|
श्रीमद् भगवद्गीता कर्मयोगः
भगवंतांनी दुसर्या अध्यायात गीताशास्त्राचे प्रतिपाद्य अशा दोन बुद्धि सांगितल्या. एक सांख्यबुद्धि व दुसरी योगबुद्धि. सांख्यबुद्धि हा निवृत्तिचा विषय आहे व योगबुद्धि हा प्रवृत्तिचा विषय आहे. योगबुद्धि साधन आहे व सांख्यबुद्धि साध्य आहे. त्यांत ’प्रजहाति यदा कामान्’ येथून दुसरा अध्याय संपेपर्यंत ’ज्ञाननिष्ठेचा आश्रय केलेल्या लोकांनी सर्वकर्मसंज्ञास करावा’ असे सांगितले व ’त्या निष्ठेने ते कृतार्थ होतात’ असेंही शेवटी सांगितले. पण अर्जुनाला ’तूं ज्ञाननिष्ठ हो’ असें न सांगता तुझा कर्मामध्येंच अधिकार आहे, कर्म न करण्याविषयीं तूं आग्रह धरूं नकोस,’ असें सांगितले. पण ’त्या कर्मानेंच तूं कृतार्थ होशील’ असें काही म्हटले नाही. उलट ’बुद्धियोगाहून कर्म अत्यंत निकृष्ट आहे’ असे सांगितले आहे. त्यामुळे अर्जुनाचे अंतःकरण व्याकुळ झाले. भगवान् इतर मुमुक्षु भक्ताला ज्ञाननिष्ठा म्हणजे साक्षात् मोक्षसाधन सांगतात व मला मात्र जणूंकाय मी भक्त व श्रेयोर्थी - मुमुक्षु नाहींच असे समजून ’तूं कर्मच कर’ असा आग्रह करतात. आणि तें कर्म कोणते, तर युद्धासारखे घोर कर्म; ज्यांत गुरु भ्राते इत्यादिकांची प्रत्यक्ष हिंसा आहे, असल्या कर्माच्या योगाने चित्तशुद्धि होऊन याच जन्मीं ज्ञानरूप फल प्राप्त होईल असाही नियम नाही. यास्तव भगवंतांनी मला अशी आज्ञा करणे योग्य नाहीं असें वाटून अर्जुनाचें चित्त व्याकुल होणे साहजिकच होते, आणि त्याने केलेला प्रश्नही त्या स्थितीला साजेसाच आहे. पण भगवंतांनी त्याच्या प्रश्नाचे जे उत्तर दिले आहे ते शास्त्राच्या पूर्वोक्त विभागाला धरूनच आहे, त्याला सोडून नाही.
अर्जुन उवाच -
ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । अन्वय : जनार्दन - हे जनार्दना; चेत् कर्मणः बुद्धिः ज्यायसी - कर्माच्या अपेक्षेने ज्ञान श्रेष्ठ आहे; ते मता - असे जर तुम्हाला मान्य असेल; तत् केशव ! तर मग हे केशवा ! - माम घोरे कर्मणि किम् नियोजयसि - माझी भयंकर कर्म करण्यांत का बरे तुम्ही योजना करीत आहात. ॥ १ ॥ व्याख्या : हे जनार्दन, हे केशव ! कर्मणः निष्कामात् कर्मणः सकाशात् बुद्धिः आत्मविषया बुद्धिः ज्यायसी प्रशस्ततरा ते तव मता चेत् मान्या चेत् तत् तर्हि त्वं मां किं किमर्थं 'युद्ध्यस्व' 'उत्तिष्ठ' इति वारंवारं वदन् सन् घोरे हिंसात्मके कर्मणि नियोजयसि प्रवर्त्तयसि ॥ अर्थ : हे जनार्दना ! कर्माहून ज्ञान श्रेष्ठ आहे असे जर तुझे मत आहे, तर मग हे केशवा, तूं मला युद्धासारख्या घोर कर्म करण्यात का बरे नियुक्त करतोस ? विवरण :
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे । अन्वय : व्यामिश्रेणेव इव वाक्येन - जणू मिश्रित अशा वाक्यांनी; मे बुद्धिम् मोहयसि - माझ्या बुद्धीला तुम्ही जणूं मोहित करीत आहात; (अतः) येन अहं श्रेयं आप्नुयाम् - म्हणून ज्यामुळे मी कल्याण प्राप्त करून घेईन; तत् एकं निश्चित्य वद - अशी ती एक गोष्ठ निश्चित करून सांगा. ॥ २ ॥ व्याख्या : क्वचित् कर्मप्रशंसा क्वचित् ज्ञानप्रशंसा इति व्यामिश्रेणेव संशयोत्पादकेनैव वाक्येन वचनेन त्वं मे मंदबुद्धेः बुद्धिं मोहयसीव भ्रांत्या योजयसीव ! तत् तयोः ज्ञानकर्मणोः मध्ये एकं निश्चयात्मकं निश्चित्य वद । अहं येन निश्चयात्मक वाक्येन श्रेयः मोक्षं आप्नुयां प्राप्स्यामि ॥ अर्थ : अर्थ : संदिग्ध भाषणानें, अत्यंत घोटाळ्यात पाडणार्या वाक्याने जणुं काय माझ्या बुद्धीला तूं मोहच पाडीत आहेस. यास्तव माझा वर्ण, अधिकार यांस योग्य असे कोणतेतरी एक निशित श्रेयसाधन मला सांग पाहूं. विवरण :
श्रीकृष्ण प्रश्नाच्या अनुरूप प्रतिवचन देतात -
लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ । अन्वय : अनघ, अस्मिन् लोके - हे निष्पापा, या जगात; मया द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता - मी दोन प्रकारची निष्ठा पुर्वी सांगितली आहे; ज्ञानयोगेन साङ्ख्यानाम् (निष्ठा) - ज्ञानयोगद्वारा सांख्ययोग्यांची निष्ठा; कर्मयोगेन योगिनाम् (निष्ठा) - कर्मयोगद्वारा योग्यांची निष्ठा होते. ॥ ३ ॥ व्याख्या : हे अनघ ! न विद्यते अघं पापं यस्य सः तत्संबुद्धौ हे अनघ हे अर्जुन ! अस्मिन् शुद्ध-अशुद्धांतःकरणतया द्विविधे लोके अधिकारिजने द्विविधा द्वे विधे प्रकारौ यस्याः सा निष्ठा मोक्षपरता पुरा पूर्वाध्याये मया सर्वज्ञेन प्रोक्ता स्पष्टमेव उक्ता । प्रकारद्वयमाह । सांख्यानां शुद्धांतःकरणानां ज्ञानभूमिकां आरूढानां ज्ञानयोगेन ज्ञानमेव योगः ज्ञानयोगः तेन ध्यानादिना निष्ठा ब्रह्मपरता उक्ता । योगिनां कर्मयोगाधिकारिणां कर्मयोगेन कर्मैव योगः कर्मयोगः तेन निष्ठा उक्ता ॥ अर्थ : मी सृष्टीच्या आरंभी सर्व प्रजा उत्पन्न करून त्यांच्या ऐहिक व पारलौकिक उत्कर्षासाठी व मोक्षासाठी त्यांतील त्रैवर्णिकांना दोन प्रकारची निष्ठा सांगितली. ज्ञानयोगाने सांख्यांची निष्ठा व कर्मयोगानें कर्माधिकारी द्विजांची निष्ठा, अशी दोन प्रकारची निष्ठा सांगितली. विवरण :
ज्ञान जर कर्माहून श्रेष्ठ आहे व कर्म जर संसारबंध उत्पन्न करणारे आहे तर तेंच करण्याविषयीं भगवान् मला कां आग्रह करीत आहेत, असें मनांत आणून अर्जुन अतिशय खिन्न झाला आहे, हें पाहून भगवान् म्हणतात -
न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते । अन्वय : कर्मणाम् अनारम्भात् - कर्मांचे आचरण केल्याशिवाय; पुरुषः नैष्कर्म्यं न अश्नुते - मनुष्य निष्कामता म्हणजे योगनिष्ठा प्राप्त करून घेऊ शकत नाही; च संन्यसनात् एव सिद्धिं न समगच्छति - तसेच, कर्मांचा केवळ त्याग केल्यामुळे सिद्धि म्ह० सांखय्निष्ठा प्राप्त करून घेत नाही. ॥ ४ ॥ व्याख्या : पुरुषः ज्ञानायोग्यः बहिर्मुखः कर्मणां वेदोक्तानां अनारंभात् अननुष्ठानात् नैष्कर्म्यं सर्वकर्मशून्यं ज्ञानं न अश्नुते न प्राप्नोति । किंच चित्तशुद्धिं विना संन्यासनात् ज्ञानशून्यात् कृतसंन्यासात् सिद्धिं मोक्षं न समधिगच्छति न प्राप्नोति ॥ अर्थ : ज्ञानासह संन्यासानें नैष्कर्म्यप्राप्ति होते. ज्ञानासाठी चित्तशुद्धि व्हावी लागते व चित्तशुद्धीला नित्य-नैमित्तिक कर्मांची अपेक्षा असते. यास्तव कर्माच्या अनुष्ठानाला आरंभ केल्याशिवाय नैष्कर्म्य प्राप्त होत नाही. ज्ञानरहित केवल कर्मत्याग केल्यानेंच कांही नैष्कर्म्यसिद्धि प्राप्त होत नाही. विवरण :
ज्ञानरहित कर्मसंन्यासानेंच नैष्कर्म्यरूप सिद्धि कां मिळत नाहीं, ते सांगतात -
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् । अन्वय : कश्चित् जातु - कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी; हि क्षणं अपि - निःसंदेहपणे क्षणमात्रसुद्धा; अकर्मकृत् न तिष्ठति - कर्म न करता राहात नाही; हि प्रकृतिजैः गुणैः - कारण प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांनी; अवशः सर्वः कर्म कार्यते - परतंत्र झालेला हा सर्व मनुष्यसमुदाय कर्म करण्यास भाग पाडला जातो. ॥ ५ ॥ व्याख्या : कश्चिदपि ज्ञानी वा अज्ञो वा जातु कस्यां चित् अवस्थायां क्षणमपि क्षणमात्रमपि अकर्मकृत् सन् कर्माणि करोतीति कर्मकृत् न कर्मकृत् अकर्मकृत् कर्माणि अकुर्वाणः सन् न तिष्ठति । हि यस्मात् सर्वः चित्तशुद्धिरहितः सर्वजनः अवशः सन् अस्वतंत्रः सन् प्रकृतिजैः प्रकृत्याः जाताः कृतिप्रजाः तैः स्वभावप्रभवैः रागद्वेषादिभिः गुणैः सत्त्वरजस्तमोभिः कर्म लौकिकं वा वैदिकं कार्यते कर्मणि प्रवर्त्तते ॥ अर्थ : कारण कोणीही एक क्षणभरसुद्धां कर्म न करणारा असा, कर्म सोडून केव्हांही रहात नाही. कारण कर्माच्या अधीन असलेलाच प्रत्येक प्राणी - प्रकृतिपराधीन असलेला हरएक जीव - ईश्वराच्या अचिंत्य शक्तीपासून झालेल्या सत्त्व-रज-तम गुणांकडून कर्म करविला जातो. म्हणजेच गुणांद्वारा प्रत्येक अज्ञ जीवाकडून कर्म करविले जाते. विवरण :
जे अनात्मज्ञ, सकाम पुरुष शास्त्रविहित कर्म आरंभीत नाही, तो संज्ञासी तर ढोंगी आहे असे सांगतात -
कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् । अन्वय : विमूढात्मा कर्मेन्द्रियाणि संयम्य - मूढबुद्धीचा मनुष्य सर्व इंद्रियांना जबरदस्तीने रोखून धरून; यः मनसा इन्द्रियार्थान् स्मरन् आस्ते - जो मनाने त्या इंद्रियांची विषयांचे चिण्तन करीत असतो; स मिथ्याचारः उच्यते - तो मिथ्याचारी म्ह० दांभिक म्हटला जातो. ॥ ६ ॥ व्याख्या : यः विमूढात्मा विशेषेण मूढ आत्मा बुद्धिः यस्य सः रागद्वेषादि दूषितांतःकरणः सन् कर्मेन्द्रियाणि वाक् पाण्यादीनि संयम्य निगृह्य इन्द्रियार्थान् इंद्रियाणां अर्थाः इंद्रियार्थाः तान् शब्दादि विषयान् मनसा अंतःकरणेन भगवध्यानमिषेण स्मरन् सन् आस्ते सः पुरुषः मिथ्याचारः दांभिकः उच्यते ॥ अर्थ : जो मूढमति पुरुष कर्मेंद्रियांचे संयमन करून विषयांचे मनाने स्मरण करीत राहतो तो ढोंगी म्हटला जातो. विवरण :
कर्मेंद्रियांचे संयमन करून मनाने विषयचिंतन करणारा संन्यासी नसून ढोंगी असतो. पण याच्या उलट -
यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन । अन्वय : तु अर्जुन यः - परंतु हे अर्जुना जो पुरुष - मनसा इन्द्रियाणि नियम्य - मनाच्या योगे इंद्रियांना वश करून घेऊन - असक्तः - अनासक्त होऊन - कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् आरभते - सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो - सः विशिष्यते - तो पुरुष श्रेष्ठ होय. ॥ ७ ॥ व्याख्या : हे अर्जुन ! तु शब्दात् शुद्धांतःकरणः गृह्यते । यः पुमान् इंद्रियाणि श्रोत्रादीनि ज्ञानेंद्रियाणि मनसा विवेकयुक्तेन अंतःकरणेन नियम्य ईश्वरप्रवणानि कृत्वा कर्मेंद्रियैः वाक् पाण्यादिभिः कर्मयोगं विहितं कर्म असक्तः सन् फलाभिलाषशून्यः सन् आरभते आरंभं करोति सः पुरुषं विशिष्यते मिथ्याचारात् विशिष्टो भवति ॥ अर्थ : हे अर्जुन ! पण जो ज्ञानेंद्रियांचा मनाने निग्रह करून कर्मफलामध्ये आसक्त न होता कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचा आरंभ करतो तो चांगला श्रेष्ठ होय. म्हणजेच जो कर्माधिकारी अज्ञ पुरुष ज्ञानेंद्रियांचे मनाने संयमन करून वाक्, हस्त इत्यादि कर्मेंद्रियांनी कर्मयोगाला - कर्मानुष्ठानाला, त्यांत आसक्त न होता, आरंभ करतो तो इतर मिथ्याचारांहऊन म्हणजे पूर्वोक्त ढोंग्यांहून अधिक चांगला होय. विवरण :
म्हणून -
नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः । अन्वय : त्वं नियतं कर्म कुरु - तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर; - हि अकर्मणः कर्म ज्यायः - कारण कर्म न करण्याच्या अपेक्षेने कर्म करणे श्रेष्ठ आहे; च अकर्मणः - करण कर्म न केल्यास; ते शरीरयात्रा न प्रसिद्ध्येत् - तुझा शरीरनिर्वाहसुद्धा सिद्ध होणार नाही. ॥ ८ ॥ व्याख्या : हे पार्थ ! त्वं नियतं नित्यं कर्म संध्योपासनादि कुरु । हि यस्मात् अकर्मणः कर्माकरणात् सकाशात् कर्मज्यायः कर्मणा श्रेष्ठः कर्मज्यायः अधिकतरः भविष्यसि । अन्यथा उक्तवैपरीत्ये सति अकर्मणः युद्धादिकर्मरहितस्य ते तव शरीर यात्रापि शरीरस्य यात्रा शरीरनिर्वाहोपि न प्रसिद्ध्येत् न भवेत् ॥ अर्थ : कर्म करणे, वा न करणे, यांचा परिणाम प्रत्यक्ष प्रमाणानेंच अनुभवास येतो. यास्तव कर्माधिकारी असताना नियत कर्म सोडणें हा मोठा दोष आहे. शरीर स्थितीही कर्म न करण्याने उत्तम प्रकारे शास्त्रविहित मार्गानें सिद्ध होणार नाही. विवरण :
कर्म बंधालाच कारण होणारे असल्यामुळें करूं नये, असे जे तूं समजत आहेस, तेंही बरोबर नाही. कारण -
यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः । अन्वय : यज्ञार्थात् कर्मणः - यज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणार्या कर्मांव्यतिरिक्त; अन्यत्र अयं लोकः - इतर कर्मांमध्ये गुंतलेला हा मनुष्य समुदाय; कर्मबन्धनः - कर्मांनी बांधला जातो; (अतः) कौन्तेय ! - म्हणून हे अर्जुना !; (त्वं) मुक्तसङ्गः - तू आसक्तिरहित होऊन म्ह० फलापेक्षा सोडून; तदर्थं कर्म समाचर - त्या यज्ञासाठी चांगल्या प्रकारे कर्तव्य कर्म कर. ॥ ९ ॥ व्याख्या : हे कौंतेय ! यज्ञार्थात् यज्ञाः विष्णुः स एव अर्थो आराधां यस्मिन् तत् यज्ञार्थं तस्मात् कर्मणः सकाशात् अन्यत्र ईश्वरार्पणं विना अयं लोकः कर्माधिकारी कर्मबंधनः कर्मणा बंधनं यस्य सः भवति कर्मभिः बद्धो भवति । त्वं मुक्तसंगः सन् मुक्तः त्यक्तः संगो कर्मफसंगः येन सः मुक्तसंगः निष्कामः सन् तदर्थं विष्णुप्रीत्यर्थं कर्म समाचर सम्यक् आचर ॥ अर्थ : हा अधिकारी कर्मठ मनुष्य ईश्वरार्थ केलेल्या कर्माहून अन्य कर्माने कर्मबद्ध होतो. ई श्वरासाठी केलेल्या कर्माहून बाकीचे सर्व कर्म त्याला बंधनकारक होते. म्हणून हे कौंतेय ! तूं ईश्वरासाठी मुक्तसंग म्हणजे कर्मफलाविषयींची आसक्ति सोडून कर्माचे आचरण कर. विवरण :
कर्माधिकारी पुरुषाने याही आणखी एका कारणातव नैमित्तिक कर्मासह नित्य कर्म करावे, असें भगवान् सांगतात -
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः । अन्वय : पुरा - कल्पाच्या पूर्वी; सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा - यज्ञाच्या बरोबर प्रजा निर्माण करून; प्रजापति उवाच - ब्रह्मदेव त्यांना म्हणाला; यूयं अनेन प्रसविष्यध्वम् - तुम्ही लोक या यज्ञाच्याद्वारा उत्कर्ष प्राप्त करून घ्या; (च) एषः यज्ञः वः - आणि हा यज्ञ तुम्हा लोकांचे; इष्टकामधुक् अस्तु - इष्ट भोग देणारा होवो. ॥ १० ॥ व्याख्या : हे कौंतेय ! पुरा सर्गादौ प्रजापतिः प्रजानां पतिः प्रजापतिः ब्रह्मा सहयज्ञाः यज्ञेन सह वर्त्तंत इति सहयज्ञाः प्रजाः ब्राह्मणाद्याः सृष्ट्वा निर्मयित्वा इदं वक्ष्यमाणं उवाच उक्तवान् । किं उवाच । हे प्रजाः ! यूयं अनेन यज्ञेन स्व आश्रमोचितधर्मेण प्रसविष्यध्वं उत्तरोत्तरां अभिवृद्धिं लभध्वम् । एषः यज्ञः वः युष्माकं इष्टकामधुक् इष्टान् कामान् मनोरथान् दोग्धीति अभीष्टफलप्रदः अस्तु ॥ अर्थ : स्रष्टा ब्रह्मदेव सृष्टीच्या आरंभी यज्ञासहवर्तमान तीन वर्णांना उत्पन्न करून ’या यज्ञाने आपली वृद्धि करून घ्या. हा तुमचे इष्ट मनोरथ पूर्ण करो’ असे म्हणाला. विवरण :
हा यज्ञ काम कसा देणार ? उत्तर -
देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः । अन्वय : अनेन देवान् भावयत - या यज्ञाचे द्वारा देवतांना तुम्ही उन्नत करा; (च) ते देवाः वः भावयन्तु - आणि त्या देवता तुम्हां लोकांना उन्नत करोत; एवं परस्परं भावयन्तः - याक्रकारे निःस्वार्थ भावनेने एकेमेकांना उन्नत करीत - परं श्रेयः अवाप्स्यथ - तुम्ही परम कल्याण प्राप्त करून घ्याल ॥ ११ ॥ व्याख्या : यूयं अनेन यज्ञेन देवान् इंद्रादीन् भावयत हविर्भागैः संवर्द्धयंत । ते देवाः यः युष्मान् भावयंतु वृष्टिद्वारा अन्नादिभिः संवर्द्धयंतु । देवाः चेत्यपरं यूयं परस्परं परंच परं च परस्परं भावयंतः संतः भावयंति ते भावयंतः अन्योन्यं संवर्धयंतः संतः परस्परं श्रेयः इष्टं अर्थं अवाप्स्यथ प्राप्स्यथ ॥ अर्थ : तुम्ही हे यज्ञादि करून हविर्भागांनी देवतांना प्रसन्न करा व वृष्टि, अन्न इत्यादिकांच्या योगाने देव तुमचे परिपोषण करतील. या प्रमाणे एकमेकांच्या उपयोगी पडून तुम्ही स्वर्गाची इच्छा असल्यास देवतांच्या प्रसादाने स्वर्गाला प्राप्त व्हाल व तुम्हाला स्वर्गाची इच्छा नसून जर मुमुक्षु असाल तर चित्तसुद्धि, ज्ञानप्राप्ति या क्रमाने मोक्षाला प्राप्त व्हाल. विवरण :
कर्माधिकारी पुरुषाने कर्मच करावे, याविषयी आणखी एक कारण -
इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः । अन्वय : यज्ञभाविताः देवाः - यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता; वः इष्टान् भोगान् हि दास्यन्ते - तुम्हा लोकांना न मागता इष्ट भोग निश्चितपणे देत राहतील; यः तैः दत्तान् - आणि जो पुरुष अशाप्रकारे त्या देवतांनी दिलेले भोग; एभ्यः अप्रदाय भुङ्क्ते - त्यांना अर्पण न करता सर्व स्वतःच भोगतो - सः स्तेनः एव - तो चोरच आहे. ॥ १२ ॥ व्याख्या : देवां इंद्रादयं यज्ञभाविताः संतः यज्ञैः भाविताः तोषिताः संतः वः युष्मभ्यं वृष्ट्यादिद्वारेण भोगान् पश्वन्नहिरण्यादीन दास्यंते । हि यस्मात् यः पुरुषः देवैः दत्तन् अन्नदिभोगान् येभ्यः देवेभ्यः पंचयज्ञादिभिः अप्रदाय अदत्त्वा यज्ञेषु देवोद्देशेन आहुतीः असंपाद्य भुंक्ते देहेंद्रियाणि तर्पयति सः पुरुषः स्तेन एव तस्कर एव ज्ञेयः ॥ अर्थ : तुम्हांकडून यज्ञांनी संतुष्ट केले गेलेले देव तुम्हांला इष्ट भोग देतील. पण आनृण्य क करिअतां म्हणजे यज्ञांच्या भोगाने देवांच्या, ब्रह्मचर्यानें ऋषींच्या व प्रजेच्या योगाने पितरंच्या ऋणांतून मुक्त न होतां त्यांना त्या त्या साधनांनी तृप्त केल्यावाचून, जो त्यांचा उपभोग घेतो, आपलाच देह व इंद्रियें यांस तृप्त करतो; तो देव, ऋषि, व पितर यांचे धन हरण करणारा चोरच होय. विवरण :
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः । अन्वय : यज्ञशिष्टाशिनः सन्तः - यज्ञ झाल्यावर शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष; सर्वकिल्बिषैः मुच्यन्ते - सर्व पापापासून मुक्त होतात; ये पापा आत्मकारणात पचन्ति - परंतु जे पापी लोक स्वतःच्या पोषणासाठीच अन्न शिजवितात; ते तु अघं भुञ्जते - ते तर पापच खातात. ॥ १३ ॥ व्याख्या : यज्ञशिष्टासिनः यज्ञशिष्टं अश्नंति ते यज्ञशिष्टाशिनः वैश्वदेवादि यज्ञावशिष्टभक्षिणः संतः शिष्टाः सर्वकिल्बिशहिः सर्वाणि च तानि किल्बिषाणि पंचसूनाजनित पातकानि च सर्वकिल्बिषाणि तैः मुच्यंते मुक्ताः भवंति । ये पुरुषाः आत्मकारणात् आत्मनः कारणं आत्मकारणं तस्मात् पचंति स्वभोजनार्थमेव अन्नं पचंति न तु वैश्वदेवाद्यर्थः ते तु पुरुषाः पापाः संतः पापरूपिणः संतः अघं पंचसूनाजनित पापं भुंजते भक्षणं कुव्रंति । ’कंडणी पेषणी चुल्ली उदकुंभी च मार्जनी । पंचसूना गृहस्थस्य ताभिः स्वर्गं न विंदति’ इति ॥ अर्थ : देवयज्ञादिक करून अवशिष्ट राहिलेले अन्न खाणारे शिष्ट सर्व पापांकडून मुक्त केले जातात. परंतु जे आपलेंच पोट भरण्यासाठी अन्न शिजवितात ते पापी लोक पाप खातात. विवरण :
कर्माधिकारी पुरुषाने याही आणखी एका कारणाने पंचयज्ञरूपी कर्म करावे -
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः । अन्वय : अन्नात् भुतानि भवन्ति - अन्नापासून संपूर्ण प्राणी उत्पन्न होतात; पर्जन्यात् अन्न सम्भवः - पर्जन्यवृष्टीपासून अन्नाची उत्पत्ती होते; यज्ञात् पर्जन्यः भवति - यज्ञापासून पर्जन्यवृष्टी होते; यज्ञः कर्मसमुद्भवः - यज्ञ विहितकर्मांपासून उत्पन्न होणारा आहे; कर्म ब्रह्मोद्भवम् - कर्मसमुदाय हा वेदांपासून उत्पन्न होणारा (आणि); ब्रह्म अक्षरसमुद्भवं विद्धि - वेद हे अविनाशी परमात्म्यापासून् उत्पन्न होणारे आहेत असे तू जाण; तस्मात् सर्वगतं ब्रह्म - म्हणून यावरून सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा; नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् - नेहमीच यज्ञामध्ये प्रतिष्ठित आहे. ॥ १४-१५ ॥
व्याख्या : अन्नात् शुक्रशोणितरूपेण परिपाकात् भूतानि जीवाः भवंति । यज्ञात् वैश्वदेवाग्निहोत्रात् पर्जन्यः वृष्टिः भवति । यज्ञझ् वैश्वदेवाग्निहोत्रं कर्मसमुद्भवः कर्मणा यजमानादिव्यापारेण समुद्भवतीति कर्मसमुद्भवः अस्ति ॥ १४ ॥ अर्थ : खाल्लेल्या अन्नापासून प्राण्यांची शरीरे होतात. पर्जन्यापासून तांदूळ, गहूं इत्यादि अन्नाची उत्पति होते. यज्ञापासून पाऊस होतो. तो धर्म - ’अपूर्व’ नांवाचा यज्ञ यजमान, ऋत्विक् इत्यादिकांच्या कर्मापासून, त्यांच्या हालचालीने होणारा आहे. यजमानादिकांचें तें कर्म वेदापासून उद्भवलेले आहे. वेद हे कर्माचे कारण - प्रमाण आहे असे तूं जाण. तो वेद परमात्म्यापासून श्वासोच्छ्वासाप्रमाणे प्रकट झालेला आहे. वेद परमात्म्यापासून प्रकट झालेला असल्यामुळे तो सर्व विषयांचे प्रकाशन करणारा जरी असला तरी यज्ञाचे विधान करणे, हे त्याचे प्रधान कर्तव्य असल्यामुळे तो यज्ञप्रधान आहे. म्हणून ते ’वेद’ संज्ञक ब्रहम् सतत यज्ञांत स्थिर स्थित आहे. विवरण :
अधिकारी पुरुषाने अध्ययनादिकांच्या द्वारा जगच्चक्राचें अनुवर्तन करावे, नाहीतर ईश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन करणार्या त्याला प्रत्यवाय लागतो, असे सांगतात -
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः । अन्वय : पार्थ ! इह एवं प्रवर्तितं चक्रम् - हे पार्था, या जगामध्ये अशा प्रकारे परंपरेने प्रचलित असणार्या; यः चक्रं न अनुवर्तति - सृष्टिचक्राला अनुकूल असे आपल्या कर्तव्याचे पालन जो पुरुष करीत नाही; सः इन्द्रियारामः - तो पुरुष इंद्रियांच्या द्वारा भोगामध्ये रमणारा; अगायुः मोघं जीवति - पापी आयुष्याचा असून व्यर्थच जिवंत राहतो. ॥ १६ ॥ व्याख्या : हे पार्थ ! हे पृथापुत्र ! आदौ परमेश्वरात् वेदाविर्भावः वेदात् कर्मानुष्ठानं कर्मानुष्ठानात् यज्ञः यज्ञात् पर्जन्यः पर्जन्यात् अन्नसंभवः अन्नसंभवात् भूतानि भूतेभ्यः पुनः तथैव भूतानां कर्मप्रवृत्तिः एवंप्रकारेण परमेश्वरेण प्रवर्तितं निर्मितं चक्रं सर्व जगन्निर्वाहकं नानुवर्त्तयति नानुतिष्ठति यः पुरुषः सः इह लोके मोघं व्यर्थं जीवति । तस्य पुरुषस्य जीवनात् मरणं वरं श्रेष्ठम् । कथंभूतः सः । अघायुः अघं पापरूपं आयुर्यस्य सः अघायुः । पुनः कथांभूतः सः । इंद्रियारामः इंद्रियेषु आरामो विश्रांतिर्यस्य सः इंद्रियारामः ॥ अर्थ : प्रजापतीने जगाला उत्पन्न केले व त्याच्या स्थितीसाठी त्याला कर्म लावून दिले. वेद परमेश्वरापासून झाला, त्या वेदावरून कर्माचे ज्ञान होते. कर्माने अपूर्व उत्पन्न होते. त्या अपूर्वापासून पर्जन्य, पर्जन्यापासून अन्न, अन्नापासून प्राणिशरीरे, प्राणिशरीरेंहेंच जगत्, त्यांपासून पुन्हा कर्म, कर्मापासून अपूर्व, अपूर्वापासून पर्जन्य, पर्जन्यापासून अन्न व अन्नापासून पुनः प्रजा, असें हें चक्र आहे. जो कर्माधिकारी कर्मानुष्ठानानें त्याचें अनुवर्तन करीत नाही तो पापी होय. विवरण :
ईश्वराने प्रवृत्त केलेलें हें जगच्चक्र प्रत्येक द्विजाने चालविले पाहिजे कीं पूर्वोक्त ज्ञाननिष्ठेला प्राप्त न झालेल्या अनात्मज्ञ याने या चक्राचे अनुवर्तन करणे उचित आहे - भगवान् उत्तर देतात. उत्तरात शास्त्रार्थाचा विशेष उत्तम प्रकारे ध्यानांत यावा, म्हणजे संन्याससह आत्मज्ञान हेंच मुक्तीचे साधन आहे आणि ज्ञानकर्मसमुच्चय अर्थात् केवळ कर्म मुक्तीचें साधन नाहीं असा निश्चयपूर्वक विवेक करण्यासाठी भगवान पुढील दोन श्लोकांत श्रुत्यर्थ सांगत आहेत -
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः । अन्वय : तु यः मानवः - परंतु जो मनुष्य; आत्मरतिः एव च आत्मतृप्तः - आत्म्यामध्येच रमणारा आणि आत्म्यामध्येच तृप्त असणारा; च आत्मनि एव संतुष्टः स्यात् - तसेच आत्म्यामध्येच संतुष्ट असतो; तस्य कार्यं न विद्यते - त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य नसते. ॥ १७ ॥ व्याख्या : यः प्रसिद्धः मानवः मनुष्यः आत्मरतिः आत्मन्येव रतिः प्रीतिर्यस्य सः आत्मरतिः स्यात् । किंच आत्मतृप्तः आत्मन्येव तृप्तः आत्मतृप्तः स्वानंदानुभवेन संतुष्टः स्यात् । चेत्यपरं आत्मन्येव संतुष्टः भोगापेक्षारहितः स्यात् । तस्य पुरुषस्य कार्यं वैदिकं लौकिकं कर्म नि विद्यते कर्त्तव्यं नास्ति ॥ अर्थ : पण याच्या उलट जो मनुष्य सांख्य आत्मज्ञाननिष्ठ आत्मरतिच असतो म्हणजे त्याची रति आत्मामध्येंच असते, जो आत्मस्वरूपांतच तृप्त असतो, जो आत्म्यामध्येंच संतुष्ट असतो त्याला कांहीही शास्त्रविहित कर्तव्य नसते. तो कर्तव्यशून्य असतो. विवरण :
त्याला आणखी एका कारणानें ’कर्तव्य’ नसते -
नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन । अन्वय : तस्य इह कृतेन - त्या महापुरुषाला या विश्वामध्ये कर्म करण्यात; कश्चन अर्थः न - कोणतेही प्रजोजन असत नाही; च सर्वभूतेषु अस्य - तसेच सर्वप्राणीमात्रातसुद्धा याचा; कश्चित् अर्थव्यपाश्रयः न - किंचितही स्वार्थाचा संबंध राहात नाही. ॥ १८ ॥ व्याख्या : कृतेन कर्मणा तस्य आत्मरतेः अर्थः पुण्यं वा प्रयोजनं नैवास्ति । इह लोके अकृतेन अकर्मणा कश्चन कोपि दिषः नास्ति । चेत्यपरं अस्य ब्रह्मनिष्ठस्य कशिचपि अर्थव्यपाश्रयः अर्थस्य व्यपाश्रयः आश्रयः सर्वभूतेषु ब्रह्मादिस्थावरांतेषु नास्ति अर्थे मोक्षे आश्रयणीयोऽस्य नास्ति इत्यर्थः ॥ अर्थ : या लोकी त्याच्या केलेल्या कर्मानें कांही फल नाहींच. त्याचप्रमाणे त्याच्या न केलेल्या कर्मानें कोणत्याही प्रकारचा प्रत्यवाय नाही. आब्रह्मस्तंबपर्यंत जी असंख्य भूतें आहेत त्यांतील, या ज्ञानी पुरुषासाठी, या आत्मवेत्त्यासाठी, एकाद्यासाठींही कांही प्रयोजन कर्मानें साधावयाचें नसते. विवरण :
पण ज्याअर्थीं ज्ञाननिष्ठेच्या अभावी कर्माचें अनुष्ठान अवश्य केलें पाहिजे -
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर । अन्वय : तस्मात् सततं असक्तः - म्हणून निरंतरपणे आसक्तिरहित होऊन; कार्यं कर्म समाचर - तू नीटपणे कर्तव्य कर्म करीत रहा; हि असक्तः कर्म आचरन् - कारण आसक्तिरहित होऊन कर्म करणारा; पुरुषः परं आप्नोति - पुरुष परमात्म्याला प्राप्त करून घेतो. ॥ १९ ॥ व्याख्या : हे अर्जुन ! तस्मात् त्वं असक्तः सन् फलसंगरहितः सन् कार्यं कर्तुं योग्यं आर्यं आवश्यकं सततं निरंतरं कर्म नित्यनैमित्तकं कर्म समाचर यथाशास्त्रं कुरु । हि यस्मात् असक्तः कर्मफलसंगरहितः पुरुषः कर्म वैदिकं कर्म आचरन् सन् आचरतीति आचरन् परं मोक्षं आप्नोति प्राप्नोति ॥ अर्थ : तूं अजून ज्ञाननिष्ठेचा अधिकारी नसल्यामुळे असक्त म्हणजे संगरहित होऊन सतत, सर्वदा कार्य अर्थात् अवश्य कर्तव्य असलेले नित्य कर्म कर. त्याचे उत्तमप्रकारे अनुष्ठान कर. कारण कर्मामध्यें ’मी कर्ता’ इत्यादि प्रकारें आसक्त न होतां कर्मानुष्ठान करणारा म्हणजेच ईश्वरार्थ कर्म करणारा पुरुष मोक्षाला प्राप्त होतो. भावार्थ हा आहे की चित्तशुद्धीच्या द्वारा ज्ञान होऊन परंपरेने त्याला मोक्ष मिळतो. विवरण :
याविषयी शिष्टाचाराचें प्रमाण देतात -
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः । अन्वय : कर्मणा एव - आसक्तिरहित कर्माचणद्वारेच; जनकादयः संसिद्धिं आस्थिताः - जनक इत्यादि ज्ञानीजन सुद्धा परमसिद्धीला प्राप्त झाले होते; हि (तथा) लोकसंग्रहं सम्पश्यन् अपि - म्हणून लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवूनसुद्धा; अत्रुं एव अर्हसि - कर्म करण्यासच तू योग्य आहेस म्ह० तुला कर्म करणे हेच उचित आहे. ॥ २० ॥ व्याख्या : जनकादयः जनकः आदिर्येषां ते जनकादयः जनकधर्मराज प्रभृतयः कर्मणैव शुद्धांतःकरणाः संतः संसिद्धिं श्रवणादिसाध्यां ज्ञाननिष्ठां सिद्धिं आस्थिताः प्राप्ताः । त्वं क्षत्रियोपि लोकसंग्रहं लोकस्य संग्रहः लोकसंग्रहः तं पश्यन् सन् पश्यतीति पश्यन् कर्म कर्तुं अर्हसि योग्यभवसि । हि इति निश्चयेन ॥ अर्थ : जनकादि प्राचीन विद्वान् क्षत्रिय कर्मानेंच मोक्षाला जाण्यास प्रवृत्त झाले. ’पूर्वी अज्ञ असलेल्या, कृतार्थ न झालेल्या जनकादिकांनी जरी कर्म केले असले तरी तेवढ्यावरून ज्ञानी व कृतार्थ झालेल्या माझ्यासारख्यानेंही ते केले पाहिजे, असे म्हणता येत नाही,’ असे तुला वाटत असेल तर तें मी कबूल करतो. पण तूं ज्ञानी आहेस असे जरी मानले तरी तूं आपल्या प्रारब्ध-कर्माधीन आहेस. त्या कर्मानेंच तुला क्षत्रियकुलांत उत्पन्न केले आहे. यास्तव लोकसंग्रहाकडे पाहाणार्या तुला स्वधर्मरूप कर्मच करणें उचित आहे. लोकांच्या स्वाभाविक उन्मार्गवृत्तीचें निवारण करणें याला लोकसंग्रह म्हणतात. तेच आपल्या धर्माचरणाचे फल आहे, असे समजून तुला कर्मच केले पाहिजे. "सर्वे राजाश्रिता धर्मा, राजा धर्मस्य धारकः" म्हणजे सर्व धर्म राजाच्या आश्रयानें राहणारे आहेत. राजा धर्माचे धारण करणारा आहे, असे स्मृतिवचन आहे. त्यावरून क्षत्रिय वर्णाश्रम धर्मप्रवर्तक आहे हे सिद्ध होते. म्हणून तुला स्वध्र्मरूप कर्म केले पाहिजे. विवरण :
लोकसंग्रह करण्यास कोण योग्य आहे व तो कसा, ते सांगतात -
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । अन्वय : श्रेष्ठः यत् यत् आचरति - श्रेष्ठ जे जे आचरण करतो - इतरः जनः तत् तत् एव - अन्य पुरुषसुद्धा त्या त्या प्रमाणे आचरण करतात् - सः यत् प्रमाणं कुरुते - तो ज्या गोष्टी प्रमाण म्हणून मान्य करतो; लोकः तत् अनुवर्तते - सर्व मनुष्यसमुदाय त्यालाच अनुसरून वागू लागतो. ॥ २१ ॥ व्याख्या : श्रेष्ठः श्रेष्ठजनः यत् यत् शुभं अशुभं वा कर्म आचरति करोति तत तत् एव इतरः प्राकृतः जनः लोकः शुभं अशुभं कर्म कुरुते । सः श्रेष्ठजनः यत् लौकिकं वैदिकं च कर्म प्रमाणं कुरुते प्रमाणत्वेन मन्यते तत् कर्म लोकः प्राकृतजनः अनुमन्यते प्रामाणत्वेन मन्यते ॥ अर्थ : श्रेष्ठ जे जे विहित किंवा निषिद्ध कर्म करतात, तेच इतर प्राकृत जनही आचरतात. यास्तव विद्वानानें लोकमर्यादा राखण्यासाठी विहित कर्म करावे. सामान्य लोक आचरणांत श्रेष्ठांचे अनुकरण करतात. एखादी गोष्ट प्रमाण किंवा अप्रमाण मानावयाची झाली तरी ते त्या प्रसंगी श्रेष्ठांचेच अनुकरण करतात. विवरण :
लोकसंग्रहाच्या कर्तव्यतेविषयीं तुला जर कांही संदेह असला तर तूं मलाच कां पहात नाहींस ?
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन । अन्वय : पार्थ, त्रिषु लोकेषु - हे अर्जुना, तिन्ही लोकांत; मे किञ्चन कर्तव्यं न अस्ति - मला कोणतेही कर्तव्य नाही; च अवाप्तव्यं अनवाप्तं न - तसेच प्राप्त करून घ्यावयाचे असे काही नाही वा प्राप्त झालेले नाही असेही काही नाही; तथापि कर्मणि एव वर्ते - तरीसुद्धा मी कर्मांचे आचरण करीतच असतो. ॥ २२ ॥ व्याख्या : हे पार्थ ! मे मम परमेश्वरस्य त्रिषु लोकेषु किंचन किमपि कर्त्तव्यं कर्तुं योग्यं कर्त्तव्यं कर्म नास्ति । किं च मम परमेश्वरस्य त्रिषु लोकेषु अनवाप्तं अप्राप्यं नास्ति । चेत्यपरं अवाप्तव्यं आप्तुं प्राप्तुं योग्यं अवाप्तव्यं प्राप्त्व्यं नास्ति तथापि एवं सत्यपि अहं कर्मणि वेदप्रतिपादिते कर्मणि वर्त्त एव कर्म करोमि ॥ अर्थ : मला या त्रिभुवनांत ’कर्तव्य’ असे कांहीच नाही. मला अमुक एक मिळालेले नाही जे मला मिळवावयाचे आहे, असेही नाही. तरीही मी कर्म करतोच. विवरण :
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । अन्वय : पार्थ, हि यदि जातु - हे पार्थ, कारण जर कदाचित - अहं अतन्द्रितः कर्मणि न वर्तेयम् - मी सावध दाहून कर्मे केली नाहीत तर मोठी हानी होईल कारण; मनुष्याः सर्वशः - माणसे नेहमी सर्व प्रकारे; मम वर्त्म अनुवर्तन्ते - माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. ॥ २३ ॥ व्याख्या : हे पार्थ ! यदि पुनः अहं अतंद्रितः सन् तंद्रा निद्रा संजाता यस्य सः तंद्रितः तंद्रितः न भवतीति अतंद्रितः अंनलसः सन् कर्मणि वेदोक्त कर्मणि जातु कदाचिदपि न वर्तेयं नानुतिष्ठेयम् । मनुष्याः कर्माधिकारिणः मम श्रेष्ठस्य वर्त्म मार्गं सर्वशः सर्वप्रकारैः अनुवर्तते अनुवर्तेरन् ॥ अर्थ : मी आळस सोडून स्वीकारलेल्या वर्णाश्रमाप्रमाणे धर्माचरण न केले, तर इतर लोकही माझेंच सर्व प्रकारे अनुसरण करतील. कारण मी श्रेष्ठ आहे. यादवांमध्ये मी प्रधान पुरुष आहे. यास्तव मला धर्माचा कांही उपयोग जरी नसला तरी माझ्या अनुयायी जनांनी धर्माचरण करावे म्हणून मलाही ते करावे लागते. विवरण :
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् । अन्वय : (अतः) चेत् अहं कर्म न कुर्याम् - म्हणून जर मी कर्मे केली नाहीत तर; इमे लोकाः उत्सीदेयुः - ही सर्व माणसे नष्ट-भ्रष्ट होऊन जातील; च सङ्करस्य कर्ता स्याम् - आणि मी संकराचा कर्ता होईन; (तथा) इमाः प्रजाः उपहन्याम् - तसेच या सर्व प्रजांचा मी घात करणारा होईन. ॥ २४ ॥ व्याख्या : हे पार्थ ! अहं ईश्वरः कर्म वेदप्रतिपादितं कर्म न मुर्यां चेत् तर्हि इमे सर्वे लोकाः उत्सीदेयुः कर्मलोपेन भ्रश्येयुः । भ्रष्टाः भविष्यंतीति भावः । चेत्यपरं अहं संकरस्य वर्णसंकरस्य कर्ता करोतीति कर्ता स्यां भविष्यामि । अहमेव इमाः प्रजाः उपहन्यां मलिनीकुर्याम् ॥ अर्थ : जर मी विहित कर्म न करीन तर हे सर्व लोक नाश पावतील. मी वर्णसंकराचा कर्ता - निमित्त होईन आणि जणुंकाय या सर्व लोकांचा घातच करीन; म्हणजे मज ईश्वराला अनुरूप नसलेली गोष्ट घडेल. विवरण :
पण मजप्रमाणेंच तूं किंवा दुसराही जो कोणी कृतार्त्जबुद्धि आत्मज्ञ असेल त्यालाही परानुग्रह करणेंच उचित आहे. त्यानेंही दुसर्यावर अनुग्रह करण्यासाठी कर्मानुष्ठान करावें, असें म्हणतात -
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत । अन्वय : भारत, कर्माणि सक्ताः अविद्वांसः - हे भारता, कर्मांमध्ये आसक्त असणारे अज्ञानी लोक; यथा (कर्म) कुर्वन्ति - ज्याप्रमाणे कर्मे करतात; तथा असक्तः विद्वान् - त्याचप्रमाणे आसक्तिरहित अशा विद्वानाने सुद्धा; लोकसंग्रहं चिकीर्षुः (कर्म) कुर्यात् - लोकसंग्रह करण्याच्या हेतूने कर्मे करावीत. ॥ २५ ॥ व्याख्या : हे भारत ! हे अर्जुन ! यथा अविद्वांसः अज्ञानिनः कर्मणि वेदप्रतिपादिते कर्मणि सक्ताः संतः कर्तृत्वाभिमानेन अभिनिविष्टाः संतः कर्म कुर्वंति तथा विद्वान् ज्ञानी कर्मणि वेदप्रतिपादिते असक्तः सन् कर्तृत्वाभिमानरहितः सन् कर्म करोति । कथंभूतः विद्वान् । लोकसंग्रहं चिकीर्षुः कर्तुमिच्छतीति चिकीर्षुः ॥ अर्थ : हे अर्जुना ! या कर्माचा मी कर्ता आहे, मला याचे फल अवश्य मिळेल, अशा अभिमानानें कर्मामध्ये आसक्त झालेले अविद्वान् - आत्मज्ञानशून्य लोक - जसे कर्म करण्याची इच्छा करणार्या विद्वानानें आसक्त न राहून मी याचा कर्ता व भोक्ता असा अभिनिवेश न करतां कर्म करावें. विवरण :
या प्रमाणें लोकसंग्रह करण्याची इच्छा करणार्या मला किंवा दुसर्या कोणा आत्मवेत्त्याला लोकसंग्रह कांही कर्तव्य नसते. म्हणून त्याला असा उपदेश केला जातो -
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् । अन्वय : युक्तः विद्वान् - परमात्म्याच्या स्वरूपात अढळपणे स्थित असणार्या ज्ञानी पुरुषाने; अज्ञानां कर्मसङ्गिनाम् - शास्त्रविहित कर्मांमध्ये आसक्ति असणार्या अज्ञानी पुरुषांचा; बुद्धिभेदं न जनयेत् - बुद्धिभ्रम म्ह० कर्मामध्ये अश्रद्धा उत्पन्न करू नये; सर्व कर्माणि समाचरन् जोषयेत् - उलट स्वतःच नीटपणे शास्त्रविहित सर्व कर्मे आचरण करीत तशीच त्यांच्याकडूनही कर्मे करवून घ्यावीत. ॥ २६ ॥ व्याख्या : विद्वान् ज्ञानवान् अज्ञानां अविवेकिनां अत एव कर्मसंगिनां कर्मसु संगो येषां ते कर्मसंगिनः तेषां कर्मासक्तानां बुद्धिभेदं बुद्धेः भेदः बुद्धिभेदः तं बुद्धिभेदं बुद्धिचालनं न जनयेत् अकर्तात्मोपदेशेन न कुर्यात् । किं तु विद्वान् युक्तः सन् स्वस्थः सन् कर्माणि समाचरन् सन् सम्यक् यथाशास्त्रं आचरतीति समाचरन् तेषां अज्ञानिनां श्राधां भक्तिं उत्पाद्य जोषयेत् प्रीत्या सेवयेत् ॥ अर्थ : कर्मामध्यें आसक्त असलेल्या अविवेकी लोकांच्या निश्चित बुद्धीचा भेद करूं नये. त्यांची श्रद्धा कमी होईल असें करूं नये. तर विद्वानानें स्वतः तेच अविद्वानांचे कर्म शांत चित्तानें करून त्यांच्याकडूनही सर्व कर्में करवावी. विवरण :
अविद्वान् अज्ञ पुरुष कर्मामध्ये कसा आसक्त होतो, ते सांगतात -
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः । अन्वय : सर्वशः कर्माणि - खरे पाहता सर्व कर्मे सर्व प्रकारांनी; प्रकृतेः गुणैः क्रियमाणानि - प्रकृतीच्या गुणांचे द्वारा केली जातात; (तथापि) अहंकारविमूढात्मा - तरीसुद्धा अहंकारामुळे ज्याचे अंतःकरण मोहित झाले आहे असा अज्ञानी पुरुष; अहं कर्ता इति मन्यते - मीच कर्ता आहे असे मानतो. ॥ २७ ॥ व्याख्या : अज्ञानी पुरुषः कर्माणि लौकिक वैदिकानि कर्माणि सर्वशः सर्वप्रकारेणे ’अहं कर्ता अहं करोमि’ इति एवंप्रकारेण मन्यते । कथंभूतः पुरुषः । अहंकारविमूढात्मा अहंकारेण देहेंद्रियादिषु आत्माध्यासेन विमूढः आत्मा बुद्धिर्यस्य सः । कथंभूतानि कर्माणि । प्रक्रृतेः सत्वरजस्तमोगुणमय्याः मायायाः गुणैः कार्यकारणरूपैः विकारैः क्रियमाणानि क्रियंते तानि क्रियमाणानि ॥ अर्थ : प्रकृतीच्या शरीर-इंद्रियरूप विकारांकडून सर्व लौकिक व शास्त्रीय कर्में केली जातात. पण ’शरीरेद्रिय संघातच मी’ या अहंकाराने ज्याचे चित्त ऊढ झाले आहे तो ’त्या त्या कर्मांचा मी कर्ता आहे’ असे मानतो. विवरण :
पण विद्वान कसा आसक्त होत नाही, ते दाखवितात -
तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः । अन्वय : तु महाबाहो - परंतु हे महाबाहो; तत्त्ववित् गुणकर्मविभागयोः - तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे; गुणाः गुणेषु वर्तन्ते - सर्व गुण हेच गुणांमध्ये वावरतात; इति मत्वा न सज्जते - असे जाणून त्यामध्ये अडकत नाही. ॥ २८ ॥ व्याख्या : हे महाबाहो ! हे विवेकिन् ! तत्त्ववित् तत्त्वं याथात्म्यं वेत्ति जानातीति तत्त्ववित् ज्ञानी गुणकर्मविभागयोः गुणाश्च देहेंद्रियांतःकरणानि कर्माणि च देहेंद्रियव्यापारभूतकर्माणि गुणकर्माणि गुणकर्मणां समाहारः गुणकर्म विभज्यत इति विभागः विभज्यते सर्वेषां विकाराणां प्रकाशत्वेन पृथक्भवतीति विभागः स्वप्रकाशज्ञानरूपः आत्मा गुणकर्म च विभागश्च गुणकर्मविभागौ तयोः यः तत्त्वं याथात्म्यं वेत्ति जानाति स तु ज्ञानसंपन्नस्तु न सज्जते कर्तृत्वाभिनिवेशं न करोति । किं कृत्वा । गुणाः इंद्रियाणि गुणेषु विषयेषु वर्तंते नाहमिति मत्वा ॥ अर्थ : मी शरीरेंद्रियसंघातरूप नाहीं, हा गुणांहून आत्म्याचा विभाग आहे व कर्में माझी नव्हेत, हा कर्मांहून आत्म्याचा विभाग आहे. या दोन विभागांचे तत्त्व यथार्थस्वरूप जाणणारा म्हणजे गुण व कर्में यांहून आत्मा अगदी निराळा आहे, असें साक्षात् जाणणारा तत्त्ववेत्ता अहंकार-विमूढात्माही होत नाही व इंद्रियरूप गुण विषयरूप गुणांमध्यें प्रवृत्त होतात, आत्मा प्रवृत्त होत नाही, असें मानून आसक्तही होत नाहीं. विवरण :
या प्रमाणे विद्वान् व अविद्वान् यांचे स्वरूप सांगून विद्वानानें अविद्वानाचा बुद्धिभेद करूं नये, असा उपसंहार करतात -
प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । अन्वय : प्रकृतेः गुणसम्मूढाः - प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मूढ झालेली माणसे; गुणकर्मसु सज्जन्ते - गुणांमध्ये आणि कर्मांमध्ये आसक्त होतात; अकृत्स्नविदः मन्दान् - पूर्णपणे न जाणणार्या मंदबुद्धी अज्ञानी अशा; तान् कृस्त्नवित् न विचालयेत् - त्या माणसांना संपुर्णपणे जाणणर्या ज्ञा नी पुरुषाने विचलित करू नये. ॥ २९ ॥ व्याख्या : ये पुरुषाः प्रकृतेः पूर्वोक्तायाः मायायाः गुणसंमूढाः संतः गुणैः देहादिविकारैः सम्यक् उत्तमप्रकारेणे मूढाः मंदाः गुणसंमूढाः स्वरूपाज्ञानेन देहात्मत्वेन मन्यमानाः संतः गुणकर्मसु गुणानां देहेंद्रियांतःकरणानां कर्माणि इंद्रियव्यापाराः गुणकर्मणि तेषु सज्जंते सक्ताः भवंति । कृत्स्नवित् कृत्स्नं सर्वं वेत्ति जानातीति कृत्स्नवित् सर्वज्ञः तान कर्मसंगिनः न विचालयेत् कर्मश्रद्धायाः न च्यावयेत् । कथंभूतान् तान् । अकृत्स्नविदः अकृत्स्नं अनात्मानं विदंति ते अकृत्स्नविदः देहात्मवादिनः । पुनः कथंभूतान् तान् । मंदान् मंदमतीन् ॥ अर्थ : देहादिकांनाच आत्मा समजणारे अज्ञ त्याच शरीरेंद्रियांच्या व्यापारांत आसक्त होतात - म्हणजे ते व्यापार माझेच आहेत असे मानतात. आत्मज्ञाने त्या अनात्मज्ञांचा स्वतः बुद्धिभेद करूं नये. कारण तसे केल्यास त्यांची कर्मांवरील श्रद्धाच उडून ते नास्तिक बनतील व पुरुषार्थापासून भ्रंश पावतील. त्यापेक्षां ते श्रद्धेनें कर्मेंच करीत राहिल्यास कांही दिवसांनी त्यांनाच यातायातीला कंटाळा येऊन ते आपोआप जिज्ञासु होतील. विवरण :
पण कर्मामध्यें अधिकृत असलेल्या अज्ञ मुमुक्षुनें कर्म कसें करावें, ते सांगतात -
मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा । अन्वय : अध्यात्मचेतसा सर्वाणि कर्माणि - अंतर्यामी परमात्मा अशा माझ्या ठिकाणी गुंतलेल्या चित्ताच्या द्वारा सर्व कर्मे; मयि संन्यस्य - मला अर्पण करून; निराशी निर्ममः - आशारहित, ममतारहित; च विगतज्वरः भूत्वा युद्ध्यस्व - आणि संतापरहित होऊन तू युद्ध कर. ॥ ३० ॥ व्याख्या : हे पार्थ ! त्वं सर्वाणि लौकिकानि वैदिकानि च कर्माणि मयि परमेश्वरे वासुदेवे अध्यात्मदेतसा अध्यात्मं अंतर्यामिरूपं च तत् चेतश्च अध्यात्मचेतः तेन अध्यात्मचेतसा अहं कर्ता अंतर्याम्यधीनः तस्मै परमेश्वराय ’कर्माणि करोमि’ इति अनया बुद्ध्या संन्यस्य समर्प्य निर्मम निर्गतं मम ममत्वं यस्य सः निर्ममः देहपुत्रभ्रात्रादिषु ममताशून्यं भूत्वा बुद्ध्यस्व विहितानि कर्माणि कुतु । कतंभूतः त्वम् । निराशीः निष्कामः । पुनः कथंभूतः त्वम् । विगतज्वरः विगतः ज्वरो यस्य सः विगतज्वरः दुर्यशो नरकपातादि निमित्तशोकरहितः ॥
अर्थ : नित्य-नैमित्तिकादि सर्व कर्मे विवेकबुद्धीने मी कर्ता अंतर्यामीसाठी चाकराप्रमाणे ही करीत आहे अशा भावनेने माझ्या ठिकाणी मज सर्वज्ञ परमेश्वराचे ठिकाणीं टाकून - मला अर्पण करून त्याचप्रमाणें फलशारहित व देह पुत्रादिकांविषयींच्या ममतेनें रहित होऊन - आशारहित व ममतारहित होऊन शोकरहित होऊन युद्ध कर. विवरण :
या कर्म करणार्या मुमुक्षूला क्रममुक्ति हें फल मिळते, असे सांगतात -
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः । अन्वय : ये मानवाः अनसूयन्तः - जे कोणी मानव दोषदृष्टीने रहित; च श्रद्धावन्तः - आणि श्रद्धायुक्त होऊन; मे इतं मतम् - या माझ्या मताचे; नित्यं अनुतिष्ठन्ति - नेहमी अनुसरण करतात; ते कर्मभिः मुच्यन्ते - तेसुद्धा सर्व कर्मांतून सुटून जातात. ॥ ३१ ॥ व्याख्या : ये प्रसिद्धाः मानवाः मनोः अपत्यानि पुमांसः मानवाः मनुष्याः मम परमेश्वरस्य इदं फलाभिसंधिराहित्येन विहितकर्माचरणरूपं मतं अनु अनुलक्षेण तिष्ठंति तेपि पुरुषाः अपि सत्त्वशुद्धिज्ञानद्वारेण कर्मभिः धर्म-अधर्माख्यैः मुच्यंते मुक्ताः भवंति । कथंभूताः मानवाः । श्रद्धावंतः श्रद्धा विद्यते येषां ते श्रद्धावंतः । पुनः कथंभूताः मानवाः । अनसूयंतः दुःखात्मके कर्मणि प्रवर्तौअति इति दोषदृष्टिं अकुर्वंतः । कथंभूतं मतम् । नित्यं वेदबोधितत्वेन परंपरागतम् ॥ अर्थ : जे जे श्रद्धाळू व असूया न करणारे मनुष्य माझें हे मत नित्य अनुष्ठितात - माझ्या सांगण्याप्रमाणे आचरण करतात - ते सुद्धां पाप-पुण्यांकडून मुक्त केले जातात. येथील ’अपि’ या शब्दानें त्यांची मुक्ति मुख्य नव्हे, क्रममुक्ति आहे असे सुचविले आहे. किंवा या माझ्या मताचें अनुवर्तन करणारे चित्तशुद्धि, ज्ञानप्राप्ति यांच्या क्रमाने मुक्त होतात असे समजावे. धर्माच्या सामर्थ्यानें मरणोत्तर ब्रह्मलोकीं जाणें, कल्प संपेपर्यंत तेथेंच राहणे व कल्पाच्या शेवटीं तेथील हिरण्यगर्भासह परमात्मरूपी मिळून जाणें, ही क्रममुक्ति व याचे देहांत आत्मसाक्षात्कारानें जीवन्मुक्त होऊन शरीर मरतांच परमात्मरूप होणें ही सद्योमुक्ति होय. विवरण :
पण या भगवद् वचनाचे अनुवर्तन न करणार्या मूढांना प्रत्यवाय लागतो असे सांगतात -
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् । अन्वय : तु ये अभ्यसूयन्तः - परंतु जे मानव माझ्यावर दोषारोपण करीत; मे एतत् मतं न अनुतिष्ठन्ति - माझ्या या मताला अनुसरून आचरण करीत नाहीत; तान् सर्वज्ञानविमूढान् - त्या संपूर्ण ज्ञानाचे बाबतीत मोहित झालेल्या अशा; अचेतसः नष्टान् विद्धि - मूर्खांना नष्ट झालेले असेच समज. ॥ ३२ ॥ व्याख्या : ये तु पुरुषास्तु मे मम एतत् धर्मयुक्तं मतं ’ईश्वरार्थं कर्म कर्तव्यं’ इति अनुशासनं अभ्यसूयंतः संतः द्विषंतः संतः नानुतिष्ठंति । हे पार्थ ! त्वं तान् पुरुषान् सर्वज्ञानविमूढान् सर्वस्मिन् ब्रह्मविषये कर्मणि ज्ञानं सर्वज्ञानं सर्वज्ञाने विमूढाः सर्वज्ञानविमूढाः तान् सर्वपुरुषार्थभ्रष्टान् विद्धि जानीहि । कथंभूतान् तान् । नष्टान् दुष्टचित्तन् । पुनः कथंभूतान् तान् । अचेतसः विवेकशून्यान् ॥ अर्थ : पण या माझ्या मतामध्यें दोषदृष्टि ठेवणारे जे कोणी त्याचे अनुवर्तन करीत नाहींत - त्याप्रमाणे आचरण करीत नाहींत - ते सर्व सगुण-निर्गुणविषयक ज्ञानामध्यें नानाप्रकारें मूढ व नष्ट झाले आहेत, असे तूं समज. विवरण :
पण ते तुझ्या उपदेशाप्रमाणें कां बरें वागत नाहींत ? स्वधर्माचा त्याग करून परधर्माचें अनुष्ठान करीत असतांना त्यांना तुझ्या आज्ञाभंगाची भीति कशी वाटत नाहीं ? उत्तर -
सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि । अन्वय : भूतानि प्रकृतिं यान्ति - सर्वच प्राणी प्रकृतीप्रत जातात म्हणजे आपल्या स्वभावाला परवश होऊन कर्मे करतात; ज्ञानवान् अपि - ज्ञानी माणूससुद्धा; स्वस्याः प्रकृतेः सदृशं चेष्टते - आपल्या प्रकृतीला अनुसरून क्रिया करीत राहतो; निग्रहः किं करिष्यति - मग अशा स्थितीत स्वभावापुढे हट्ट काय करणार. ॥ ३३ ॥ व्याख्या : ज्ञानवानपि ज्ञानं विद्यते यस्य सः ज्ञानवान् स्वस्याः स्वकीयायाः प्रकृतेः प्राचीनकर्माधीनस्वभावस्य सदृशं अनुरूपमेव गुणदोषं चेष्टते चेष्टां करोति । भूतानि सर्वेपि प्राणिनः प्रकृतिं प्राचीनकर्मस्वभावं यांति अनुवर्तते । एवं सति निग्रहः इंद्रियनिग्रहः मम वा राज्ञः निग्रहः किं करिष्यति ? । पापात् निवारयितुं न शक्नोति । महानरक साधनं ज्ञात्वापि दुर्वासनाप्राबल्यात् पापेषु प्रवर्तते ॥ अर्थ : पूर्वजन्मी आचरलेला धर्म व अधर्म, संपादन केलेलें ज्ञान, मनांत दृढ धरलेली इच्छा, यांचा संस्कार मरणानंतर पुनः शरीर घेईपर्यंत जरी अगदी सूक्ष्म अवस्थेंत रहात असला तरी तो या जन्माच्या अगदीं आरंभीं अभिव्यक्त होतो. तीच प्राण्याची प्रकृति होय. तिचें उल्लंघन ज्ञानी पुरुषालाही करतां येत नाही, मग अज्ञाला करतां येणार नाहीं, हें काय सांगावे ? अर्थात् ज्ञानी व अज्ञ असे सर्व प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे आपापल्या स्वभावावर जातात. त्यांची इच्छा जरी नसली तरी ते प्रकृतीप्रमाणें व्यवहार करतात. तेव्हां माझा किंवा दुसर्या कोणा राजादिकांचा निग्रह - ’असें करूं नका’ असा निषेध काय करणार ? कोणी कितीही निग्रह केला तरी त्याचा कांही उपयोग होत नाही. विवरण :
सर्वच प्राणी आपल्या प्रकृतीप्रमाणें यवहार करतो, प्रकृतिशून्य कोणीच नाही, असें जत म्हटले तर पुरुषाच्या प्रयत्नाला अवकाश रहात नाही. तेव्हां ’अमुक कर व अमुक करूं नकोस’ असे सांगणारे विधि-निषेधशास्त्र व्यर्थ नाही कां होत ? उत्तर -
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ । अन्वय : इन्द्रियस्य इन्द्रियस्य अर्थे - इंद्रिय-इंद्रियांच्या, अर्थात् प्रत्येक इंद्रियाच्या विषयांमध्ये; रागद्वेषौ व्यवस्थितौ - राग आणि द्वेष लपून राहिलेले असतात; तयोः वशं (मनुष्यः) न आगच्छेत् -मनुष्याने त्या दोघांच्या तावडीत सापडूं नये; हि तौ अस्य परिपन्थिनौ - कारण ते दोघेही या माणसाचे कल्याणमार्गात विघ्न करणारे महान् शत्रू आहेत. ॥ ३४ ॥ व्याख्या : इंद्रियस्य इंद्रियस्य सर्वेषां इंद्रियाणां अर्थे श्ब्दस्पर्शरूपरसगंधविषये इंद्रियार्थे रागद्वेषौ रागश्च द्वेषश्च रागद्वेषौ अनुकूले रागः प्रतिकूले द्वेषः व्यवस्थितौ अवश्यंभाविनौ स्तः । तथापि एवं सत्यपि मुमुक्षुः तयः रागद्वेषयोः वशं स्वाधीनतां नागच्छेत् न गमनं कुर्यात् । हि यस्मात् अस्य मुमुक्षोः तौ रागद्वेषौ परिपंथिनौ परितः आसमताद्भागे पंथानं मार्गं आवृत्य तिष्ठतः तौ परिपंथिनौ शत्रू कल्याणमार्गस्य विघ्नकर्तारौ स्तः ॥ अर्थ : प्रत्येक इद्रिययाच्या विषयांतील इष्ट विषयाविषयीं प्रीति व अनिष्ट विषयाविषयीं द्वेष अवश्य उत्पन्न होतात. पण शास्त्र क्रमानें क्रमानें त्यांचा निरोध करीत असते. म्हणून त्याला व्यर्थत्व नाही - त्याला व्यर्थ म्हणतां येणार नाही. यास्तव त्या राग-द्वेषांच्या वश होऊं नये. कारण ते मोक्षमार्गामध्यें विघ्न करणारे चोर-वाटमारे आहेत. विवरण :
व्यवहारांत राग व द्वेष यांनीं प्रेरित झालेला पुरुष शास्त्रार्थालाही विपरीत मानतो. म्हणजे तो परधर्मही धर्मच असल्यामुळे आपल्याला अनुष्ठानास योग्य आहे, असें मानतो. पण ते बरोबर नाही असें सांगतात -
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् । अन्वय : स्वनुष्ठितात् परधर्मात् - चांगल्याप्रकारे आचरणात आणलेल्या दुसर्या धर्मापेक्षा; विगुणः स्वधर्मः श्रेयान् - गुणरहित असला तरी स्वतःचा धर्म अति उत्तम आहे; स्वधर्मे निधनं श्रेयः - आपल्या धर्मात् मरणेसुद्धा कल्याणकारक आहे; (च) परधर्मः भयावहः - आणि दुसर्याचा धर्म भय निर्माण करणारा आहे. ॥ ३५ ॥ व्याख्या : स्वधर्मः स्वस्य धर्मः स्वधर्मः विगुणोपि किंचित् अंगहीनोपि परधर्मात् परेषां अन्येषां धर्मः परधर्मः तस्मात् श्रेयात् प्रशस्तः भवेत् । कथंभूतात् परधर्मात् । स्वनुष्ठितात् सर्वांगसंपूर्णत्वात् स्वधर्मे युद्धादौ प्रवर्तमानस्य निधनं मरणं श्रेयः श्रेष्ठं अस्ति । परधर्मः अन्यधर्मः भयावहः भयं नरकं आवहति प्रापयतीति भयावहः अस्ति ॥ अर्थ : परवर्णाचा व पर आश्रमाचा धर्म सर्व सद्गुणांनी युक्त असा जरी आचरता आला तरी त्याहून स्वतःच्या वर्णाला व आश्रमाला विहित असलेला धर्म, त्यंत हिंसा वगैरे कांही दोष जरी असले तरी, आचरणेंच अधिक चांगले होय. स्वधर्माचरण करीत असतांना मरण आलेलेंही पतकरले. पण दुसर्या वर्णाचा व आश्रमाचा धर्म केव्हांही भयावह आहे. स्वध्र्माचा त्याग करून परधर्माचें अनुष्ठान करणार्या पुरुषाला स्वधर्मत्यागाचा दोष अवश्य लागतो. म्हणून स्वधर्माचा त्याग केव्हांही श्रेयस्कर नाही. विवरण :
सर्व अनर्थांचे मूळ ?
अर्जुन उवाच -
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः । अन्वय : वार्ष्णेय अथ अयं पूरुषः अनिच्छन् अपि - हे कृष्णा, तर मग हा पुरुष स्वतःची इच्छा नसताना सुद्धा; बलात् नियोजितः इव - बळजबरीने जणू भाग पाडल्यामुळे; केन प्रयुक्तः पापं चरति - कुणाकडून प्रेरित होऊन पापाचे आचरण करतो. ॥ ३६ ॥ व्याख्या : हे वार्ष्णेय ! वृष्णिवंशे अवतीर्णः वार्ष्णेयः तत्संबुद्धौ हे वार्ष्णेय हे कृष्ण ! अथेत्यनंतरं स्वधर्माचरणानंतरं अयं त्वन्मतानुवर्त्ती पुरुषः पापं अनर्थरूपं पापं कर्तुं अनिच्छन्नपि अनिच्छन् बलादिव बलात्कारेणेव नियोजितः सन् नितरां अतिशयेन योजितः प्रेरितः सन् पापं चरति पापाचरणां करोति । कथंभूतः पुरुषः । केन हेतुना प्रयुक्तः प्रेरितः ॥ अर्थ : जसे राजाकडून प्रेरित झालेला त्याचा भृत्य वागतो तसे कोणाकडून प्रेरणा केला गेलेला हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतांही, जणुंकाय बलात्कारानेंच करावयास लावल्याप्रमाणें, पापाचरण करतो ? विवरण :
सर्व अनर्थांचे मूळ काम आहे असा निश्चय -
श्रीभगवानुवाच -
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः । अन्वय : रजोगुणसमुद्भवः - रजोगुणापासून उत्पन्न झालेला; एषः काम क्रोधः - हा कामच क्रोध आहे; एषः महाशनः - हा पुष्कळ खाणारा म्हणजे भोगांनी कधीही तृप्त न होणारा; (च) महापाप्मा - तसेच महापापी आहे; इह एनं वैरिणं विद्धि - काम हाच खरोखर वैरी आहे असे तू जाण. ॥ ३७ ॥ व्याख्या : हे पार्थ ! एषं कामः विषयाभिलाषः एष एव काम एव क्रोधः भवति एष एव काम केनचित् हेतुना प्रतिहतः सन् कुंठितः सन् क्रोधत्वेन परिणमते परिणामं प्राप्नोति । त्वं एनं कामः इह मोक्षमार्गे वैरिणं शत्रुं विद्धि जानीहि । कथंभूतः कामः । रजोगुणसमुद्भवः रजोगुणात् समुद्भवतीति तथोक्तः । पुनः कथंभूतः कामः । महाशनः महत् अशनं विषयग्रहणं यस्य सः दुःपूरः । पुनः कथंभूतः कामः । महापाप्मा महत् पापं यस्मात् सः अत्युग्रः ॥ अर्थ : पुरुषाला पापांत प्रवृत्त करणारा हा काम आहे. हाच क्रोध आहे. तो काम रजोगुणापासून उत्पन्न होतो. मोठा खादाड आहे. म्हणूनच तो महापापी आहे. या संसारांत या कामाला वैरी समज. विवरण :
वैरी स्वरूप कसे आहे ते दृष्टांतांनी स्पष्ट करतात -
धूमेन आव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च । अन्वय : यथा धूमेन वह्निः - ज्या प्रकारे धुराने अग्नी; च मलेन आदर्शः आव्रियते - आणि धुळीने आरसा झाकला जातो; (तथा) यथा उल्बेन गर्भः आवृतः - तसेच ज्याप्रकारे वारेने गर्भ झाकलेला असतो; तथा तेन इदं आवृतम् - त्याप्रकारे त्या कामाचे द्वारा हे ज्ञान झाकले जाते. ॥ ३८ ॥ व्याख्या : यथा वह्निः प्रकाशात्मकः अग्निः धूमेन सहजेन अप्रकाशात्मकेन आव्रियते आच्छाद्यते चेत्यपरं यथा आदर्शः मलेन आगंतुकेन असहजेन व्रियते आच्छाद्यते तथा च गर्भः उल्बेन गर्भवेष्टनचर्मणा आवृत्तः व्याप्तः तथा प्रकारत्रयेणापि तेन कामेन इदं ज्ञानं आवृतं आच्छादितम् ॥ अर्थ : अग्नीच्या बरोबरच उत्पन्न झालेल्या अप्रकाशरूप धूमाकडून प्रकाशरूप अग्नि आच्छादित केला जातो, किंवा ज्याप्रमाणें आरसा मळानें जांकला जातो, किंवा जसा गर्भाच्या वेष्टनानें (उल्बानें) - वारेनें गर्भ आवृत्त, म्हणजे आच्छादित झालेला असतो त्याप्रमाणें त्या कामानें हें आच्छादित केले आहे. विवरण :
’हें’ म्हणजे काय ते सांगतात -
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा । अन्वय : च कौन्तेय - आणि हे अर्जुना; अनलेन दुष्पूरेण - अग्नीप्रमाणे कधीही पूर्ण न होणार्या; (च) एतेन कामरूपेण - आणि या कामरूपी; ज्ञानिनः नित्यवैरिणा - ज्ञानी लोकांच्या नित्य शत्रूच्या द्वारा; ज्ञानं आवृतम् - मनुष्याचे ज्ञान झाकून टाकलेले असते. ॥ ३९ ॥ व्याख्या : हे कौंतेय ! हे अस्मत्कुलोत्पन्न ! एतेन कामेन अंतःकरणे ज्ञानं विविएज्ञानं आवृतं आच्छादितम् । कथंभूतेन कामेन । ज्ञानिनः ज्ञानमस्यास्तीति ज्ञानी तस्य नित्यवैरिणा नित्यं वैरी शत्रुरूपः नित्यवैरी तेने अज्ञपुरुषः विषयभोगकाले कामं मित्रं पश्यन् सन् परिणामकाले दुःखे प्राप्ते सति शत्रुं जानाति । ज्ञानी तु भोगकालेपि शत्रुरूपं जानाति । अनेन कामेन अहं अनर्थे प्रेवेशितः । अतः हेतोः विवेकी दुःखी भवति । पुनः कथंभूतेन एतेन । कामरूपेण काम एव रूपं इच्छातृष्णादि काम एव रूपं स्वरूपं यस्य सः कामरूपः तेन । पुनः कथंभूतेन एतेन । दुःपूरेण दुःखेन कष्टेन पूरितुं पूर्णं कर्तुं अशक्यः दुःपूरः तेन । पुनः कथंभूतेन एतेन । अनलेन न विद्यते अलं प्रर्याप्तिः यस्य सः अनलः तेन अनलेन निरंतरसंतापरूपेण ॥ अर्थ : हे अर्जुना ! ज्ञानी पुरुषाचा नित्यवैरी, ज्याची भरती कधीच होत नाही, ज्याला ’पुरे’ असे कधीच वाटत नाही अशा या इच्छा(काम)रूप शत्रूने ज्ञान आच्छादित केले आहे. विवरण :
पण कोणत्या अधिष्ठानाचा आश्रय करून हा सर्वांचा वैरी होतो ते सांगतात -
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते । अन्वय : इन्द्रियाणि मनः (च) बुद्धिः - इंद्रिये मन आणि बुद्धी हे सर्व; अस्य अधिष्ठानं उच्यते - या कामाचे निवासस्थान म्हटले जातात; एषः एतैः - हा काम या मन, बुद्धि आणि इंद्रिये यांच्या द्वारेच; ज्ञानं आवृत्य - ज्ञानाला झाकून टाकून; देहिनं विमोहयति - जीवात्म्याला मोहित करतो. ॥ ४० ॥ व्याख्या : इंद्रियाणि शब्दस्पर्शरूपरसगंधग्राहकाणि चेत्यपरं मनः संकल्पविकल्पात्मकं च बुद्धिः अध्यवसायात्मिका अस्य कामस्य अधिष्ठानं आश्रयः उच्यते कथ्यते । एषः कामः एतैः इंद्रियादिभिः ज्ञानं विवेकज्ञानं आवृत्य आच्छाद्य देहिनं देहोऽस्यास्तीति देही तं देहिनं देहाभिमानिनं जीवं विमोहयति विशेषेण मोहयुक्तं करोति ॥ अर्थ : इंद्रिये, मन व बुद्धि या कामाचे आश्रयस्थान सांगितले जाते. हा काम या इंद्रियादिकांच्या योगाने ज्ञानाला आच्छादित करून देहाभिमानी आत्म्याला नानाप्रकारें मोहित करतो. विवरण :
तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । अन्वय : तस्मात् भरतर्षभ - म्हणून हे अर्जुना - त्वं आदौ इन्द्रियाणि नियम्य - तू प्रथम इंद्रियांना वश करून घेऊन; ज्ञानविज्ञाननाशनम् - ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणार्या; एनं पाप्मानम् - या महान् पापी अशा कामाला; हि प्रजहि - निश्चितपणे बळ वापरून मारून टाक. ॥ ४१ ॥ व्याख्या : हे भरतर्षभ ! हे महावंशप्रसूत ! त्वं आदौ विमोहात्पूर्वमेव तस्मात् श्रेयःप्राप्तिहेतोः इंद्रियाणि श्रोत्रादीनि मनोबुद्धिरूपाणि नियम्य वशीकृत्य पाप्मानं सर्वपापमूलभूतं एनं कामं वैरिणं प्रजहि घातय त्यजेत्यर्थः । हि इति निश्चयेन । कथंभूतं एनम् । ज्ञानविज्ञाननाशनं ज्ञा शास्त्राचार्योपदेशजं च विज्ञानं निदिध्यासनं ज्ञानविज्ञाने ज्ञानविज्ञाने नाशयतीति ज्ञानविज्ञाननाशनः तम् ॥ अर्थ : हे अर्जुना ! म्हणून तूं अगोदर आपली इंद्रियांचे नियमन करून शास्त्रज्ञान व आत्मसाक्षात्काररूप विज्ञान यांचा नाश करणार्या या पाप्याला सोड. त्याचा परित्याग कर. विवरण :
पण कशाच्या आश्रयाने मुमुक्षूने कामत्याग करावा ते सांगतात -
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः । अन्वय : इन्द्रियाणि पराणि आहुः - इंद्रिये ही स्थूलशरीरापेक्षा पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान् आणि सूक्ष्म आहेत असे म्हणतात; इन्द्रियेभ्यः मनः परम् - इंद्रियांपेक्षा मन हे पर आहे; मनसः तु बुद्धिः परा - मनापेक्षा बुद्धी ही पर आहे; तु यः बुद्धेः परतः सः - आणि जो बुद्धीच्यासुद्धा अत्यंत पलीकडचा तो आत्मा आहे. ॥ ४२ ॥ व्याख्या : बुधाः पंडिताः इंद्रियाणि कर्मेंद्रियेभ्यः ज्ञानेंद्रियाणि पराणि श्रेष्ठानि आहुः वदण्ति । इंद्रियेभ्यः ज्ञानेंद्रियेभ्यः परं श्रेष्ठं मनः संकल्पविकल्पात्मकं आहुः वदंति स्म । मनसः संकल्पविकल्पात्मकात् बुद्धिः निश्चयात्मिका बुद्धिः परा श्रेष्ठा अस्ति । यस्तु आत्मा न बुद्धेः निश्चयात्मिकायाः परतः बुद्धिसाक्षित्वेन अवस्थितः तस्थौ । सः आत्मा बुद्धेः द्रष्टा सर्वेषां इंद्रियाणां साक्षी वर्तते ॥ अर्थ : इंद्रिये, मन, बुद्धि व आत्मा ही उत्तरोत्तर श्रेष्ठ, सूक्ष्म व आंतर आहेत. म्हणजेच बाह्य स्थूल देहाच्या अपेक्षेने श्रोत्रादि पांच इंद्रिये उत्कृष्ट आहेत असे पंडित सांगतात. इंद्रियांहून मन श्रेष्ठ आहे व मनाहून बुद्धि श्रेष्ठ आहे. जो बुद्धीच्याही पलिकडे असलेला साक्षी तोच प्रसिद्ध आत्मा आहे. विवरण :
एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना । अन्वय : एवं बुद्धेः परम् - अशा प्रकारे बुद्धीपेक्षा पर म्ह० सूक्ष्म, बलवान आणि अत्यंत श्रेष्ठ अशा आत्म्याला; बुद्ध्या (च) आत्मना आत्मानं संस्थभ्य - जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला वश करून घेऊन; महाबाहो - हे महाबाहो; कामरूपं दुरासदं शत्रुं जहि - कामरूपी दुर्जय शत्रूला तू ठार कर. ॥ ४३ ॥ व्याख्या : हे महाबाहो ! हे शत्रुमारणसुकर ! त्वं बुद्धेः निश्चयात्मिकायाः एवंभूतः परं परमात्मानं बुद्ध्वा आत्मात्कृत्य आत्मानं मनः आत्मना निश्चयामिकया बुद्ध्या संस्तभ्य स्थितीकृत्य शत्रुं सर्वपुरुषार्थघातकं जहि मारय । कथंभूतं शत्रुम् । कामरूपं काम एव तृष्णा एव रूपं स्वरूपं यस्य सः कामरूपः तं कामरूपम् । पुनः कथंभूत शत्रुम् । दुरासदं दुःखेन कष्टेन स्वधर्मेण यमाराध्य भक्त्या मिक्तिमिता बुधाः । तं कृष्णं परमानंदं तोषयेत्सर्वकर्मभिः ॥
अर्थ : याप्रमाणे बुद्धिच्याही पलिकडे असलेल्या आत्म्याला जाणून व सुसंस्कृत मनानें अन्तःकरणाला त्यामध्ये स्थिर करून या कामरूप अजिंक्य शत्रूला जिंक. विवरण :
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु |