सूत उवाच
श्रीशस्य वचनाद्देवाः सन्तुष्टाः सर्व एव हि ।
प्रसन्नमनसो भूत्वा पुनरेनं समूचिरे ॥ १ ॥
देवा ऊचुः
देवदेव महाविष्णो सृष्टिस्थित्यन्तकारण ।
विष्णो विन्ध्यनगोऽर्कस्य मार्गरोधं करोति हि ॥ २ ॥
तेन भानुविरोधेन सर्व एव महाविभो ।
अलब्धभोगभागा हि किं कुर्मः कुत्र याम हि ॥ ३ ॥
श्रीभगवानुवाच
या कर्त्री सर्वजगतामाद्या च कुलवर्धनी ।
देवी भगवती तस्याः पूजकः परमद्युतिः ॥ ४ ॥
अगस्त्यो मुनिवर्योऽसौ वाराणस्यां समासते ।
तत्तेजोवञ्चकोऽगस्त्यो भविष्यति सुरोत्तमाः ॥ ५ ॥
तं प्रसाद्य द्विजवरमगस्त्यं परमौजसम् ।
याचध्वं विबुधाः काशीं गत्वा निःश्रेयसः पदीम् ॥ ६ ॥
सूत उवाच
एवं समुपदिष्टास्ते विष्णुना विबुधोत्तमाः ।
प्रतीताः प्रणताः सर्वे जग्मुर्वाराणसीं पुरीम् ॥ ७ ॥
क्षणेन विबुधश्रेष्ठा गत्वा काशीपुरीं शुभाम् ।
मणिकर्णीं समाप्लुत्य सचैलं भक्तिसंयुताः ॥ ८ ॥
सन्तर्प्य देवांश्च पितॄन्दत्त्वा दानं विधानतः ।
आगत्य मुनिवर्यस्य चाश्रमं परमं महत् ॥ ९ ॥
प्रशान्तश्वापदाकीर्णं नानापादपसङ्कुलम् ।
मयूरैः सारसैर्हंसैश्चक्रवाकैरुपाश्रितम् ॥ १० ॥
महावराहैः कोलैश्च व्याघ्रैः शार्दूलकैरपि ।
मृगै रुरुभिरत्यर्थं खड्गैः शरभकैरपि ॥ ११ ॥
समाश्रितं परमया लक्ष्म्या मुनिवरं तदा ।
दण्डवत्पतिताः सर्वे प्रणेमुश्च पुनः पुनः ॥ १२ ॥
देवा ऊचुः
जय द्विजगणाधीश मान्य पूज्य धरासुर ।
वातापीबलनाशाय नमस्ते कुम्भयोनये ॥ १३ ॥
लोपामुद्रापते श्रीमन्मित्रावरुणसम्भव ।
सर्वविद्यानिधेऽगस्त्य शास्त्रयोने नमोऽस्तु ते ॥ १४ ॥
यस्योदये प्रसन्नानि भवन्त्युज्ज्वलभांज्यपि ।
तोयानि तोयराशीनां तस्मै तुभ्यं नमोऽस्तु ते ॥ १५ ॥
काशपुष्पविकासाय लङ्कावासप्रियाय च ।
जटामण्डलयुक्ताय सशिष्याय नमोऽस्तु ते ॥ १६ ॥
जय सर्वामरस्तव्य गुणराशे महामुने ।
वरिष्ठाय च पूज्याय सस्त्रीकाय नमोऽस्तु ते ॥ १७ ॥
प्रसादः क्रियतां स्वामिन् वयं त्वां शरणं गताः ।
दुस्तराच्छैलजाद्दुःखात्पीडिताः परमद्युते ॥ १८ ॥
इत्येवं संस्तुतोऽगस्त्यो मुनिः परमधार्मिकः ।
प्राह प्रसन्नया वाचा विहसन् द्विजसत्तमः ॥ १९ ॥
मुनिरुवाच
भवन्तः परमश्रेष्ठा देवास्त्रिभुवनेश्वराः ।
लोकपाला महात्मानो निग्रहानुग्रहक्षमाः ॥ २० ॥
योऽमरावत्यधीशानः कुलिशं यस्य चायुधम् ।
सिद्ध्यष्टकं च यद्द्वारि स शक्रो मरुतां पतिः ॥ २१ ॥
वैश्वानरः कृशानुर्हि हव्यकव्यवहोऽनिशम् ।
मुखं सर्वामराणां हि सोऽग्निः किं तस्य दुष्करम् ॥ २२ ॥
रक्षोगणाधिपो भीमः सर्वेषां कर्मसाक्षिकः ।
दण्डव्यग्रकरो देवः किं तस्यासुकरं सुराः ॥ २३ ॥
तथापि यदि देवेशाः कार्यं मच्छक्तिसिद्धिभृत् ।
अस्ति चेदुच्यतां देवाः करिष्यामि न संशयः ॥ २४ ॥
एवं मुनिवरेणोक्तं निशम्य विबुधर्षभाः ।
प्रतीताः प्रणयोद्विग्नाः कार्यं निजगदुर्निजम् ॥ २५ ॥
महर्षे विन्ध्यगिरिणा निरुद्धोऽर्कविनिर्गमः ।
त्रैलोक्यं तेन संविष्टं हाहाभूतमचेतनम् ॥ २६ ॥
तद्वृद्धिं स्तम्भय मुने निजया तपसः श्रिया ।
भवतस्तेजसागस्त्य नूनं नम्रो भविष्यति ।
एतदेवास्मदीयं च कार्यं कर्तव्यमस्ति हि ॥ २७ ॥
देव अगस्तीस शरण जातात
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सर्व देव श्रीपतीस म्हणाले, "हे देवाधिदेवा, हे महाविष्णो, विंध्याने सूर्याचा मार्ग अडविला आहे. त्यामुळे आम्ही सर्व भोगभागरहित झालो आहोत. आता आम्ही काय करावे ?"
श्री भगवान म्हणाले, "त्या सर्वश्रेष्ठ भगवतीची पूजा करणार्या मुनिश्रेष्ठ अगस्तीला शरण जा. तो वाराणसीमध्ये राहातो. तोच विंध्याद्रीची वृद्धी कुंठित करील."
अशा रीतीने विष्णूने उपदेश केल्यावर सर्व देव वाराणसी नगरीत गेले. मणिकर्णिकेत स्नान करून अगस्तीच्या आश्रमात गेले. तो आश्रम श्वापदे, वृक्ष यांनी व्याप्त होता. मयूर, सारस, हंस, चक्रवाक पक्षांनी त्याचा आश्रय केला होता. वराह, व्याघ्रादि हिंस्त्र प्राणीही तेथे शांततेने राहात होते. तेथील श्रेष्ठ मुनीस प्रणाम करून देव म्हणाले, हे द्विजश्रेष्ठ, हे भूदेवा, हे वातापीचा नाश करणार्या, कुंभापासून उत्पन्न झालेल्या, तुला नमस्कार असो. हे लोपामुद्रापते, हे मित्रवरुणवंदना, हे सर्वविद्यानिधाना, हे शास्त्रजनका, तुला प्रणाम असो, अगस्त्य पुष्पाच्या विकासास कारण होणार्या, दशरथी रामास प्रिय असलेल्या, हे गुणसागरा, तुझ्या पत्नीसह तुला आम्ही प्रणाम करतो. हे स्वामी, आम्ही शरण आलो असून सांप्रत आम्हावर दया कर. पर्वतामुळे आम्ही दुःखी झालो आहोत. आम्हाला दुःखमुक्त कर."
मुनीश्रेष्ठ म्हणाले, "हे देवांनो, तुम्ही लोकपाल असून निग्रही आहात. हे देवेंद्रा, तुजजवळ वज्र हे आयुध असून तू अष्टसिद्धीयुक्त आहेस. कृशानु अग्नी हा सर्व देवांचे मुख आहे. त्याला दुष्कर असे काय आहे ? जो सर्व कर्मांचा साक्षी आहे त्या यमास अशक्य काय आहे ? परंतु हे देवांनो, माझ्या शक्तीप्रमाणे मी तुम्हास सहाय्य करीन."
असे त्या मुनीश्रेष्ठाने देवांना सांगितल्यावर ते आनंदित झाले. देव म्हणाले, "हे महर्षे, "विंध्याद्रीने सूर्याचा मार्ग निरोधन केला आहे. म्हणून आपल्या तपोबलाने आपण त्याची वृद्धी कुंठित करा. हे अगस्तऋषे, आपल्या तेजोबलाने तो नष्ट होईल. हे आमचे कार्य आहे."
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
दशमस्कन्धे अगस्त्याश्वासनवर्णनं नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥