श्रीमद् भगवद्‌गीता
त्रयोदशोऽध्यायः

क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगः


क्षेत्र-क्षेत्रज्ञज्ञान व त्याची प्रशंसा.

क्षेत्र-क्षेत्रज्ञरूप द्विविध प्रकृतींचे निरूपण करून तिच्या द्वारा ईश्वराच्या स्वरूपाचा निश्चय करण्यासाठी हा अध्याय आरंभिला आहे. त्याचप्रमाणे बाराव्या अध्यायाच्या शेवटी तत्वज्ञानी संन्याश्यांची निष्ठा सांगितली. ते कसे वागतात ते सांगितले, पण ते ज्या तत्वज्ञानाने युक्त होते, तसे आचरण करून भगवानास प्रिय होतात, ते तत्वज्ञान सांगण्यासाठी हा अध्याय आरंभिला जातो. हे या अध्यायाच्या आरंभाचे दुसरे प्रयोजन आहे. तसेच सुखदुःखादिरूप संसार हा आत्म्याचा धर्म नसून क्षेत्राचा धर्म आहे, इत्यादि दुसर्‍याही विशेष गोष्टींचे यांत निरूपण केले आहे.

श्रीभगवानुवाच -
इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रं इति अभिधीयते ।
एतत् यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १३-१ ॥

अन्वय : हे कौन्तेय - हे कुन्तिपुत्रा - इदं शरीरं क्षेत्रं इति अभिधीयते - हे शरीर क्षेत्र आहे असे म्हटले जाते - यः एतत् वेत्ति - जो याला जाणतो - तं क्षेत्रज्ञः इति तद्विदः प्राहुः - त्याला क्षेत्रज्ञ असे क्षेत्र-क्षेत्रज्ञवेत्ते सांगतात. १.

व्याख्या : श्रीः । क्षेत्रक्षेत्रज्ञसंज्ञकं प्रकृतिद्वयं विभागशः दर्शयितुं त्रयोदशाध्यायारंभः । तत्र तावत् क्षेत्रक्षेत्रज्ञयोः स्वरूपं सामान्यतो दर्शयति । इदं शरीरमिति । हे कौंतेय ! हे कुंतीतनय ! विद्वद्भिः पंडितैः इति शेषः । इदं भोगायतनं प्रत्यक्षत्वेन दृश्यमानं शरीरं शीर्यते क्षीयते तत् शरीरं प्रतिक्षणं विशीर्णस्वभावं क्षेत्रं धान्यनिष्पत्तिस्थानवत् धर्माधर्मोत्पत्तिहेतुभूतस्थानं इति एवं प्रकारेण अभिधीयते उच्यते । संसारस्य प्ररोहभूमित्वात् । इति क्षेत्रस्वरूपं । यः एतत् क्षेत्रं वेत्ति जानाति आत्मत्वेन अभिमन्यते अहं ममेति मन्यते सः क्षेत्रज्ञः तःकरणप्रतिफलितचैतन्यप्रमाता अस्ति । तद्विदः तौ क्षेत्रक्षेत्रज्ञौ विदंति ते तद्विदः तं क्षेत्रज्ञं प्राहुः कथयंति ॥१॥

अर्थ : श्रीभगवान् म्हणाले - हे कुंतीपुत्रा अर्जुना, हे शरीर क्षेत्र आहे, असे म्हटले जाते व त्याला जो जाणतो, तो क्षेत्रज्ञ होय, असे क्षेत्र-क्षेत्रज्ञवेत्ते सांगतात. [ क्षेत्र-क्षेत्रज्ञांना जाणणारे तत्वज्ञ या शरीराला ‘क्षेत्र’ व त्याला ‘हे मी’ किंवा ‘मी द्रष्टा आत्मा व हे माझे दृश्य’ असे जाणणारा क्षेत्रज्ञ आहे, असे सांगतात. ]

विवरण :


क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत ।
क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तत् ज्ञानं मतं मम ॥ १३-२ ॥

अन्वय : हे भारत - हे अर्जुना ! - सर्वक्षेत्रेषु क्षेत्रज्ञं मां च विद्धि - सर्व शरीररूप क्षेत्रांतील क्षेत्रज्ञ मलाच म्ह० मीच आहे असेही जाण - यत् क्षेत्रक्षेत्रज्ञयोः ज्ञानं - जे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे ज्ञान - तत् ज्ञानं मम मतम् - ते यथार्थज्ञान म्हणून मला संमत आहे. २

व्याख्या : क्षेत्रज्ञमिति । यथा जलगतसूर्यप्रतिबिंबेन जलं प्रकाशते तत् प्रतिबिंबं स्वतंत्रं न भवति किं तु व्योमगतमुख्यसूर्यपरतंत्रं तत् जलोपाधियोगात् प्रकाशकर्तृत्वेन प्रतीयते मुख्यः सूर्यः प्रकाशस्वरूपलक्षण एव जलाभासेन लक्ष्यते तथा बुद्धिप्रतिफलितचैतन्यप्रमाता क्षेत्रं प्रकाशयन् क्षेत्रज्ञः इति उच्यते । स तु क्षेत्रवत् स्वतंत्रः न भवति किं तु मत्स्वरूपज्ञानप्राप्तः क्षेत्रज्ञेन अहं मुख्यः ज्ञानस्वरूपः लक्ष्यते । हे भारत ! हे भरतान्वय ! त्वं सर्वक्षेत्रेषु सर्वाणि च तानि क्षेत्राणि च सर्वक्षेत्राणि तेषु सर्वशरीरेषु क्षेत्रज्ञं क्षेत्राणि सर्वशरीराणि जानातीति क्षेत्रज्ञः तं क्षेत्रज्ञं मां परमात्मानं विद्धि जानीहि । यथा घटाकाशे जलाकाशरूपेण महाकाशमेव वर्तमानं तथा सर्वशरीरेषु प्रत्यगाभासरूपेण मामेव क्षेत्रज्ञं जानीहि । उक्तमेव अनवद्यं निर्दोषं स्वाभिप्रायेण द्रढयति । क्षेत्रक्षेत्रज्ञयोः क्षेत्रं जडं विकारि च क्षेत्रज्ञः सत्यज्ञानानंतरूपः परमात्मा सदैकरूपः क्षेत्रक्षेत्रज्ञौ तयोः क्षेत्रक्षेत्रज्ञयोः यत् प्रसिद्धं ज्ञानं विवेकःअस्ति तत् प्रसिद्धं ज्ञानं मम मतं मान्यं । अन्यत् वृथा पांडित्यं बंधहेतुत्वादिव्यर्थः ॥२॥

अर्थ : हे अर्जुना, सर्व शरीररूप क्षेत्रांतील क्षेत्रज्ञ मी आहे, असेही जाण. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे जे ज्ञान, ते यथार्थ ज्ञान म्हणून मला संमत आहे. [ या श्लोकांत ‘च’ व ‘अपि’ असे जे दोन निपात आहेत, ते ‘जीवच अक्षर आहे’, या ज्ञानाचा ‘तो देहाहून भिन्न आहे’, या ज्ञानाशी समुच्चय करण्यासाठी आहे, यास्तव कापिल सांख्यदर्शनाप्रमाणे क्षेत्रज्ञ दृश्याहून अन्य आहे, एवढेच तू जाणू नकोस. तर ‘क्षेत्रज्ञ मीच आहे’ असेही जाण. जो सर्व क्षेत्रज्ञ आहे, तो मीच आहे असे समज. हेच सम्यग्ज्ञान आहे. ]

विवरण :


तत्क्षेत्रं यच्च यादृक्च यत् विकारि यतश्च यत् ।
स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे श्रृणु ॥ १३-३ ॥

अन्वय : तत् क्षेत्रं यत् च यादृक् च - ते क्षेत्र कोणते व कोणत्या प्रकारचे आहे आणि - यद्विकारि यतः च यत् - कोणकोणत्या विकारांनी युक्त असलेले, व ज्या कारणाचे जे कार्य आहे - च यः सः च - तसेच जो क्षेत्रज्ञ तो कोण व - यत्प्रभावः तत् मे समासेन शृणु - तो ज्या प्रभावाने युक्त आहे ते मजपासून संक्षेपतः ऐक. ३.

व्याख्या : क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यदुक्तं तदेव ज्ञानं सामान्यतः विभागेन दर्शयति । तत्क्षेत्रमिति । यत् इदं शरीरं मया उक्तं तत् क्षेत्रं विद्धि । यत् स्वरूपतः जडं दृश्यादिस्वभावं यादृक् यादृशं इच्छादिधर्मकं यद्विकारि यैः विकारैः इंद्रियादिविकारैः युक्तं यद्विकारि यतः यस्मात् प्रकृतिपुरूषयोगात् भवति यत् यैः स्थावरजंगमादिभेदैः भिन्नं अस्ति । यच्छब्दः प्रत्येकविशेषणसंबंधार्थः । स च क्षेत्रज्ञः यः स्वरूपतः यत्प्रभावः अचिंत्यैश्वर्ययोगेन यैः प्रभावैः संपन्नः अस्ति तत् सर्वं समासेन संक्षेपतः मे मत्तः त्वं शृणु । चकारपंत्रकं उभयविशेषणसमुच्चयार्थम् ॥३॥

अर्थ : ते क्षेत्र कोणते ? कोणत्या प्रकारचे ! कोणकोणत्या विकाराने युक्त असलेले, ते ज्या कारणाचे कार्य आहे, त्याचप्रमाणे क्षेत्रज्ञ कोण ? तो कोणत्या प्रभावाने युक्त आहे ! ते मजपासून ऐक. [ क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे हे अशाप्रकारचे यथार्थ स्वरूप तू वाक्यावरून संक्षेपतः ऐक व त्याविषयी निश्चय कर, असा याचा भावार्थ. ]

विवरण :


ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिः विविधैः पृथक ।
ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्‌भिः विनिश्चितैः ॥ १३-४ ॥

अन्वय : ऋषिभिः बहुधा गीतं - वसिष्ठादि ऋषींनी अनेक प्रकारांनी गायलेले - विविधै छन्दोभिः पृथक् (गीतं) - नानाप्रकारच्या वेदांनी अगदी विवेकतः गायलेले - हेतुमद्‌भिः विनिश्चितैः - आणि युक्तियुक्त अत्यंत निश्चित अशा - ब्रह्मपदैः एव (बहुधा गीतं) - ब्रह्मसूत्रपदांनी अनेक प्रकारे गायलेले असे हे आहे. ४

व्याख्या : तत्र क्षेत्रस्वरूपं वदन् ‘ समासेन शृणु ’ इति यदुक्तं तत्तावत् कैः विस्तरेण उक्तं तस्य अयं विस्तारः इत्यपेक्षायामाह । ऋषिभिरिति । ऋषिभिः वसिष्ठादिऋषिभिः योगशास्त्रेषु तत्साधनांगत्वेन बहुधा बहुप्रकारेण विस्तरेण गीतं उक्तम् । तथा विविधैः कर्मोपासनाज्ञानकांडप्रकारैः नित्यनैमित्तिककाम्यविषयैः छंदोभिः वेदैः पृथक् इष्टानिष्टमिश्रकर्मफलाधिकारविभागेन गीतं कथितम् । किं च ब्रह्मसूत्रपदैः ब्रह्म सूत्र्यते सूच्यते एभिरिति सूत्राणि तत्रस्थलक्षणपराणि उपनिषद्वाक्यानि ब्रह्म पद्यते ज्ञायते साक्षात्क्रियते एभिरिति पदानि ‘ सत्यं ज्ञानं अनंतं ’ इत्यादीनि वाक्यानिसूत्रपदानि ब्रह्मणः सूत्रपदानि ब्रह्मसूत्रपदानि तैः बहुधा उत्पत्त्याद्यभिधानेन गीतम् । किं च हेतुमद्‌भिः शरीरोत्पत्तिस्थितिव्यवहारवाक्यकारणैः विनिश्चितैः एकवाक्यतया असंदिग्धार्थप्रतिपादकैः गीतं कथितम् ॥४॥

अर्थ : ते वसिष्ठादि ऋषींनी अनेक प्रकारे गायिलेले आहे, म्हणजे क्षेत्रक्षेत्रज्ञांचे याथात्म्य त्यांनी बहुतप्रकारे कथन केले. अनेक शाखाभेदांनी विविध झालेल्या वेदांनी त्यांचे वर्णन केले. तसेच उपनिषदांतील युक्तियुक्त व अत्यंत निश्चित अशा ब्रह्मसूचक पदांनी त्याचे उपपादन केले आहे.

विवरण :


क्षेत्राचे स्वरूप.

महाभूतानि अहंकारो बुद्धिः अव्यक्तमेव च ।
इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥ १३-५ ॥
इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः ।
एतत्क्षेत्रं समासेन सविकारं उदाहृतम् ॥ १३-६ ॥

अन्वय : महाभूतानि अहंकारः बुद्धिः अव्यक्तं एव च - पृथिव्यादि पंच महाभूतें, त्यांचे कारण अहंकार, त्याचे कारण निश्चयात्मिका बुद्धि, आणि बुद्धिचें कारण अव्यक्त - दश (च) एकं च इन्द्रियाणि च पंच इन्द्रियगोचराः - दहा व एक अशी अकरा इंद्रियें आणि पांच इंद्रियांचे विषय - इच्छा द्वेषः सुखं दुःखं - सुखाला कारण झालेल्या पदार्थाला ग्रहण करण्याची इच्छा, प्रतिकूल पदार्थाविषयी द्वेष, अनुकूल असलेले सुख, अप्रिय वाटणारे दुःख - संघातः चेतना धृतिः - शरीर व इंद्रिये यांचा समुदाय, देहांत व्यक्त झालेली चिदाभासयुक्त अंतःकरणवृत्ति व धैर्य - एतत् क्षेत्रं समासेन सविकारं उदाहृतम् - हे क्षेत्र संक्षेपतः विकारांसह सांगितले आहे. ५, ६

व्याख्या : इदानीं प्रकृतं सविशेषं शरीरस्वरूपं क्षेत्रस्वरूपं आह द्वाभ्याम् । महाभूतानीति । महाभूतानि पृथिव्यप्तेजोवाय्वाकाशानि अहंकारः तत्कार्यभूतः द्रव्यज्ञानक्रियाशक्तिमान् बुद्धिः निश्चयात्मिका वृत्तिः चेत्यपरं अव्यक्तं तत्कारणभूतं अविद्याख्यं अज्ञानं दश इंद्रियाणि पंच ज्ञानेंद्रियाणि पंच कर्मेंद्रियाणि एवं च दशेंद्रियाणि एकं मनः साधारणेंद्रियं चेत्यपरं पंच इंद्रियगोचराः तत्तद्द्वारा आविर्भूताः शब्दादयः शब्दस्पर्शरूपरसगंधाः ॥५॥
तदेव प्रकारेण चतुर्विंशतितत्त्वानि उक्तानि । इच्छेति । इच्छा प्राप्तस्य उत्कंठा द्वेषः प्रतिकूले द्वेषः सुखं अनुकूलं दुःखं तद्विपरीतम् । इच्छादीन्यपि साक्षिदृश्यत्वात् क्षेत्रांतःपातीनि । संघातः उक्तेषु सर्वेषु तादात्म्याभिनः चेतना ज्ञानात्मिका मनोवृत्तिः विषयस्फूर्त्तिः सापि साक्षिदृश्यत्वात् क्षेत्रांतःपातिनी धृतिः परस्परविरूद्धेषु महाभूतादिषु तत्तद्विरोधप्रतिबंधेन अवष्टंभकसामर्थ्यं एतत् ‘ महाभूतानीत्यादि धृत्यंतं’ क्षेत्रं सविकारं विकारेण इंद्रियादिविकारेण सहितं युक्तं सविकारं मया तुभ्यं समासेन संक्षेपेण उदाहृतं कथितम् । केषांचिन्मते तत्त्वाधिक्यगणनाभिप्रायेण अयं संक्षेपः ज्ञातव्यः ॥६॥

अर्थ : पृथ्व्यादि पंच सूक्ष्म भूते; त्यांचे कारण अहंकार; त्यांचे कारण निश्चयात्मिका बुद्धि; बुद्धीचे कारण अव्यक्त; दहा व एक अशी अकरा इंद्रिये; पांच इंद्रियांचे विषय; सुखाला कारण होणार्‍या पदार्थांचे ग्रहण करण्याची इच्छा, प्रतिकूल पदार्थांविषयी द्वेष, अनुकूल असलेले सुख, अप्रिय वाटणारे दुःख, सर्व देहांत व्यक्त झालेली चिदाभासयुक्त अंतःकरणवृत्ति व धैर्य, हे शरीर संक्षेपतः विकारांसह सांगितले आहे. [ येथे सांगितलेले सूक्ष्म भूतादि पदार्थ, अव्यक्तापर्यंत कारणे व पुढील सर्व कार्ये हेच क्षेत्र आहे. ]

विवरण :


अमानित्वादि ज्ञानसाधने.

याप्रमाणे क्षेत्राचे व्याख्यान केल्यावर आता क्षेत्रज्ञाचे व्याख्यान करणे उचित आहे. पण त्यापूर्वी भगवान् अमानित्वादि ज्ञानसाधनांचा उपदेश करतात -

अमानित्वं अदंभित्वं अहिंसा क्षान्तिः आर्जवम् ।
आचार्योपासनं शौचं स्थैर्यं आत्मविनिग्रहः ॥ १३-७ ॥

अन्वय : अमानित्वं - मी मोठा आहे, मी विद्वान् आहें इत्यादि आत्मश्लाघा करणें व स्वतःला तसें समजणे, हें मानित्व होय, पण तसा मानीपणा न धरणे - अदंभित्व - खरोखर धार्मिक नसतांना तसा आव आणणे, वरवर धार्मिकता प्रकट करणें, हा दांभिकपणा आहे, तसा दांभिकपणा न दाखविणे, - अहिंसा - प्राण्यांना पीडा न देणे , - क्षान्ति - दुसऱ्याने अपराध केला असतांही मनांत क्रोध हा विकार उत्पन्न होऊं न देणे, - आर्जवं - अन्तःकरणाचा सरळपणा, - आचार्योपासनं - मोक्षाच्या साधनांचा उपदेश करणाऱ्या आचार्यांची शुश्रूषा वगैरे करणे, - शौच - शरीराचे मल पाण्यानें वगैरे धुऊन टाकणे व मनाचे रागादि मल वैराग्यादिकांनी घालविणे असें हें दोन प्रकारचे शौच, शुद्धि, - स्थैर्यं - मोक्षमार्गाविषयीच दृढनिश्चय - आत्मविनिग्रहः - शरीरेंद्रियसमूहाला असन्मार्गापासून परतवून सन्मार्गातच ठेवणें ( ही सर्व ज्ञानाची साधने आहेत, असा पुढे याचा संबंध आहे.) ७

व्याख्या : क्षेत्रक्षेत्रज्ञयोः मध्ये क्षेत्रस्वरूपं संक्षेपेण उक्तम् । क्षेत्रज्ञस्य मुख्यं स्वरूपं अहमेव तत्स्वरूपं ज्ञानैकगम्यं इति मत्वा उपायत्वेन ज्ञानसाधनानि आह । अमानित्वमिति । अमानित्वं मानः अविवेकाद्वारेण अहंभावः यस्यास्तीति मानी मानिनः भावः मानित्वं न मानित्वं अमानित्वं देहाद्यभिमानादिराहित्यं अदंभित्वं दंभः देहोद्देशेन धर्मातिशयप्रदर्शकः यस्यास्तीति दंभी दंभिनः भावः दंभित्वं न दंभित्वं अदंभित्वं ज्ञानसाधनत्वेन ज्ञानं अहिंसा न हिंसा अहिंसा मनोवाक्कायजन्याभिः संकल्पवचनक्रियाभिः परपीडाराहित्यं क्षांतिः आकृष्टे ताडितेपि क्षमा आर्जवं सर्वत्र कौटिल्यराहित्येन ऋजुता आचर्योपासनं आचार्यस्य अंतर्यामिणः गुरोः उपासनं सेवा आचार्योपासनं गुरोः देहे वर्तमाने सति शब्दस्पर्शरूपरसगंधादिभोगपर्यवसानाधिष्ठानानुचिंतनम् । एवं जीवता म्रियमाणेनापि अनुसंधानं सेवनं शौचं बाह्याभ्यंतरभेदेन द्विविधं मृज्जलाभ्यां बाह्यं शौचं अंतः भावशुद्धिः अंतः शौचम् । शौचस्य ज्ञानाभिसाधनमिति भावः । स्थैर्यं स्थूलदेहचेष्टाराहित्यम् । तत्र हेतुत्वं न । ज्ञानसाधनांतरमाह । आत्मविनिग्रहः आत्मनः मनसः विनिग्रहः विविधसंकल्परूपपरित्यागेन अत्यंतग्रहणं आत्मविनिग्रहः मनोनिरोधः स्थूलदेहक्रियाणां मनोधीनत्वात् । मनसे निरूद्धे सति तत्स्थैर्यं इति भावः । अस्मिन् श्लोके नव ज्ञानसाधनानि उक्तानि ॥७॥

अर्थ :

विवरण : मी मोठा आहे, इत्यादि आत्मश्लाघा करणे व स्वतःलाच तसे समजणे, हे मानित्व आहे. पण १ तसा मानीपणा न करणे; खरोखर धार्मिक नसतांना तसा आव आणणे, वरवर धार्मिकता प्रकट करणे हा दांभिकपणा आहे, तसा २ दांभिकपणा न दाखविणे; ३ प्राण्यांना पीडा न देणे; ४ दुसर्‍याने अपराध केला असतांही मनांत क्रोध हा विकार उत्पन्न होऊ न देणे; ५ अंतःकरणाचा सरलपणा; ६ मोक्षाच्या साधनांचा उपदेश करणार्‍या आचार्यांची शुश्रूषा करणे; ७ शरीराचे मल जलाने धुवून टाकणे आणि मनाचे रागादि मल वैराग्यादिकांनी घालविणे, असे हे दोन प्रकारचे शौच म्ह. शुद्धि; ८ मोक्षमार्गाविषयी दृढ निश्चय; ९ शरीरेंद्रियसमूहाला असन्मार्गापासून परतवून सन्मार्गातच ठेवणे;


इन्द्रियार्थेषु वैराग्यं अनहंकार एव च ।
जन्ममृत्युजराव्याधि दुःखदोष अनुदर्शनम् ॥ १३-८ ॥

अन्वय : इंद्रियार्थेषु वैराग्यं - ऐहिक व पारलौकिक विषयांविषयी वैराग्य - अनहंकार: एव च - आणि गर्वरहित, मी अमुक अमुक अशा प्रकारचा आहे, असा केव्हांहि गर्व,अभिमान न वाहणें - जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनं - जन्म, मरण, म्हातारपण, रोग व दुःख या प्रत्येकांतील दोषांचा विचार करणे वा जन्ममरण, जरा, रोग यांतील असह्य दुःख, ह्याच दोषाचें चिंतन करणे; ( ही ज्ञानसाधनें आहेत.) ८

व्याख्या : इंद्रियार्थेष्विति । किंच इंद्रियार्थेषु इंद्रियाणां अर्थाः शब्दादिविषयाः इंद्रियार्थाः तेषु वैराग्यं तन्मिथ्यादर्शनेन वैतृप्ण्यं अनहंकारः अहंकारः कर्ता भोक्तास्मीति विकारित्वं न भवतीति अनहंकारः । एव च इति निपातौ पादपूर्णार्थौ अथवा निश्चयसमुच्चयार्थौ । जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनं जन्म च मृत्युश्च जरा च व्याधिश्च जन्ममृत्युजराव्याधयः जन्ममृत्युजराव्याधीनां दुःखं जन्ममृत्युजराव्याधिदुःखं तेन दोषानुदशनम् । जन्मनः दुःखम् - जननीजठरे मलमूत्रकुस्थलजनकजननीशुक्रशोणितोद्भवस्य जरायुणा पाशितसर्वगात्रस्य उदरस्थसूचीमुखजंतुसंविद्धातिकोमलत्वचः नवदशमासावधि गर्भाशयस्य दोहदापेक्षिताशीतपीततीव्ररससंतप्तचर्मणः प्रसूतिवातनिःसारितातिसूक्ष्मयोनियंत्रनिष्पीडितस्थूलदेहस्य अधोमुखभूपतितस्य मलमूत्रदिग्धसर्वांगस्य यूकामत्कुणादिदूषितशय्याशयानस्य उदरवेदनायां दत्तस्तनस्य क्षुब्दोधे दत्तनिंबादिरसस्येति जन्मनः दुःखदोषदर्शनम् । मृत्युदोषः - अंतकालेयमदूतैःभृशं पापबद्धस्य जायापुत्राद्याकृष्टमनसःतद्वृत्तिव्याकुलितस्य स्थूलदेहादाकृष्य भृशं कशाताडितस्य नानायातनानुभवतः इति मृत्योः दोषदर्शनम् । जरायाः - सर्वत्र अप्रियदर्शनायाः वलीपलितदूतिकायाः मूलव्याधिगजारूढायाः वातकंपिशिरःपताकायाः डिंडिरवत् उपवनवत् शिरोरूहमल्लिकायाः कर्णमूलयोः श्रुम्रालकचमरयुग्मलंबितायाः श्लेष्मबिंदुमुक्ताशोभीतनासाग्रभागायाः विगतदंतदिगंतायाः सततारोहणावरोहणाधरहनुनर्त्तकीनृत्यतोषितायाः कफरूद्धकंठघोरविटंकितवीणायाः ऊर्ध्वश्वासतालमृदंगध्वनितोषितायाः ध्वस्तजाठरदीपिकाद्याः मुखलालापूरितोरस्कायाः मलमूत्ररंजितपटायाः अधोवातभेरीघोषितदिगंतायाः नानाधिपरिवारितपरिचरिकायाः इति जरायाः दुःखदोषदर्शनम् । व्याधिदुःखदोषाः - नानोदरमस्तकनयनकटिपाणिपादवेदनाज्वरदिव्याधीनां दुःखदोषदर्शनम् । तथा त्रिविधतापदुःखदर्शनम् । जन्मादिदुःखदोषदर्शनेन देहे विरागोत्पत्तिद्वारा आत्मजिज्ञासाभिमुखस्य जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनं ज्ञानसाधनत्वात् ज्ञानम् । अस्मिन् श्लोके त्रीणि ज्ञानसाधनानि ॥८॥

अर्थ : १० ऐहिक व पारलौकिक विषयांविषयी वैराग्य; ११ मी अमुक अमुक अशा प्रकारचा आहे, असा गर्व म्ह. अभिमान केव्हाही न वहाणे; १२ जन्म-मरण, जरा, रोग व दुःख या प्रत्येकांतील दोषांचा विचार करणे किंवा जन्म, मरण, जरा, रोग यांतील असह्य दुःख, यांच दोषांचे चिंतन करणे;

विवरण :


असक्तिः अनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु ।
नित्यं च समचित्तत्वं इष्टानिष्टोपपत्तिषु ॥ १३-९ ॥

अन्वय : असक्तिः - विषयांवर प्रीति न ठेवणे, - पुत्रदारगृहादिषु अनभिष्वंगः - पुत्र, स्त्री, गृह इत्यादिकांमध्ये अत्यंत आसक्ति न ठेवणे, - च इष्टानिष्टोपपत्तिषु - आणि इष्ट व अनिष्ट यांची प्राप्ति झाली असतां, - नित्यं समचित्तत्वं - नेहमी समचित्त ठेवणे, ( इष्टप्राप्तीने हृष्ट न होणे व अनिष्टप्राप्तीने खिन्न न होणें ही ज्ञानसाधने आहेत.) ९

व्याख्या : असक्तिरिति । किंच पुत्रदारगृहादिषु पुत्राश्च दाराः स्त्रियश्च गृहाश्च पुत्रदारगृहाः पुत्रदारगृहाः आदयो येषां धनादीनां ते पुत्रदारगृहादयः तेषु आसक्तिः न सक्तिः असक्तिः प्रीतित्यागः एकं ज्ञानसाधनम् । तथा पुत्रादिषु अनभिष्वंगः अभिष्वंगो नाम तेषां पुत्रादीनां सुखे जाते सति अहमेव सुखी इति अध्यासातिरेकः न भवतीति अनभिष्वंगः द्वितीयम् । इष्टानिष्टोपपत्तिषु सत्सु इष्टं अनुकूलं च अनिष्टं प्रतिकूलं इष्टानिष्टे इष्टानिष्टयोः उपपत्तयः प्राप्तयः इष्टानिष्टोपप्त्तयः तासु इष्टानिष्टोपपत्तिषु नित्यं सर्वदा समचित्तत्वं समे ब्रह्मणि चित्तं अंतःकरणं यस्य सः समचित्तः समचित्तस्य भावः समचित्तत्वं तृतीयम् । अस्मिन् श्लोके त्रिणि ज्ञानसाधनानि ॥९॥

अर्थ : १३ विषयांवर प्रीति न ठेवणे; १४ पुत्र, स्त्री, गृह इत्यादिकांमध्ये अत्यंत आसक्ति न ठेवणे आणि १५ इष्ट व अनिष्ट यांची प्राप्ति झाली असतां नेहमी समचित्त ठेवणे; ( इष्ट प्राप्तीने हृष्ट न होणे व अनिष्ट प्राप्तीने खिन्न न होणे. )

विवरण :


मयि चानन्ययोगेन भक्तिः अव्यभिचारिणी ।
विविक्तदेशसेवित्वं अरतिः जनसंसदि ॥ १३-१० ॥

अन्वय : च मयि अनन्ययोगेन अव्यभिचारिणी भक्तिः - आणि माझ्या ठिकाणी अनन्ययोगानें म्ह. वासुदेवाहून श्रेष्ठ कोणी नाही, अशा चित्तसमाधानाने अढळ भक्ति - विविक्तदेशसेवित्वं - एकांत, निर्भय, पवित्र प्रदेशांत राहणें, अरण्य, नदीकांठ इत्यादि प्रदेशाचे सेवन करणे, - जनसंसदि अरतिः - सामान्य जनांच्या समूहात मिसळण्याची आवड नसणे, ही ज्ञानसाधने आहेत. १०.

व्याख्या : मयीति । मयि परमेश्वरे ब्रह्मणि अनन्ययोगेन न अन्यः अनन्यः अनन्यश्चासौ योगश्च अनन्ययोगः तेन सर्वात्मभावेन अव्यभिचारिणि व्यभिचारिणि न भवति सा अव्यभिचारिणि दृश्याननुविद्धा भक्तिः भजनम् । विविक्तदेशसेवित्वं विविक्तः एकांतश्चासौ देशश्च विविक्तदेशः विविक्तदेशं सेवितु शीलं यस्य सः विविक्तदेशसेवी विविक्तदेशसेविनः भावः विविक्त देशसेवित्वम् । जनसंसदि जनानां प्राकृतजनानां संसद् सभा जनसंसद् तस्यां जनसंसदि प्राकृतजनसभायां अरतिः अप्रीतिः । अत्रापि त्रीणि ज्ञानसाधनानि ॥१०॥

अर्थ : १६ माझ्या ठिकाणी अनन्ययोगाने म्ह. वासुदेवाहून श्रेष्ठ कोणी नाही, तोच आमची गति आहे, अशा चित्तसमाधानाने अढळ भक्ति; १७ एकान्त, निर्भय, पवित्र प्रदेशात रहाणे, म्ह. अरण्य, नदीकांठ इत्यादि प्रदेशांचे सेवन करणे; १८ सामान्य प्राकृतजनांच्या समूहांत मिळण्याची आवड नसणे;

विवरण :


अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् ।
एतत् ज्ञानं इति प्रोक्तं अज्ञानं यदतोऽन्यथा ॥ १३-११ ॥

अन्वय : अध्यात्मज्ञाननित्यत्वं - आत्मा व अनात्मा यांच्या विवेकज्ञानांमध्यें सतत गढून जाणे व - तत्त्वज्ञानार्थदर्शनं - तत्त्वज्ञानाचा अर्थ वा फल जो मोक्ष, त्याचें आलोचन करणे - एतत् ज्ञानं इति प्रोक्तं - हें सर्व ज्ञान म्हणजे ज्ञानाचे साधन आहे, असें सांगितले आहे - यत् अत: अन्यथा ( तत्) अज्ञानं - जें याच्या उलट, ते अज्ञान होय. ११

व्याख्या : अध्यात्ममिति । किं च अध्यात्मज्ञाननित्यत्वं आत्मानं अधिकृत्य वर्तमानं ज्ञानं अध्यात्मज्ञानं अध्यात्मज्ञाने नित्यत्वं अध्यात्मज्ञाननित्यत्वं आत्मविचारे चित्तस्य संततो भावः पदार्थशोधने नैरंतर्यम् । तत्त्वज्ञानार्थदर्शनं तत्त्वानां ज्ञानं तत्त्वज्ञानं तत्त्वज्ञानस्य अर्थः प्रयोजनं वाच्यार्थपरित्यागेन अखंडैकरसत्वेन अवस्थानं तत्त्वज्ञानार्थः तत्त्वज्ञानार्थस्य दर्शनं अनुभवापादनं तत्त्वज्ञानार्थदर्शनं तत्तु संप्रदायप्रवर्त्तकैः पूर्वाचार्यैरेव प्रदर्शितम् । मोक्षस्य सर्वोत्कृष्टतालोचनमित्यर्थः । एतत् अमानित्वमदंभित्वमित्यादि तत्त्वज्ञानार्थदर्शनमित्यंतं विंशतिसंख्याकं ज्ञानसाधनत्वात् ज्ञानं इति मया सर्वज्ञेन प्रोक्तं कथितम् । अतः उक्तात् अमानित्वादितत्त्वज्ञानार्थदर्शनसमुदायात्यत् अन्यथा विपरीतं अज्ञानमपि मया प्रोक्तं इति अनुषंगेन ज्ञेयं ॥११॥

अर्थ : १९ आत्मा व अनात्मा यांच्या विवेकज्ञानामध्ये सतत गढून जाणे व २० तत्वज्ञानाचा अर्थ-फल जो मोक्ष, त्याचे आलोचन करणे हे सर्व ज्ञान म्हणजे ज्ञानाचे साधन आहे असे सांगितले आहे. जे याच्या उलटअसलेले मानित्व, दंभित्व, हिंसा, क्रोध, इत्यादि ते अज्ञान होय.

विवरण :


ज्ञेयाचे स्वरूप.

या ज्ञानाने जाणण्यास योग्य असे काय आहे ते सांगतात -

ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यत् ज्ञात्वा अमृतमश्नुते ।
अनादि मत्परं ब्रह्म न सत् न असत् उच्यते ॥ १३-१२ ॥

अन्वय : यत् ज्ञेयं तत् प्रवक्ष्यामि - जे ज्ञेय ते मी सांगतो. - यत् ज्ञात्वा अमृतं अश्नुते - जे जाणून अमरणभावास प्राप्त होतो. - अनादिमत् परं ब्रह्म - जे आदिमत् नसलेलें निरतिशय ब्रह्म तें ज्ञेय होय. - तत् न सत् न असत् उच्यते - ते सत् म्हटलें जात नाहीं व असत् म्हटलें जात नाही. १२

व्याख्या : एभिः साधनैः यत् ज्ञेयं तदाह । ज्ञेयमिति । यत् प्रसिद्धं ज्ञेयं ज्ञातुं योग्यं ज्ञेयं ज्ञानविषयं अस्ति तत् ज्ञेयं अहं प्रवक्ष्यामि प्रकर्षेण वक्ष्यामि कथयिष्यामि इति प्रतिज्ञाय तत् ज्ञाने किं फलं इत्यपेक्षायामाह । पुमान् यत् ज्ञेयं ज्ञात्वा स्वयमेव अनुभूय अमृतं मरणरहितं ब्रह्म मोक्षं अश्नुते प्राप्नोति । पूर्वसिद्धः तद्रूप एव भवतीत्यर्थः । किं तत् ज्ञेयम् । अनादिमत् आदि विद्यते यस्य तत् आदिमत् आदिमत् न भवति तत् अनादिमत् परं निरतिशयं ब्रह्म यद्वा अनादि न विद्यते आदिः कारणं वा उत्पत्तिः यस्य तत् अनादि अकार्यकारणं मत्परं अहमेव उत्कृष्टं यस्य तत् मत्परं ब्रह्म बृहत्वात् व्यापकं असत्यमपि सत्यपरतया वर्धयतीति यावत् तत् ब्रह्म सत् स्थूलं तत् ब्रह्म असत् सूक्ष्मं नोच्यते तत् कार्यकारणविलक्षणं उच्यते ॥१२॥

अर्थ : जे ज्ञेय ते मी सांगतो. ते जाणून पुरुष अमरभावास प्राप्त होतो. जे आदिमत नसलेले निरतिशय ब्रह्म ते ज्ञेय होय. ते सत् म्हटले जात नाही व असत् ही म्हटले जात नाही. [ जी अवश्य ज्ञातव्य वस्तु ती ज्ञेय होय. तिला जाणून मोक्ष मिळतो. अनादि परब्रह्मच अवश्य ज्ञातव्य आहे. त्याला सत् किंवा असत् म्हणता येत नाही. ती ज्ञेय वस्तु सर्व विशेषशून्य आहे. त्यामुळे तिचा उपदेश असाच करता येणे शक्य आहे. ब्रह्मात्मप्रकाश सिद्ध आहे. त्यामुळे त्याचा उपदेश विधिमुखाने करता येत नाही. वेदान्तामध्येही त्याच्यावर आरोपिलेल्या धर्माची निवृत्ति करण्यासाठी, त्याचा निषेधमुखानेच उपदेश केला आहे. ]

विवरण :


ज्ञेय ब्रह्म ‘सत्’ हा शब्द व ‘सत्’ असा प्रत्यय यांचा विषय होत नसल्यामुळे ‘ते मुळी नाहीच’ अशी शंका आली असतां सर्व प्राण्यांची इंद्रिये याच उपाधीच्या द्वारा प्रतिपादन करतात -

सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोऽक्षि शिरोमुखम् ।
सर्वतः श्रुतिमत् लोके सर्वं आवृत्य तिष्ठति ॥ १३-१३ ॥

अन्वय : तत् - ते ज्ञेय - सर्वतःपाणिपादं - सर्व बाजूंनी ज्याला हातपाय आहेत, असें आहे - सर्वतः अक्षिशिरोमुखं - सर्व बाजूंनी ज्याला नेत्र, मस्तकें व मुखे आहेत, असें आहे - सर्वतःश्रुतिमत् - ज्याला सर्व बाजूंनी श्रवणेंद्रियें आहेत, असे आहे - लोके सर्वं आवृत्य तिष्ठति - या प्राणिसमूहांत सर्वांला व्यापून तें तत्त्व रहाते. १३

व्याख्या : सर्वतः इति । कीदृशं तत् ज्ञेयं तदाह । सर्वतःपाणिपादं पाणयः हस्ताः च पादाः चरणाः पाणिपादाः सर्वतः ब्रह्मांडगोले ब्रह्मादिपिपीलिकानां पाणिपादाः यस्य तत् सर्वतः पाणिपादम् । सर्वतोक्षिशिरोमुखं अक्षीणि नेत्राणि च शिरांसि मस्तकानि च मुखानि आननानि अक्षिशिरोमुखानि सर्वतः ब्रह्मांडगोले ब्रह्मादिपिपीलिकानां अक्षिशिरोमुखानि यस्य तत् सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमत् सर्वतः ब्रह्मांडगोले ब्रह्मादिपिपीलिकानां श्रुतयः श्रोत्राणि विद्यंते यस्य तत् सर्वतःश्रुतिमत् । ननुअनेकस्य अनेकप्राणिसंबंधिनः पाणिपादादयः कथं वक्तुं शक्याः इत्याशंक्य सुवर्णखचितानेकमूर्त्तीनां अवयवाः सुवर्णस्येव इति अभिप्रायेणाह । सर्वं भूतभौतिकं मृदादिवत् तन्मयविकारं आवृत्य अंतर्बहिर्व्याप्य तिष्ठति ॥१३॥

अर्थ : ते ज्ञेय सर्व बाजूंनी ज्याला हात-पाय आहेत, असे आहे. सर्व बाजूंनी ज्याला नेत्र, मस्तके, व मुखे आहेत, असे आहे. ज्याला सर्व बाजूंनी श्रवणेंद्रिये आहेत, असे आहे. ते तत्व या प्राणिसमूहांत सर्वाला व्यापून रहाते. [ ज्ञेय ब्रह्माचे केवल सानिध्याने इंद्रियादि सर्वांना आपापल्या कार्यांत प्रवृत्त करण्याचे जे सामर्थ्य, त्याच्या सत्तेनेच हस्त-पादादिक वस्तु घेणे, चालणे, इत्यादि आपापले व्यवहार करू शकतात. त्यामुळे हस्त-पादादि ज्ञेयब्रह्माच्या अस्तित्वाची सूचक चिन्हे आहेत. म्हणून हस्त-पादादिक हे त्या ज्ञेयाचेच अवयव आहेत, असे उपचाराने म्हटले आहे. येथील अक्षि व श्रवण या इंद्रियांचे ग्रहण बाकीच्या ज्ञानेंद्रियांच्या उपलक्षणार्थ; पाणि, पाद, मुख यांचे ग्रहण कर्मेंद्रियांच्या उपलक्षणार्थ आणि मन व बुद्धि यांचे ग्रहण अन्तरींद्रियांच्या उपलक्षणार्थ केले आहे. एकच तत्व सर्व सृष्टीला व्यापून रहात असल्यामुळे त्याने सर्वत्र इंद्रियादिकांनी युक्त असणे, यांत काहीच विरोध नाही. ]

विवरण :


पण ते ज्ञेय ब्रह्म खरोखरच हात, पाय इत्यादि अवयवांनी युक्त आहे, असे कोणाला वाटू नये म्हणून सांगतात -

सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् ।
असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥ १३-१४ ॥

अन्वय : सर्वेन्द्रियगुणाभासं - ज्याचा अवभास = प्रकाश सर्व इंद्रियांच्या गुणांनी होतो; पण जे वस्तुतः - सर्वेन्द्रियविवर्जितं - सर्व इंद्रियांनी रहित आहे, त्यामुळें - असक्त च एव - कोठेंहि आसक्त न होणारे तथापि - सर्वभृत् - सर्वांना धारण करणारे, सर्वांचे अधिष्ठान, - निर्गुणं च गुणभोक्तृ - ते गुणरहित आहे; पण गुणांचा म्ह० सुख, दुःख व मोह या कार्याचा भोग घेणारें असे हे ज्ञेय आहे. १४

व्याख्या : किंच सर्वेंद्रियगुणाभासं सर्वाणि च तानि इंद्रियाणि ज्ञानकर्मेंद्रियाणि सर्वेंद्रियाणि सर्वेंद्रियाणां गुणाः शब्दादयः सर्वेंद्रियगुणेषु भासत इति सर्वेंद्रियगुणाभासं अथवा सर्वेंद्रियगुणानां आभासः कांतयः यस्मात् तत् अथवा सर्वेंद्रियगुणान् भासयति तत् । सर्वेंद्रियविवर्जितं सर्वाणि च तानि इंद्रियाणि च सर्वेंद्रियाणि सर्वेंद्रियैः ज्ञानकर्मेंद्रियैः विवर्जितं रहितं सर्वेंद्रियविवर्जितम् । ‘ अपाणिपादो जवनो गृहीता पश्यत्यचक्षुः स शृणोत्यकर्णः ’ इति श्रुतेः । असक्तं संगेषु सक्तं न भवति तत् असक्तं संगशून्यम् । तथापि एवं सत्यपि सर्वभृत् सर्वं भूतभौतिकं बिभर्ति तत् सर्वभृत् रज्जुसर्पवत् सर्वापादानत्वेन सर्वाधारमिति भावः । निर्गुणं सत्त्वादिगुणविलक्षणं गुणभोक्तृ गुणानां सत्वादीनां भोक्तृ पालकं गुणभोक्तृ ॥१४॥

अर्थ : ज्याचा प्रकाश सर्व इंद्रियांच्या गुणांनी होतो, पण जे वस्तुतः सर्व इंद्रियांनी रहित आहे. त्यामुळे कोठेही आसक्त न झालेले, तथापि सर्वांना धारण करणारे व सर्वांचे अधिष्ठान, असे ते गुणरहित आहे. पण गुणांचा सुख-दुःख व मोह या कार्याचा भोग घेणारे आहे. [ ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, बुद्धि व मन या उपाधिभूत सर्व इंद्रियांच्या गुणांनी म्ह. श्रवणादि, भाषणादि, निश्चय व संकल्प या क्रियांनी ते भासते. सर्व इंद्रियांच्या व्यापारांनी जणुकाय ते व्यापारयुक्त असल्यासारखे दिसते. पण स्वतः स्वरूपाने सर्व इंद्रियरहित आहे. त्यामुळेच असक्त म्ह. सर्वसंबंधशून्य आहे. तथापि सर्वभूत्-स्वतःच्या केवल सत्तेने अधिष्ठानत्वाने सर्वांचे पोषण करते. ते निर्गुण-सत्व, रज व तम या गुणांनी रहित आहे. तथापि शब्दादि विषयांच्या द्वारा सुख, दुःख व मोह यांच्या आकारांनी परिणत झालेल्या गुणांचा अनुभव घेणारे आहे. ]

विवरण :


बहिः अन्तश्च भूतानां अचरं चरमेव च ।
सूक्ष्मत्वात् तत् अविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् ॥ १३-१५ ॥

अन्वय : भूतानां बहिः च अन्तः - सर्व प्राण्यांच्या बाहेर व आत आहे. तेंच - अचरं च चरं एव - अचर आहे आणि चरही आहे. - तत् सूक्ष्मत्वात् अविज्ञेयं - ते ज्ञेय सूक्ष्म असल्यामुळें विशेषतः ज्ञेय होत नाही. त्याचे झाड, दगड यांप्रमाणें प्रत्यक्ष ज्ञान होत नाही - तत् च दूरस्थं च अन्तिके - ते अज्ञदृष्ट्या अत्यंत दूर आहे व ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीनें अगदीं जवळ, हृदयांत आहे. १५

व्याख्या : बहिरंतरिति । किंच कीदृशं तत् ज्ञेयं भूतानां चराचराणां अंतः चेत्यपरं बहिः सत्तास्फुरणरूपेण वर्तमानं भूतसृष्टेः पूर्वं कारणरूपेण भूतेषु अवस्थानं अंतःशब्देन गृह्यते । सृष्टेः ऊर्ध्वं कार्यरूपेणैव भूतेषु अवस्थानं बहिःशब्देन गृह्यते । एवं च सति ज्ञेयव्यतिरिक्तं किमपि नास्तीति ध्वनितम् । किंच अचरं चरं न भवति तत् अचरं स्थावरजातं चरं चरति तत् चरं जंगमजातं तदपि सर्वं ज्ञेयम् । सूक्ष्मत्वात् सूक्ष्मस्य भावः सूक्ष्मत्वं तस्मात् सर्वांतरत्वात् कारणत्वात् व्यापकत्वात् तत् ज्ञेयम् । अविज्ञेयं विशेषेण ज्ञेयं न भवति तत् अविज्ञेयम् । तस्मात् बहिर्दृष्टीनां ज्ञातुमयोग्यमित्यर्थः । देहात्मबुद्धीनां दूरस्थं दूरे तिष्ठति तत् दूरस्थं योजनलक्षांतरितमिव स्थितं अंतर्दृष्टीनां तत् ज्ञेयं अंतिके समीपे स्वरूपमेव स्थितं भवति ॥१५॥

अर्थ : ते सर्व प्राण्यांच्या बाहेर व आत आहे. तेच अचर आहे व चरही आहे. ते ज्ञेय सूक्ष्म असल्यामुळे विशेषतः ज्ञेय होत नाही म्ह. त्याचे वृक्ष, पाषाण यांप्रमाणे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. ते अज्ञदृष्ट्या अत्यंत दूर आहे व ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने अगदी समीप - हृदयांत आहे. [ ते भूतांच्या बाहेर विषयादिरूप आहे व भूतांमध्येही प्रत्यग्भूत आहे. बाहेर व आंत ते आहे, असे म्हटल्याने मध्ये ते नाही असे कोणाला वाटेल, म्हणून चराचर भूतात्मक म्ह. नानाप्रकारच्या देहरूपाने भासणारे ते ज्ञेयच आहे. अधिष्ठानभूत रज्जूमध्ये कल्पित सर्पादिकाचा अंतर्भाव जसा होतो, तसा देहाभासाचाही ज्ञेयामध्ये अंतर्भाव होतो. तथापि ते आकाशाप्रमाणे अति सूक्ष्म आहे. त्यामुळे अविद्वानांना त्याचे ज्ञान होत नाही. पण विद्वानांना ‘आत्माच हे सर्व आहे, ब्रह्मच हे सर्व आहे’, इत्यादि प्रमाणांच्या योगाने नित्य विज्ञातच आहे. अविद्वानांना ते असंख्य वर्षांनीही प्राप्त होण्यासारखे नसल्यामुळे ते दूर स्थित आहे व विद्वानांच्या प्रत्यगात्मत्वामुळे ते अगदी समीप आहे. ]

विवरण :


अविभक्तं च भूतेषु विभक्तं इव च स्थितम् ।
भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ॥ १३-१६ ॥

अन्वय : तत् भूतेषु अविभक्तं - ते ज्ञेय प्राण्यांमध्ये, प्रत्येक देहामध्यें एक म्ह० भिन्न भिन्न नसलेले असे आहे - च विभक्तं इव स्थितं - पण विभक्त असल्यासारखे राहिले आहे. प्रत्येक शरीरांत भिन्न भिन्न असल्यासारखें दिसते - तत् ज्ञेयं भूतभर्तृ - ते ज्ञेय स्थितिकालीं भूतांचे भरण, धारण करणारे आहे - ग्रसिष्णु च प्रभविष्णु च - तसेंच ते प्रलयकाळीं भूतांचा ग्रास, संहार करणारे व सृष्टिसमयीं त्या भूतांना प्रकट करणारे आहे. १६

व्याख्या : अविभक्तमिति । किंच कीदृशं तत् ज्ञेयम् । भूतेषु स्थावरजंगमात्मकेषु अविभक्तं विभक्तं न भवति तत् अविभक्तं कारणात् कार्यस्य अनन्यत्वात् कार्येषु कारणरूपेण अभिन्नम् । तथा मृदि घट इव कार्यरूपेण विभक्तमिव स्थितम् । न तु विभक्तमित्यर्थः । भूतभर्त्तृ स्थितिकाले पालनसमये भूतभर्तृ भूतानि बिभर्ति तत् भूतभर्त्तृ भूतानां पालकं चेत्यपरं प्रभविष्णु उत्पत्तिकाले प्रभवशीलं प्रभविष्णु भूतानां उत्पादकम् । ‘ यतो वा इमानि भूतानि जायंते ’ इति श्रुतेः ॥१६॥

अर्थ : ते ज्ञेय प्राण्यामध्ये एक म्ह. भिन्न भिन्न नसलेले असे आहे, पण विभक्त असल्यासारखे राहिले आहे. ते प्रत्येक शरीरात भिन्न भिन्न असल्यासारखे दिसते. ते ज्ञेय स्थितिकाली भूतांचे भरण-धारण-पोषण करणारे आहे. तसेच ते प्रलयकाली भूतांचा ग्रास म्ह. संहार करणारे व सृष्टिसमयी त्या भूतांना प्रकट करणारे आहे. [ ज्ञेयाच्या अस्तित्वाविषयी आणखी असे हेतु आहेत - ते सर्व देहांत आकाशाप्रमाणे एक आहे. कारण त्याचा भेद आहे, असे मानण्यास काही प्रमाण नाही. उलट ते जर भिन्न असेल, तर ते घटादिकांप्रमाणे अनात्मा आहे, असे होईल. यास्तव, अद्वितीय व सर्वत्र प्रत्यगात्मभूत असे ज्ञेय नाही, असे समजणे हे साहस आहे. ‘तर मग प्रतिदेहात ते भिन्न आहे, अशी प्रतीति कशी येते ?’ (उत्तर-) ते सर्व भूतांमध्ये विभक्त असल्यासारखे स्थित आहे. प्रतिदेहांत भासणारा भेद काल्पनिक आहे. खरा नव्हे. कारण देहामध्येच त्याची प्रतीति येत असते, देहावांचून त्या ज्ञेयाची प्रतीति येत नाही व प्रत्येक देह तर भिन्न भिन्न; त्यामुळे त्यांतील ज्ञेयही तसेच भिन्न असावे, अशी अविचारी लोकांची कल्पना होते. ते ज्ञेय कार्यांच्या स्थितीला कारण होत असल्यामुळेही भूतभर्तृ आहे - भूताचे भरण-पोषण करते. ते सर्व भूतांच्या उत्पत्ति व प्रलय या समयी निमित्त व उपादान कारणही आहे. ज्याप्रमाणे मिथ्या कल्पित सर्पादिकांच्या उत्पत्ति-स्थिति-लयांचे कारण रज्जुप्रभृति अधिष्ठान असते, त्याप्रमाणे मी ज्ञेय कल्पित भूतांच्या उत्पत्यादिकांचे कारण आहे. त्यामुळे अद्वैत स्थितीला बाध येत नाही. ]

विवरण :


ज्योतिषां अपि तत् ज्योतिः तमसः परम उच्यते ।
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् ॥ १३-१७ ॥

अन्वय : तत् ज्योतिषां अपि ज्योतिः - ते ज्ञेय सूर्य, अग्नि इत्यादि जड ज्योतींचीही ज्योत आहे, प्रकाशांनाही प्रकाशित करणारे आहे - तमसः परं उच्यते - तमाचा म्ह० अज्ञानाचा त्याला स्पर्शही झालेला नाही असे म्हटले जाते - ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं - अमानित्वादि मागील श्लोकांत सांगितलेले ज्ञेय व त्याच्या ज्ञानाचे फल असे ते त्रिविध ज्ञेय - सर्वस्य हृदि विष्ठितं - सर्व प्राण्यांच्या बुद्धींत विशेषतः स्थित आहे. १७

व्याख्या : ज्योतिषामिति । किंच कीदृशं तत् ज्ञेयम् । ज्योतिषां चंद्रसूर्यादीनां ज्योतिः प्रकाशकम् । ‘ तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं बिभाति ’ इति श्रुतेः । ज्ञानिभिः इति शेषः । तमसः अज्ञानात् परं विलक्षणं तत् ज्ञेयं उच्यते कथ्यते । ज्ञानं ज्ञायते सर्वं अनेनेति ज्ञानम् । ज्ञेयं तदेव परमंपुरूषार्थत्वात् मुमुक्षुभिः ज्ञातुं योग्यं ज्ञेयं ज्ञानगम्यं ज्ञानेन आत्मानात्मलक्षणेन गम्यते प्राप्यत इति ज्ञानगम्यम् । एतादृशं ज्ञेयं कुत्रस्थितम् ? । सर्वस्य प्राणिजातस्य हृदि अंतःकरणे विष्ठितं विविधाकारसमुदायरूपेण स्थितम् । ज्ञेयं विना किमपि नास्तीति समुदायार्थः ॥१७॥

अर्थ : ते ज्ञेय सूर्य-अग्नि इत्यादि जडज्योतींचीही ज्योति आहे. जड प्रकाशांनाही प्रकाशित करणारे आहे. तमाचा-अज्ञानाचा त्याला स्पर्शही झालेला नाही, असे म्हटले जाते. अमानित्वादि ज्ञान, बाराव्या श्लोकापासून सांगितलेले ज्ञेय व त्याच्या ज्ञानाचे फल, असे ते त्रिविध ज्ञेय सर्व प्राण्यांच्या बुद्धीत विशेषतः स्थित आहे. [ ज्ञेयच ज्ञात झाले असता ज्ञानगम्य-ज्ञानाचे फल होते. ते तत्व बुद्धिस्थ असल्यामुळे अगदी प्रकट आहे. बुद्धीमध्येच या तिहींचा अनुभव येतो, हे प्रसिद्ध आहे. ]

विवरण :


इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः ।
मद्‌भक्त एतत् विज्ञाय मद्‌भावाय उपपद्यते ॥ १३-१८ ॥

अन्वय : इति क्षेत्रं (तथा) ज्ञानं - येणेंप्रमाणें क्षेत्र, शरीर अमानित्वादि ज्ञानसाधनें - तथा च ज्ञेयं - आणि त्याचप्रमाणें जाणण्यास योग्य असे परब्रह्म - समासतः उक्तं - संक्षेपतः सांगितले. - मद्‌भक्तः एतत् विज्ञाय - माझ्याठिकाणीं ज्यानें आपला भाव ठेवला आहे असा माझा परमभक्त हें सर्व जाणून - मद्‌भावाय उपपद्यते - माझ्या भावाला, माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. १८

व्याख्या : उक्तं क्षेत्रज्ञानज्ञेयस्वरूपं सफलमुपसंहरति । इति क्षेत्रमिति । इति अनेन प्रकारेण क्षेत्र ‘ महाभूतानि ’ इत्यारभ्य ‘ धृत्यंतं ’ शरीरं तथा ज्ञानं ‘ अमानित्वादितत्त्वज्ञानार्थदर्शनांतं ’ ज्ञानसाधनं चेत्यपरं ज्ञेयं ‘ अनादिमत्परं ब्रह्म ’ इत्यारभ्य ‘ हृदि सर्वस्य विष्ठितं ’ इत्यंतं ज्ञानार्हं समासतः संक्षेपेण उक्तं कथितम् । मया इति शेषः । ततः किं इत्यत आह । मद्भक्तः मां अनन्यत्वेन भजतीति मद्भक्तः एतत् क्षेत्रादित्रयं विज्ञाय स्वरूपलक्षणया चेत्यपरं तटस्थलक्षणया ज्ञात्वा मद्भावाय मम भावः मद्भावः तस्मै मम स्वरूपभवनाय उपपद्यते योग्यो भवति । हेयत्वेन त्याज्यत्वेन क्षेत्रं ज्ञात्वा स्वरूपज्ञानेन प्रत्यग्ब्रह्मरूपेण अवतिष्ठति इत्यर्थः ॥१८॥

अर्थ : याप्रमाणे क्षेत्र-शरीर, अमानित्वादि ज्ञानसाधने, त्याचप्रमाणे जाणण्यास योग्य असे परब्रह्म संक्षेपतः सांगितले. माझ्या ठिकाणीच ज्याने आपला सर्व भाव ठेवला आहे, असा माझा परम भक्त हे सर्व जाणून, माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो.

विवरण :


प्रकृति व पुरुष यांचे वर्णन.

सातव्या अध्यायात ईश्वराच्या पर व अपर - क्षेत्रज्ञ व क्षेत्र या दोन उपाधि सांगितल्या व याच दोन प्रकृति सर्व भूतांचे कारण आहेत, असे म्हटले. पण त्या द्विविध प्रकृतीला भूतांचे कारणत्व कसे ते सांगतात -

प्रकृतिं पुरुषं चैव विद्धि अनादि उभौ अपि ।
विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान् ॥ १३-१९ ॥

अन्वय : प्रकृतिं च एव पुरुषं - आठ प्रकारच्या प्रकृतीला आणि क्षेत्रज्ञाला - उभौ अपि अनादी विद्धि - अशा दोघांनाही तूं अनादी, नित्य असे जाण. - विकारान् च गुणान् एव - बुद्धि, इंद्रिये, देह इत्यादि विकारांस आणि सुखदुःख मोहरूप गुणांना तू - प्रकृतिसंभवान् विद्धि - ईश्वराच्या त्रिगुणात्मक मायाख्य प्रकृतीपासून झालेले जाण. १९

व्याख्या : ‘ मद्भक्त एतत् विज्ञाय ’ इति यदुक्तं तदेव द्विधा राशिविभागेन दर्शयति । प्रकृतिमिति । हे पार्थ ! त्वं उभौ द्वौ अनादी न विद्यते आदिर्ययोस्तौ अनादी उत्पत्तिरहितौ विद्धि जानीहि । एव अपि अवधारणे । उभौ कौ । प्रकृतिं परापरभेदेन द्विधा क्षेत्रसंज्ञां कार्यभूतां चेत्यपरं पुरूषं क्षेत्रज्ञोपलक्षितं परमात्मानं कारणभूतं मां किंच त्वं विकारान् कर्तृत्वभोक्तृत्वसुखदुःखादीन् चेत्यपरं गुणान् देहेंद्रियादिरूपगुणपरिणामान् प्रकृतिसंभवान् प्रकृतेः संभवो येषां ते प्रकृतिसंभवाः तान् प्रकृतिसंभवान् विद्धि जानीहि । प्रकृतेः विकाररूपेण परिणतत्वात् तुच्छमित्यर्थः ॥१९॥

अर्थ : अष्टधा प्रकृति आणि क्षेत्रज्ञ या दोघांनाही तू अनादि-नित्य जाण. त्याचप्रमाणे बुद्धि, इंद्रिये, देह, इत्यादि विकारांस व सुख-दुःख-मोहरूप गुणांस तू ईश्वराच्या त्रिगुणात्मक मायाख्य प्रकृतीपासून झालेले समज.

विवरण :


कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ।
पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥ १३-२० ॥

अन्वय : कार्यकारण कर्तृत्वे - कार्य म्ह० शरीर व करण म्ह० सर्व इंद्रिये, यांच्या कर्तृत्वाविषयीं - प्रकृतिः हेतुः उच्यते - वरील प्रकृति निमित्त सांगितली जाते. - सुखदुःखानां भोक्तृत्वे - तसेच सुखदुःखांच्या भोक्तृत्वाविषयीं - पुरुषः हेतुः उच्यते - पुरुष, क्षेत्रज्ञ, जीव निमित्त सांगितला जातो. २०

व्याख्या : उक्तौ प्रकृतिपुरूषौ हानोपादानाभ्यां कार्यकारणाभ्यां जडाजडविभागेन दर्शयति । कार्यकारणेति । कपिलादिभिरिति शेषः । प्रकृतिः जडभागः कार्यकारणकर्तृत्वे कार्यं शरीरं स्थूलभागं च कारणानि च सुखदुःखादिसाधनानि इंद्रियाणि कार्यकारणानि कार्यकारणानां कर्तृत्वं कार्यकारणकर्तृत्वं तस्मिन् तत्तदाकाररूपपरिणामे हेतुः उपादानं कारणं उच्यते कथ्यते । पुरूषः अजडः चेतनो भागः सुखदुःखानां सुखानि च दुःखानि च सुखदुःखानि तेषां भोक्तृत्वे भोगाथै हेतुः कारणं उच्यते कथ्यते । अयं अभिप्रायः । यद्यपि अचेतनायाः प्रकृतेः स्वतःकर्तृत्वं न संभवति तथा पुरूषस्यापि अविकारिणः भोक्तृत्वं न संभवति तथापि कर्तृत्वं नाम क्रियानिर्वर्त्तकत्वं तत्तु अचेतनस्यापि चेतनादृष्टवशात् संभवति । यथा अयस्कांतसंनिधौ लोहस्य चलनमिव । तथा पुरूषसंनिधौ प्रकृतेः अचेतनायाः कार्यकारणकर्तृत्वं संभवति ॥२०॥

अर्थ : कार्य-शरीर व करण-सर्व इंद्रिये, यांच्या कर्तृत्वाविषयी वरील प्रकृति निमित्त आहे, असे सांगितले जाते, त्याचप्रमाणे सुख-दुःखांच्या भोक्तृत्वाविषयी क्षेत्रज्ञ-जीव निमित्त सांगितला जातो. [ देहाची आरंभक-देह ज्यांच्यापासून उत्पन्न होतो ती भूते, विषय व शरीरे हे विकार हा येथील ‘कार्य’ शब्दाचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे तेरा इंद्रिये व त्यांचा आश्रय करून राहणारे सुख-दुःख-मोहात्मक गुण, हा येथील ‘करण’ शब्दाचा अर्थ आहे. त्यांचे कर्तृत्व प्रकृतीला आहे. त्यांना उत्पन्न करणे या रूपाने ती त्यांचे कारण आहे. अशा कार्य, करण, कर्तृत्वामुळे प्रकृति संसारकारण आहे. पुरुष म्ह. जीव-क्षेत्रज्ञ-भोक्ता, सुख-दुःखांच्या भोक्तृत्वाचे निमित्त आहे. प्रकृति शरीरेंद्रियांच्या कर्तृत्वाने व पुरुष सुख-दुःखांच्या भोक्तृत्वाने संसाराचे निमित्त होतो. सुख-दुःखांचा साक्षात्कार हाच अविक्रय आत्म्याचा म्ह. द्रष्ट्याचा संसार व तशा प्रकारचे भोक्तृत्व हेच त्याचे संसारित्व होय. ]

विवरण :


सुख-दुःखाचे भोक्तृत्व हेच पुरुषाचे संसारित्व आहे, पण अविक्रय पुरुषाला ते कोणत्या कारणाने प्राप्त होते ते सांगतात -

पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् ।
कारणं गुणसङ्गोऽस्य सत् असत् योनिजन्मसु ॥ १३-२१ ॥

अन्वय : हि पुरुषः प्रकृतिस्थः - कारण पुरुष शरीरेंद्रियांच्या रूपानें परिणत झालेल्या शरीरेंद्रियाकार प्रकृतींत स्थित होऊन, ’हेंच मी’ असें मानून - प्रकृतिजान् गुणान् भुंक्ते - प्रकृतिपासून उत्पन्न झालेल्या सुखदुःख मोहात्मक गुणांस भोगतो, त्यांचा अनुभव घेतो. - अस्य गुणसंगः - या भोक्त्याच्या गुणांवरील संग, आसक्ति हेंच त्याच्या - सदसद्योनिजन्मसु कारणम् - देवादि सत् योनि व पश्वादि असत् योनि यांत जन्म होण्याचें कारण, निमित्त आहे. २१

व्याख्या : तथापि अविकारिणः जन्मरहितस्य च भोक्तृत्वं कथं इत्यत आह । पुरूष इति । हि यस्मात् पुरूषः परिपूर्णः परमात्मा प्रकृतिस्थः सन् प्रकृतौ प्रकृतिकार्ये देहे तादात्म्येन तिष्ठतीति प्रकृतिस्थः प्रकृतिजान् प्रकृतेः कार्यकारणरूपेण विद्यमानायाः जाताः प्रकृतिजाः तान् प्रकृतिजान् प्रकृतिसंभवान् गुणान् सुखदुःखादीन् भुंक्ते । ‘ ध्यायतीव लालयतीव ’ इति श्रुतेः । ननु-एवं सति संसारो नास्त्येव प्रत्यक्षतस्तु उपलभ्यते इत्याशंक्य तथा विवेकाभावात् देहाभिमानेन अविद्यमानोपि संसारो अवभाति इत्याशयेनाह । अस्य स्वाधिष्ठानचिदाभासस्य सदसद्योनिजन्मसु सती च देवादियोनिः असती च तिर्यगादियोनिः सदसत्यौ सदसतीभ्यां मिश्राः योन्यः सदसद्योन्यः सदसद्योनिषु जन्मानि ससद्योनिजन्मानि तेषु ससद्योनिजन्मसु गुणसंगः गुणेषु शुभाशुभेषु कर्मसु संगः गुणबुद्ध्या आसक्तिः गुणसंगः कारणं हेतुः अस्ति । गुणसंगेन शुभाशुभयोनिषु स्वनिष्ठितेषु सत्सु मिथ्याभूतोपि संसारः अस्य प्रतीयत इत्यर्थः ॥२१॥

अर्थ : कारण पुरुष इंद्रियांच्या रूपाने परिणत झालेल्या-शरीरेंद्रियाकार प्रकृतीत स्थित होऊन, हा शरीरेंद्रियसंघातच मी, असे मानून प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या सुख-दुःख-मोहात्मक गुणांस भोगतो, त्यांचा अनुभव घेतो. या भोक्त्याची गुणांवरील आसक्ति हाच त्याचा देवादि ‘सत् योनि’ व पश्वादि ‘असद्योनि’ यांत जन्म होण्याचे कारण आहे. [ अविद्या हे संसाराचे उपादान कारण असून ‘गुणसंघ’ निमित्तकारण आहे. ‘सदसद्योनि’ या शब्दाने मनुष्यांतीलही उत्तम-अधम योनि व्याख्या. ]

विवरण :


त्या पुरुषाचाच पुनः साक्षात् निर्देश करतात -

उपद्रष्टा अनुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः ।
परमात्मा इति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः ॥ १३-२२ ॥

अन्वय : उपद्रष्टा अनुमन्ता च - समीप राहून पाहणारा, अनुमोदन देणारा - च भर्ता भोक्ता - आणि भरण पोषण करणारा, भोग घेणारा - महेश्वरः परमात्मा इति च अपि उक्तः - सर्व ईश्वरांचाही ईश्वर, परमात्मा असेही बोललेला - अस्मिन् देहे परः पुरुषः - या देहांत पर पुरुष आहे. २२

व्याख्या : वस्तुतस्तु सत्यत्वेन अयं संसारी न भवतीत्याह । उपद्रष्टेति । अस्मिन् अविद्याध्यस्ते प्रकृतिकार्ये देहे कारणरूपेण विद्यमानोपि पुरूषः परः भिन्न एव । तद्रुणैः न युज्यते इत्यर्थः । तमेव हेतुत्वेन विशिनष्टि । देहादिभ्यः भिन्नत्वादेव रज्जुसर्पवत् उप समीपे वर्तमानत्वात् द्रष्टा साक्षी तथा अनुमंता अनुमोदनकर्ता । स्वसंनिधिमात्रेण अंतर्बहिः अनुग्राहक इत्यर्थः । ‘ साक्षी चेता केवलो निर्गुणश्च ’ इति श्रुतेः । तथा ऐश्वरेण रूपेण भर्ता विभर्ति इति अविद्यमानमपि स्वसत्तया पुष्णाति वा धारयतीति भर्त्ता तथा भोक्ता भुनक्तीति चेतनत्वात् अस्मिन्नेव सर्वस्यापि भोगस्य पर्यवसानात् भोक्ता । तथा महेश्वरः महांश्चासौ ईश्वरश्च महेश्वरः ब्रह्मादीनामपि अंतर्यामी । नियामक इत्यर्थः । तथा परमात्मा परा उत्कृष्टा चासौ मा ज्ञानशक्तिः परमा तया लक्ष्यते आत्मा स्वरूपं यस्य सः परमात्मा अथवा परमाणां उत्कृष्टब्रह्माद्युपाधीनां आत्मा तत्तद्रूपेण सर्वं प्रकाशयन् व्याप्नोतीति परमात्मा यद्वा परा चासौ सृष्टिस्थितिसंहारकत्वेन परमात्मा यद्वा परमस्य समष्टिजीवभूतस्य हिरण्यगर्भस्य अंतर्यामी आत्मा स्वरूपं यस्य सः परमात्मा सर्वोत्तमस्वरूपः इति उक्तः कथितः ॥२२॥

अर्थ : समीप राहून पहाणारा, अनुमोदन देणारा आणि भरण-पोषण करणारा, भोग घेणारा, सर्व ईश्वरांचाही ईश्वर, ‘परमात्मा’ असेही पण बोलला गेलेला परमपुरुष या देहांत आहे. [ ‘उपद्रष्टा’ यांतील ‘उप’ या उपसर्गाचा ‘सामीप्य’ हा अर्थ आहे. त्यामुळे उपद्रष्टा म्ह. समीप स्थित होऊन पहाणारा, पण हा पुरुष लौकिक उपद्रष्ट्याप्रमाणे स्वतः काही व्यापार करीत नाही. त्यामुळे यजमान व ऋत्विक यांच्या यज्ञकर्मातील गुण किंवा दोष यांस समीप बसून पहाणारा सर्व यज्ञकुशल विद्वान् जसा सर्व जाणतो, त्याप्रमाणे हा चिन्मात्रस्वभाव आत्मा सर्व पहातो म्हणून तो उपद्रष्टा होय किंवा देह, चक्षु, मन, बुद्धि व आत्मा हे पांच द्रष्टे आहेत. त्या सर्वांत बाह्यद्रष्टा देह आहे व सर्वांच्या आतील द्रष्टा आत्मा आहे. तोच प्रत्यक् म्ह. अगदी समीप आहे. अर्थात् प्रत्यगात्मा हाच उपद्रष्टा होय. ‘अनुमन्ता’ म्हणजे अनुमोदन देणारा. शरीरेंद्रिये आपापल्या व्यापारामध्ये प्रवृत्त झाली असता साक्षी आत्मा त्यांचे निवारण करीत नाही, म्हणून तो अनुमन्ता. आपल्या चिदाभासाने शरीर-इंद्रिये-मन व बुद्धि यांचे पोषण करतो. त्यांना परस्पर संबद्ध करतो, म्हणून तो ‘भर्ता’. बुद्धिचे सर्व विषयानुभव आत्मचैतन्याने व्याप्त असेच उत्पन्न होत असलेले दिसतात. कारण चैतन्याच्या व्याप्तीवाचून त्यांचा अनुभवच संभवत नाही. म्हणून तो ‘भोक्ता’. सर्व ईश्वरांचाही ईश्वर, म्हणून ‘महेश्वर’ व देहादि मिथ्या आत्म्याहून श्रेष्ठ, म्हणून तो ‘परमात्मा’ आहे. ‘उपद्रष्टा’ इत्यादि विशेषांनी युक्त असलेला तो या देहांत व्यक्त होतो. ]

विवरण :


य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह ।
सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ॥ १३-२३ ॥

अन्वय : यः एवं - जो या प्रकारे - पुरुषं च गुणैःसह प्रकृतिं वेत्ति - पुरुषाला व प्रकृतीला जाणतो - सः सर्वथा वर्तमानः अपि - तो कसाही जरी वागत असला तरी - भूयः न अभिजायते - पुनरपि उत्पन्न होत नाही, जन्म घेत नाही. २३

व्याख्या : एवं प्रकृतिपुरूषविवेकज्ञाने किं फलं इत्यत आह । य एवमिति । यः साधनसंपन्नः यतिः एवं उक्तलक्षणं पुरूषं चेत्यपरं गुणैः सह सुखदुःखादिविकारैः सह प्रकृतिं देहद्वयात्मिकां वेत्ति विवेक्तत्वेन जानाति सः यतिः सर्वथा विध्युल्लंघनेन अस्मिन् देहे वर्तमानः सन्नपि प्रारब्धकर्मणि क्षीणे सति भूयः पुनः नाभिजायते नोत्यद्यते । भुक्तो भवतीत्यर्थः ॥२३॥

अर्थ : जो याप्रकारे पुरुषाला व गुणांसह प्रकृतीला जाणतो, तो कसाही जरी वागत असला तरी पुनरपि उत्पन्न होत नाही. [ पूर्वोक्त आत्म्याला ‘हाच मी’ असे जो जाणतो व गुणांसह म्ह. स्वविकारांसह ज्ञानाने निवृत्त केलेल्या प्रकृतीला, ब्रह्मात्मैक्य ज्ञानाच्या योगाने कार्यांसह अविद्येचा अभाव आहे, असे जो जाणतो, तो सर्वथा - विहित किंवा निषिद्ध आचरणाने जरी वागत असला तरी ज्या शरीरांत ज्ञान झाले, ते शरीर मृत झाले असतां पुनः उत्पन्न होत नाही, मग जो नियमाने सदाचरणसंपन्न असतो, तो उत्पन्न होणार नाही हे काय सांगावे ? ]

विवरण :


आत्मदर्शनाचे उपाय.

आता या आत्मदर्शनाविषयी ध्यानादिक निरनिराळे उपाय सांगितले जातात -

ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचित् आत्मानमात्मना ।
अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ॥ १३-२४ ॥

अन्वय : केचित् आत्मानं आत्मनि - कांही योगी प्रत्यगात्म्याला बुद्धीत - ध्यानेन आत्मना पश्यन्ति - ध्यानानें सुसंस्कृत झालेल्या अंतःकरणानें पाहतात. - अन्ये सांख्येन योगेन - आणि काही सांख्ययोगाने, - च अपरे कर्मयोगेन (पश्यन्ति) - आणि दुसरे कित्येक ईश्वरार्पण बुद्धीनें केलेल्या कर्मानुष्ठानानें त्याला पाहतात. २४

व्याख्या : प्रकृतिपुरूषयोः विवेके सति ‘ वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिकेत्येव सत्यम् ’ इति श्रुतेः । प्रकृतेः विकाररूपेण अनृतत्वात् पुरूष एव सत्यस्वरूपः तं विना किमपि नास्तीति ज्ञाने इयान् पुरूषार्थः भवति । तर्हि तदेव प्रकृतिपुरूषविवेकज्ञानं केन उपायेन भवति इत्यपेक्षायां यथाधिकारं साधनविकल्पान् आह द्वाभ्याम् । ध्यानेनेति । केचित् अंतर्मुखाः यतयः ध्यानेन विजातीयप्रत्ययतिरस्कारपूर्वकं सजातीयप्रत्ययप्रवाहीकरणेन आत्मनि प्रकृतिकार्यभूते देहे आत्मना संस्कृतेन मनसा आत्मानं अंतर्यामिणं पुरूषं पश्यंति साक्षात् कुर्वंति । मनसैवेदं आप्तव्यं मनसैव अनुद्रष्टव्यम् । ‘ दृश्यते त्वग्रंया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदृष्टिभिः ’ इति । अन्ये सांख्ययोगिनः सांख्येन प्रकृतिपुरूषवैलक्षण्यदर्शनेन योगेन चित्तैकाग्रतापादकेन आत्मानं अंतर्यामिणं पश्यंति । चेत्यपरं अपरे कर्मयोगिनः कर्मयोगेन ईश्वरार्पितेन चित्तशुद्धिद्वारा विवेकज्ञानसाधनेन आत्मानं अंतर्यामिणं पश्यंति साक्षात्कुर्वंति ॥२४॥

अर्थ : काही योगी प्रत्यगात्म्याला ध्यानाला सुसंस्कृत झालेल्या अंतःकरणाने बुद्धीत पहातात. दुसरे ध्यान योगाने व आणखी कित्येक ईश्वरार्पण बुद्धीने केलेल्या कर्मानुष्ठानाने त्याला पहातात. [ प्रत्यगात्म्यामध्ये एकाग्रतेने मनाचा उपसंहार करून आत्म्याचेच चिंतन करणे हे ध्यान होय. तेलाच्या धारेप्रमाणे अविच्छिन्न प्रत्ययाला धार म्हणतात. उत्तम अधिकारी ध्यानाने आत्म्याला पहातात. ‘सत्वादि गुण मजकडून पाहिले जाण्यास योग्य आहेत. मी त्याहून अगदी निराळा, त्यांच्या व्यापाराचा साक्षी, नित्य निर्गुण आत्मा आहे’ असे चिंतन करणे हाच सांख्ययोग होय. त्याने प्रत्यगात्म्याला सुसंस्कृत अंतःकरणाने बुद्धीत पहातात. विचारजन्य ज्ञान हेच ‘सांख्य’ व तेच आत्मसाक्षात्काराचा उपाय असल्यामुळे ‘योग’ होय. मंद अधिकारी कर्मयोगाने त्याला जाणतात. ईश्वरार्पण बुद्धीने अनुष्ठान केले जाणारे जे कर्म तेच योगासाठी असल्यामुळे ‘योग’ आहे. ]

विवरण :


अत्यंत मंद अधिकार्‍यांची मोक्ष मार्गांत कशी प्रवृत्ति होते, तेच सांगतात -

अन्ये त्वेवं अजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते ।
तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः ॥ १३-२५ ॥

अन्वय : तु एवं अजानन्तः - पण वर सांगितलेल्या प्रकारांतील एकाही प्रयत्‍नाने आत्म्याला न जाणणारे - अन्ये अन्येभ्यः श्रुत्वा उपासते - इतर काही साधक दुसर्‍या आचार्यांपासून याचेंच चिंतन करा असें ऐकून श्रद्धेने उपासना करतात - ते श्रुतिपरायणाः अपि - ते श्रवणपरायण असलेले साधकही, ज्यांच्या मोक्षमार्गप्रवृत्तीचे श्रवण हें परम साधन आहे ते सुद्धां - मृत्युं अतितरन्ति एव च - मृत्युयुक्त संसारास उल्लंघून जातातच. २५

व्याख्या : अन्येत्विति । किंच अन्ये पूर्वोक्तविलक्षणाः एवं उक्तं ध्यानाद्युपायं अजानंतः संतः न जानंति ते अजानंतः अनभिज्ञाः संतः अन्येभ्यः गुरूभ्यः श्रुत्वा यथोपदेशं उपासते संततं ध्यायंति तेपि यथोपदिष्टोपासकाः मृत्युं संसारं अतितरंत्येव शनैः शनैः क्रमेणा मुक्ताः भविष्यंति । कथंमूताः ते । श्रुतिपरायणाः श्रुतिः श्रवणमेव परं अयनं आत्मप्राप्तौ आश्रयो येषां ते श्रुतिपरायणाः । न तु तत्त्वदर्शने निपुणाः श्रद्धया श्रवणानुरूपनिष्णाताः क्रमेणोत्तरोत्तरज्ञानोपचयेन मुच्यंत इत्यर्थः ॥२५॥

अर्थ : पण वर सांगितलेल्या उपायांतील एकाही उपायाने आत्म्याला न जाणणारे दुसरे काही साधक अन्य आचार्यांपासून ‘याचेच चिंतन करा’, असे ऐकून श्रद्धेने उपासना करतात. ते श्रवणपरायण असलेले साधकही - ज्यांच्या मोक्ष - मार्गप्रवृत्तीचे ‘श्रवण’ हेच परम साधन आहे, ते सुद्धा मृत्युयुक्त संसारास उल्लंघून जातातच. [ परोपदेशाने आत्मचिंतनात प्रवृत्त झालेल्या त्यांची ही प्रवृत्ति व्यर्थ होत नाही. ‘श्रुतिपरायण’ - श्रुति म्ह. श्रवण, तेच ज्यांच्या मोक्ष - मार्ग प्रवृत्तीतील श्रेष्ठ साधन आहे, तेच श्रुतिपरायण होत. अर्थात् केवल परोपदेशालाच प्रमाण मानून मोक्षमार्गात प्रवृत्त होणारे विवेकरहित अधिकारीही जर मृत्युचे उल्लंघन करतात, तर प्रमाणाविषयी स्वतंत्र असलेले विवेकी मृत्यूचे उल्लंघन करतील हे काय सांगावे ? ]

विवरण :


क्षेत्रज्ञ व ईश्वर यांचे एकत्व ज्ञान हे मोक्षाचे साधन आहे, असे वर सांगितले. पण ते कोणत्या कारणाने ? म्हणून विचारशील तर सांगतो -

यावत् सञ्जायते किञ्चित् सत्त्वं स्थावरजङ्गमम् ।
क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तत् विद्धि भरतर्षभ ॥ १३-२६ ॥

अन्वय : भरतर्षभ - हे भरतश्रेष्ठा - यावत् किंचित् स्थावरजंगम सत्वं संजायते - जेवढें कांही अचर किंवा चर प्राणिजात उत्पन्न होते - तत् क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् विद्धि - तें सर्व तूं क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होते असे जाण. २६

व्याख्या : ननु-उक्तप्रकारेण प्रकृतिपुरूषयोः अत्यंतविविक्तत्वात् संसृतेः का गतिः इति आह । यावदिति । हे भरतर्षभ ! यावत् किंचित् वस्तुजातं स्थावरजंगमं चराचरं सत्त्वं प्राणिजातं संजायते उत्पद्यते । तत् सर्वं क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् क्षेत्रं जानातीति क्षेत्रज्ञः क्षेत्रं प्रकृतिः च क्षेत्रज्ञः पुरूषः क्षेत्रक्षेत्रज्ञौ क्षेत्रक्षेत्रज्ञयोः संयोगः क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगः तस्मात् अविवेककृततादात्म्याध्यासात्भ्वति इति एवं त्वं विद्धि जानीहि ॥२६॥

अर्थ : हे भरतश्रेष्ठा, जेवढे काही अचर किंवा चर प्राणिजात उत्पन्न होते, ते सर्व तू क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होते असे जाण. वृक्ष - पाषाणादि स्थावर व मनुष्यादि जंगम यांतील जो जो प्राणी उत्पन्न होतो, तो तो क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होतो. [ पण येथील हा संयोग अध्यासरूप आहे. क्षेत्रज्ञ निरवयव असल्यामुळे त्याचा क्षेत्राशी खरा संयोग संभवत नाही, क्षेत्रज्ञाच्या चैतन्याचा क्षेत्रावर व क्षेत्राच्या जाड्यादिकांचा क्षेत्रज्ञावर आरोप होतो. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे यथार्थ स्वरूप न कळणे, हेच या परस्पर अध्यासाचे कारण आहे. यास्तव शास्त्रानुसार क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे विवेकज्ञान संपादन करून म्ह. पूर्वोक्त क्षेत्राहून क्षेत्रज्ञ अगदी पृथक् आहे, असे जाणून ‘ते सर्व उपाधिशून्य ज्ञेय ब्रह्म मीच आहे’ असा साक्षात्कार झाल्याने ज्याचे अज्ञान निवृत्त झाले आहे, त्याच्या पुढील जन्माचे काही कारणच उरत नाही. त्यामुळे ‘ज्ञानी पुनः उत्पन्न होत नाही’ असे जे वर म्हटले आहे ते योग्यच आहे. ]

विवरण :


ज्ञानाचे फल.

अविद्यादि संसारबीजाच्या निवृत्तिद्वारा जन्माचा अभाव हेच सम्यग्ज्ञानाचे फल सांगितले, क्षेत्र-क्षेत्रज्ञांचा संयोग हे जन्माचे कारण सांगितले, क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे अज्ञान हेच त्यांच्या मिथ्या संयोगाचे कारण सांगितले आणि आता त्या अज्ञानाची निवृत्ति करणारे सम्यग्ज्ञान जरी यापूर्वी वारंवार सांगितले असले, तरी त्याचा विषय अतिशय सूक्ष्म असल्यामुळे ते पुनः दुसर्‍या शब्दांनी सांगितले जाते -

समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् ।
विनश्यस्त्सु अविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ १३-२७ ॥

अन्वय : यः विनश्यत्सु सर्वेषु भूतेषु - जो विनाश पावणार्‍या सर्व भूतांमध्ये - समं तिष्ठन्तं अविनश्यन्तं - सम असलेल्या, विनाश न पावणार्‍या - परमेश्वरं पश्यति सः पश्यति - परमेश्वराला पाहतो तो यथार्थपणे पाहतो. २७

व्याख्या : एवं प्रकृतिपुरूषाविवेकात् संसारो जायते इति उक्तम् । इदानीं तन्निवृत्त्युपायं तत्त्वज्ञानं निरूपयति । सममिति । यः अविद्यापटेन अनावृतदृष्टिः यतिः सर्वेषु संपूर्णेषु भूतेषु स्थावरजंगमेषु समं समरूपेण तिष्ठंतं तिष्ठतीति तिष्ठन् तं विद्यमानं परमेश्वरं परमात्मानं पश्यति साक्षात् अवलोकयति सः पुरूषः सम्यक् स्वरूपदर्शनात् चक्षुष्मान् सन् पश्यति अन्यः न पश्यति । कथंभूतं परमेश्वरम् । सर्वेषु भूतेषु विनश्यत्सु सत्सु नाशं गतेषु सत्सु अविनश्यंतं न विनश्यतीति अविनश्यन् तं नाशरहितम् ॥२७॥

अर्थ : जो विनाश पावणार्‍या सर्व भूतांमध्ये सम असलेल्या व विनाश न पावणार्‍या परमेश्वराला पहातो, तो यथार्थपणे पहातो. [ ब्रह्मादि स्थावरान्त सर्व भूतांमध्ये निर्विशेष स्थित असलेल्या, त्या भूतांचा नाश जरी झाला तरी नाश न पावणार्‍या आणि देह, इंद्रिये, मन, बुद्धि, अव्यक्त व जीवात्मा, यांच्या अपेक्षेने श्रेष्ठ असलेल्या ईश्वराला म्ह. निर्विशेष सर्व विकाररहित व अद्वितीय अशा परमेश्वराला जो पहातो, तोच यथार्थ पहातो. बाकीचे सर्व जरी पहात असले, तरी ते यथार्थ पहात नाहीत. विपरीत पहातात. ]

विवरण :


या सम्यग्दर्शनाचे फल सांगून त्या फलवचनानेच ज्ञानाची स्तुति करतात -

समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् ।
न हिनस्ति आत्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥ १३-२८ ॥

अन्वय : हि सर्वत्र समवस्थितः - कारण सर्व भूतांमध्ये समानत्वानें, एकरूपानें अवस्थित असलेल्या - ईश्वरं समं पश्यन् - ईश्वराला सम पाहणारा - आत्मना आत्मानं न हिनस्ति - आपणच आपल्याला मारीत नाही, हिंसा करीत नाहीं - ततः परां गतिं याति - त्यामुळें परमगतीला जातो. २८

व्याख्या : सम्यक् स्वरूपदर्शने हेतुमाह । समं पश्यन्निति । यः पुरूषः सर्वत्र सर्वकार्येषु मूर्त्तामूर्तेषु समवस्थितं सम्यक् अवस्थितः समवस्थितः तं सद्रूपेण सम्यगवस्थितं ईश्वरं सर्वनियामकं मुकुटकुंडलादिषु सुवर्णमिव समं समरूपेण पश्यन् पयश्तीति पश्यन् सन् अवलोकयन् सन् आत्मानं न हिनस्ति देहात्मबुद्ध्या न तिरस्करोति सर्वत्र आत्मदर्शनात् स एव पश्यति । इति उक्तं युक्तमित्यर्थः । ततः किं इत्यत आह । सः पुरूषः ततः तस्मात् सर्वात्मदर्शनात् परां पुनरावृत्तिरहितां गतिं गम्यते स्वरूपेण प्राप्यते इति गतिः तां गतिं आत्मप्राप्तिं याति प्राप्नोति । विस्मृतकंठगतचामीकरप्राप्तिमिव भ्रांत्या आत्मानं विस्मृत्य भ्रांतिनाशे सति आत्मानं पुनः प्राप्नोति इति भावः ॥२८॥

अर्थ : कारण सर्व भूतांमध्ये समानत्वाने म्ह. एकरूपाने अवस्थित असलेल्या ईश्वराला सम पहाणारा, आपणच आपल्याला मारीत नाही व त्यामुळेच तो परम गतीला जातो. [ सर्व भूतांमध्ये तुल्यत्वाने अवस्थित असलेल्या ईश्वराला सम पहाणारा पुरुष ज्याअर्थी आपणच आपली हिंसा करीत नाही, त्याअर्थी तो मोक्ष नावाच्या श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो. या श्लोकाच्या पहिल्या तीन पादांनी ‘ज्ञानाने अज्ञानाचा नाश झाला असतां सर्व अनर्थाचा नाश होतो’ असे सांगितले आणि चवथ्या पादाने ‘अज्ञानावरणाचा नाश झाला असतां तो ज्ञानी सर्वोत्तम गतीला प्राप्त होतो’ असे सांगितले. आत्मा नित्य आहे, त्यामुळे त्याची वास्तविक हिंसा संभवत नाही. पण अज्ञ देहादि अनात्म्याला आत्मा समजून, त्या मिथ्या आत्म्याच्या योगाने धर्म व अधर्म या नावांची कर्मे करून, कर्मानेच संपादन केलेल्या त्या मिथ्या आत्म्यालाही मारून, दुसर्‍या नवीन आत्म्याचे ग्रहण करतो व ही त्याची परंपरा ज्ञान होईपर्यंत एकसारखी चाललेली असते, म्हणून विद्वान् आपणच आपला घात करीत नाही, असे येथे म्हटले आहे. तसेच विद्यमान असलेल्या आत्म्याला अविद्येमुळे न जाणूनही ज्ञानी त्याला असून नसल्यासारखे करीत नाही. ]

विवरण :


"सर्व भूतस्थ ईश्वराला सम पहाणारा आपणच आपला नाश करीत नाही", असे सांगितले. पण सुख-दुःखादि स्वगुण व धर्माधर्मादि स्वकर्मे यांच्या वैलक्षण्यामुळे प्रति शरीरांत भिन्न असलेल्या आत्म्यामध्ये समदृष्टि संभवत नाही, अशी आशंका घेऊन भगवान् म्हणतात -

प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः ।
यः पश्यति तथात्मानं अकर्तारं स पश्यति ॥ १३-२९ ॥

अन्वय : यः कर्माणि प्रकृत्या एव च - जो सर्व कर्में प्रकृतीकडूनच, ईश्वराच्या शरीरेंद्रियाकार बनलेल्या मायेकडूनच - सर्वशः क्रियमाणानि पश्यति - सर्व प्रकारें केली जाणारी असे पाहतो - तथा आत्मानं अकर्तारं पश्यति - तसेच आत्म्याला अकर्ता पाहतो - सः पश्यति - तोच वास्तविक तत्त्व पाहतो. २९

व्याख्या : प्रकृत्यैवेति । एवं प्रकृतिपुरूषविवेके किं फलति इति आह द्वाभ्याम् । यः यतिः प्रकृत्यैव कार्यकारणरूपयैव न तु आत्मना । सर्वशः सर्वप्रकारेण कर्माणि कर्तुं योग्यानि कर्माणि । कर्तुः इष्टतमानि क्रियमाणानि वा क्रियंते तानि क्रियमाणानि निवर्त्यमानानि इति पश्यति अवलोकयति तथा आत्मानं प्रत्यंचं अंतर्यामिणं अकर्तारं करोतीति कर्ता न कर्ता अकर्ता तं अकर्तारं क्रियारहितं पश्यति अवलोकयति सः प्रकृतिपुरूषविवेकी कर्मभिः वैदिकलौकिकैः मुक्तो भवतीत्यर्थः । नान्य इति भावः ॥२९॥

अर्थ : जो सर्व कर्मे प्रकृतीकडूनच - ईश्वराच्या शरीरेंद्रियाकार बनलेल्या मायेकडूनच सर्व प्रकारे केली जाणारी पहातो, त्याचप्रमाणे आत्म्याला अकर्ता पहातो, तोच वास्तविक तत्व पहातो. [ कायिक, वाचिक व मानसिक कर्मे शरीरेंद्रियांच्या आकाराने परिणत झालेल्या प्रकृतीकडूनच केली जातात, आत्म्याकडून केव्हाही केली जात नाहीत, असा जो साक्षात् अनुभव घेतो आणि क्षेत्रज्ञ आत्म्याला जो अकर्ता व सर्व उपाधिशून्य पहातो, तो परमार्थदर्शी होय. निर्गुण, अकर्ता व निर्विशेष अशा क्षेत्रज्ञाच्या भेदाविषयी काही प्रमाण नाही. अर्थात् आकाशाप्रमाणे तो विभु आहे. ]

विवरण :


यदा भूतपृथक् भावं एकस्थं अनुपश्यति ।
तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ॥ १३-३० ॥

अन्वय : यथा भूतपृथग्भावं - जेव्हां भूतांचा पृथक्‌पणा - एकस्थं अनुपश्यति - एका आत्म्यामध्येंच स्थित आहे असे शास्त्र व आचार्य यांच्या उपदेशाप्रमाणें पाहतो - च ततः एव विस्तारं (पश्यति) - त्या एक आत्म्यापासूनच भूतांचा विस्तार पाहतो - तदा ब्रह्म संपद्यते - त्यावेळीं साधक ब्रह्म होतो. ३०

व्याख्या : तदेव मुखतः प्रतिपादयति । यदेति । पुमान् यदा यस्यां अवस्थायां भूतपृथग्भावं भूतानां चराचराणां पृथग्भावः देवमनुष्यतिर्यगादिवैचित्र्यं भूतपृथग्भावः तं एकस्थं एकस्यां ईश्वरशक्तिरूपायां प्रकृतौ तिष्ठतीति एकस्थः तं एकस्थं प्रलये अनुपश्यति अवलोकयति व्योमस्थं वाय्वादिभूतचतुष्टयवैषम्यमिव तदा तस्यां अवस्थायां ततः तस्मात् भूतपृथग्भावैकस्थत्वदर्शनात् विस्तारं भूतविस्तारं सृष्टिसमये अनुपश्यति अवलोकयति तदा प्रकृतितावन्मात्रत्वेन भूतानां अभेदं पश्यन् सन् ब्रह्म परिपूर्णं ब्रह्म संपद्यते ब्रह्मैव भवति । आत्मातिरेकेण किमपि नास्तीत्यनुभवो भवतीत्यर्थः ॥३०॥

अर्थ : जेव्हा साधक भूतांचा पृथक्‌पणा एका आत्म्यामध्येच स्थित आहे, असे शास्त्र व आचार्य यांच्या उपदेशाप्रमाणे पहातो आणि त्या एक आत्म्यापासूनच भूतांचा विस्तार पहातो, त्यावेळी तो ब्रह्म होतो.

विवरण :


अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः ।
शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥ १३-३१ ॥

अन्वय : कौन्तेय - हे कुंतीपुत्रा, - अयं परमात्मा - हा परमात्मा - अनादित्वात् निर्गुणत्वात् अव्ययः - अनादित्वामुळें व निर्गुणत्वामुळे अक्षय आहे - शरीरस्थः अपि - शरीरांत असलेलाही - न करोति न लिप्यते - कांही करीत नाही व कर्मफलानें लिप्त होत नाही. ३१

व्याख्या : ननु-एवंभूतः परमात्मा सर्वाधिष्ठानत्वेन कर्तृत्वाद्यभिमानाभावात् कर्मभिः न लिप्यते । तथापि एवं सत्यपि अंतर्यामितया शरीरनियमनं कुर्वन् कथं न लिप्यते इति आह । अनादित्वादिती । हे कौंतेय ! शरीरस्थः अंतर्यामितया शरीरे तिष्ठतीति शरीरस्थः अयं प्रसिद्धः परमात्मा परमेश्वरः अव्ययः सन् न विद्यते व्ययो विकारः यस्य सः अव्ययः अविकारी सन् अनादित्वात् अनादेर्भावः अनादित्वं तस्मात् उत्पत्त्यादिहीनत्वात् चेत्यपरं निर्गुणत्वात् निर्गुणस्य भावः निर्गुणत्वं तस्मात् वर्णाश्रमादिगुणरहितत्वात् न करोति कर्मणा न लिप्यते । कर्मफलेन असंस्पृष्टो भवतीत्यर्थः ॥३१॥

अर्थ : हा परमात्मा अनादित्वामुळे व निर्गुणत्वामुळे अक्षय आहे. हे कुंतीपुत्रा, शरीरांत स्थित असलेलाही हा पुरुष काही करीत नाही व कर्मफलाने लिप्त होत नाही. [ आदि म्ह. कारण. ते ज्याला नसते ते अनादि. जे आदिमत् कारणयुक्त असते, ते कार्य स्वतःच्या स्वरूपाने व्यय पावते. त्याच्या स्वरूपाचा क्षय होतो. पण हा अनादि असल्यामुळे, निरवयव असणे, या कारणाने व्यय पावत नाही. त्याचप्रमाणे निर्गुणत्वामुळे त्याचा व्यय होत नाही. गुणयुक्त पदार्थच गुणांच्या व्ययामुळे व्यय पावतो म्हणून हा परमात्मा अव्यय आहे. निरवयत्वामुळे अवयवांच्या द्वारा, निर्गुण असल्यामुळे गुणांच्या द्वारा व नित्य असल्यामुळे स्वभावतःही याचा व्यय होत नाही. त्यामुळे शरीरांत जरी त्याचा अनुभव येत असला - तो शरीरस्थ असला तरी स्वतः किंवा देहादि रूपाने काही करीत नाही व त्यामुळे फलाने लिप्त होत नाही. ‘तर मग कोण करतो व लिप्त होतो’ म्हणून विचारशील तर त्याचे उत्तर - मी ‘स्वभावस्तु प्रवर्तते’ (अ. ५-१४) या वाक्याने दिले आहे. अविद्येमुळे त्याच्यावर कर्तृत्वभोक्तृत्वाचा आरोप होतो. आत्म्याला वास्तविक कर्तृत्व नाही व ज्ञाननिष्ठ संन्यासीच अशा अकर्तृ आत्मभावाने अवस्थित होऊ शकतात. ]

विवरण :


"कोणाप्रमाणे तो करीत नाही व लिप्त होत नाही ?" उत्तर -

यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं नोपलिप्यते ।
सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ॥ १३-३२ ॥

अन्वय : यथा सर्वगतं आकाशं - ज्याप्रमाणें सर्वव्यापी आकाश - सौक्ष्म्यात् न उपलिप्यते - सूक्षमत्वामुळे कोणत्याही लेपानें लिप्त होत नाही - तथा देहे सर्वत्र - त्याचप्रमाणे देहांत सर्व ठिकाणी - अवस्थितः आत्मा न उपलिप्यते - अवस्थित असलेला, व्यापून राहिलेला आत्मा देहधर्मांनी संबद्ध होत नाही. ३२

व्याख्या : उक्तदृष्टांतेन तमेवार्थं प्रपंचयति । यथेति । यथा सौक्ष्म्यात् सूक्ष्माणां भावः सौक्ष्म्यं तस्मात् सर्वांतरत्वात् आकाशं सर्वगतं सत् सर्वेषु पंकादिषु गतं प्राप्तं सर्वगतं तत्तद्विकारैः नोपलिप्यते लिप्तं न भवति । तथा आत्मा सर्वत्र उत्तमे वा अधमे देहे अवस्थितः सन् विद्यमानः सन् नोपलिप्यते न लिप्तो भवति । दैहिकैर्गुणदोषैर्न युज्यते इत्यर्थः ॥३२॥

अर्थ : ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश सूक्ष्मत्वामुळे कोणत्याही लेपाने लिप्त होत नाही त्याप्रमाणे देहांत सर्व ठिकाणी अवस्थित असलेला - व्यापून राहिलेला आत्मा देहधर्मांनी लिप्त होत नाही.

विवरण :


यथा प्रकाशयति एकः कृत्स्नं लोकं इमं रविः ।
क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत ॥ १३-३३ ॥

अन्वय : भारत - हे अर्जुना ! - यथा एकः रविः - ज्याप्रमाणे एक सूर्य - कृत्स्नं इमं लोकं प्रकाशयति - या सर्व लोकाला प्रकाशमान करतो - तथा क्षेत्री कृत्स्नं क्षेत्रं प्रकाशयति - त्याचप्रमाणे क्षेत्रज्ञ आत्मा सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो. ३३

व्याख्या : ननु-एकस्य अंतर्यामितया सर्वप्रकाशकत्वं कथं इत्यपेक्षायां सदृष्टांतमाह । यथेति । यथा यद्वत् एकः असाह्यः रविः सूर्यः इमं प्रमाणेन दृष्टश्रुतं कृत्स्नं समस्तं लोकं लोक्यत इति लोकः तं भूर्भुवःस्वरादिलोकं प्रकाशयति स्वकिरणैः प्रकाशीकरोति तथा तद्वत् । हे भारत ! क्षेत्री क्षेत्राणि नियम्यतया विद्यंते यस्य सः क्षेत्री अंतर्यामी परमात्मा कृत्स्नं समस्तं क्षेत्रं ब्रह्मादिस्तंबपर्यंतं शरीरजातं प्रकाशयति प्रकाशीकरोति प्रकाशक्षमं करोति ॥३३॥

अर्थ : हे अर्जुना, ज्याप्रमाणे एक सूर्य या सर्व लोकाला प्रकाशमान करतो, त्याप्रमाणे क्षेत्रज्ञ आत्मा सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो. [ सूर्याप्रमाणेच क्षेत्रज्ञ आत्मा महाभूतांपासून धृतीपर्यंत सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो. येथील हा सूर्याचा दृष्टांत सर्व क्षेत्रामध्ये आत्मा एक व लेपरहित आहे, या दोन्ही अर्थी आहे. ]

विवरण :


सर्व अध्यायार्थाचा उपसंहार -

क्षेत्रक्षेत्रज्ञयोः एवं अंतरं ज्ञानचक्षुषा ।
भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् ॥ १३-३४ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥

अन्वय : ये एवं क्षेत्रक्षेत्रयोः - जे याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्यामधील - अन्तरं च भूतप्रकृतिमोक्षं - परस्पर विलक्षणता, फरक व भूतांच्या प्रकृतीच्या ज्ञानानें होणारा अभाव - ज्ञानचक्षुषा विदुः - ज्ञानदृष्टीनें जाणतात - ते परं यान्ति - ते परमात्मतत्त्वास प्राप्त होतात. ३४

व्याख्या : ननु-एकस्य अंतर्यामितया सर्वप्रकाशकत्वं कथं इत्यपेक्षायां सदृष्टांतमाह । यथेति । यथा यद्वत् एकः असाह्यः रविः सूर्यः इमं प्रमाणेन दृष्टश्रुतं कृत्स्नं समस्तं लोकं लोक्यत इति लोकः तं भूर्भुवःस्वरादिलोकं प्रकाशयति स्वकिरणैः प्रकाशीकरोति तथा तद्वत् । हे भारत ! क्षेत्री क्षेत्राणि नियम्यतया विद्यंते यस्य सः क्षेत्री अंतर्यामी परमात्मा कृत्स्नं समस्तं क्षेत्रं ब्रह्मादिस्तंबपर्यंतं शरीरजातं प्रकाशयति प्रकाशीकरोति प्रकाशक्षमं करोति ॥३३॥ अध्यायार्थं क्षेत्रक्षेत्रज्ञविविक्तज्ञानं सकलं उपसंहरति । क्षेत्रक्षेत्रज्ञयोरिति । ये आत्मानात्मविवेकिनः संन्यासिनः एवं उक्तप्रकारेण क्षेत्रक्षेत्रज्ञयोः क्षेत्रं शरीरं च क्षेत्रज्ञः अंतर्यामी क्षेत्रक्षेत्रज्ञौ तयोः क्षेत्रक्षेत्रज्ञयोः प्रकृतिपुरूषयोः अंतरं अन्योन्यविलक्षणत्वेन भेदं ज्ञानचक्षुषा ज्ञानमेव चक्षुः चक्षुरिंद्रियं ज्ञानचक्षुः तेन ज्ञानचक्षुषा विवेकनेत्रेण विदुः जानंति पश्यंति । तथा ये विवेकिनः भूतप्रकृतिमोक्षं भूतप्रकृतेः सकाशात् मोक्षः मोक्षोपायः भूतप्रकृतिमोक्षः तं भूतप्रकृतिमोक्षं विदुः जानंति ते परमहंसाः परं ब्रह्म यांति प्राप्नुवंति । ‘ ब्रह्मविदाप्नोति परम् ’ इति श्रुतेः ॥३४॥
विविक्तौ येन तत्वेन मिश्रौ प्रकृतिपुरूषौ ।
तं वंदे परमानंदं नंदनंदनमीश्वरम् ॥१॥
शरीरत्मविवेकेन निर्विशेषात्मदर्शनम् ।
कृतवान् भक्तवात्सल्यात् तस्मै श्रीगुरवे नमः ॥२॥
॥ इति श्रीबालबोधिन्यां श्रीमद्‌भगवद्‌गीताटीकायां त्रयोदशोऽध्यायः ॥१३॥

अर्थ : जे याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्यामधील परस्पर विलक्षणता - फरक व भूतांच्या प्रकृतीचा ज्ञानाने होणारा अभाव, ज्ञानदृष्टीने जाणतात, ते ज्ञानी परमात्मतत्वास प्राप्त होतात. [ येथवर क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे जसे वर्णन केले आहे, तसेच म्ह० एक कूटस्थ व दूसरे परिणामी, एक चेतन व दुसरे जड, इत्यादि ज्ञानचक्षूने जाणतात, त्याचप्रमाणे भूतांच्या अविद्यारूप प्रकृतीचे अभावगमन जे विशेष करून जाणतात, ते परमार्थ तत्वाला प्राप्त होतात. पुनरपि देहधारण करीत नाहीत. याप्रमाणे अमानित्वादि ज्ञानसाधनामध्ये तत्पर झाल्यामुळे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या यथार्थ स्वरूपाचे विज्ञान ज्याला झाले आहे, त्याच्या सर्व अनर्थाची निवृत्ति होऊन परिपूर्ण परमानंदाचा आविर्भाव होणे, या स्वरूपाचा पुरुषार्थ सिद्ध होतो, हे या अध्यायात सांगितले. ]
येथे भगवद्‌गीतेचा प्रकृति-पुरुष (क्षेत्र-क्षेत्रज्ञविवेकयोग) नावाचा तेरावा अध्याय समाप्त झाला.

विवरण :


॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP