॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ अवधूतगीता ॥

॥ अथ चतुर्थोऽध्यायः - अध्याय चवथा ॥


॥ आत्मासक्ति ॥


श्रीदत्त उवाच -
नावाहनं नैव विसर्जनं वा
     पुष्पाणि पत्राणि कथं भवन्ति ।
ध्यानानि मन्त्राणि कथं भवन्ति
     समासमं चैव शिवार्चनं च ॥ १ ॥

दत्त म्हणाले, आवाहन किंवा विसर्जन जेथे नाही तेथे पत्रे पुष्पे इत्यादि पूजासाहित्य तरी कोठून असणार ? तसेच ध्यान व मंत्र तेथे कोठचे ? तेथे शिवाचे पूजन करणे किंवा न करणे दोन्ही सारखेच. (१)

न केवलं बन्धविबन्धमुक्तो
     न केवलं शुद्धविशुद्धमुक्तः ।
न केवलं योगवियोगमुक्तः
     स वै विमुक्तो गगनोपमोऽहम् ॥ २ ॥

मी केवळ बंध व मोक्ष, मी केवल शुद्धि किंवा विशुद्धि योग किंवा वियोग यांनीच केवळ मी रहित आहे असे नव्हे तर अत्यंत मुक्त व गगनासारखा (परमात्मा तोच) मी आहे. (२)

सञ्जायते सर्वमिदं हि तथ्यं
     सञ्जायते सर्वमिदं वितथ्यम् ।
एवं विकल्पो मम नैव जातः
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ ३ ॥

निरनिराळ्या दृष्टीने पाहिले हे सर्व उत्पन्न होते हे म्हणणे खरे आहे व खोटेही आहे. तथापि हे विकल्प माझे ठिकाणी कधीच नसतात. मी निर्वाण स्वरूपाचा व व्याधिरहित आहे. (३)

न साञ्जनं चैव निरञ्जनं वा
     न चान्तरं वापि निरन्तरं वा ।
अन्तर्विभन्नं न हि मे विभाति
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ ४ ॥

हे सर्व मलिन किंवा निर्मल, सच्छिद्र किंवा भरलेले नाही आतून थोडे तरी भेद युक्त आहे ! असेही माझे प्रत्ययाला येत नाही. तर मी निर्वाण स्वरूप व व्याधिरहित आहे. (४)

अबोधबोधो मम नैव जातो
     बोधस्वरूपं मम नैव जातो ।
निर्बोधबोधं च कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ ५ ॥

अज्ञान किंवा ज्ञान तसेच ज्ञानरूप हे कधी उत्पन्न झाले नाही तेव्हा ज्ञान किंवा अज्ञान हे मी कसे सांगावे कारण मी मोक्षस्वरूप व आनंदपूर्ण आहे. (५)

न धर्मयुक्तो न च पापयुक्तो
     न बन्धयुक्तो न च मोक्षयुक्तः ।
युक्तं त्वयुक्तं न च मे विभाति
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ ६ ॥

मी धर्मवान, बंधमुक्त किंवा मोक्षयुक्तही नाही. युक्तत्व किंवा अयुक्तत्व यापैकी कशाचाही मला प्रत्यय येत नाही. मी मोक्षरूप व आनंदमये आहे. (६)

परापरं वा न च मे कदाचित्
     मध्यस्थभावो हि न चारिमित्रम् ।
हिताहितं चापि कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ ७ ॥

परत्व किंवा अपरत्व (म्ह. श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व) हे धर्म माझे नाहीत. उदासीनपणा किंवा मित्रत्व वा शत्रुत्व हे ही माझे भाव नाहीत. हे हितकर किंवा अहितकर हे मी कसे सांगावे. कारण मी मोक्षरूप वे आनंदमय आहे. (७)

नोपासको नैवमुपास्यरूपं
     न चोपदेशो न च मे क्रिया च ।
संवित्स्वरूपं च कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ ८ ॥

मी कोणाचा उपासक नाही की उपास्य दैवत नाही मला कोणाचा उपदेश व कोणतीच क्रियाही नाही. असे असताना ज्ञानस्वरूपाविषयी काय सांगावे ? मी मोक्षरूप व आनंदमय आहे. (८)

नो व्यापकं व्याप्यमिहास्ति किञ्चित्
     न चालयं वापि निरालयं वा ।
अशून्यशून्यं च कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ ९ ॥

यात व्याप्य किंवा व्यापक, साधार वे निराधार असेही काही नाही. तर मी ते शून्य किंवा अशून्य आहे हे कसे सांगावे ? कारण मी मोक्षरूप व आनंदमय आहे. (९)

न ग्राहको ग्राह्यकमेव किञ्चित्
     न कारणं वा मम नैव कार्यम् ।
अचिन्त्यचिन्त्यं च कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ १० ॥

मी ग्राहक नाही की ग्राह्यही नाही, मी कारण नाही किंवा कार्यही नाही असे असताना त्या अचिन्त्याचे वर्णन कसे करू ? कारण मी मोक्षरूप व आनंदमय आहे. (१०)

न भेदकं वापि न चैव भेद्यं
     न वेदकं वा मम नैव वेद्यम् ।
गतागतं तात कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ ११ ॥

जे तत्त्व कशाचा भेद करीत नाही किंवा ते स्वतः भेद पावत नाही ते कशाचे वेदक किंवा जाणण्यास योग्य नाही. ते गत किंवा अगत आहे हे मी कसे सांगू ? मी मोक्षरूप व आनंदमय आहे. (११)

न चास्ति देहो न च मे विदेहो
     बुद्धिर्मनो मे न हि चेन्द्रियाणि ।
रागो विरागश्च कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ १२ ॥

मला देह नाही मी विदेहीही नाही. बुद्धि, मन, इंद्रिये ही माझी नव्हेत. ते तत्त्व सकामे की निरोगी हे मी कसे सांगावे ? कारण मी मोक्षरूप व आनंदमय आहे. (१२)

उल्लेखमात्रं न हि भिन्नमुच्चै-
     रुल्लेखमात्रं न तिरोहितं वै ।
समासमं मित्र कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ १३ ॥

त्या तत्त्वाचा उल्लेख मात्र करता येतो. पण ते आकृतीने पृथक झालेले नाही. उल्लेख करता येतो पण ते अत्यंत गूढ आहे असेही नाही. ते सम आहे किंवा विषम आहे हे कसे सांगू. मी मोक्षरूप व आनंदमय आहे. (१३)

जितेन्द्रियोऽहं त्वजितेन्द्रियो वा
     न संयमो मे नियमो न जातः ।
जयाजयौ मित्र कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ १४ ॥

मी जितेंद्रिय किंवा अजितेंद्रिय आहे ? कारण इंद्रिय संयम किंवा नियम माझ्या ठिकाणी मुळीच नाहीत. हे मित्रा, जय किंवा अजय हे मी कसे सांगावे. मी मोक्षरूप आनंदमय आहे. (१४)

अमूर्तमूर्तिर्न च मे कदाचि-
     दाद्यन्तमध्यं न च मे कदाचित् ।
बलाबलं मित्र कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ १५ ॥

मी वस्तुतः मूर्त किंवा अमूर्त नाही. मला जन्म, स्थिती व लय नाही. यास्तव हे मित्रा, त्याच्या बलाबलाविषयी काय बोलू? मी मोक्षरूप आनंदमय आहे. (१५)

मृतामृतं वापि विषाविषं च
     सञ्जायते तात न मे कदाचित् ।
अशुद्धशुद्धं च कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ १६ ॥

बाबारे मजपासून मृतत्व किंवा अमृतत्व, विष किंवा अविष यापैकी काहीच उत्पन्न होत नाही. त्याअर्थी शुद्ध किंवा अशुद्ध ते मी कसे सांगू ? मी मोक्षरूप आनंदमय आहे. (१६)

स्वप्नः प्रबोधो न च योगमुद्रा
     नक्तं दिवा वापि न मे कदाचित् ।
अतुर्यतुर्यं च कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ १७ ॥

स्वप्न, जागृति, योगांतील आसनादिमुद्रा दिवस व रात्र याचे की मला कधीच काही नाही तर मग तुरीय किंवा अतुरीय हे मी कसे सांगावे ? कारण मी मोक्षरूप आनंदमय आहे. (१७)

संविद्धि मां सर्वविसर्वमुक्तं
     माया विमाया न च मे कदाचित् ।
सन्ध्यादिकं कर्म कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ १८ ॥

सर्व व प्रत्येक समष्टि व व्यष्टि यानी रहित, कौटिल्य किंवा अकौटिल्य यापैकी मला काही नाही तर मग संध्यादि कर्मे तरी माझी आहेत हे कसे सांगू ? मी मोक्षरूप... आहे. (१८)

संविद्धि मां सर्वसमाधियुक्तं
     संविद्धि मां लक्ष्यविलक्ष्यमुक्तम् ।
योगं वियोगं च कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ १९ ॥

मी सर्व अंगे व उपांगे यासहित संप्रज्ञान व असंप्रज्ञात समाधियुक्त आहे असे जाण. लक्ष्य अलक्ष्य यांनी रहित मी आहे, असेही जाण. योग व योगरहित यापैकी कोणत्या धर्माने ते तत्त्व युक्त ते कसे सांगू मी मोक्ष... आनंदमय आहे. (१९)

मूर्खोऽपि नाहं न च पण्डितोऽहं
     मौनं विमौनं न च मे कदाचित् ।
तर्कं वितर्कं च कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ २० ॥

मी मूर्ख किंवा पंडितही नाही. मौन किंवा बोलकेपणा हे माझे धर्म कधीही नव्हते. तर्क करण्यासारखे किंवा न करण्यासारखे हे मी काय सांगू ? मी मोक्षरूप आनंदमय आहे. (२०)

पिता च माता च कुलं न जाति-
     र्जन्मादि मृत्युर्न च मे कदाचित् ।
स्नेहं विमोहं च कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ २१ ॥

पिता माता, कुल जाति, जन्म मृत्यु इत्यादि माझे कधीही नव्हेत प्रीति व तिचे कारण मोह यापैकी काहीतरी एक आहे हे तरी मी कसे म्हणावे ? कारण मी मोक्षरूप व आनंदमय आहे. (२१)

अस्तं गतो नैव सदोदितोऽहं
     तेजोवितेजो न च मे कदाचित् ।
सन्ध्यादिकं कर्म कथं वदामि
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ २२ ॥

कधीही माझा अस्त नाही, सदोदित उदय पावलेलाच असतो. तेज व निस्तेज माझे धर्म नव्हेत तर संध्यादिक कर्मा विषयी मी काय सांगावे? मी मोक्ष..... आहे. (२२)

असंशयं विद्धि निराकुलं मां
     असंशयं विद्धि निरन्तरं माम् ।
असंशयं विद्धि निरञ्जनं मां
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ २३ ॥

निःसंशय मी व्याकुळ नाही. मी सर्वव्यापी आहे असे तू निःसंशय समज. मी निर्मल आहे हे निःसंशय जाण. कारण मी.. आहे. (२३)

ध्यानानि सर्वाणि परित्यजन्ति
     शुभाशुभं कर्म परित्यजन्ति ।
त्यागामृतं तात पिबन्ति धीराः
     स्वरूपनिर्वाणमनामयोऽहम् ॥ २४ ॥

साधक सर्वही ध्याने, शुभाशुभ कर्मे टाकतात. बाबारे, ते धीर पुरुष संन्यासापासून प्राप्त झालेले अमृत यथेच्छ पितात. सारांश मी मोक्षस्वरूप आनंदमय आहे. (२४)

विन्दति विन्दति न हि न हि यत्र
     छन्दोलक्षणं न हि न हि तत्र ।
समरसमग्नो भावितपूतः
     प्रलपति तत्त्वं परमवधूतः ॥ २५ ॥

जेथे ज्ञान व अज्ञान हे शब्द नाहीत. छंदोलपणाची जेथे गंधही नाही. पण समरसामध्ये मग्न झाल्यामुळे जो अंतर्बाह्य पवित्र झाला आहे तोच परम सिद्ध पुरुष या तत्त्वाविषयी बोलतो. (२५)

इति अवधूतगीतायां स्वरूपनिर्णयो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥

याप्रमाणे ... स्वरूप निर्णय नावाचा चौथा अध्याय पूर्ण झाला.





GO TOP