|
श्रीमद् भगवद्गीता विभूतियोगः
सातव्या व नवव्या अध्यायांत भगवानांचे सोपाधिकनिरुपाधिक तत्त्व व सविशेषनिर्विशेष रूपाच्या ज्ञानाला उपयोगी असलेल्या विभूति प्रकाशित केल्या. त्यानंतर आतां पुढें ज्या ज्या पदार्थामध्ये भगवान चिंत्य - चिंतन करण्यास योग्य आहे, तो तो भाव-पदार्थ सविशेष ध्यानाच्या व निर्विशेष ज्ञानाच्या अंगत्वाने सांगावा आणि भगवानाचे तत्वही सांगावे, म्हणून या अध्यायाचा आरंभ केला आहे. भगवानांचे सविशेष व निर्विशेषरूप पूर्वी ठिकठिकाणीं जरी सांगितले आहे, तरी तें अतिशय दुर्विज्ञेय असल्यामुळे पुनः सांगणे उचित आहे -
श्रीभगवानुवाच - अन्वय : व्याख्या : श्री । अथेदानीं ता एव पूर्वोक्ता एव विभूतीः प्रपंचयिष्यन् स्वभक्तेश्च अवश्यं करणीयत्वं वर्णयिष्यन् श्रीभगवान् उवाच । भूय एवेति । हे महाबाहो ! महांतौ युद्धादिस्वधर्मानुष्ठाने च मत्परिचर्यायां कुशलौ बाहू यस्य सः महाबाहुः तत्संबुद्धौ हे महाबाहो हे मदुक्तसर्वादानसमर्थः ! त्वं भूय एव पुनरपि मे मत्तः अथवा मे मम परमेश्वरस्य सर्वज्ञस्य परमं वेदार्थमथितं उत्कृष्टं वचः वाक्यं शृणु अवधारय । यत् यस्मात् कारणात् अहं ते तुभ्यं हितकाम्यया हितस्य काम्या इच्छा हितकाम्या तया हितकाम्यया हितेच्छया पुनः पूर्वं उक्तमपि वक्ष्यामि कथयामि । कथंभूताय ते । प्रीयमाणाय प्रीयतेसौ प्रीयमाणः तस्मै प्रीयमाणाय प्रीतिं प्राप्नुवते ॥ १ ॥ अर्थ : श्रीभगवान् म्हणाले - हे पराक्रमी अर्जुना, माझे हें श्रेष्ठ वचन तू ऐक. कारण माझें वचन ऐकून संतुष्ट होणाऱ्या तुला तुझें हित व्हावें, या इच्छेने मी तें सांगत आहे. [ माझ्या वचनामुळे तूं जणुकाय अमृतच पीत असल्याप्रमाणे अतिशयच संतुष्ट होतोस, म्हणून हिताच्या इच्छेने मी जें परम वचन तुला सांगतो, तें ऐक. ] १ विवरण :
न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः । अन्वय : व्याख्या : न मे विदुरिति । सुरगणाः सुराणां देवानां गणाः समूहाः ब्रह्मादयः मे मम परमात्मनः प्रभवं जन्मरहितस्यापि नानाविभूतिभिः आविर्भावं न विदुः नैव जानन्ति । तथा महर्षयः महांतश्च ते ऋषयश्च महर्षयः भृग्वादयः मे मम परमात्मनः प्रभवं उत्पत्तिं न विदुः न जानन्ति । अहं त्वदुपदेष्टा सर्वशः सर्वेषां देवानां दीव्यन्ति प्रकाशरूपाः भवन्ति ते देवाः तेषां देवानां द्योतनस्वभावानां ब्रह्मादीनां तथा महर्षीणां महांतश्च ते ऋषयश्च महर्षयः तेषां महर्षीणां वेदार्थज्ञानां आदिः कारणं उत्पत्ति-हेतुः अस्मि । न हि पुत्रः पितुरुत्पत्तिं जानाति अथवा अग्रं मूलमित्यर्थः । अतो मदनुग्रहं विना मां केपि न जानन्ति इत्यर्थः ॥ २ ॥ अर्थ : पण तूं तेंच कशासाठी सांगत आहेस ?' असें जर तूं विचारशील सर सांगतों - माझ्या प्रभावाला किंवा उत्पत्तीला ब्रह्मदेवादि देवगण जाणत नाहींत. भृगुप्रभृति महर्षिही माझ्या प्रभावाला किंवा उत्पत्तीला जाणत नाहींत. कारण मी देवांचें व महर्षींचे सर्व प्रकारे कारण आहे.[ कारण कार्याच्या पूर्वी असतें, त्यामुळें कोणत्याही कार्याला आपल्या कारणाचा प्रभाव किंवा उत्पत्ति यांचे ज्ञान असणें शक्य नाहीं. ] २ विवरण :
यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् । अन्वय : व्याख्या : ननु-तव प्रभवं देवकीवसुदेवौ जानतः । सत्यम् । तत्तु सुरकार्यार्थं अवताराभिप्रायम् । वास्तवं यथाभूतं यः जानाति स कृतार्थ इत्याह । योमामिति । यः अनेकजन्मोपचितपुण्यः परुषः मां परमात्मानं वेत्ति याथात्म्येन जानाति । कथंभूतं माम् । अजं जायतेऽसौ जः न जः अजः तं अजं जन्ममरणशून्यं अत एव अनादिं न विद्यते आदिर्यस्य सः अनादिः तं अनादिं सर्वेषां उत्पत्तिकारणं अत एव लोकमहेश्वरं महांश्चासौ ईश्वरश्च महेश्वरः लोक्यंत हति लोकाः लोकानां महेश्वरः लोकमहेश्वरः तं लोकमहेश्वरं सर्वलोकनियंतारं सः पुरुषः मर्त्येषु मरणधर्मात्मकेषु असंमूढः सन् संमोहवर्जितः सन् सर्वपापैः सर्वाणि च तानि पापानि च सर्वपापानि तैः सर्वपापैः प्रारब्धव्यतिरिक्तै पुण्यपापैः प्रमुच्यते जीवन्मुक्तो भवति ॥ ३ ॥ अर्थ : शिवाय जो मला जन्मरहित, कारणरहित व सर्व लोकांचा महेश्वर जाणतो, तो मर्त्यांमध्ये - मनुष्यांमये मोहित न झालेला पुरुष सर्व पापांपासून सर्वथा मुक्त होतो. [ मानवांतील आत्मानात्मविवेकीच सर्व पापांपासून मुक्त होतो. ] ३ विवरण :
बुद्धिर्ज्ञानमसंमोहः क्षमा सत्यं दमः शमः । अन्वय :
व्याख्या : 'अहमादिर्हि देवानां' इति यदुक्तं तस्य कारणं द्वाभ्यां श्लोकाभ्यां दर्शयति । बुद्धिरिति । एते बुद्धिर्ज्ञानमित्यादयः भूतानां प्राणिनां भावाः भवन्तीति भावाः भवन्ति स्वस्वकर्मवशात् भवन्ति पृथग्विधाः सन्तः पृथक् विधा येषां ते पृथग्विधाः नानाप्रकाराः सन्तः मत्त एव भवन्ति । एते के । बुद्धि लौकिकपदार्थानां यथावत् ज्ञानं अथवा सारासारविवेकनैपुण्यं ज्ञानं आत्मानात्मविवेकः चेत्यपरं असंमोहः संमोह न भवतीति असंमोहः अंतःकरणस्य वैकल्याभावः क्षमा द्वंद्वसहनं चेत्यपरं सत्यं यथार्थभाषणं च दमः सर्वेंद्रियाणां स्वस्वविषयेभ्यः उपरतिः च शमः अंतःकरणस्य कामादिभ्यः उपरतिः च सुखं अनुकूलसंवेदनीयं च दुःखं प्रतिकूलवेदनीयं च भवः उद्भवः च अभावः नाशः च भयं त्रासः च अभयं त्रासराहित्यम् ॥ ४ ॥ अर्थ : बुद्धि - अंतःकरणांतील सूक्ष्म विषय जाणण्याचे सामर्थ्य; ज्ञान, आत्मा, प्रकृति इत्यादि शब्दांच्या अर्थाचा बोध; असंमोह - ज्ञातव्य व कर्तव्य पदार्थांमध्ये विवेकपूर्वक प्रवृत्ति; क्षमा - कोणीं शिव्या दिल्या किंवा ताडन केले असतांही चित्ताला विकार होऊं न देणे; सत्य - जसें अवगत असेल, तसे दुसऱ्याला सांगणे; दम - बाह्येंद्रियांचा उपशम; शम - अंतःकरणाचा उपशम; सुख-दुःख, भव-उद्भव; अभाव-अनुद्भव, भीति, अभय, अहिंसा - अण्यांना पीडा न देणे, समता - संतोष; तप - इंद्रियांचा संयम करून शरीरास्ला पीडणें; दान, धर्मसंबंधीं कीर्ति, अकीर्ति, इत्यादि प्राण्यांचे नानाप्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात. [ सर्व प्राण्यांचे बुद्धयादि सर्व विकार मजपासूनच होतात. ] ४-५ विवरण :
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा । अन्वय : व्याख्या : महर्षय इति । किं च सप्त सप्तसंख्याकाः महर्षयः भृग्वादय तेभ्योपि भृग्वादिभ्योपि पूर्वे अन्ये चत्वारः महर्षयः सनकादयः तथा मनवः स्वायंभुवादयः चतुर्दश मनवः एते सर्वे मद्भावाः संतः मदीयः भावः प्रभावः येषु ते मद्भावाः मानसाः ममैव हिरण्यगर्भात्मनः मनसः संकल्पमात्रात् जाताः मानसाः । मत्त एव जाताः इति शेषः । लोके त्रैलोक्ये येषां भृग्वादीनां च सनकादीनां च मनूनां इमाः ब्राह्मणाद्याः वर्त्तमानाः पुत्रपौत्रादिरूपाः शि-ष्यप्रशिष्यादिरूपाः प्रजाः संततयः । वर्तन्ते इति शेषः ॥ ६ ॥ अर्थ : पूर्वांचे सात भृगुप्रभृति महर्षि, तसेच चार सावर्ण्य मनु, हे सर्व माझ्यामध्येंच भावना ठेवणारे असून मीं मनानेच त्यांना उत्पकन्न केलें आहे. या लोकांत त्यांच्याच या सर्व प्रजा आहेत.[ त्या मनूंची व महर्षींची सृष्टि म्ह. विद्या व जन्म यांच्या योगानेच झालेली संतति या लोकांतील ही सर्व स्थावर-जंगमरूप प्रजा आहे. ६ विवरण :
याप्रमाणे भगवान् सोपाधिक प्रभाव सांगून त्याच्या ज्ञानाचे फल सांगतात-
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः । अन्वय : व्याख्या : एतामिति । यः पुरुषः मम सर्वान्तर्यामिणः एतां अनंतरोक्तां विभूतिं भृग्वादिरूपां चेत्यपरं योगं मम अचिंत्यघटनाचातुर्यं तत्त्वतः सत्यत्वेन वेत्ति जानाति । सः पुरुषः अविकंपेन अप्रचलितेन योगेन सम्यग्ज्ञानेन युज्यते युक्तौ भवति । मम यथार्थात्मज्ञानवान् भवतीत्यर्थः । अत्र मद्विभूतियोगवित् सम्यग्ज्ञानी भवति इति अस्मिन् अर्थे संशयः नास्ति सर्वेषामपि मद्वाक्यं प्रमाणम् ॥ ७ ॥ अर्थ : जो माझ्या या विभूतीला व घटनेला तत्त्वतः जाणतो तो निश्चल योगाने - सम्यग्दर्शनाच्या स्थैर्यरूप योगाने युक्त होतो, यांत संशय नाहीं. [ ही वर सांगितलेली बुद्धीपासून अयशापर्यंत माझी विभूति व महर्षि, मनु यांतील योग-ऐश्वर्यादिक यांना जो पूर्णपणे जाणतो, तो यथार्थ ज्ञानाची स्थिरता याच ज्ञानास प्राप्त होतो. म्ह० जो माझें सोपाधिक ज्ञान संपादन करतो, त्याला त्याच्या द्वारा निरुपाधिक ज्ञान होतें. ] ७ विवरण :
आतां तो कशा प्रकारच्या निश्चल योगाने युक्त होतो' म्हणून विचारशील तर सांगतो -
अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते । अन्वय : व्याख्या : अहमिति । अहंसच्चिदानंदविग्रहः सर्वस्य कार्यकारणस्य भूतजातस्य प्रभवः प्रभवति अस्मादिति प्रभवः निमित्तोपादानभूतः अस्मि । अत एव मत्तः संकाशात् सर्वं निखिलं दृष्टश्रुतं प्रवर्त्तते उत्पन्नं भवति । बुधाः सर्वत्र मत्प्राप्तिविदः इति एवं प्रकारेण मत्वा ज्ञात्वा भावसमन्विताः संतः भावेन अविद्यमानमपि विश्वं मत्सत्तया सत्यवत् भाति इति विश्वासेन समन्विताः युक्ताः भावसमन्विताः मां जगति सच्चिदानंदविग्रहं भजन्ते सर्वात्मत्वेन सेवन्ते ॥ ८ ॥ अर्थ : मी 'वासुदेव'-संज्ञक परमक्ष सर्व जगाची उत्पत्ति आहे. मजपासून सर्व जगत् प्रवृत्त होते. परमार्थतत्त्वाविषयींच्या भावनेनें युक्त असलेले तत्त्ववेचे मला भजतात. [ मी सर्वांची प्रकृति-आत्मा आहे. मज अंतर्यामीकडून प्रेरित झालेले हे सर्व जगत् आपापल्या अधिकाराप्रमाणे मर्यादेचे उल्लंघन न करतां सर्व व्यवहार करते, असें जाणून ज्ञानी मला भजतात. माझें सर्वात्मत्व, सर्व प्रकृतित्व, सर्वेश्वरस्व, सर्वज्ञत्व, इत्यादि सर्व माहात्म्य जाणून माझ्या ठिकाणीच निष्ठा ठेवतात. हा संसार असार आहे, असें ज्यांना निश्चित कळले आहे, तेच ईश्वराच्या भक्तीचे अधिकारी आहेत. वर सांगितल्याप्रमाणे परमार्थतत्त्व ज्ञात झाले असतां प्रेम व आदर यांचा उद्भव होतो. त्यांनीं युक्त असणें हेही भगवद्भक्तीचे निमित्त आहे. ] ८ विवरण :
भगवद्भजनाचें हें वर सांगितले आहे एवढेंच साधन नाहीं, तर दुसरेंही आहे. ते कोणतें ? तर सांगतों -
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् । अन्वय : व्याख्या : बुधाः मां भजन्ते इति उक्तं तेषां भजनप्रकारं आह । मच्चित्ता इति । बुधाः मत्प्राप्तिविदः शिष्येभ्यः बोधयन्तः सन्तः बोधयन्ति ते बौधयन्तः सच्चिदानन्दरूपेण परमेश्वरेण विना नामरूपादिकं किमपि नास्ति इति बोधं कुर्वन्तः तथा सर्वत्र न्यायेन सर्वे विद्वांसोपि संभूय परस्परं यथास्यात्तथा मां सच्चिदानंदविग्रहं कथयन्तः सन्तः कथयन्ति ते कथयन्तः स्वविषयं परमात्मानं मां नित्यं सर्वकालं निवेदयन्तः तुष्यन्ति अनुमोदनसंतोषं प्राप्नुवन्ति चेत्यपरं रमन्ति तत्रैव मद्भजनेन विश्रान्तिं प्राप्नुवन्ति । ब्रह्मरूपाः भवन्तीत्यर्थः । कथंभूताः बुधाः । मच्चित्ता मय्येव ज्ञानानन्ते ब्रह्मणि चित्तं ज्ञानशक्तिः येषां ते मच्चित्ता । पुनः कथंभूताः बुधाः । मदद्गतप्राणाः मय्येव ज्ञानानन्ते ब्रह्मणि गतः विद्यमानः प्राणः सर्वेंद्रियक्रियाशक्तिः येषां ते मद्गतप्राणाः मदर्पितजीवाः ॥ ९ ॥ अर्थ : माझ्या मध्येंच ज्यांचे चित्त आहे व ज्यांची इंद्रिये मज वासुदेवालाच विषय करतात, असे माझे तत्त्ववेत्ते भक्त आचार्यांपासून ऐकलेले भगवत्तत्व परस्परांस समजावून देत असतात. 'मीच ज्ञान-बल-वीर्यादिकांच्या योगाने विशिष्ट आहें,' असें नित्य सांगतात व त्यामुळे सतत संतुष्ट व रममाण होतात. [ वर सांगितलेल्या सर्वांतर्यामी ईश्वराहून दुसर्या कोणत्याही पदार्थामध्ये चित्ताचा प्रसाद न होणे, चित्ताने प्रत्यगात्म्यावांचून दुसऱ्या कशाचेंही चिंतन न करणें, हेंच मच्चित्तत्व आहे. माझ्या ठिकाणीं ज्यांनीं आपल्या ही इंद्रियांचा उपसंहार केला आहे, किंवा मद्गतप्राण म्ह ० ज्यांचे जीवन मलाच प्राप्त झाले आहे; भगवानावांचून भक्तांचा आपल्या जीवनामध्येंही आदर नसतो. त्यांनीं आपले जीवनही ईश्वरार्पण केलेले असतें. यापेक्षा आणखी संन्यास तो कशाचा उरला ? असो. परस्परांस बोध करणारे, त्याचे स्वरूप सांगणारे, आचार्यांपासून श्रवण करून सहाध्यायी वादकथेनें एकमेकांस भगवानांचे ज्ञान करून देतात, तेही भगवद्भजनाचे साधन आहे. 'मी भगवान् ज्ञान-बल-वीर्य इत्यादि धर्मांनी विशिष्ट आहे' असें माझे कथन करणारे आचार्य शिष्यांना आगम, शास्त्र व उपपत्ति यांच्या योगाने विशिष्ट धर्मांनी युक्त अशा माझा बोध करतात. तेंही एक भजन साधन आहे. असे ते माझे भक्त अत्यंत संतुष्ट होतात आणि प्रिय मनुष्याच्या संगतीने जसे, तसेच ते त्या भजनांत रत होतात. यावरून भजनाचे अनेक प्रकार आहेत, हे सिद्ध झाले. ] ९ विवरण :
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् । अन्वय : व्याख्या : यस्मिन् पक्षे तुष्यन्ति च रमन्ति तस्मिन् पक्षे तेषां किं फलं इति आह । तेषामिति । अहं अंतर्यामी तेषां पुर्वोक्तप्रकारेण मां भजतां तं श्रुतिप्रसिद्धं बुद्धियोगं बुद्धिं वाक्यार्थज्ञानं अनुभवतीति बुद्धियोगः तं ददामि अंतर्यामिरूपेण बुद्धौ वाक्यज्ञानं प्रयच्छामि ते प्रीतिपूर्वकं भजन्तः येन बुद्धियोगेन मां तत्पदलक्ष्यं उपयान्ति प्रत्यग्रूपेण तादात्म्यं अनुभवन्ति । कथंभूतानां तेषां सततयुक्तानां सततं निरंतरं युक्ताः सततयुक्ताः तेषां सततयुक्तानां सदा समाहितानाम् । पुनः कथंभूतानां तेषाम् । प्रीतिपूर्वकं भजतां भजन्ति ते भजन्तः तेषां भजतां लुब्धधनवत् प्रेम्णा मां अनुसंदधताम् ॥ १० ॥ अर्थ : जे माझे भक्त होऊन वर सांगितलेल्या प्रकारांनी माझे भजम करतात, त्या माझ्यामध्यें चित्ताला सतत स्थिर केलेल्या व मोठ्या प्रेमाने मला भजणाऱ्या भक्तांना मी, ज्याच्या योगाने ते मलाच प्राप्त होतील, असा बुद्धियोग ज्ञानयोग देतों. [ माझ्या ठिकाणींच चित्ताला स्थिर करून व सर्व एषणांचा त्याग करून मोठ्या प्रेमानें मला भजणार्या भक्तांना मी 'अविकंप' ज्ञानयोग देतो. त्या तत्त्वज्ञानरूप बुद्धियोगानें ते मला प्राप्त होतात. 'हा मी आल्या आहे' अशा भावनेने ते मज आत्मरूप परमेश्वराला प्राप्त होतात. ] १० विवरण :
तेषामेवानुकंपार्थमहमज्ञानजं तमः । अन्वय : व्याख्या : तेषामेवेति । अहं अंतर्यामी तेषां पूर्वोक्तानां प्रीतिपर्वकं भजतां प्रारब्धकर्मवशात् कदाचित उत्पतितं अज्ञानजं अज्ञानात् जातं अज्ञानजं तमः मोहरूपं अनुकंपार्थं कृपया तत्संरक्षणार्थं ज्ञानदीपेन दीपयति प्रकाशयतीति दीपः ज्ञानमेव दीपः ज्ञानदीप तेन ज्ञानदीपेन स्वप्रकाशेन नाशयामि स्वात्मज्ञानेन निवारयामि । कथंभूतः अहम् । आत्मभावस्थः आत्मनः स्वस्य भावः सत्ता आत्मभावः आत्मभावे तिष्ठतीति । यद्वा आत्मनः बुद्धेः भावः प्रेम आत्मभावः आत्मभावे तिष्ठतीति आत्मभावस्थः ममानंदरूपत्वात् यत्र प्रेम वर्त्तते तत्रैव अहं यत्र अहं तत्रैव सूर्यवत् तमोनाशः । कथंभूतेन ज्ञानदीपेन । भास्वता स्वयंप्रकाशमानेनेत्यर्थः ॥ ११ ॥ अर्थ : त्यांच्यावर दया करण्यासाठींच, मी त्यांच्या अंतःकरणांत स्थित होऊन देदीप्यमान ज्ञानदीपानें अज्ञानामुळे उत्पन्न झालेला त्यांचा अविवेक घालवितो. [ मी त्यांच्यावर दया करण्यासाठीं त्यांच्या अंतःकरणांत स्थित होऊन आत्मसाक्षात्काररूप अत्यंत प्रदीप्त ज्ञानदीपानें अविवेकजन्य मोहान्धकार घालवितों. ] ११ विवरण :
अर्जुन उवाच - अन्वय :
व्याख्या : परंब्रह्मेति । हे भगवन् ! भवान् त्वं परं निरतिशयं ब्रह्म परिपूर्णं असि परं सर्वोत्कृष्टं धाम आश्रयं सर्वाधिष्ठानं असि । पवित्रं ज्ञानमात्रेणैव संसारशोधकं परमं परं अविद्याकल्पितं माति मिनोति दूरीकरोति इति परमं यद्वा स्मरणमात्रेण संसारशोधकत्वात् परम उत्कृष्टं असि । ऋषयः त्वां पुरुषं पूर्षु सर्वाशु नगरीषु शेते शयनं करोतीति पुरुषः तं चेत्यपरं शाश्वतं आविर्भावतिरोभावरहितं च दिव्यं द्योतनस्वभावं तथा आदिदेवं देवानां आदिः इति आदिदेवः तं आदिदेवं तथा अजं जन्मरहितं चेत्यपरं विभुं व्यापकं वा सर्वकारणं आहुः वदन्ति ॥ १२ ॥ अर्थ : भगवानांची पूर्वोक्त विभूति व योग ऐकून अर्जुन म्हणाला - सर्व ऋषि तुला 'आपण परमात्मा अहां, परम तेज अहां, परमपावन अहां व पुरुष, शाश्वत, दिव्य, सर्वांच्या पूर्वी झालेला देव, जन्मरहित व विभु अहां' असे म्हणतात. त्याचप्रमाणे देवर्षि नारद, असित देवल व व्यासप्रभृति इतर ऋषि तसेच म्हणतात आणि तूं स्वसःही मला तेंच सांगतोस. हे केशवा, तूं मला जें सांगत आहेस, ते सर्व मी खरें समजतो. हे भगवन्, तुझ्या निरुपाधिक स्वरूपाला देव जाणत नाहींत व दानवही जाणत नाहींत. [ केशवा, ऋषि व तूं जे मला सांगत अहां, त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुझ्या निरुपाधिक स्वरूपाला देव व दानवही जाणत नाहींत, मग मानवांची काय कथा ! ] १२-१४ विवरण :
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम । अन्वय : व्याख्या : स्वयमिति । हे पुरुषोत्तम ! हे क्षराक्षरातीत हे भूतभावन ! भूतानि भावयति उत्पादयतीति भूतभावनः तत्संबुद्धौ हे भूतभावन ! हे भूतेश भूतानां ईशः भूतेशः तत्संबुद्धौ हे भूतेश ! हे सर्वभूतनियन्तः ! हे देवदेव देवानां देवः देवदेवः तत्संबुद्धौ हे देवदेव ! द्योतनस्वभावानां सूर्यादीनां प्रकाशक ! हे जगत्पते जगतां पतिः जगत्पतिः तत्संबुद्धौ हे जगत्पते हे जगत्पालक । एतैः संबोधनैः सर्वोपादानत्वं उक्तम् । स्वयमेव त्वं आत्मना सर्वरूपेण आत्मानं सर्वोपादानं वेत्थ जानासि । अयं आत्मा प्रवचनेन न लभ्यः मेधया न लभ्यः श्रवणेन न लभ्यः किंतु भगवत्कृपयैव लभ्यः ॥ १५ ॥ अर्थ : हे पुरुषोत्तमा, हे भूतांना उत्पन्न करणाऱ्या व भूतांचें नियमन करणाऱ्या देवांच्याही देवा, हे जगत्पालका, तूं स्वतःच ज्ञानस्वरूपाने निरतिशय ज्ञानैश्वर्यसंपन्न अशा स्वतःला जाणतोस. [ तुजवांचून सर्व जड असल्यामुळें तुझ्या सोपाधिक स्वरूपालाही दुसरा कोणी जाणत नाही. तुला सर्वप्रकृतित्त्व, सर्वेश्वरत्व व सर्वकर्तृत्व आहे, तुझें सोपाधिक स्वरूप देवांनाही आराधना करण्यास योग्य आहे. ] १५ विवरण :
ज्याअर्थी तुझें स्वरूप आमच्या सारख्यांचा विषय होऊं शकत नाहीं, पण आम्हांला तें जाणण्याची मात्र इच्छा आहे त्याअर्थी -
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः । अन्वय : व्याख्या : निर्गुणरूपं अनन्तं अपि एकत्वात् त्वकृपया अंतर्मुखानां अनुभवगोचरं भवति । न तु बहिर्मुखानाम् । तेषां बहिर्मुखानां सगुणरूपं यथाकथंचित् ज्ञातुं शक्यं तत् कथय इति प्रार्थयते । वक्तुमिति । हे जगदात्मन् ! त्वं दिव्याः दिव्यरूपाः आत्मावभूतयः आत्मनः स्वस्य विभूतयः आत्मविभूतीः आत्मनः आविर्भावस्थानानि अशेषेण प्रधानभूतासु यथा अवशेषो न भवतीति अशेषः तेन अशेषेण समग्रेण वक्तुं उपदेष्टुं अर्हसि योग्यो भवसि । हीति स्फुटम् । याभिः प्रसिद्धाभिः विभूतिभिः त्वं इमान् प्रसिद्धान् लोकान् भूरादिलोकान् व्याप्य तिष्ठसि ॥ १६ ॥ अर्थ : ज्या विभूतींनी तूं या लोकांस व्यापून रहातोस, त्या आपल्या दिव्य विभूति संपूर्णपणे सांगण्यास तूंच योग्य आहेस. १६ विवरण :
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् । अन्वय :
व्याख्या : ननु- त्वं यथोक्तं निर्गुणं चिंतय किमिति सगुणचिंतां करोषि इत्याशंक्य अहं यथोक्तं निर्गुणं चिंतयन्नपि विभूतिभेदेषु मया कथं चिंत्योसि इति कृपया कथय इति प्रार्थयामीत्याह । कथमिति । हे भगवन् ! हे अणिमाद्यैश्वर्योपेत ! हे योगिन् ! हे अचिंत्यरूप ! अहं त्वां सर्वकारणं सदा सर्वाशु अवस्थासु परिचिंतयन् सन् परिचिंतयतीति परिचिंतयन् कथं विद्यां कथं जानीयाम् ? त्वं केषु केषु भावेषु केषु केषु विभूतिभेदेषु मया चिंत्यः चिंतितुं योग्यः चिंत्यः चिंतनीयः असि ? तस्मात् विभूतियोगं मां कथयेतिभावः ॥ १७॥ अर्थ : तू माझ्या विभूति कशासाठी ऐकण्याची इच्छा करतोस, म्हणून विचारशील तर त्याचे कारण सांगतों - हे योगिन्, तुझें सर्वदा चिंतन करणाऱ्या मीं तुला कसें बरे जाणावें ? हे भगवन्, तूं को, कोणत्या पदार्थांमध्ये मजकडून चिंतन करण्यास योग्य आहेस ! हे जनर्दना, तुझ्या आत्म्याचा विस्तार - विशेष प्रकारचे योगैश्वर्य व ध्यानास योग्य असलेल्या पदार्थांचा विस्तार पुनरपि सविस्तर सांग. कारण तुझे वाक्यामृत ऐकणाऱ्या माझी तृप्ति होत नाही. [ ऐश्वर्यसंपन्न ईश्वरा, मी स्थूलबुद्धि आहे. म्हणून कोणत्या प्रकाराने सदा तुझें परिचिंतन करीत होत्साता, शुद्धचित्त होऊन निरुपाधिक अशा तुला जाणूं शकेन ! तसेंच कोणकोणत्या वस्तूंमध्ये मीं तुझें ध्यान करावे ? म्हणून आपली योगैश्वर्यशक्ति व ध्येयपदार्थांचा विस्तार मला पुनरपि सांग. ] १७-१८ विवरण :
श्रीभगवानुवाच - अन्वय : व्याख्या : एवं सख्युः भक्तस्य सप्रेमवाक्यं श्रत्वा कृपया आह । हन्तेति । हन्तेति सानुकंपसंबोधनम् । हे कुरुश्रेष्ठ ! कुरुषु कुरुकुलोद्भवेषु राजसु मध्ये श्रेष्ठः तत्संबुद्धौ हे कुरुश्रेष्ठ ! अहं ते तुभ्यं दिव्याः अलौकिकाः आत्मविभूतयः आत्मनः मम विभूतयः अभिव्यक्तिस्थानानि आत्मविभूतीः प्राधान्यतः मुख्यत्वेन कथयिष्यामि उपदेक्ष्यामि । ननु- मयाविस्तरेण कथय इति उक्तम् । किमिति प्राधान्येन कथयिष्यामि इति वदसि तत्राह । मे मम विस्तरस्य विभूतिविस्तरस्य अन्तः अवधिः नास्ति इति हेतोः प्राधान्यतः कथयिष्यामि इति उक्तमित्यर्थः ॥ १९ ॥ अर्थ : अर्जुनाला आश्वासन देत भगवान् म्हणाले - अर्जुना, बरें आहे, मीआतां तुला आपल्या मुख्य मुख्य दिव्य आत्मविभूति सांगतो. कारण माझ्या विस्ताराचा अंत नाहीं. तो अनंत आहे. त्यामुळे तो पूर्णपणे सांगतां येणे शक्य नाहीं. १९ विवरण :
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः । अन्वय : व्याख्या : तत्र प्रथमं मुख्यं विभूतिमाह । अहमात्मेति । हे गुडाकेश ! गुडाकायाः निद्रायाः अथ च आलस्यादेः ईशः नियन्ता तत्संबुद्धौ हे गुडाकेश हे जितानिद्र हे अप्रत्त ! अहं सर्वभूताशयस्थितः सर्वाणि च तानि भूतानि च सर्वभूतानि सर्वभूतानां आशयः बुद्धिः सर्वभूताशयः तस्मिन् अंतर्यामितया तिष्ठतीति सर्वभूताशयस्थितः आत्मा अतति सातत्येन सर्वत्र गच्छतीति आत्मा अस्मि । चेत्यपरं भूतानां चराचराणां आदिः उपादानकारणं उत्पत्तिकारणं अहं अस्मि । चेत्यपरं मध्यं पोषणहेतुः अहं अस्मि । चेत्यपरं अन्तः प्रलयकारणमपि अहमेव अस्मि । तथा चश्रुतिः - ’यतो वा इमानि भूतानि जायंते । येन जातानि जीवन्ति । यत्प्रयंत्यभिसंविशन्ति' हति ॥ २० ॥ अर्थ : हेअर्जुना, आतां अगोदर माझी पहिली विभूति ऐक. मी सर्व प्राण्यांच्या हृदयांत स्थित असलेला आत्मा आहे. मी सर्व भूतांचा आदि-कारण, मध्य-स्थिति व अंत-प्रलय आहे. [ भूतांच्या आशयात-अंतर्हृदयांत जेथे कर्म व ज्ञान यांचे संस्कार रहातात, तेथें स्थित असलेला मी प्रत्यगात्मा आहें, असे नित्य ध्यान करावे. पण जो मध्यम किंवा मंद अधिकारी परमात्म्याचे प्रत्यगात्मत्वाने ध्यान करूं शकत नाहीं, त्यानें मीच सर्व भूतांचे कारण, स्थिति व प्रलय आहें, परमात्मा सर्व कारण, सर्वज्ञ व सर्वेश्वर असल्यामुळें तो सर्वत्र ध्यान करण्यास योग्य आहे, दुसरा कोणीही नाहीं, असे ध्यान करावे. ] २० विवरण :
आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् । अन्वय :
व्याख्या : इदानीं विभूतीः कथयति । आदित्यानामिति । आदित्यानां अदितेः अपत्यानि पुमांसः आदित्याः तेषां द्वादशादित्यानां मध्ये अहं विष्णः वामनः उर्पेद्रत्वेन वर्तमानः अस्मि । ज्योतिषां ज्योतिः तेजः विद्यते येषां ते ज्योतिषः तेषां ज्योतिषां प्रकाशानां मध्ये अंशुमान् अंशवः किरणाः विद्यन्ते यस्य सः अंशुमान् विश्वव्यापी त्रैलोक्यप्रकाशकः रविः सूर्यः अहं अस्मि । मरुतां एकोनपंचाशत्संख्याकानां यद्वा सप्तमरुद्गणानां वायूनां मध्ये मरीचिनामा अहं अस्मि । सप्तवायवः आवहः प्रवहः विवहः परावहः उद्ववहः परिवहः प्रभवहश्चेति । नक्षत्राणां अश्विन्यादीनां मध्ये शशी चद्रः अहं अस्मि ॥ २१ ॥ अर्थ : पण, हे दुसऱ्या प्रकारचे ध्यान ड्यण्यासही असमर्थ असलेल्या पुरुषाने मी आदित्यांतील विष्णू आहे. ज्योतींतील किरणवान् सूर्य आहे. मरुत् या नांवाच्या देवांतील मी मरीचि आहे. नक्षत्रातील चंद्र आहे. वेदांतील सामवेद, देवांतील इंद्र, इंद्रियांतील मन व भूतांतील चेतना आहे. [ शरीर व इंद्रिये यांच्या संघातांत नित्य अभिव्यक्त होणारी जी बुद्धिवृत्ति ती चेतना होय. ] २१-२२ विवरण :
रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् । अन्वय :
व्याख्या : रुद्राणामिति । किं च रुद्राणां एकादशरुद्राणां मध्ये शंकरः शं कल्याणं करोतीति शंकरः नीलकंठः अहं अस्मि । यक्षरक्षतां यक्षाश्च रक्षांसि च यक्षरक्षांसि तेषां मध्ये वित्तेशः वित्तानां द्रव्याणां ईशः वित्तेशः कुबेरः अहं अस्मि । वसूनां अष्टानां मध्ये पावकः हविर्वहः अहं अस्मि । किं च शिखरिणां शिखराणि येषां सति ते शिखरिणः तेषां शिखरवतां पर्वतानां मध्ये मेरुः सुवर्णमयः पृथिवीमध्यभागस्थः अहं अस्मि ॥ २३ ॥ अर्थ : मी अकरा रुद्रांतील शंकर आहे. यक्ष-राक्षसातील कुबेर आहें. आठ वसूंतील 'पावकअग्नि' या नांवाचा वसू मी आहें. मी शिखरयुक्त पर्वतांतील मेरु आहें. हे पार्था, मी पुरोहितांतील मुख्य बृहस्पति आहे, असे तूं जाण. मी सेनापतींतील स्कंद-कार्तिकस्वामी आहे व देवनिर्मित सरोवरांतील सागर आहे. मी महर्षींतील भृगु व पदरूप वाणींतील ओंकार हें एकाक्षर आहे. मी यज्ञांतील जपयज्ञ व स्थावरांतील हिमालय आहें. २३-२५ विवरण :
अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः । अन्वय : व्याख्या : किं च अश्वत्थ इति सर्ववृक्षाणां सर्वे च ते वृक्षाश्च सर्ववृक्षाः तेषां मध्ये सर्ववनस्पतीनां मध्ये अश्वत्थः शमीगर्भः अहं अस्मि । देवर्षीणां मध्ये देवाश्च ते ऋषयश्च देवर्षयः तेषां देवर्षीणां मध्ये नारदः ब्रह्मपुत्रः सर्वात्मदृक् अहं अस्मि । गंधर्वाणां मध्ये देवगायकानां मध्ये चित्ररथः चित्ररथगंधर्वः अहं अस्मि । सिद्धानां मध्ये उत्पन्नज्ञानवतां मध्ये कपिलः कर्दमात् देवहूत्यां आविर्भतः मुनिः मननशीलः मुनिः अहं अस्मि ॥ २६ ॥ अर्थ : मी सर्व वनस्पतींतील अश्वत्थ-पिंपळ आहे. देवर्षींतील नारद आहें. गंधर्वांतील तुझा मित्र चित्ररथ मी आहे. सिद्धांतील कपिलमुनि मी आहे. [ जे देवच असून मंत्रर्शित्वामुळे ऋषित्वास प्राप्त होतात, ते देवर्षि. अशा देवर्षींतील नारद मी आहे. जन्मतः धर्म, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य यांच्या आधिक्याला प्राप्त झालेल्या सिद्धांतील मी कपिलमुनि आहे. ] २६ विवरण :
उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि मां अमृतोद्भवम् । अन्वय : व्याख्या : किं च उच्चैःश्रवसमिति । हे पार्थ ! त्वं अश्वानांमध्ये देवादिवाहनानां मध्ये उच्चैःश्रवसं अश्वं मां विद्धि मद्विभूतिं जानीहि । कथंभूतं अश्वम् । अमृतोद्भवं अमृतार्थं देवासुरैः क्षीरसागरस्य मथनसमये उद्भवतीति अमृतोद्भवः तं अमृतोद्भवमित्यर्थः । त्वं गजेद्राणा मध्ये गजानां इद्राः गजेंद्राः तेषां दिग्गजानां मध्ये ऐरावतं इरायाः पृथिव्याः अपत्यं पुमान् ऐरावतः तं ऐरावतं इंद्रवाहनं मां विद्धि मद्विभूतिं जानीहि । कथं भूतं ऐरावतम् । अमृतोद्भवं सागरमथनसमये उत्पन्नम् । त्वं नराणां मध्ये मनुष्याणां मध्ये नराधिपं नरान् अधिष्ठाय पातीति नराधिपः तं नराधिपं राजानं मां विद्धि ॥ २७॥ अर्थ : मला अश्वांतील अमृतासाठी केलेल्या क्षीरसागराच्या मंथनांतून उत्पन्न झालेला उच्चैःश्रवा नामक अश्व जाण. मी गजेंद्रांतील ऐरावत व मनुष्यांतील राजा आहे. २७ विवरण :
आयुधानामहं वज्रं धेनूनां अस्मि कामधुक् । अन्वय :
व्याख्या : आयुधानामिति । किं च आयुधानां मध्ये प्रहरणसाधनानां शस्त्राणां मध्ये वज्रं दध्यङ्स्थिनिर्मितं शतपर्वेंद्रायुधं अहं अस्मि । धेनूनां सुरभीणां मध्ये कामधुक् कामान् मनोरथान् दोग्धीति कामधुक् इच्छितकामप्रसवा अहं अस्मि । प्रजनः प्रजोत्पत्तिहेतुः कदर्पः कामः अहं अस्मि । सर्पाणां मध्ये सविषाणांमध्ये वासुकिः तीव्रविषधरः प्रसिद्धः अहं अस्मि ॥ २८ ॥ अर्थ : मी आयुधांतील वज्र, धेनूंतील कामधेनु, प्रजोत्पादनाचे कारण कंदर्प - काम व सविष सर्पांतील वासुकी आहे. निर्विष नागांतील अनंत, जलदेवतांतील वरुण, पितरांतील 'अर्यमा' नावाचा पितृराज व संयम करणारांतील यम आहे. मी दैत्यांतील प्रल्हाद आहे. गणना करणारांतील काल आहें. पशूंतील सिंह किंवा वाघ आहे व पक्ष्यांतील गरुड आहे. मी पावन करणारांतील वायु, शस्त्रधारण करणारांतील दाशरथि राम, मासे, कासव, इत्यादि जलचर प्राण्यांतील सुसर-मगर मी आहे व प्रवाहांतील गंगा मी आहे. २८-३१ विवरण :
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन । अन्वय : व्याख्या : सर्गाणां सृष्टीनाम् आदिः अन्तश्च मध्यं चैव अहम् उत्पत्तिस्थितिलयाः अहम् अर्जुन । भूतानां जीवाधिष्ठितानामेव आदिः अन्तश्च इत्याद्युक्तम् उपक्रमे, इह तु सर्वस्यैव सर्गमात्रस्य इति विशेषः । अध्यात्मविद्या विद्यानां मोक्षार्थत्वात् प्रधानमस्मि । वादः अर्थनिर्णयहेतुत्वात् प्रवदतां प्रधानम् , अतः सः अहम् अस्मि । प्रवत्त्कृद्वारेण वदनभेदानामेव वादजल्पवितण्डानाम् इह ग्रहणं प्रवदताम् इति ॥ ३२ ॥ अर्थ : हे पार्थ, मी सृष्टीची उत्पत्ति, स्थिति व लय आहे. विद्यांतील अध्यात्मविद्या आहे. मी वाद, जल्प व वितंडा यांतील वाद आहे. [ कारण वाद अर्थांच्या निर्णयाला कारण होतो. ] ३२ विवरण :
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च । अन्वय : व्याख्या : अक्षराणां वर्णानाम् अकारः वर्णः अस्मि । द्वन्द्वः समासः अस्मि सामासिकस्य च समाससमूहस्य । किञ्च अहमेव अक्षयः अक्षीणः कालः प्रसिद्धः क्षणाद्याख्यः, अथवा परमेश्वरः कालस्यापि कालः अस्मि । धाता अहं कर्मफलस्य विधाता सर्वजगतः विश्वतोमुखः सर्वतोमुखः ॥ ३३ ॥ अर्थ : मी अक्षरांतील ' अकार ' हें अक्षर आहे. समासांच्या समूहांसील उभयपदार्थप्रधान 'द्वंद्व' समास मी आहे. [ कारण त्यांतील सर्व पदें अर्थामध्ये येतात. अक्षय्य काल मीच आहे. मी सर्व जगाला त्याच्या कर्माचे फल देणारा सर्वतोमुख धाता आहे. ] ३३ विवरण :
मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् । अन्वय : व्याख्या : आपदि वैकल्याभावः क्षमा सहिष्णुता अहं अस्मि । यासां सप्तानां स्त्रीणां भासमात्रेण लोके प्राणिनः श्लाव्याः (श्लाघ्याः ?) भवन्तीति भावः ॥ ३४ ॥ अर्थ : मी सर्वांच्या धनादिकांचें व प्राणांचे हरण करणारा मृत्यू आहे. (परमेश्वर प्रलयसमयीं सर्वांचे हरण करीत असल्यामुळे सर्वहर आहे व तोच मी होय.) पुढें होणाऱ्या उष्कर्षाचा-अभ्युदयाचा उद्भव म्ह. हेतु मी आहे. आणि सर्व स्त्रियांतील उत्तम स्त्रिया अशा ज्या कीर्ति, श्री, वाक्, स्मृति, मेधा-धारणाशक्ति, धृति व क्षमा या देवता, त्या मी आहे. [ कीर्ति-धार्मिकतेविषयींची ख्याति; श्री-लक्ष्मी, कांति, शोभा; वाक्-सर्व अर्थ प्रकाशन करणारी वाणी; स्मृति-दीर्घ कालापूर्वी अनुभविलेल्या गोष्टींची स्मरणशक्ति; मेधा-ग्रंथधारण शक्ति; धृति-धैर्य; क्षमा-मान व अपमान या दोन्ही वेळीं मन निर्विकार ठेवणे. या अलौकिक स्त्रियांतील या उत्तम स्त्रिया मी आहे. ज्यांच्या आभासमात्र संबंधानेंही लोक आपल्याला कृतार्थ समजतात त्या कीर्त्यादिक मी आहें. ] ३४ विवरण :
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् । अन्वय : व्याख्या : बृहत्सामेति । किंच साम्नां सप्तसंख्याकानां, ’त्वामिंद्र हवामहे’ इत्यस्यां ऋचि यद्गीयमानं बृहत् श्रेष्ठं साम तत् अहं अस्मि । छंदसां मध्ये छदोविशिष्टानां मंत्राणां मध्ये गायत्री चतुर्विंशत्यक्षरात्मिकः द्विजत्वप्रतिपादको मंत्रः अहं अस्मि । तथा मासानां मध्ये चैत्रादिफाल्गुनांतानां द्वादश मासानां मध्ये मार्गशीर्षः मासः अहं अस्मि । ऋतूनां मध्ये हेमंतादिशरदंतीनां मध्ये कुसुमाकरः कुसुमानां पुष्पाणां आकरो यस्मिन् सः कुमुमाकरः वसंतः अहं अस्मि ॥ ३५ ॥ अर्थ : त्याचप्रमाणे सामांतील बृहत्साम मी आहें. मी छंदांतील गायत्री छंद आहे. (कारण गायत्री द्विजांच्या दुसऱ्या जन्माची जननी आहे.) मी चैत्रादि बारा महिन्यातील मार्गशीर्ष मास आहे. ( कारण तो महिना परिपक्व धान्यांनीं युक्त असतो.) तसेच वसंतादि ऋतुतील मी वसंत आहें. ( कारण तो ऋतु फार रमणीय असतो.) ३५ विवरण :
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् । अन्वय : व्याख्या : द्यूतमिति । किं च छलयतां छलयन्ति ते छलयन्तः तेषां अन्योन्यवंचनपराणां संबंधि द्यूतं पणनिबंधेन पाशक्रीडा अहं अस्मि । तेजस्विनां प्रशस्तं तेजो येषां ते तेजस्विनः तेषां प्रागल्भ्यवतां अथवा प्रभावतां तेजः प्रागल्भ्यं अथवा प्रभा अहं अस्मि । जिगीषुणा संबंधि जयः अहं अस्मि । व्यवसायिनां संबंधि व्यवसायः अहं अस्मि । सत्त्ववतां सत्त्वगुणयुक्तानां सात्त्विकबलयुक्तानां सत्त्वं अहं अस्मि ॥ ३६ ॥ अर्थ : छल म्हणजे कपट करणाऱ्या पदार्थांतील फाशांनीं खेळणे इत्यादि स्वरूपाचे द्यूत मी आहें. ( तें सर्वस्व घालविण्यास कारण होते. निराळ्याच मिषाने दुसऱ्याच्या इष्टाचा घात करणें व आपले इष्ट साधणे हा छल होय.) मी तेजस्वी लोकांतील तेज आहे. विजयीजनांचा जय आहें. व्यवसायी लोकांचा व्यवसाय व सात्त्विक लोकांचे सत्त्व मी आहें. ३६ विवरण :
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः । अन्वय :
व्याख्या : वृष्णीनामिति । किं च वृष्णीनां मध्ये यादववंशभेदानां मध्ये वासुदेव वसुदेवस्य अपत्यं पुमान् वासुदेवः वसुदेवात्मजः त्वदुपदेष्टा अहं अस्मि । पांडवानां पांडपुत्राणां मध्ये धनंजयतीति धनंजयः त्वं अहं अस्मि । मुनीनां मननशीलाः मुनयः तेषां मननशीलानां मध्ये व्यासः वेदविभागकर्त्ता सत्यवतीसुतः अहं अस्मि । कवीनां सूक्ष्मदर्शिनां मध्ये उशनाः शुक्राचार्यः कविः सर्वात्मदर्शी अहं अस्मि ॥ ३७ ॥ अर्थ : मी वृष्णींतील वासुदेव आहे. पांडवांतील धनंजय आहें. मननशील - सर्व पदार्थांचे ज्ञानी, असे जे मुनि, त्यांमध्यें मी व्यास आहें. सर्वज्ञ विद्वानांतील 'शुक्राचार्य' या नांवाचा कवि-सर्वज्ञ मी आहें. प्राण्यांचे दमन करणारांतील दंड, उद्धटांना नम्र करण्याचें साधन मी आहे. जयाची इच्छा करणारांमध्ये मी नीति आहे. गुह्यांतील मौन आहे. ज्ञानवानांतील श्रवणादिकांच्या द्वारा परिपक्व झालेल्या चित्तसमाधीपासून उद्भवलेले सम्यग्ज्ञान मी आहे. ३७-३८ विवरण :
यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन । अन्वय : व्याख्या : यच्चापीति । किं च सर्वभूतानां चराचराणां यत् बीजं प्ररोहकारणं अस्ति तत् प्ररोहकारणं अहं अस्मि । किं बहुनोक्तेन मद्विना किमपि नास्तीत्याह । हे अर्जुन ! यत् चराचरभूतं स्यात् चेत्यपरं भवेत् तत् भूतं चराचरभूतं मया विना नास्ति ॥ ३९ ॥ अर्थ : हे अर्जुना, याशिवाय सर्वभूतांचे जें बीज, तें मी आहे. जें चर किंवा अचर भूत माझ्यावांचून असेल, असें कांहीं नाहींच. [ सर्व जड समूहांत प्रतिबिंबित झालेले चैतन्य हेंच बीज आहे. तात्पर्य कोणतेंही स्थावर-जंगम भूत मजवांचून नाहीं. ] ३९ विवरण :
नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप । अन्वय : व्याख्या : किमिति सामान्येन उच्यते इति आह । नांतोस्तीति । हे परंतप ! परान् कामादिशत्रून् तापयतीति परंतपः तत्सबुद्धौ हे परंतप कामादिशत्रु- संतापक ! मम अनंतमूर्त्तेः दिव्यानां अलौकिकानां विभूतीनां अन्तः पर्यवसानं नास्तीत्यर्थः । अनंतत्वात् । मया त्वदुपदेष्ट्रा सर्वज्ञेन एषः अधुना कथितः विभूतेः विस्तरस्तु प्रपंचस्तु उद्देशतः संक्षेपतः प्रोक्तः कथितः ॥ ४० ॥ अर्थ : अर्जुना, माझ्या दिव्य-अलौकिक विभूतींचा-विस्तारांचा अंत-सीमा नाहीं. तथापि मीं हा विभूतींचा विस्तार संक्षेपाने सांगितला आहे. [ सर्वांचा आत्मा, अशा ईश्वराच्या दिव्य विभूतींची मर्यादा कोणालाही सांगणे किंवा जाणणे शक्य नाहीं. त्याची मर्यादा कोणालाही ठाऊक नाहीं. त्याचा अन्त कोणालाही लागला नाहीं. त्यामुळे तो कोणालाही सांगतां येत नाहीं. यास्तव मीं हा विभूतीचा विस्तार एकदेशानें सांगितला आहे. ] ४० विवरण :
यद् यद् विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा । अन्वय : व्याख्या : एवमपि पुनः साकल्येन वक्तव्यं इति आकांक्षमाणं प्रत्याह । यद्यदिति । यत् यत् प्रसिद्धं विभूतिमत् विभूतिः विद्यते यस्मिन् तत् विभूतिमत् ऐश्वर्ययुक्तं सत्त्वं पदार्थजातं वस्तुमात्रं ऊर्जितमेव केनचिद्गुणविशेषेण अतिशयितमेव अस्ति । कथंभूतं सत्त्वम् । श्रीमत् श्रीः विद्यते यस्मिन् तत् संपद्युक्तम् । हे पार्थ ! स्वं तत् तत् पदार्थजातं ममैव तेजोंशसंभवं तेजसः प्रभावस्य अंशः तेजोंशः तेजोंशात् संभवति तत् तेजोंशसंभवं अवगच्छ जानीहि ॥ ४१ ॥ अर्थ : वर न सांगितलेल्याही ईश्वराच्या विभूतींचा संग्रह करण्यासाठीं मी तुला विभूतींचे लक्षण सांगतों - जे जें ऐश्वर्ययुक्त, समृद्धि किंवा कांति यांनी युक्त अथवा बलाठ्यसत्त्व-वस्तु-प्राणी आहे, तें तेंच माझ्या तेजाच्या अंशापासून झालेले आहे, असें तूं जाण. यालोकीं उत्कर्षाने युक्त असलेला प्रत्येक प्राणी किंवा पदार्थ ईश्वराच्या तेजोंशापासून झाला आहे. असा तूं निश्चय कर. ४१ विवरण :
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन । अन्वय :
व्याख्या : किमनेन परिच्छिन्नेन ज्ञानेन मम व्यापकत्वं त्वं विषयीकुरु इत्याह । अथवेति । अथवा इति प्रकारांतरोपक्रमार्थम् । हे अर्जुन ! तव बहुना पृथक् पृथक् एतेन परिच्छिन्नेन विभूतिप्रपंचेन ज्ञानेन किं किं कार्यम् । न किमपीत्यर्थः । तर्हि अपरिच्छिन्नं त्वां कथं जानीयां इति आह । अहं सच्चिदानंदरूपः इदं दृष्टश्रुतं कृत्स्नं संपूर्णं जगत् चराचरं एकांशेन एकश्चासौ अंशश्च एकांशः तेन विष्टभ्य धृत्वा अथवा व्याप्य अवस्थितः परिपूर्णरूपेण स्थितः अस्मि । 'पादोस्य विश्वाभूतानि' इति श्रुतेः ॥ ४२ ॥
अर्थ : किंवा, हे अर्जुना, हे असे तूं पुष्कळ जरी जाणलेस, तरी तुला त्यापासून काय लाभ होणार आहे ? कांहीं नाहीं. यास्तव मी आपल्या एका अंशानें हे सर्व जगत् दृढ धारण करून राहिलो आहे. [ कितीही सांगितले तरी आणखी शिल्लकच रहाणारी ही विभूति तू किती जरी ऐकलीस, तरी ती अपूर्णच रहाणार. माझें पूर्णपणे ज्ञान होणें कोणालाही शक्य नाही. यास्तव तूं माझ्या सकल विभूतींना थोडक्यांत ऐक. माझा एक अवयव म्ह० सर्वभूतस्वरूप - सर्व प्रपंचाची उत्पादनशक्ति याच उपाधीने युक्त अशा एका पादानें या सर्व जगाचे धारण केले आहे. या प्रमाणें या अध्यायांत भगवानांच्या नानाप्रकारच्या विभूति ध्येयरूपानें व ज्ञेयरूपाने सांगितल्या आहेत व सर्व प्रपंचात्मक ध्येयरूप प्रदर्शित करून 'याचे तीन पाद निरुपाधिक अवस्थेंत आहेत' अशा अर्थाच्या श्रुति वचनाने निरुपाधिक- प्रपंचातीत तत्त्वाचा उपदेश करणाऱ्या भगवानांनी तत्पदाचा परिपूर्ण सच्चिदानंद एकरस आहे आत्मा हा लक्ष्यार्थ निश्चित केला आहे. ] ४२ विवरण : ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ |