श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
एकादशः स्कन्धः
चतुर्थोऽध्यायः


रुद्राक्षमाहात्म्यवर्णनम्

नारद उवाच
एवंभूतानुभावोऽयं रुद्राक्षो भवतानघ ।
वर्णितो महतां पूज्यः कारणं तत्र किं वद ॥ १ ॥
श्रीनारायण उवाच
एवमेव पुरा पृष्टो भगवान् गिरिशः प्रभुः ।
षण्मुखेन च रुद्रस्तं यदुवाच शृणुष्व तत् ॥ २ ॥
ईश्वर उवाच
शृणु षण्मुख तत्त्वेन कथयामि समासतः ।
त्रिपुरो नाम दैत्यस्तु पुराऽऽसीत्सर्वदुर्जयः ॥ ३ ॥
जितास्तेन सुराः सर्वे बह्मविष्ण्वादिदेवताः ।
सर्वैस्तु कथिते तस्मिंस्तदाहं त्रिपुरं प्रति ॥ ४ ॥
अचिन्तयं महाशस्त्रमघोराख्यं मनोहरम् ।
सर्वदेवमयं दिव्यं ज्वलन्तं घोररूपि यत् ॥ ५ ॥
त्रिपुरस्य वधार्थाय देवानां तारणाय च ।
सर्वविघ्नोपशमनमघोरास्त्रमचिन्तयम् ॥ ६ ॥
दिव्यवर्षसहस्रं तु चक्षुरुन्मीलितं मया ।
पश्चान्ममाकुलाक्षिभ्यः पतिता जलबिन्दवः ॥ ७ ॥
तत्राश्रुबिन्दुतो जाता महारुद्राक्षवृक्षकाः ।
ममाज्ञया महासेन सर्वेषां हितकाम्यया ॥ ८ ॥
बभूवुस्ते च रुद्राक्षा अष्टत्रिंशत्प्रभेदतः ।
सूर्यनेत्रसमुद्‌भूताः कपिला द्वादश स्मृताः ॥ ९ ॥
सोमनेत्रोत्थिताः श्वेतास्ते षोडशविधाः क्रमात् ।
वह्निनेत्रोद्‍भवाः कृष्णा दश भेदा भवन्ति हि ॥ १० ॥
श्वेतवर्णश्च रुद्राक्षो जातितो ब्राह्म उच्यते ।
क्षात्रो रक्तस्तथा मिश्रो वैश्यः कृष्णस्तु शूद्रकः ॥ ११ ॥
एकवक्त्रः शिवः साक्षाद्ब्रह्महत्यां व्यपोहति ।
द्विवक्त्रो देवदेव्यो स्याद्‌विविधं नाशयेदघम् ॥ १२ ॥
त्रिवक्त्रस्त्वनलः साक्षात्स्त्रीहत्यां दहति क्षणात् ।
चतुर्वक्त्रः स्वयं ब्रह्मा नरहत्यां व्यपोहति ॥ १३ ॥
पञ्चवक्त्रः स्वयं रुद्रः कालाग्निर्नाम नामतः ।
अभक्ष्यभक्षणोद्‌भूतैरगम्यागमनोद्‍भवैः ॥ १४ ॥
मुच्यते सर्वपापैस्तु पञ्चवक्त्रस्य धारणात् ।
षड्वक्त्रः कार्तिकेयस्तु स धार्यो दक्षिणे करे ॥ १५ ॥
ब्रह्महत्यादिभिः पापैर्मुच्यते नात्र संशयः ।
सप्तवक्त्रो महाभागो ह्यनङ्‌गो नाम नामतः ॥ १६ ॥
तद्धारणान्मुच्यते हि स्वर्णस्तेयादिपातकैः ।
अष्टवक्त्रो महासेन साक्षाद्देवो विनायकः ॥ १७ ॥
अन्तकूटं तूलकूटं स्वर्णकूटं तथैव च ।
दुष्टान्वयस्त्रियं वाथ संस्पृशंश्च गुरुस्त्रियम् ॥ १८ ॥
एवमादीनि पापानि हन्ति सर्वाणि धारणात् ।
विघ्नास्तस्य प्रणश्यन्ति याति चान्ते परं पदम् ॥ १९ ॥
भवन्त्येते गुणाः सर्वे ह्यष्टवक्त्रस्य धारणात् ।
नववक्त्रो भैरवस्तु धारयेद्वामबाहुके ॥ २० ॥
भुक्तिमुक्तिप्रदः प्रोक्तो मम तुल्यबलो भवेत् ।
भ्रूणहत्यासहस्राणि ब्रह्महत्याशतानि च ॥ २१ ॥
सद्यः प्रलयमायान्ति नववक्त्रस्य धारणात् ।
दशवक्त्रस्तु देवेशः साक्षाद्देवो जनार्दनः ॥ २२ ॥
ग्रहाश्चैव पिशाचाश्च वेताला ब्रह्मराक्षसाः ।
पन्नगाश्चोपशाम्यन्ति दशवक्त्रस्य धारणात् ॥ २३ ॥
वक्त्रैकादशरुद्राक्षो रुद्रैकादशकं स्मृतम् ।
शिखायां धारयेद्यो वै तस्य पुण्यफलं शृणु ॥ २४ ॥
अश्वमेधसहस्रस्य वाजपेयशतस्य च ।
गवां शतसहस्रस्य सम्यग्दत्तस्य यत्फलम् ॥ २५ ॥
तत्फलं लभते शीघ्रं वक्त्रैकादशधारणात् ।
द्वादशास्यस्य रुद्राक्षस्यैव कर्णे तु धारणात् ॥ २६ ॥
आदित्यास्तोषिता नित्यं द्वादशास्ये व्यवस्थिताः ।
गोभेधे चाश्वमेधे च यत्फलं तदवाप्नुयात् ॥ २७ ॥
शृङ्‌गिणां शस्त्रिणां चैव व्याघ्रादीनां भयं न हि ।
न च व्याधिभयं तस्य नैव चाधिः प्रकीर्तितः ॥ २८ ॥
न च किञ्चिद्‍भयं तस्य न च व्याधिः प्रवर्तते ।
न कुतश्चिद्‍भयं तस्य सुखी चैवेश्वरो भवेत् ॥ २९ ॥
हस्त्यश्वमृगमार्जारसर्पमूषकदर्दुरान् ।
खरांश्च श्वशृगालांश्च हत्वा बहुविधानपि ॥ ३० ॥
मुच्यते नात्र सन्देहो वक्त्रद्वादशधारणात् ।
वक्त्रत्रयोदशो वत्स रुद्राक्षो यदि लभ्यते ॥ ३१ ॥
कार्तिकेयसमो ज्ञेयः सर्वकामार्थसिद्धिदः ।
रसो रसायनं चैव तस्य सर्वं प्रसिद्ध्यति ॥ ३२ ॥
तस्यैव सर्वभोग्यानि नात्र कार्या विचारणा ।
मातरं पितरं चैव भ्रातरं वा निहन्ति यः ॥ ३३ ॥
मुच्यते सर्वपापेभ्यो धारणात्तस्य षण्मुख ।
चतुर्दशास्यो रुद्राक्षो यदि लभ्येत पुत्रक ॥ ३४ ॥
धारयेत्सततं मूर्ध्नि तस्य पिण्डः शिवस्य तु ।
किं मुने बहुनोक्तेन वर्णनेन पुनः पुनः ॥ ३५ ॥
पूज्यते सन्ततं देवैः प्राप्यते च परा गतिः ।
रुद्राक्ष एकः शिरसा धार्यो भक्त्या द्विजोत्तमैः ॥ ३६ ॥
षड्‌विंशद्‌भिः शिरोमाला पञ्चाशद्‌धृदयेन तु ।
कलाक्षैर्बाहुवलये अर्काक्षैर्मणिबन्धनम् ॥ ३७ ॥
अष्टोत्तरशतैर्माला पञ्चाशद्‌भिः षडानन ।
अथवा सप्तविंशत्या कृत्वा रुद्राक्षमालिकाम् ॥ ३८ ॥
धारणाद्वा जपाद्वापि ह्यनन्तं फलमश्नुते ।
अष्टोत्तरशतैर्माला रुद्राक्षैर्धार्यते यदि ॥ ३९ ॥
क्षणे क्षणेऽश्वमेधस्य फलं प्राप्नोति षण्मुख ।
त्रिःसप्तकुलमुद्धृत्य शिवलोके महीयते ॥ ४० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां एकादशस्कन्धे रुद्राक्षमाहाम्यवर्णनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥


रुद्राक्षाचे प्रकार

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारद म्हणाले, ''हे मुने, रुद्राक्ष महात्म्यांना पूज्य होण्याचे कारण काय ?''

नारायण मुनी म्हणाले, ''पूर्वी षडाननाने शंकरास हाच प्रश्न केला होता. तेव्हा भगवान ईश्वर म्हणाले, '' हे षण्मुखा, तुला थोडक्यात गोष्ट सांगतो. पूर्वी त्रिपुर दैत्य अजिंक्य झाला. त्याने सर्व देवांचा पराभव केला. सर्व देवांनी ही वार्ता मला सांगितल्यावर मी त्रिपुरासाठी अमोघ अस्त्र शोधून काढले. ते देवमय, तेजस्वी, झळकणारे घोर अस्त्र होते. त्यासाठी मी देवांचे हजार वर्षे डोळे मिटून चिंतन केले. तेव्हा माझ्या व्याकुळ नेत्रातून जलाचे थेंब पडले. त्या अश्रुतून रुद्राक्षाचा महावृक्ष झाला. ते अडतीस प्रकारचे होते. सूर्याच्या नेत्रापासून विविधवर्णी बारा, चंद्राच्या नेत्रातून श्वेतवर्णी सोळा, अग्नीच्या नेत्रापासून दहा प्रकारचे काळे असे रुद्राक्ष झाले. श्वेतवर्णी रुद्राक्ष ब्राह्मण, लालवर्णी क्षत्रिय, मिश्रवर्णी वैश्य, काळा शूद्र जातीचा असतो. एक मुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष शिव आहे. त्यामुळे ब्रह्महत्येचेही पातक नष्ट होते. द्विमुखी देव व देवीसंज्ञक असून दोन प्रकारच्या पातकांचा नाश करतो. त्रिमुखी अग्नीस्वरूप असून स्त्रीहत्येच्या पापापासून मुक्त करतो. चतुर्मुखी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाप्रमाणे असून नरहत्येचा नाशक आहे. पंचमुखी हा स्वतःच रुद्र आहे. त्याला कालाग्नी म्हणतात. अभक्ष भक्षण, अगम्य स्त्रीशी गमन इत्यादी पातके नष्ट करतो व शेवटी प्राणी मुक्त होतो. सहामुखांचा रुद्राक्ष कार्तिकेय असतो. तो उजव्या हातात धारण केल्यास ब्रह्महत्येसारखी सर्व पापे नष्ट होतात. अनंग नावाचा सप्तमुखी रुद्राक्ष सर्वश्रेष्ठ होय. त्यामुळे सुवर्णचोरी इत्यादि पातके नाहीशी होतात.

अष्टमुखी रुद्राक्ष हा प्रत्यक्ष विनायक आहे. अन्न, कापूस, सुवर्ण, अगम्य गमन वगैरे सर्व पातके नाहीशी करतो. तसेच त्यामुळे विघ्ने नाहीशी होतात. मरणोत्तर उत्तम पदाची प्राप्ती होते. अष्टवक्र रुद्राच्या ठिकाणी हे सर्व गुण आढळतात. नऊ मुखी भैरव रुद्राक्ष डाव्या बाहूत धारण करावा. तो माझ्याप्रमाणे समर्थ होतो. हजारो भ्रूणहत्या, शेकडो ब्रह्महत्या त्यामुळे तत्‌काळ नष्ट होतात. दशमुखी रुद्राक्ष जनार्दनस्वरूप आहे. ब्रह्मराक्षस, नाग, वेताळ, पिशाच्च इत्यादी त्यामुळे शांत होतात. अकरा मुखी रुद्राक्ष शिखेत धारण केल्यामुळे हजार अश्वमेध, शेकडो वाजपेय व हजारो गोदाने इत्यादींचे फल मिळते. बारामुखी रुद्राक्ष कानात धारण केल्याने आदित्य संतुष्ट होतो. गोमेध, अश्वमेध यज्ञांची फले प्राप्त होतात. त्याला शृंगवान, व्याघ्र इत्यादींचे भय नसते. मानसिक व्यथाही प्राप्त होत नाहीत. तो कित्येक महापातकांपासून मुक्त होतो.

तेरा मुखी रुद्राक्ष कार्तिकेयाप्रमाणे आहे. तो सर्व कामनापूर्ती करतो. त्यापासून सर्व भोग प्राप्त होतात. चवदामुखी रुद्राक्ष मस्तकी धारण करावा. कारण तो शंकराचा पिंड होय." असे शंकराने रुद्राक्षांचे वर्णन केले. या रुद्राक्षांची देवही नित्य पूजा करतात. एक रुद्राक्ष मस्तकी, सव्वीसांची मस्तकावरील माला करावी. पन्नास हृदयी धारण करावेत. कालाक्ष रुद्राक्ष बाहूत बांधावेत. अर्काक्ष मनगटात बांधावेत. सव्वीस पन्नास एकशे आठ अशी माला घेऊन जप केल्यास अनंत फल मिळते.

हे षण्मुखा एकशे आठ रुद्राक्षांची माला धारण केल्यास अश्वमेधाचे फल मिळते व त्यामुळे एकवीस कुळांचा उद्धार होतो. त्याला शिवलोकी मान्यता मिळते.



अध्याय चवथा समाप्त

GO TOP