श्रीमद् भगवद्‌गीता
पञ्चमोऽध्यायः

कर्मसंन्यासयोगः


चवथ्या अध्यायांत 'कर्मण्यकर्म य: पश्येत्०' थेथून आरंभ करून 'योग संन्यस्त कर्माणं' (४१) येथपर्यंतच्या वचनांनी भगवानानी सर्व कर्मांचा संन्यास सांगितला आहे, तसेच परोक्षज्ञानरूपीं खड्गाने संशयाचा छेद करून साक्षात्काराचा उपाय असा जो कर्मयोग त्याचें अनुष्ठान कर, असेंहि शेवटी सांगितले आहे. परंतु कर्मानुष्ठान व कर्मसंन्यास यांचा चालणे व उभे राहणॅ यांप्रमाणे परस्परविरोध आहे. त्यामुळे एकाच पुरुषाला एकाच वेळीं त्यांचे अनुष्ठान करतां येणे शक्य नाहीं. भिन्न काली त्यांचे अनुष्ठान करावे असेंही विधान नाहीं. तेव्हां अर्थातच कर्मसंन्यास व कर्मयोग यांतील कांहीं तरी एकच करणे प्राप्त झाले असतां त्यांतल्या त्यांत जें अधिक प्रशस्त असेल तेच करावें, असे समजून 'त्यांतील अधिक चांगलें कोणते ?' हें जाणण्याच्या इच्छेने अर्जुन म्हणाला-

अर्जुन उवाच -
सन्न्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥ ५-१ ॥

अन्वय : कृष्ण, कर्मणां संन्यासम् - हे कृष्णा, कर्मांच्या संन्यासाची (प्रशंसा करता); च पुनः योगं शंससि - आणि लगेच कर्मयोगाची प्रशंसा करीत आहात; अतः एतयोः यत् एकम् - म्हणून या दोहोंतील जे एक; मे सुनिश्चितं श्रेयः - माझ्यासाठी चांगल्याप्रकारे व निश्चित कल्याणकारक साधन असेल; तत् ब्रूहि - ते तुम्ही मला सांगा. ॥ १ ॥

व्याख्या : ज्ञानकर्मोपदेशेन संशयाविष्टमानसम्‌ । चोदयामास यः प्रीत्या स कृष्णः शरणं मम । हे कृष्ण ! हे सदानंदमूर्ते ! त्वं कर्मणां नित्यनैमित्तिकानां संन्यासं त्यागं शंससि कथयसि । चेत्यपरं पुनः कर्मत्यागकथनानंतरं योगं युद्धाख्यं स्वधर्मं शंससि कथयसि । उभयोः विरुद्धयोः दोलायितांतःकरणाय मे मह्यं एतयोः त्यागकर्मणोः मध्ये यत्‌ त्यागकर्मात्मकं श्रेयः कल्याणकारकं प्रशस्यतरं कर्म वा त्यागं मन्यसे तत्‌ कल्याणं सुनिश्चितं सुतरां अत्यंतं निश्चितं तव मतं सुनिश्चितं ब्रूहि कथय ॥ १ ॥

अर्थ : कृष्णा, एकदां तूं कर्मांचा संन्यास सांगतोस व पुनरपि शास्त्रोक्त कर्माचे अनुष्ठान करावयास सांगतोस, पण त्यांचा परस्परविरोध असल्यामुळें एकाच वेळीं ज्यांचे अनुष्टान करतां येणे शक्य नाहीं. यास्तव, त्यातील जे एक तुला अत्यंत श्रेयस्कर वाटत असेल, तेच तूं निश्चयानें सांग. ॥ १ ॥

विवरण :


श्रीभगवानुवाच -
सन्न्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसन्न्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥ ५-२ ॥

अन्वय : संन्यासः च कर्मयोगः उभौ - कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही; निःश्रेयसकरौ - परम कल्याण साधणारे आहेत; तु तयोः - परंतु त्या दोहोंमध्ये; कर्मसंन्यासात् कर्मयोगो विशिष्यते - कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग हा साधण्यास सुगम असल्यामुळे श्रेष्ठ आहे. ॥ २ ॥

व्याख्या : उभौ द्वौ निःश्रेयसकरौ नितरां साक्षात्‌ शीघ्रं समीपं श्रेयः मोक्षसंपादनं कुर्वतः तौ निःश्रेयसकरौ आस्ताम्‌ । उभौ कौ । संन्यासः सर्वकर्मणां यथाशास्त्रेण परित्यागः ज्ञानप्रधानः चेत्यपरं कर्मयोगः फलाभिसंधिराहित्येन ईश्वरार्पणं नित्यनैमित्तिकानुष्ठानं तयोस्तु संन्यासकर्मयोगयोस्तु मध्ये कर्मसंन्यासात्‌ कर्मणां संन्यासः कर्मसंन्यासः तस्मात्‌ कर्मसंन्यासात्‌ ज्ञानप्रधान साधनश्रवणादि रहितात्‌ पतनहेतुभूतात्‌ कर्मयोगः स्वधर्माचरणं विशिष्यते ईश्वरार्पणबुद्ध्या अनुष्ठानेन ईश्वरप्रसादित ज्ञानप्रधान संन्यासप्राप्तिद्वारा श्रवणादिभिः मुक्तिहेतुत्वात्‌ विशिष्टो भवति ॥ २ ॥

अर्थ : अर्जुनाच्या या प्रश्नाचा निर्णय करण्यासाठीं भगवान् म्हणाले - अज्ञ मुमुक्षूनें केलेला कर्माचा परित्याग व त्याने केलेलें कर्मानुष्टान ही दोन्ही साधनें मोक्ष देणारीं आहेत. परंतु त्या दोन साधनांतील अनात्मज्ञाच्या कर्मत्यागाहून त्याचे कर्मानुष्ठान अधिक चांगले आहे.
अज्ञ पुरुषाचा कर्मसंन्यास व त्याचेच कर्मानुष्ठान ही दोन्ही जरी निःश्रेयसाचीं समबळ साधनें आहेत, तरी ज्ञानरहित संन्यासाहून कर्मयोग श्रेष्ठ आहे. कारण कर्मसंन्यासाहून तो सुकर आहे. भगवान् कर्मयोगाची ही स्तुति करीत आहेत व ज्याअर्थी ते स्तुति करीत आहेत त्याअर्थी कर्मयोगच अर्जुनाला किंवा त्याच्यासारख्या जिज्ञासूला विहित आहे. ॥ २ ॥

विवरण :


ज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति ।
निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥ ५-३ ॥

अन्वय : महाबाहो, यः न द्वेष्टि - हे अर्जुना, जो पुरुष कुणाचाही द्वेष करीत नाही; न काङ्क्षति - आणि कशाचीही आकांक्षा करीत नाही; सः नित्यसंन्यासी ज्ञेयः - तो कर्मयोगी सदा संन्यासीच समजण्यास योग्य आहे; हि निर्द्वंद्वः - कारण राग-द्वेषादि द्वंद्वांनी रहित असा तो; बन्धात् सुखं प्रमुच्यते - संसारबंधनातूप सुखाने मुक्त होतो. ॥ ३ ॥

व्याख्या : सः कर्मयोगी नित्यसंन्यासी ज्ञेयः ज्ञातुं योग्यः ज्ञेयः अस्ति । यः कर्मयोगी इष्टप्राप्तौ न द्वेष्टि कस्यापि द्वेषं न कुरुते इष्टवियोगे न कांक्षति किमप्यर्थजातं नेच्छति । हे महाबाहो ! हे परविद्यादानसमर्थ ! सः कर्मयोगी सुखं अनायासेन बंधात्‌ कर्मजन्यसंसारबंधनात्‌ प्रमुच्यते प्रकर्षेण मुक्तो भवति । हि इति निश्चयेन । कथंभूतः सः । निर्द्वंद्वः निर्गतानि गतानि द्वंद्वानि सुखदुःखादीनि यद्वा शीतोष्णादीनि यद्वा स्नेहमोहादीनि यस्मात्सः ॥ ३ ॥

अर्थ : कर्मानुष्ठान निःश्रेयस्कर कसे व संन्यासाहून कर्मयोग श्रेष्ठ कां तें भगवान सांगतात - जो कोणाचा द्वेष करीत नाहीं व कशाचीही आकांक्षा करीत नाही, तो नित्य संन्यासीच जाणावा. कारण हे महाबाहो, द्वंद्वरहित पुरुष धर्माधर्माख्य बंधापासून अनायासानें सर्वथा मुक्त होतो.
जो कर्मयोगी सुख व त्याचे साधन यांचीं आकांक्षा करीत नाहीं व दुशःख आणि त्याचें साधन यांचा द्वेष करीत नाहीं, तो नित्य, म्हणजे मी अकर्ता, अभोक्ता, आत्मा आहे, असा साक्षात् अनुभव येण्याच्या पूर्वीही संन्यासीच आहे, असे सांगितलें आहे. ॥ ३ ॥

विवरण :


भिन्न भिन्न पुरुषांनींच अनुष्ठान करण्यास योग्य व परस्परविड्य, अशा संन्यासाच्या व कर्मयोगाच्या फलांतहि विरोध असणेच युक्त आहे. त्या दोहींनाहि निःश्रेयस्करच असणे युक्त नाहीं, या शंकेचे निरसन -

साङ्ख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः ।
एकमप्यास्थितःसम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥ ५-४ ॥

अन्वय : बालाः सांख्ययोगौ - मूर्ख लोकच संन्यास व कर्मयोग हे; पृथक् प्रवदन्ति - वेगवेगळी फले देणारी आहेत असे म्हणतात; न पण्डिताः - परंतु पंडितजन तसे म्हणत नाहीत; हि एकं अपि सम्यक् आस्थितः - कारण दोन्हींपैकी एकामध्येही योग्य प्रकारे स्थित असणारा पुरुष; उभयोः फलं विन्दते - दोन्हींचे फळरूप असा परमात्मा प्राप्त करून घेतो. ॥ ४ ॥

व्याख्या : बालाः शास्त्रहृदयं अनभिज्ञाः अज्ञानिनः सांख्ययोगौ सांख्यं आत्मानात्मविवेकजं तत्त्वज्ञानं च योगः कर्मानुष्ठानं सांख्ययोगौ पृथक्‌ भिन्नफलौ प्रवदंति प्रकर्षेण कथयंति ज्ञानफलं मोक्षः कर्मफलं जन्मबंधः इति जल्पंति । तथा पंडिताः शस्त्रहृदयज्ञाः न प्रवदंति । किं तु तद्‌ब्रह्माहं इति ज्ञात्वा सर्वबंधैः प्रमुच्यंते यज्ञादीनां करणेन अंतःकरणशुद्धिद्वारा ज्ञानं ज्ञानद्वारा मोक्षफलं प्रवदंति । पुमान्‌ उभयोः ज्ञानकर्मणोः मध्ये एकमपि ज्ञानमपि अथवा कर्मापि सम्यक्‌ यथाशास्त्रं आस्थितः सन्‌ आश्रितः सन्‌ एकमेव फलं मोक्षं विंदते प्राप्नोति । अथवा उभयोः फलं मोक्षं विंदते प्राप्नोति ॥ ४ ॥

अर्थ : अज्ञ जन सांख्य व योग निरनिराळें फल देणारे आहेत, असे सांगतात. पण पंडित म्ह० तत्त्ववेत्ते तसे सांगत नाहींत. ज्या दोहोंतील एका साधनाचाही उत्तम प्रकारे आश्रय केलेला पुरुष या दोहोंच्या फलास संपादन करतो.
अर्जुनाने केवळ संन्यास म्ह. ज्ञानरहित संन्यास व कर्मयोग यांविषयींच प्रश्न केला व भगवंतांनींही त्याविषयींच उत्तर दिले. पण पुढे भगवंतांनी संन्यास व कर्मयोग यांचा सर्वथा त्याग न करितां त्यांचा अर्थातच आपल्याला इष्ट असलेला अधिक अर्थ जोडून सांख्य व योग या शब्दांनीं बोलण्यास आरंभ केला आहे. 'संन्यास' या शब्दाच्या अर्थांत ज्ञान घातलें म्ह० तोच संन्यास सांख्य होतो व कर्मानुष्ठानांत ज्ञानाचा उपाय अशी समत्वबुद्धि, शम, दम, इत्यादिकांची योजना केली कीं, ते कर्मानुष्टानच योग बनते. अर्थात् सांख्य व योग हे शब्द संन्यास व कर्मयोग या शब्दांच्या अगदीं विरूद्ध नाहींत; तर सकाम कर्मयोग आणि संन्यास यांच्या फलांमध्ये विरोध आहे. त्यामुळें येथे भगवंतांनी विषयांतर केलेले नसून त्यांना गीतेंत जे सांगावयाचे आहे, त्याचाच स्पष्ट उल्लेख केला आहे. सांख्य म्ह० आत्मज्ञान व योग म्ह० त्याचा उपाय. दुसर्‍या अध्यायाच्या ३९ व्या श्लोकांत याच अर्थी सांख्य-योग शब्दांचा उल्लेख केला आहे. ॥ ४ ॥

विवरण :


यत्साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
एकं साङ्ख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥ ५-५ ॥

अन्वय : यत् स्थानं सांख्यं प्राप्यते - जे परमधाम ज्ञानयोगी प्राप्त करून घेतात; तत् स्थानं योगैः अपि गम्यते - तेच परमधाम योगीदेखील प्राप्त करून घेतात; सांख्यम् च योगम् एकम् - ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फलरूपाने एकच आहेत; यः पश्यति सः पश्यति - असे जो पुरुष पाहतो तोच यथार्थ पाहतो. ॥ ५ ॥

व्याख्या : सांख्यैः ज्ञाननिष्ठैः संन्यासिभिः ऐहिक कर्मानुष्ठानशून्यत्वेपि प्राग्भवीयकर्मभिरेव संस्कृतांतःकरणैः यत्‌ प्रसिद्धं स्थानं तिष्ठति यस्मिन्‌ इति स्थानं मोक्षाख्यं प्राप्यते तत्‌ योगैः योगाः भगवदर्पणबुद्ध्या फलाभिसंधिराहित्येन कृतानि कर्माणि येषां संति ते योगाः तैः योगैरपि योगिभिरपि मोक्षाख्यस्थानं गम्यते प्राप्यते । यः पुरुषः सांख्यं ज्ञानयोगं चेत्यपरं योगं स्वधर्मानुष्ठानं एकं एकफलं पश्यति । सः पुरुषः सम्यक्‌ यथाशास्त्रं पश्यति । तदुक्तम्‌ 'यान्यतोन्यानि जन्मानि तेषु नृनं कृतं भवेत्‌ । यत्कृतं पुरुषेणेह नान्यथा ब्रह्मणि स्थितिः' । अतः मुमुक्षुणा अंतःकरणशुद्धये प्रथमं कर्मयोगः अनुष्ठेयः ॥ ५ ॥

अर्थ : सांख्य व योग यांतील एकाचेंहि जरी उत्तम प्रकारे अनुष्ठान केले तरी दोहोंचे फळ कसे प्राप्त होते ते सांगतात - जें स्थान सांख्यांकडून मिळविले जाते, तेच योग्यांनाहि क्रमाने प्राप्त होते. यास्तव सांख्य-ज्ञानलक्षण संन्यास- ज्ञाननिष्ठा व योग - त्याचा उपाय - निष्काम ईश्वरार्थ कर्मानुष्ठान एकच आहे, असे जो पहातो, तो यथार्थ पहातो-जाणतो.
ज्ञाननिष्ठ संन्याश्यांना साक्षात् मोक्षसंज्ञक स्थान प्रास होते, हे तर प्रसिद्धच आहे. तेच स्थान योग्यांनाही मिळते. पण ते कसे ? साक्षात् नव्हे. तर जे जिज्ञासु सर्व कर्मे त्यांच्या फलाची इच्छा न करतां भगवत्प्रसादार्थ चित्तशुद्धीच्या द्वारा ज्ञानप्राप्तीचा उपाय या रूपाने अनुष्ठितात, ते योगी होत. येथील योग हा शब्द योगी या अर्थी आहे. सर्व द्वैतप्रपंच खरा नाहीं. तो मायेचा विलास-मायाकार्य आहे, म्हणून मिथ्या होय. म्ह० त्याला पारमार्थिक सत्ता नाहीं. आत्मा अविक्रिय व एक आहे. त्यामुळें तो सत्य आहे. असे जे ज्ञान तेच परमार्थज्ञान होय. असा ज्ञानपूर्वक जो संन्यास त्याच्या द्वारा ईश्वरार्थ कर्मानुष्ठान करणारांनाही तेच स्थान प्राप्त होते. ह्यामुळे सांख्य व योग यांना एकफलत्व आहे, असे म्हणण्यांत कांहीं विरोध नाहीं. सांख्य व योग यांचे स्वरूप एक नाही. योग्यताही सारखीच नाही. पण शेवटीं दोहोंचें फल एकच आहे, म्हणून फलदृष्ट्या त्यांना जो एकच समजतो, तो खरा ज्ञानी होय, असा याचा भावार्थ. ॥ ५ ॥

विवरण :


लोकांच्या अर्थाचा विचार केला असतां योग सांख्याच्या-ज्ञानपूर्वक संन्यासाच्या द्वाराच मोक्षाचें साधन होतो, साक्षात नव्हे, असे स्पष्ट दिसतें. मग 'कर्मयोग श्रेष्ठ असे कसे म्हणतां ?' असे विचारशील तर सांगतो -

संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः ।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ॥ ५-६ ॥

अन्वय : तु महाबाहो - परंतु हे अर्जुना; अयोगतः संन्यासः - कर्मयोगाशिवाय संन्यास म्ह० मन, इंद्रिये व शरीर यांचे द्वारा होणार्‍य सर्व कर्मांच्या कर्तेपणाचा त्याग; आप्तुम् दुःखम् - प्राप्त होणे कठीण आहे; योगयुक्तः मुनिः - भगवत् स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी; ब्रह्म नचिरेण अधिगच्छति - परब्रह्म परमात्म्याला लवकरच प्राप्त करून घेतो. ॥ ६ ॥

व्याख्या : हे महाबाहो ! अयोगतः न योगः अयोगः अयोगादिति अयोगतः अंतःकरणशोधक कर्मानुष्ठानं विना संन्यासस्तु सर्वकर्मत्यागस्तु हठेन कृतः सन्‌ दुःखं आप्तुं प्राप्तुं भवति । अशुद्धांतःकरणेन ज्ञाननिष्ठायाः असंभवात्‌ । मुनिः मननशीलः मुनिः योगयुक्तः सन्‌ योगेन ईश्वरार्पणकर्मयोगेन युक्तः योगयुक्तः ब्रह्म सत्यज्ञानादिलक्षणं आत्मानं न चिरेण शीघ्रं अधिगच्छति साक्षात्करोति ॥ ६ ॥

अर्थ : हे पराक्रमी अर्जुना, पण खरा संन्यास-परमार्थ संन्यास म्ह० सांख्य योगावांचून पाप्त होणे कठिण आहे. वैदिक कर्मानुष्ठानाने युक्त असलेला व ईश्वराचे मनन करणारा मुनि परमार्थसंन्यासाला लवकरच पाप्त होतो. ॥ ६ ॥

विवरण :


योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः ।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ५-७ ॥

अन्वय : विशुद्धात्मा - ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे; विजितात्मा - ज्याचे मन त्याच्या स्वाधीन आहे; जितेन्द्रियः - जो जितेंद्रिय आहे; च सर्वभूतात्मभूतात्मा - आणि सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्मा हाच ज्याचा आत्मा आहे; योगयुक्तः - असा कर्मयोगी - कुर्वन् अपि न लिप्यए - कर्म करीत असताना सुद्धा लिप्त होत नाही. ॥ ७ ॥

व्याख्या : योगयुक्तः योगेन कर्मानुष्ठानेन युक्तः समाहितः योगयुक्तः यतिः स्वधर्मं कुर्वन्‌ सन्नपि करोतीति कुर्वन्‌ अनुतिष्ठन्‌ सन्‌ न लिप्यते संसर्गं न प्राप्नोति । कथंभूतः योगयुक्तः । विशुद्धात्मा विशुद्धः मायामलरहितः आत्मा चित्तं यस्य सः । पुनः कथंभूतः योगयुक्तः । विजितात्मा विशेषेण जितः वशीकृतः आत्मा मनः येन सः । पुनः कथंभूतः जितेंद्रियः । जितानि इंद्रियाणि ज्ञानकर्मसाधनानि येन सः । पुनः कथंभूतः सः । सर्वभूतात्मभूतात्मा सर्वाणि च तानि भूतानि च सर्वभूतानि सर्वभूतानां आत्मभूतः आत्मा स्वरूपं यस्य सः ॥ ७ ॥

अर्थ : ज्ञानप्राप्तीचा उपाय या रूपाने जेव्हां हा मुमुक्षु नित्य-नैमिप्तिक कर्मानुष्ठान करतो, तेव्हां त्याचे चित्त शुद्ध म्ह.० रजस्तमोगुणरहित होते. त्यामुळे त्याचे शरीर व इंद्रिये ही दोन्ही त्याच्या स्वाधीन रहातात. त्याला 'माझा आत्माच सर्व भूतांचा आत्मा आहे' असें सर्वास्मैक्यदर्शन होते. अशा ज्ञानामध्ये स्थित असलेल्या त्यानें पुढें लोकसंग्रहासाठीं कमें जरी केली, तरी ती त्याला बद्ध करीत नाहींत - पुनर्जमाचीं निमित्तें होऊन रहात नाहींत.
अर्थात ज्ञानोत्तर घडणारी कर्मे आभासरूप असल्यामुळें त्यांना 'कर्मयोग' हे नांव देतां येत नाही.

विवरण :


पण हा ज्ञानी वस्तुतः कांहीं करीत नाहीं. म्हणून त्यानें शरीरेंन्द्रियांचीं स्वाभाविक कर्मे करीत असतांनाही असे चिंतन करावे -

नैव किञ्चित्कत्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।
पश्यञ्श्रुण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन् ॥ ५-८ ॥
प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ५-९ ॥

अन्वय : पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् - पाहताना, ऐकताना, स्पर्श करताना वा वास घेताना; अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् - भोजन करताना, गमन करताना, झोपताना वा श्वास घेताना; प्रलपन् विसृजन् गृह्णन् - बोलताना, त्याग करताना व घेताना; तथा उन्मिषन् च निमिषन् अपि - तसेच डोळे उघडताना वा मिटताना सुद्धा; इन्द्रियाणि इन्द्रियार्थेषु वर्तन्ते - सर्व इंद्रिये आपापल्या विषयांत व्यवहार करीत आहेत; इति धारयन् - असे समजून; तत्त्ववित् युक्तः एव - तत्त्व जाणणार्‍या सांखयोगी पुरुषाने निःसंदेहपणे; इति मन्येत - असा विचार करावा की; किञ्चित् न करोमि - मी काहीही करीत नाही. ॥ ८-९ ॥

व्याख्या : तत्त्ववित्‌ तत्त्वं वास्तवरूपं वेत्ति जानातीति तत्त्ववित्‌ युक्तः आदौ कर्मयोगेन युक्तः पश्चात्‌ अंतःकरणशुद्धिद्वारा तत्त्वविद्‌भूत्वा इति मन्येत । इतीति किम्‌ । अहं किंचित्‌ किमपि नैव करोमि किं कुर्वन्‌ चक्षुरिंद्रियेण पश्यन्‌ पश्यतीति पश्यन्‌ श्रोत्रेंद्रियेण शृण्वन्‌ श्रृणोतीति श्रृण्वन्‌ त्वगिंद्रियेण स्पृशन्‌ स्पृशतीति स्पृशन्‌ घ्राणेंद्रियेण जिघ्रन्‌ जिघ्रति अवघ्राणं करोतीति जिघ्रन्‌ रसनेंद्रियेण अश्नन्‌ अश्नाति भक्षयतीति अश्नन्‌ चरणेंद्रियेण गच्छन्‌ गच्छतीति गच्छन्‌ बुद्धिगुणेन स्वपन्‌ स्वपति निद्रां करोतीति स्वपन्‌ प्राणवायुना श्वसन्‌ श्वसतीति श्वसन्‌ ॥ ८ ॥ वागिंद्रियेण प्रलपन्‌ प्रलपतीति पायूपस्थगुणेन विसृजन्‌ विसृजति त्यागं करोतीति हस्तेंद्रियेण गृह्णन्‌ गृह्णातीति कूर्माख्यप्राणेन उन्मिषन्‌ उन्मिषति उन्मीलनं करोतीति निमिषन्‌ निमिषति निमीलनं करोतीति सर्वान्‌ इंद्रियव्यापारान्‌ कुर्वन्‌ सन्‌ इंद्रियाणि कर्मेंद्रियाणि ज्ञानेंद्रियाणि च इंद्रियार्थेषु स्वस्वविषयेषु वर्तंते प्रवर्तंते इति एवंप्रकारेण धारयन्‌ धारयतीति धारयन्‌ साक्षित्वेन आत्मानं निर्व्यापारं बुद्ध्या निश्चित्य ' किंचिदपि अहं न करोमि ' इति मन्यते सः पापैः न लिप्यते ॥ ९ ॥

अर्थ : तत्त्वज्ञ डोळ्यांनी पहात असतांना, कानांनी ऐकत असतांना, सत्वगिंद्रिने स्पर्श करीत असतांना, घ्राणेंद्रियानें वास घेत असतांना, जिभेनें चाटीत असतांना, पायांनीं चालत असतांना, मन लीन झाल्यामुळें झोंप चेत असतांना तसेंच श्वासोच्छ्वास करतांना व वागिंद्रियानें बोलतांना, पायु-इंद्रियानें मलत्याग करतांना, हातांनी ग्रहण करतांना व पापण्यांनीं नेत्रांची उघडझांप करीत असतांनाही इंद्रियें आपापल्या विषयांमध्ये प्रवृत्त होत आहेत, मी प्रत्यगात्मा त्या क्रिया करीत नाहीं, असे मनांत दृढ धरून - असे समजून कोणतीही क्रिया मी स्वतः करीत नाहींच, असे आत्म्यामध्ये चित्ताला स्थिर ठेवून चिंतन करावे.
तत्त्वज्ञानें शरीरेंद्रियांचीं ही स्वाभाविक कर्मेंही माझी नव्हेत, असे सतत अनुसंधान ठेवावें. ॥ ८-९ ॥

विवरण :


ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा ॥ ५-१० ॥

अन्वय : ब्रह्मणि कर्माणि आधाय - परमात्म्यामध्ये सर्व कर्मे अर्पण करून; च सङ्गं त्यक्त्वा - आणि आसक्तीचा त्याग करून; यः कर्म करोति - जो कर्म करतो; सः - तो पुरुष; अम्भसा पद्मपत्रं इव - पाण्याने कमळाचे पान (जसे लिप्त होत नाही तसा); पापेन न लिप्यते - पापाने लिप्त होत नाही. ॥ १० ॥

व्याख्या : यः प्रारब्धपुण्योपचयवान्‌ निष्कामः कर्माणि वर्णाश्रमकर्माणि ब्रह्मणि परमेश्वरे आधाय समर्प्य संगं फलाभिलाषं त्यक्त्वा करोति ईश्वरोद्देशेन करोति सः मदर्थ कर्म कर्ता पापेन आत्मसाक्षात्कार प्रतिबंधकेन कर्मणा न लिप्यते न लिप्तो भवति । यथा अंभसि विद्यमानमपि पद्मपत्रं पद्मस्य कमलस्य पत्रं दलं अंभसा उदकेन न लिप्यते ॥ १० ॥

अर्थ : पण याच्या उक्तट जो तत्त्ववेत्ता नसतो, तो शास्त्रीय कर्मे ब्रह्मामध्ये- ईश्वरामध्यें समर्पण करून व फलाची आसक्ति सोडून करतो. त्यामुळें जलाने कमलाचे पान किंवा पाकळी जशी लिप्त होत नाहीं, त्याप्रमाणे तो पापानें लिप्त होत नाहीं.
सर्व विहित कर्में ईश्वरार्पण करून मोक्षफलाचीही इच्छा न करतां जो अनात्मज्ञ तीं आचरितो, त्याला ती धर्माधर्मानें बद्ध करीत नाहींत; तर अविद्वानाच्या त्या कर्माचें केवल सत्त्वशुद्धि एवढेंच फल आहे. ॥ १० ॥

विवरण :


कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥ ५-११ ॥

अन्वय : योगिनः केवलैः इन्द्रियैः - कर्मयोगी ममत्व बुद्धीने रहित होऊन केवळ इंद्रियांनी; च मनसा बुद्ध्या कायेन अपि - तसेच मनाने, बुद्धीने व शरीरानेही होणार्‍या - संगम् त्यक्वा - आसक्तीचा त्याग करून; आत्मशुद्धये कर्म कुर्वन्ति - अंतःकरणाच्या शुद्धीसाठी सर्व कर्मे करतात. ॥ ११ ॥

व्याख्या : योगिनः केचित्‌ पुण्यारब्धप्राप्तदेहाः कायेन स्नानादिना चेत्यपरं मनसा ध्यानादिना चेत्यपरं बुद्ध्या आत्मानात्मतत्त्वनिश्चयात्मिकया केवलैः संकल्पाभिनिवेशरहितैः इंद्रियैः संगं कर्तृत्वाभिनिवेशं फलाऽऽसंगं त्यक्त्वा आत्मशुद्धये आत्मनः अज्ञानकार्यकर्तृत्वादिना कलुषितस्य मनसः शुद्धिः आत्मशुद्धिः तस्यैः केवलं कर्म कुर्वंति ॥ ११ ॥

अर्थ : कर्माधिकारी पुरुष केवळ शरीराने, केवल मनानें, केवल बुद्धीने व केवळ इंद्रियांनींही फलाविषयींचींही आसक्ति सोडून चित्तशुद्धीसाठीं नित्य व नैमित्तिक कमें करतात.
कर्माधिकारी मुमुक्षु ममतारहित शरीरेंद्रियांनीं फलासक्ति सोडून चित्तशुद्धीसाठीं नियतकर्में करतात. म्हणून तूंही चित्तशुद्धीसाठी कर्मच कर. ॥ ११ ॥

विवरण :


युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥ ५-१२ ॥

अन्वय : युक्तः कर्मफलं त्यक्त्वा - कर्मयोगी कर्माच्या फळाचा त्या करून; नैष्ठिकीम् शान्तिम् आप्नोति - भगवत्प्राप्तीरूप शान्ति प्राप्त करून घेतो; च युक्तः कामकारेण - आणि सकाम पुरुष कामनेच्या प्रेरणेने; फले सक्तः निबध्यते - फळामध्ये आसक्त होऊन बंधनात् पडतो. ॥ १२ ॥

व्याख्या : युक्तः समाहितमनाः कर्म कर्माभिनिवेशं चेत्यपरं फलं अथवा कर्मफलं त्यक्त्वा कर्माणि कुर्वन्‌ सन्‌ नैष्ठिकीं निष्ठारूपां शांतिं मोक्षाख्यां शांतिं आप्नोति प्राप्नोति । अयुक्तस्य अनर्थं दर्शयति । अयुक्तः बहिर्मुखः विक्षिप्तचित्तः कामकारेण 'अक्षय्यं ह वै चातुर्मास्ययाजिनः सुकृतं भवति' - इति प्रलोभेन अथवा कामं मनोरथं कारयतीति कामकारः तेन अर्थवादवाक्यसमूहेन फले सक्तः सन्‌ आसक्तः सन्‌ निबध्यते नितरां पुनः पुनः स्वर्गमृत्यु जन्मप्राप्तिपाशेन बध्यते ॥ १२ ॥

अर्थ : ही कमें ईश्वरासाठी आहेत, असे समस्त मनांत शांत असलेला मुमुक्षु कर्मफलांचा त्याग करून ज्ञानद्वारा नैष्ठीक मोक्षाख्य शांतीला प्राप्त होतो. म्हणून तुला फलासक्ति सोडून कर्मेंच करणे उचित आहे. पण याच्या उलट जो अविद्वान् पुरुष मनांत अशांत असतो, तो कामाने प्रेरित झाल्यामुळे, कामकिंकर झाल्यामुळें फळामध्ये आसक्त होऊन धर्माधर्माख्य बंधाने अत्यंत बद्ध होतो.
ईश्वरार्थ ही कर्में आहेत, माझ्या फलासाठीं नाहींत, अशाप्रकारे शांतचित्तानें कर्मे करणारा कर्मफलाचा त्याग हरून नैष्ठीकी म्ह० चित्तशुद्धि, ज्ञानप्राप्ति, सर्वकर्मसंन्यास व ज्ञाननिष्ठा या क्रमानें नैष्ठीकी शांतीला प्राप्त होतो. पण याच्या उद्धट अयुक्त-अशांत असतो तो कामाकडून प्रेरित झाल्यामुळे 'मला फल मिळावे म्हणून मी हे कर्म करतो' अशाप्रकारे फलांत आसक्त होऊन पूर्णपणे बद्ध होतो. याप्रमाणे असमाधानांत मोठा दोष असल्यामुळें तूं समाहितचित्त हो. ॥ १२ ॥

विवरण :


सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ॥ ५-१३ ॥

अन्वय : वशी देही - ज्याला अंतःकरण वशा असा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष; न कुर्वन् नच कार्यन् एव - काहीही न करता तसेच काहीही न करविताच; नवद्वारे पुरे - नऊ द्वारे असणार्‍या शरीररूपी घरात; सर्वकर्माणि मनसा संम्यस्य - सर्व कर्मांचा मनाने त्याग करून; सुखम् आस्ते - आनंदपूर्वक सच्चिदानंद परमात्म्याच्या स्वरूपात राहतो. ॥ १३ ॥

व्याख्या : वशी वशः इंद्रियानिग्रहः अस्यास्तीति वशी स्वरूपसाक्षात्कारेण जितचित्तः सर्वकर्माणि नित्यनैमित्तिक काम्य निषिद्धानि चतुर्विधानि कर्माणि मनसा सह वासनासहितानि कर्माणि संन्यस्य विधिना परित्यज्य पुरे नगरवत्‌ अहंभावशून्ये देहे सुखं यथास्यात्तथा आस्ते अवतिष्ठते । अतः हेतोः तस्य देहस्य आध्यासिकसंबंधेन देही देहोस्यास्तीति देही एतादृशः भिक्षुः परमहंसः नैव कुर्वन्‌ 'अहं नैव करोमि' इति आत्मदृष्ट्या आत्मानं मन्यते न कारयन्‌ न कारयति साक्षित्वेन वर्तते । कथंभूते पुरे । नवद्वारे नव द्वाराणि यस्य तत्‌ नवद्वारं तस्मिन्‌ नेत्रे नासिके कर्णौ मुखं इति सप्त शिरोगतानि अधोभागे द्वे पायूपस्थरूपे एवं नव द्वाराणि ॥ १३ ॥

अर्थ : पण जो परमार्थदर्शी असतो तो जितेंद्रिय मुमुक्षु विवेकबुद्धीनें सर्व कर्में सोडून नऊ द्वारांनीं युक्त अशा पुरांत-शरीरांत स्वतः कांहीं एक न करीत व दुसर्‍याकडून कांही न करवीत सुखाने रहातो. ॥ १३ ॥

विवरण :


न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥ ५-१४ ॥

अन्वय : प्रभुः लोकस्य - परमेश्वर मनुष्यांचे; कर्तृत्वं कर्माणि वा कर्मफलसंयोगम् - कर्तेपण, कर्मे वा कर्मफळाशी संयोग; न सृजति - काहीच निर्माण करीत नाही; तु स्वभावः प्रवर्तते - परंतु प्रकृतीच सर्व काही करते. ॥ १४ ॥

व्याख्या : प्रभुः ईश्वरः लोकस्य प्राणिसमूहस्य कर्तृत्वं कर्तृभावं कर्माणि इष्टकर्माणि न सृजति नोत्पादयति कर्मफलसंयोगमपि कर्मणः फलं कर्मफलं कर्मफलस्य संयोगः कर्मफलसंयोगः तं न सृजति नोत्पादयति । किं तु स्वभावस्तु प्राचीनसंस्कारस्तु प्रवर्तते कर्तृत्वादिरूपेण प्रवर्तनं करोति । यस्य पुरुषस्य विवेकज्ञानं अस्ति सोपि ईश्वरात्‌ भिन्नो न भवति ॥ १४ ॥

अर्थ : 'मुमुक्षु आत्म्याला कर्तुत्व व कारयितृत्व नाहीं' असें जें वर म्हटलें आहे, त्याचाच अधिक विस्तार - आस्मा लोकाचें कर्तृत्व 'तूं अमुक कर' असे म्हणून निर्मित नाही. कर्त्याला अत्यंत इश्ठ असलेले कर्मभूत रथादि पदार्थही उत्पन्न करीत नाहीं आणि रथादि पदार्थ करणार्‍या कर्त्याला त्याच्या फलाशीं संयुक्त करीत नाहीं. 'तर मग हें सर्व कोण करतो व करवितो' म्हणून विचारशील तर सांगतो - अविद्यारूप माया-प्रकृति प्रवृत्त होते.
आत्मा देहादिकांचा स्वामी असल्यामुळे त्याला 'प्रभु' असे म्हटले आहे. तो कोणालाही 'तूं हे कर्म कर' अशी प्रेरणा करून त्याचें कर्तृत्व उत्पन्न करीत नाहीं. म्ह० करविता-कर्त्याचा प्रयोजक होत नाही. व्याकरणांत कर्त्याला प्राप्त करून घेण्यास अत्यंत इष्ट असलेल्या पदार्थास 'कर्म' म्हणतात. यास्तव आत्मा रथ, घट, राजवाडा, इत्यादि कर्त्याला ईप्सिततम असखेछे पदार्थही तो उत्पन्न करीत नाही. रथादि पदार्थ करणाराला त्याचें फळ देऊन त्याच्याशी संबद्ध अति नाहीं. म्ह० तो भोजयिता-फलभोग घेवविणाराही नाहीं. तर अविद्या नांवाची माया म्हणजेच येथील स्वभाव होय. ती परमेश्वराची अचिंत्य शक्तिच म्ह० मायाच सर्व करते व करविते. ॥ १४ ॥

विवरण :


नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ ५-१५ ॥

अन्वय : विभुः न कस्यचित् पापम् - सर्वव्यापी परमेश्वर ना कुणाचे पापकर्म; च न सुकृतम् एव आदत्ते - तसेच ना कुणाचे शुभकर्म ग्रहण करतो; किंतु अज्ञानेन ज्ञानं आवृतम् - परंतु अज्ञानाचे द्वारा ज्ञान झाकले गेले आहे; तेन जन्तवः मुह्यन्ति - त्यामुळे सर्व अज्ञानी माणसे मोहित होतात. ॥ १५ ॥

व्याख्या : विभुः विविधं भवति यस्मादिति विभुः परमात्मा प्रत्यग्‌रूपः कस्यदित्‌ जीवस्य पापं चेत्यपरं सुकृतं पुण्यं नैवादत्ते नैव गृह्णाति अज्ञानेन अन्यथा ज्ञानेन ज्ञानं 'अहं प्रत्यग्ब्रह्म' इति विवेकज्ञानं आवृतं आच्छादितम्‌ । जंतवः जननशीलाः जंतवः अविद्यावृतांतःकरणाः प्राणिनः तेन स्वात्मानं विस्मृत्य अहं करोमीति वृथाभिमानेन मुह्यंति मोहं प्राप्नुवंति ॥ १५ ॥

अर्थ : पण परमार्थदृष्ट्या पाहिल्यास तो विभु-आत्मा कोणा भक्ताचेंही पाप घेत नाहीं व भक्ताने अर्पण केलेले पुण्यही घेत नाही, असे तूं निश्चयानें जाण. तर मग भक्ताकडून पूजादिरूप व याग, दान, होम इत्यादि पुण्याचरण त्याला कशासाठी अर्पण केले जाते, ते भगवान् सांगतात - अज्ञानानें ज्ञानाला म्ह० विवेकविज्ञानाला आच्छादित केले आहे. त्यामुळे अविवेकी-संसारी जीव मोहित होतात. म्ह० मी करतो-करवितो, भोग घेतो-घेववितों, अशा मोहाला प्रास होतात. ॥ १५ ॥

विवरण :


ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ॥ ५-१६ ॥

अन्वय : तु येषाम् तत् अज्ञानम् - परंतु ज्यांचे ते अज्ञान; आत्मनः ज्ञानेन नाशितम् - परमात्म्याच्या तत्त्वज्ञानद्वारा नष्ट केले गेले आहे; तेषाम् तत् ज्ञानम् - त्यांचे ते ज्ञान; आदित्यवत् तत्परम् प्रकाशयति - सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंदघन परमात्म्याला प्रकाशित करते. ॥ १६ ॥

व्याख्या : येषां श्रवणमननादि साधनसंपन्नानां भगवदनुगृहीतानां मुमुक्षूणां ज्ञानेन आत्मसाक्षात्कारद्योतकेन ज्ञानेन आत्मनः स्वरूपविषयस्य तत्‌ आवरणविक्षेपशक्तिमत्‌ अज्ञानं अविद्यामायादि शब्दवाच्यं नाशितं बाधितं प्रत्यग्भावं नीतं तेषां ज्ञानिनां तत्‌ प्रसिद्धं ज्ञानं आदित्यवत्‌ सूर्य इव परं ब्रह्म प्रकाशयति तद्‌रूपेण भवति । यथा आदित्यः मंडलं प्रकाशयन्‌ सन्‌ जगत्‌ प्रकाशयति तथा तेषां परमहंसानां ज्ञानं वाक्यार्थज्ञानवतीं बुद्धिं स्वरूपेण प्रकाशयत्‌ सत्‌ त्रैलोक्यमपि परब्रह्मरूपेण दर्शयति ॥ १६ ॥

अर्थ : पण सर्वांचेच ज्ञान अनादि अज्ञानानें जरी आच्छादित झालेलें असले, तरी ज्ञानाने त्याचा नाश होऊन संसारनिवृत्ति संभवते, कारण ज्यांचें ते आत्मविषयक अज्ञान आत्म्याच्या ज्ञानाने नष्ट केले आहे, त्यांचें तें ज्ञान सूर्याप्रमाणे परमात्म्याला प्रकाशित करतें.
ज्याप्रमाणे सूर्य सर्व रूपजाताला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे ज्ञानाने ज्याचें अज्ञान नष्ट केलें आहे, त्याचे तें ज्ञान त्या परमार्थतत्त्वाला प्रकाशित करते. ॥ १६ ॥

विवरण :


विद्वान् व विविदिषु-जिज्ञासु यांच्यासाठीं ज्ञानपरिपाकाचीं अंतरंग साधनें सांगावी, म्हनून भगवान् म्हणतात -

तद्‌बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः ।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥ ५-१७ ॥

अन्वय : तद्‌बुद्धयः - ज्यांची बुद्धी तद्‌रूप झालेली असते; तदात्मानः - ज्यांचे मन तद्‌रूप होत असते; च तन्निष्ठा - आणि सच्चिदानंदघन परमात्म्यामध्येच ज्यांची सतत एकीभावाने स्थिति आहे असे; तत्परायणः - तत्परायण पुरुष; ज्ञाननिर्धूतकल्मषाः - ज्ञानाचेद्वारा पापरहित होऊन; अपुनरावृत्तिमं गच्छति - अपुनरावृत्ति म्हणजे परमगति प्राप्त करून घेतात. ॥ १७ ॥

व्याख्या : ते ज्ञानिनः अपुनरावृत्तिं पुनरावृत्तिरहितां जन्ममरणशून्यां स्वरूपावस्थां गच्छंति प्राप्नुवंति । कथंभूताः ते । तद्‌बुद्धयः तस्मिन्नेव ज्ञानरूपे ब्रह्मण्येव बुद्धिः ब्रह्मैवेति निश्चयात्मिका येषां ते तद्‌बुद्धयः । पुनः कथंभूताः ते । तदात्मानः तस्मिन्नेव आत्मा संकल्पविकल्परहितं मनः येषां ते तदात्मानः । पुनः कथंभूताः ते । तन्निष्ठाः तस्मिन्‌ ज्ञानरूपे ब्रह्मण्येव निष्ठा चित्तवृत्तिः येषां ते । पुनः कथंभूताः ते । तत्परायणाः तदेव परं श्रेष्ठं अयनं आलंबनं येषां ते तत्परायणाः । पुनः कथंभूताः ते । ज्ञाननिर्धूतकल्मषाः ज्ञानेन स्वरूपसाक्षात्कारेण निर्धूतं नाशिनं कल्मषं पुण्यपापात्मकं कर्म येषां ते ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥ १७ ॥

अर्थ : परमार्थ तत्त्वामध्ये ज्यांची बुद्धि आहे , जे सद्‌‌रूप झालेले आहेत, त्यांतच ज्यांची निष्ठा आहे, हें तत्त्व हीच ज्यांची परागति आहे, ते ज्ञाननिर्धूतकल्मष होत्साते पुनर्जन्मराहित्यास-मोक्षास प्रास होतात.
ज्ञानानें ज्यांचे आत्मविषयक अज्ञान नाहीसे झाले आहे व त्या ज्ञानानेंच ज्यांचा संसाराला कारण होणारा पापादि दोष नाहींसा झाला आहे, ते ज्ञानी-संन्यासी मुक्त होतात.) ॥ १७ ॥

विवरण :


विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥ ५-१८ ॥

अन्वय : विद्याविनयसम्पन्ने - विद्या व विनय यांनी युक्त अशा; ब्राह्मणे च गयि - ब्रह्माचे ठिकाणी तसेच गायीचे ठायी; हस्तिनि शुनि च श्वपाके - हत्तीचे, कुत्र्याचे तसेच चांडाळाचे ठायी सुद्धा; पण्डिताः समदर्शिनः एव - ज्ञानी लोक समदर्शीच असतात. ॥ १८ ॥

व्याख्या : ब्राह्मणे सत्त्वगुणात्मके सर्वोत्तमे तथा श्वपाके शुनः श्वानान्‌ पचतीति श्वपाकः तस्मिन्‌ श्वपाके चांडाले कर्मतः वैषम्ये चेत्यपरं गवि धेनौ तथा हस्तिनि गजे तथा शुनि श्वाने जातितः वैषम्ये ये पुरुषाः समदर्शिनः समं ब्रह्म द्रष्टुं शीलं येषां ते समदर्शिनः संति ते पंडिताः शास्त्रतात्पर्यबुद्धिमंतः ज्ञेयाः । कथंभूते ब्राह्मणे । विद्याविनयसंपन्ने विद्या वेदतात्पर्यज्ञानं च विनयः गर्वराहित्यं विद्याविनयौ विद्याविनयाभ्यां संपन्नः आढ्यः विद्याविनयसंपन्नः तस्मिन्‌ । यथा गंगोदके तडागे सुरायां मूत्रे प्रतिबिंबितस्य सूर्यस्य न गुणदोषसंबंधः तथा ब्राह्मणोपि चिदाभासद्वारा प्रतिबिंबितस्य सर्वत्र समदृष्ट्यैव रागद्वेषराहित्येन जीवन्मुक्तिं अनुभवति ॥ १८ ॥

अर्थ : ते तत्त्ववेत्ते-पंडित तत्त्व कसे पहातात, तेंच सोदाहरण सांगतात - विद्या व विनय यांनी संपन्न असलेल्या ब्राह्मणाचे ठिकाणी, गायीमध्ये किंवा बैलामध्ये, हत्तीमध्ये, कुत्र्यामध्ये व चांडालामध्यें ब्रह्मज्ञानी-ब्रह्मनिष्ठ समब्रह्म पहाणारे असतात.
सत्त्वादि गुणांनी व सत्त्वगुणांपासून झालेल्या संस्कारांनी, त्याचप्रमाणे राजस संस्कारांनीं व तामस संस्कारांनी अत्यंत अस्पष्ट म्ह० सत्त्वादि गुणांचा व त्यांच्या संस्कारांचा ज्याला मुळींच स्पर्शहि झालेला नाहीं, असे सम, एक व अविक्रिय मच पहाण्याचे ज्यांचे शील आहे, ते पंडित सम- दशी होत. पूर्वोक्त ब्राह्मणादि सर्वांमध्ये एक, निर्विकार समब्रह्म पहाणे हेंच पांडित्य होय. ॥ १८ ॥

विवरण :


इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्‌ब्रह्मणि ते स्थिताः ॥ ५-१९ ॥

अन्वय : येषां मनः साम्ये स्थितम् - ज्यांचे मन सम भावामध्ये स्थित आहे; तैः इह एव - त्यांच्याकडून या जीवित अवस्थेमध्येच; सर्गः जितः - संपूर्ण संसार जिंकला गेला आहे; हि ब्रह्म - कारण सच्चिदानंदघन परमात्मा; निर्दोषम् च समम् - दोषरहित आणि सम आहे; तस्मात् ते ब्रह्मणि स्थिताः - त्या कारणाते ते सच्चिदानंदघन परमात्म्यामध्ये स्थित असतात. ॥ १९ ॥

व्याख्या : इहैव जीवनदशायामेव तैः समदर्शिभिः पंडितैः सर्गः सृज्यत इति सर्गः प्रपंचः संसारः जितः निरस्तः अतिक्रांतः । कैः । येषां समदर्शिनां मनः अंतःकरणं साम्ये समस्य ब्रह्मणः भावः तद्‌गतधर्मः साम्यं तस्मिन्‌ साम्ये ब्रह्मभावे स्थितं तद्‌रूपेण निश्चलां अवस्थां प्राप्तम्‌ । हि यस्मात्‌ ब्रह्म निर्दोषं सर्वविकारशून्यं कूटस्थं एकं अस्ति । तस्मात्‌ कारणात्‌ ते समदर्शिनः ब्रह्मणि कूटस्थे स्थिताः ब्रह्मरूपेण संवृत्ताः ब्रह्मभावं प्राप्ताः ॥ १९ ॥

अर्थ : ज्यांचे अंतःकरण सर्व भूतांतील साम्यामध्ये स्थित असते, त्यांनीं या शरीरांत असतांनाच-जिवंतपणीच पुढील जन्म जिंकला आहे. कारण अक्षर आत्मतत्त्व सर्व दोषशून्य व सर्वत्र सम आहे. म्हणून ते सर्व ज्ञानी ब्रह्यामध्ये स्थित आहेत. ॥ १९ ॥

विवरण :


न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।
स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥ ५-२० ॥

अन्वय : यः प्रियं प्राप्य न प्रहृष्येत् - जो पुरुष प्रिय गोष्ट प्राप्त झाल्यावर आनंदित होत नाही; च अप्रियम् प्राप्य - तसेच अप्रिय गोष्ट प्राप्त झाल्यावर; न उद्विजेत् - उद्विग्न होत नाही; सः स्थिरबुद्धिः असम्मूढः ब्रह्मवित् - तो स्थिरबुद्धि व संशयरहित ब्रह्मवेत्ता; ब्रह्मणि स्थितः - सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्यामध्ये एकीभावाने नित्य स्थित असतो. ॥ २० ॥

व्याख्या : ब्रह्मवित्‌ ब्रह्म वेत्ति जानातीति ब्रह्मवित्‌ अपरोक्षसाक्षात्कारवान्‌ ब्रह्मणि स्थितः सन्‌ ब्रह्मणैक्यं गतः सन्‌ प्रियं अनुकूलं प्राप्य न प्रहृष्येत्‌ न हर्षितो भवति चेत्यपरं अप्रियं प्रतिकूलं प्राप्य नोद्‌विजेत्‌ उद्वेगं न प्राप्नुयात्‌ । कथंभूतः ब्रह्मवित्‌ । स्थिरबुद्धिः स्थरा निश्चला बुद्धिर्यस्य सः स्थिरबुद्धिः बुद्धिस्थैर्येण विवेकज्ञानवान्‌ । पुनः कथंभूतः ब्रह्मवित्‌ । असंमूढः सम्यक्‌ मूढः संमूढः संमूढः न भवति इति असंमूढः निवृत्तमोहः ॥ २० ॥

अर्थ : ज्याअर्थीं निर्दोष व समब्रह्म आत्मा आहे, त्याअर्थी इष्ट वस्तूला किंवा परिस्थितीला प्राप्त होऊन अतिशय हष्ट होऊं नये आणि तसेंच अनिष्ट वस्तूला किंवा अवस्थेला प्राप्त होऊन उद्विग्न होऊं नये. तर ज्याची बुद्धि स्थिर आहे; ब्रह्म निर्दोष व सम आहे, याविषयीं ज्याला संशय नाहीं; त्यामुळे ज्याला संमोह झालेला नाहीं, असे त्याने व्हावे. असा ब्रह्मवेत्ता ब्रह्मामध्यें अवस्थित असतो.
आत्मा एक सम व निर्दोष आहे, अशी आपली बुद्धि दृढ करून विवेकसंपन्न व्हावे. तोच ब्रह्मनिष्ठ सर्वकर्मसंन्यासी होय. ॥ २० ॥

विवरण :


बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखं अक्षयमश्नुते ॥ ५-२१ ॥

अन्वय : बाह्यस्पर्शेषु - बाहेरच्या विषयांमध्ये; असक्तात्मा - आसक्तिरहित अंतःकरण असणारा साधक; आत्मनि - आत्म्यामध्ये स्थित; यत् सात्त्विकं सुखम् - जो सात्त्विक आनंद आहे; तत् विन्दति - तो प्राप्त करून घेतो; तदनंतरम् सः ब्रह्मयोगयुक्तात्मा - त्यानंतर तो सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगामध्ये अभिन्न भावाने स्थित असलेला पुरुष; अक्षयं सुखं अश्नुते - अक्षय आनंदाचा अनुभव घेतो. ॥ २१ ॥

व्याख्या : यः पुरुषः बाह्यस्पर्शेषु इंद्रियाणि स्पृशंति ते स्पर्शाः बाह्याः आत्मनो बहिर्भूताश्च ते स्पर्शाश्च शद्बादिविषयाः बाह्यस्पर्शाः तेषु बाह्यस्पर्शेषु असकात्मा सन्‌ असक्तः निस्पृहः आत्मा चित्तं यस्य सः तथोक्तः सन्‌ आत्मनि अंतःकरणे यत्‌ प्रसिद्धं सुखं नित्यानंदं विंदति जीवन्मुक्तदशायां लभते सः तृष्णाशून्यः पुरुषः ब्रह्मयोगयुक्तात्मा सन्‌ ब्रह्मणि परमात्मनि योगः समाधिः ब्रह्मयोगः ब्रह्मयोगेन युक्तः ऐक्यं प्राप्तः आत्मा अंतःकरणं यस्य सः ब्रह्मयोगयुक्तात्मा अक्षयं न विद्यते क्षयो नाशः यस्य तत्‌ तथोक्तं सुखं निरतिशयं आनंदं अश्नुते व्याप्नोति सुखानुभवरूप एव सर्वदा भवति ॥ २१ ॥

अर्थ : शिवाय ब्रह्मामध्ये स्थित झालेला ब्रह्मवित् वर सांगितलेल्या प्रकारे केवक हर्ष-विषादरहित होतो, एवढेंच नव्हे, तर शब्दादि बाह्य विषयांमध्ये ज्याचे अन्तःकरण सक्त-आसक्त झालेले नसते, तो प्रत्यगात्म्यामध्यें जें स्वरूपभूत सुख असते, ते अनुभवितो. ब्रह्मामध्ये तो योग म्हणजे चित्ताची स्थिरता-चित्त-समाधान, त्यानें ज्याचें चित्त युक्त आहे, असा तो क्षय न पावणारे - नित्य सुख अनुभवितो.
विषयासक्ति हेच आत्मस्वरूपसुखाचें आवरण आहे. त्यामुळें विषयासक्तिरूप आवरण जसे जसे दूर होऊं लागते, तसें तसे आस्मस्वरूपसुख अभिव्यक्त होऊं लागते. असक्तात्मा केवळ शमामुळेंच सुखानुभव घेतो, असें नाहीं. तर ब्रह्मसमाधीच्या योगाने, ज्याचे अंतःकरण समाहित-शांत झाले आहे, तो अनंत सुखाचा अनुभव घेतो. म्हणून अनंत सुखाची इच्छा करणार्‍या साधकानें मोठ्या प्रयत्‍नानें इंद्रियांना विषयविमुख करावें. ॥ २१ ॥

विवरण :


ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ ५-२२ ॥

अन्वय : संस्पर्शजाः - इंद्रिये आणि विषयांच्या संयोगाने उत्पन्न होणारे; ये भोगाः - जितके भोग आहेत; ते - ते सर्व जरी विषयलोलुप पुरुषांना सुखरूप भासत असतात तरीसुद्धा; हि दुःखयोनयः एव - निःसंदेहपणे दुःखालाच कारण आहेत; च आद्यन्तवन्तः - आणि आदि-अंत म्ह० अनित्य आहेत - अतः कौन्तेय - म्हणून हे अर्जुना; बुधः तेषु न रमते - बुद्धिमान विवेकी पुरुष त्यांच्या ठिकाणी रमत नाहीत. ॥ २२ ॥

व्याख्या : हि यस्मात्‌ कारणात्‌ ये प्रसिद्धाः संस्पर्शजाः संस्पर्शात्‌ विषयेंद्रियाणां संस्पर्शसंयोगात्‌ जाताः संस्पर्शजाः भोगाः क्षुद्रसुखदवानुभवाः सुखविशेषाः वर्तंते अस्मिँल्लोके परलोके च ते विषयभोगाः ब्रह्मलोकपर्यंतं दुःखयोनय एव दुःख योनिः कारणं येषां ते दुःखयोनयः जन्ममरणद्वारा संसारप्रदत्वेन दुःखहेतवः संति । हे कौंतेय ! हे कुंतिपुत्र ! बुधः विवेकज्ञानवान्‌ तेषु संस्पर्शजेषु भोगेषु न रमते प्रीतिं न करोति । कथंभूताः भोगाः । आद्यंतवंतः आदिः उत्पत्तिः च अंतः विनाशः आद्यंतौ अथवा आदिः विषयेंद्रियसंयोगः च अंतः विषयेंद्रियवियोगः विध्येते येषां ते आद्यंतवंतः ॥ २२ ॥

अर्थ : इंद्रिये व विषय यांच्या संबंधापासून होणारे जे भोग-सुखानुभव ते सर्व दुःखाचीं बीजेच आहेत. तसेंच ते उत्पत्ति व नाश यांनीं युक्त आहेत. हे अर्जुना, तत्त्वज्ञ पंडित ज्या विषयांमध्ये रममाण होत नाहींत. ॥ २२ ॥

विवरण :


शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्‌भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥ ५-२३ ॥

अन्वय : संस्पर्शजाः - इंद्रिये आणि विषयांच्या संयोगाने उत्पन्न होणारे; ये भोगाः - जितके भोग आहेत; ते - ते सर्व जरी विषयलोलुप पुरुषांना सुखरूप भासत असतात तरीसुद्धा; हि दुःखयोनयः एव - निःसंदेहपणे दुःखालाच कारण आहेत; च आद्यन्तवन्तः - आणि आदि-अंत म्ह० अनित्य आहेत - अतः कौन्तेय - म्हणून हे अर्जुना; बुधः तेषु न रमते - बुद्धिमान विवेकी पुरुष त्यांच्या ठिकाणी रमत नाहीत. ॥ २२ ॥

व्याख्या : यः नरः इहैव अस्मिन्‌ देहे एव शरीरविमोक्षणात्‌ शरीरस्य देहस्य विमोक्षणं शरीरविमोक्षणं तस्मात्‌ प्राक्‌ मरणात्पूर्वं कामक्रोधोद्‌भवं कामः इष्टविषयाभिलाषः च क्रोधः तद्‌विनाशेन गात्रकंपनादिरूपः कामक्रोधौ कामक्रोधाभ्यां उद्‌भवो यस्य सः कामक्रोधोद्‌भवः तं वेगं आवेशं सोढुं सहितुं शक्नोति विवेकेन परिमार्जनं कर्तुं समर्थो भवति सः नरः युक्तः योगी । चेत्यपरं सः नरः सुखी सुखमस्यास्तीति सुखी परमानंदानुभववान्‌ । तथा चोक्तं वसिष्ठेन - 'प्राणे गते यथा देहः सुखं दुःखं न विंदति । तथा चेत्प्राणयुक्तोपि स कैवल्याश्रयो भवेत्‌' - इति ॥ २३ ॥

अर्थ : अर्जुना, जो पुरुष जिवंतपणीच-शरीराचा नाश होईपर्यंत काम-क्रोध यांपासून उत्पन्न होणारा वेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी व या लोकीं खरा सुखी पुरुष होय. अर्थात् कर्मयोग्यामध्ये काम-क्रोधोद्‌भव वेग मरेपर्यंत सहन करण्याचे सामर्थ्य संभवत नसल्यामुळें हे ज्ञानयोगी सांख्याचेंच वर्णन आहे.
काम-क्रोधोद्‌भववेग हा श्रेयोमार्गाचा प्रतिपक्षी, सर्व अनर्थांचे निमित्त, अतिशय कष्टकर व दुर्निवार्य असा एक दोष आहे. यास्तव त्याच्या निवारणासाठी शरीरपात होईंतों सांख्य-ज्ञानयोग्यानेंही यत्‍न करावा, असा याचा भावार्थ. ॥ २३ ॥

विवरण :


योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ ५-२४ ॥

अन्वय : यः एव - जो पुरुष ब्रह्माच्या शिवाय काहीही नाही असा निश्चय करून; अन्तःसुखः - अंतरात्म्यातच आनंदानुभव करणारा आहे; अन्तरारामः - आत्म्यामध्येच रममाण होणारा आहे; तथा यः अन्तर्ज्योतिः - त्याचप्रमाणे जो आत्म्याच्या ज्योतीमध्ये ज्याचे ज्ञान प्रकाशित होते; सः ब्रह्मभूतः योगी - तो सच्चिदानंद परब्रह्म परमात्म्याबरोबर एकीभाव प्राप्त करून घेतलेला सांख्ययोगी; ब्रह्मनिर्वाणम् अधिगच्छति - शांत ब्रह्माला प्राप्त करून घेतो. ॥ २४ ॥

व्याख्या : यः योगी परमहंसः अंतःसुखः अंतः आत्मन्येव सुखं यस्य सः तथा अंतरारामः अंतः आत्मनि आरामो क्रीडा यस्य सः वर्तते । चेत्यपरं यः योगी अंतर्ज्योतिरेव अंतः आत्मनि ज्योतिः वृष्टिः यस्य सः वर्तते । एवशब्देन विषयेषु न सुखं न क्रीडा न दृष्टिः सः प्रसिद्धः योगी ब्रह्मभूतः सन्‌ ब्रह्मतादात्म्यमाप्तः सन्‌ ब्रह्म बृहत्‌ व्यापकं अधिगच्छति प्राप्नोति । कथंभूतं ब्रह्म । निर्वाणं वणतीति वाणं वणति निरंतरं जन्ममरणं गच्छति निर्गतं वाणं यस्मात्‌ तत्‌ तथोक्तम्‌ ॥ २४ ॥

अर्थ : अर्जुना, अंतरात्म्यामध्येच ज्याचे सुख आहे व आध्यामध्येच ज्याचा आराम-आक्रीडा-करमणूक आहे, त्याचप्रमाणें जो आत्मा हीच ज्याची ज्योति-प्रकाश आहे, तो आत्मनिष्ठ ब्रह्मरूप होऊन ब्रह्मामध्ये निर्वाणास प्राप्त होतो.
सुखासाठी बाह्यविषयांची अपेक्षा न करणे, हेंच आत्मसुखत्व आहे. करमणूक, क्रीडा यांसाठी बाह्य स्त्री, मित्र इत्यादिकांची अपेक्षा नसणे, त्यावांचूनच आंतल्याआंत क्रीडेचे फळ प्राप्त होणें, हे अन्तरारामत्व आहे. इंद्रियादिकांपासून होणार्‍या विषयप्रकाशाची अपेक्षा नसणे, विषयज्ञानराहित्य हेंच अन्तर्ज्योतिष्ट्व आहे. अशा विशेषणांनीं संपन्न असलेला समाहित पुरुष जिवंत असतांनाच ब्रह्मभावास प्रास होतो. म्ह. परिपूर्ण शांतीला प्रास होतो . ॥ २४ ॥

विवरण :


लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः ।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥ ५-२५ ॥

अन्वय : क्षीणकल्मषाः - ज्यांची सर्व पापे नष्ट झालेली आहेत; छिन्नद्वैधाः - ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे निवृत्त झालेले आहेत; सर्वभूतहिते रताः - जे सर्व प्राण्यांच्या हितामध्ये रत आहेत; च यतात्मानः - आणि ज्यांचे जिंकलेले मन हे निश्चलभावाने परमात्म्यामध्ये स्थित आहे असे ते; ऋषयः ब्रह्मनिर्वाणं लभन्ते - ब्रह्मवेत्ते पुरुष शांत ब्रह्म प्राप्त करून घेतात. ॥ २५ ॥

व्याख्या : ऋषयः वाक्यार्थज्ञानसंपन्नाः निर्वाणं ब्रह्म मोक्षं लभंते प्राप्नुवंति । कथंभूताः ऋषयः । क्षीणकल्मषाः क्षीणं विवेकज्ञानेन नाशितं कल्मषं जन्ममरणबीजभूतं अज्ञानं येषां ते । पुनः कथंभूताः ऋषयः । छिन्नद्वैधाः छिन्नं गतं द्वैधं संशयः येषां ते । पुनः कथंभूताः । यतात्मानः यतः संयतः आत्मा अंतःकरणं येषां ते । पुनः कथंभूताः ऋषयः । सर्वभूतहिते सर्वाणि च तानि भूतानि च सर्वभूतानि सर्वभूतानां हितं सर्वभूतहितं तस्मिन्‌ रताः तत्पराः ॥ २५ ॥

अर्थ : ज्यांचे पापादि दोष क्षीण झाले आहेत, ज्यांचे सर्व संशय फिटले आहेत, ज्यांनीं इंद्रियांचें नियमन केले आहे व जे सर्व प्राण्यांच्या हितामध्ये रत आहेत, असे ज्ञानी-तत्ववेत्ते-संन्याशी ब्रह्मामध्ये निर्वाण पावतात. ॥ २५ ॥

विवरण :


कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥ ५-२६ ॥

अन्वय : कामक्रोधवियुक्तानाम् - जे काम व क्रोध यांनी रहित आहेत; यतचेतसाम् - ज्यांनी चित्त जिंकले आहे; विदितात्मनाम् - ज्यांना परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार झाला आहे अशा; यतीनाम् - ज्ञानी पुरुषांचे बाबतीत; अभितः ब्रह्मनिर्वाणं वर्तते - सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण भरलेला असतो. ॥ २६ ॥

व्याख्या : यतीनां परमहंसानां अभितः विद्यमाने देहे चेत्यपरं मृते निर्वाणं जन्ममरणशून्यं ब्रह्म वर्तते । कथंभूतानां यतीनाम्‌ । कामक्रोधवियुक्तानां कामश्च क्रोधश्च कामक्रोधौ कामक्रोधाभ्यां वियुक्ताः विधुराः कामक्रोधवियुक्ताः तेषाम्‌ । पुनः कथंभूतानाम्‌ । यतचेतसां यतं नियमितं चेतः अंतःकरणं येषां ते यतचेतसः तेषाम्‌ । पुनः कथंभूतानां यतीनाम्‌ । विदितात्मनां विदितः साक्षात्कृतः आत्मा कूटस्थः यैस्ते विदितात्मानः तेषाम्‌ । एतेषां ब्रह्मनिष्ठानां देहांते एव मोक्षो नास्ति किं तु जीवतामपि मोक्षो वर्तते ॥ २६ ॥

अर्थ : काम व क्रोध यांनीं रहित असलेल्या, चित्ताचें संयमन केलेल्या, आत्म्याला साक्षात् जाणलेल्या संन्याश्यांचा मोक्ष जिवंतपणीं व मेल्यावरही असतो.
या श्लोकांत 'यतीनाम्' असे प्रत्यक्ष पद आहे, त्यावरून हे सर्व धर्म कर्मयोग्याचे आहेत, असे म्हणतांच येत नाहीं. कामक्रोधरहित, चिताचे नियमन केलेल्या, आत्मज्ञानी संन्याश्यांनाच जीवन्मुक्तीचा लाभ होतो. स्वर्गादि फलाप्रमाणें त्यांना मोक्षही मेल्यावर मिळतो असे नाहीं, तर त्यांना जिवंतपणींच सद्योमुक्ति प्राप्त होते. त्याचे मोक्ष हे ज्ञानफल कर्मफलाप्रमाणें परोक्ष नसते, तर प्रत्यक्ष असते. ॥ २६ ॥

विवरण :


स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥ ५-२७ ॥
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥ ५-२८ ॥

अन्वय : बाह्यान् स्पर्शान् - बाह्य विषयभोगांना (त्यांचे चिंतन न करता); बहिः एव कृत्वा - बाहेरच सोडून देऊन; च चक्षुः भ्रुवोः अन्तरे - आणि नेत्रांची दृष्टी दोन भुवयांच्या मध्ये स्थिर करून; तथा नासाभ्यन्तरचारिणौ - तसेच नासिकेमध्ये संचार करणार्‍या; प्राणापानौ समी कृत्वा - प्राण व अपान या वायूंना स्म करून; यतेन्द्रियमनोबुद्धिः - ज्याचे इंद्रिये, मन, आणि बुद्धि जिंकलेली आहेत असा; यः मोक्षपरायणः मुनिः - जो मोक्षपरायण मुनी; विगतेच्छाभयक्रोधः - इच्छा, भय व क्रोध यांनी रहित झाला आहे; सः सदा मुक्तः एव - तो नेहमी मुक्तच असतो. ॥ २७-२८ ॥

व्याख्या : यः योगी ब्रह्मभूतः सन्‌ निर्वाणं ब्रह्म अधिगच्छति प्राप्नोति स एव योगी योगसंपन्नः सदा कात्रयेपि मुक्तः अस्ति इति द्वितीयेनान्वयः । किं कृत्वा । बाह्यान्‌ बहिर्भूतान्‌ स्पर्शान्‌ स्पृशंत क्ति स्पर्शाः तान्‌ स्पर्शान्‌ शब्दादिविषयान्‌ वासनारूपेण हृदये प्रविष्टान्‌ बहिः कृत्वा वासनात्यागेन दूरे त्यक्त्वा । चेत्यपरं पुनः किं कृत्वा । भ्रुवोः भ्रुकुट्योः अंतरे मध्यभागे आज्ञाचक्रोन्मुखं चक्षुः चक्षुषी कृत्वा । पुनः किं कृत्वा । प्राणापानौ प्राणश्च अपानश्च प्राणापानौ बहिरंतर्गमनशीलौ वायू समौ मंदगती यथा नासिकयोरेव तयोः व्यापारौ तथा समौ कृत्वा । कथंभूतौ प्राणापानौ । नासाभ्यंतरचारिणौ नासायाः नासिकायाः अब्यंतरं मध्यभागः नासाभ्यंतरं नासाभ्यंतरे चरतः संचारं कुर्वतः तौ नासाभ्यंतरचारिणौ ॥ २७ ॥
अयं उपायभूतः योगः प्रदर्शितः सः योगः यस्य विद्यते तं योगिनं चतुर्भिः विशेषणैः विशिनष्टि विशिष्टं करोति । यतेंद्रियेति । कथंभूतः योगी । यतेंद्रियमनोबुद्धिः इंद्रियाणि च मनश्च बुद्धिश्च इंद्रियमनोबुद्धयः यताः नियमिताः इंद्रियमनोबुद्धयो यस्य सः यतेंद्रियमनोबुद्धिः इंद्रियाणि ज्ञानेंद्रियकर्मेंद्रियाणि मनः अंतःकरणं बुद्धिः व्यवसायात्मिका । पुनः कथंभूतः योगी । मुनिः मननशिलो मुनिः महावाक्यार्थश्रवणमननचिंतनशीलः । पुनः कथंभूतः मुनिः । मोक्षपरायणः मोक्षः परमानंदरूपः परं श्रेष्ठं अयनं अवलंबनविषयः यस्य सः । पुनः कथंभूतः मुनिः । विगतेच्छाभयक्रोधः इच्छा विषयाभिलाषः च भयं जन्ममरणभयं च क्रोधः इच्छाभयक्रोधाः विशेषेण स्वरूपचिंतनेन गताः स्वप्नवल्लीनाः इच्छाभयक्रोधाः यस्य सः स एव मुक्तः ॥ २८ ॥

अर्थ : अर्जुना, जो मुनि-संन्यासी विषयोन्मुखता सोडून, विक्षेपाचा परिहार करण्यासाठीं चक्षूही भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून, नाकपुड्या व कंठादि आतील स्थान यांत संचार करण्याचे ज्यांचे शील आहे, असा प्राणापानांना सम करून - कुंभकाच्या योगाने त्यांचा निरोध करून म्ह० सर्व इंद्रियांचें संयमन करून व प्राणायामपरायण होऊन, इंद्रिये, मन व बुद्धि यांचे नियमन करून केवल मोक्षाचीच अपेक्षा करणारा असा मननशील होतो, तो सदा मुक्तच आहे. त्याला कांहीं कर्तव्य उरत नाही. ॥ २७-२८ ॥

विवरण :


भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ ५-२९ ॥

अन्वय : यज्ञतपसाम् - सर्व यज्ञ आणि तप यांचा; भोक्तारम् - भोक्ता मी आहे; सर्वलोकमहेश्वरम् - सर्व लोकातील ईश्वरांचासुद्धा ईश्वर म्हण सर्वलोकमहेश्वर मी आहे; तथा सर्वभूतानाम् - तसेच सर्व भूतांचा - सुहृदम् माम् - सुहृद म्हणजे स्वार्थरहित दयाळू व प्रेम करणारा असा मी आहे; ज्ञात्वा शान्तिम् ऋच्छति - तत्त्वतः जाणून माझा भक्त परम शांती प्राप्त करून घेतो. ॥ २९ ॥

व्याख्या : सः योगी मां परमेश्वरं ज्ञात्वा आत्मत्वेन अनुभूयं शांतिं सर्वदुःखोपरमरूपां मोक्षाख्यां शांतिं ऋच्छति गच्छति प्राप्नोति । मद्‌रूपो भवतीत्यर्थः । कथंभूतं माम्‌ । यज्ञतपसां यज्ञाः अश्वमेधादयः च तपांसि अनुष्ठानानि यज्ञतपांसि तेषां यज्ञतपसां स्वभक्तैः समर्पितानां भोक्तारं भुनक्तीति भोक्ता तं भोक्तारं स्वभक्त इच्छया फलदातारम्‌ । पुनः कथंभूतं माम्‌ । सर्वलोकमहेश्वरं महांश्चासौ ईश्वरस्य महेश्वरः सर्वे च ते लोकाश्च सर्वलोकाः सर्वलोकानां भूतभौतिकानां लोकानां महेश्वरः सर्वलोकमहेश्वरः तम्‌ । पुनः कथंभूतं माम्‌ । सर्वभूतानां सर्वाणि संपूर्णानि च तानि भूतानि प्राणिमात्राणि च सर्वभूतानि तेषां सर्वभूतानां सुहृदं सुष्ठु सर्वभूतहितं हरति प्रापयतीति सुहृद्‌ तं सुहृदं यद्वा सुहृदं हितकर्तारं यद्वा सुहृदं अंतर्यामिणम्‌ ॥ २९ ॥

अर्थ : यज्ञ व तपश्चर्या यांचा कर्ता व देवतारूपानें भोक्ता, सर्व लोकांचा महान् ईश्वर, सर्व भूतांवर निरपेक्ष उपकार करणारा, अशा मला जाणून पुरुष सर्व संसारशांतीस प्रास होतो.
याप्रमाणें या अध्यायांत अमुख्य संन्यासापेक्षां कर्मयोग श्रेष्ठ असला तरी मुख्य संन्यास कर्माहून श्रेष्ठ असल्यामुळें चित्तशुद्धीनें युक्त असलेल्या, कामक्रोधांचा वेग मरेपर्यत सहन करण्यास समर्थ असलेल्या शमदमादिसंपतन्न, योगाधिकारी, 'त्चं'पदाचा अर्थ जाणणार्‍या व परमात्माच माझा प्रत्यगात्मा आहे, असे समजणार्‍या मुख्य संन्याश्यालाच मुक्ति प्राप्त होते, हे सिद्ध झाले. ॥ २९ ॥

विवरण :


ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
सन्न्यासयोगो नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥


॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP