शिवस्तत्त्वं समाकर्ण्य तत्त्वज्ञानविशारदः ।
ययौ स्वयं च समरे स्वगणैः सह नारद ॥ १ ॥
शङ्खचूडः शिवं दृष्ट्वा विमानादवरुह्य च ।
ननाम परया भक्त्या शिरसा दण्डवद्भुवि ॥ २ ॥
तं प्रणम्य च वेगेन विमानमारुरोह सः ।
तूर्णं चकार सन्नाहं धनुर्जग्राह दुर्वहम् ॥ ३ ॥
शिवदानवयोर्युद्धं पूर्णमब्दशतं पुरा ।
न बभूवतुरन्योन्यं ब्रह्मञ्जयपराजयौ ॥ ४ ॥
न्यस्तशस्त्रश्च भगवान् न्यस्तशस्त्रश्च दानवः ।
रथस्थः शङ्खचूडश्च वृषस्थो वृषभध्वजः ॥ ५ ॥
दानवानां च शतकमुद्धृतं च बभूव ह ।
रणे ये ये मृताः शम्भुर्जीवयामास तान्विभुः ॥ ६ ॥
एतस्मिन्नन्तरे वृद्धब्राह्मणः परमातुरः ।
आगत्य च रणस्थानमुवाच दानवेश्वरम् ॥ ७ ॥
वृद्धब्राह्मण उवाच
देहि भिक्षां च राजेन्द्र मह्यं विप्राय साम्प्रतम् ।
त्वं सर्वसम्पदां दाता यन्मे मनसि वाञ्छितम् ॥ ८ ॥
निरीहाय च वृद्धाय तृषिताय च साम्प्रतम् ।
पश्चात्त्वां कथयिष्यामि पुरः सत्यं च कुर्विति ॥ ९ ॥
ओमित्युवाच राजेन्द्रः प्रसन्नवदनेक्षणः ।
कवचार्थी जनश्चाहमित्युवाचातिमायया ॥ १० ॥
तच्छ्रुत्वा कवचं दिव्यं जग्राह हरिरेव च ।
शङ्खचूडस्य रूपेण जगाम तुलसीं प्रति ॥ ११ ॥
गत्वा तस्यां मायया च वीर्याधानं चकार ह ।
अथ शम्भुर्हरेः शूलं जग्राह दानवं प्रति ॥ १२ ॥
ग्रीष्ममध्याह्नमार्तण्डप्रलयाग्निशिखोपमम् ।
दुर्निवार्यं च दुर्धर्षमव्यर्थं वैरिघातकम् ॥ १३ ॥
तेजसा चक्रतुल्यं च सर्वशस्त्रास्त्रसारकम् ।
शिवकेशवयोरन्यैर्दुर्वहं च भयङ्करम् ॥ १४ ॥
धनुःसहस्रं दैर्घ्येण प्रस्थेन शतहस्तकम् ।
सजीवं ब्रह्मरूपं च नित्यरूपमनिर्दिशम् ॥ १५ ॥
संहर्तुं सर्वब्रह्माण्डमलं यत्स्वीयलीलया ।
चिक्षेप तोलनं कृत्वा शङ्खचूडे च नारद ॥ १६ ॥
राजा चापं परित्यज्य श्रीकृष्णचरणाम्बुजम् ।
ध्यानं चकार भक्त्या च कृत्वा योगासनं धिया ॥ १७ ॥
शूलं च भ्रमणं कृत्वा पपात दानवोपरि ।
चकार भस्मसात्तं च सरथं चाथ लीलया ॥ १८ ॥
राजा धृत्वा दिव्यरूपं किशोरं गोपवेषकम् ।
द्विभुजं मुरलीहस्तं रत्नभूषणभूषितम् ॥ १९ ॥
रत्नेन्द्रसारनिर्माणं वेष्टितं गोपकोटिभिः ।
गोलोकादागतं यानमारुरोह पुरं ययौ ॥ २० ॥
गत्वा ननाम शिरसा स राधाकृष्णयोर्मुने ।
भक्त्या च चरणाम्भोजं रासे वृन्दावने वने ॥ २१ ॥
सुदामानं च तौ दृष्ट्वा प्रसन्नवदनेक्षणौ ।
क्रोडे चक्रतुरत्यन्तं प्रेम्णातिपरिसंयुतौ ॥ २२ ॥
अथ शलं च वेगेन प्रययौ तं च सादरम् ।
अस्थिभिः शङ्खचूडस्य शङ्खजातिर्बभूव ह ॥ २३ ॥
नानाप्रकाररूपेण शश्वत्पूता सुरार्चने ।
प्रशस्तं शङ्खतोयं च देवानां प्रीतिदं परम् ॥ २४ ॥
तीर्थतोयस्वरूपं च पवित्रं शम्भुना विना ।
शङ्खशब्दो भवेद्यत्र तत्र लक्ष्मीः सुसंस्थिरा ॥ २५ ॥
स स्नातः सर्वतीर्थेषु यः स्नातः शङ्खवारिणा ।
शङ्खो हरेरधिष्ठानं यत्र शङ्खस्ततो हरिः ॥ २६ ॥
तत्रैव वसते लक्ष्मीर्दूरीभूतममङ्गलम् ।
स्त्रीणां च शङ्खध्वनिभिः शूद्राणां च विशेषतः ॥ २७ ॥
भीता रुष्टा याति लक्ष्मीस्तत्स्थलादन्यदेशतः ।
शिवोऽपि दानवं हत्वा शिवलोकं जगाम ह ॥ २८ ॥
प्रहृष्टो वृषभारूढः स्वगणैश्च समावृतः ।
सुराः स्वविषयं प्रापुः परमानन्दसंयुताः ॥ २९ ॥
नेदुर्दुन्दुभयः स्वर्गे जगुर्गन्धर्वकिन्नराः ।
बभूव पुष्पवृष्टिश्च शिवस्योपरि सन्ततम् ।
प्रशशंसुः सुरास्तं च मुनीन्द्रप्रवरादयः ॥ ३० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे
शङ्खचूडवधवर्णनं नाम त्रयोविशोऽध्यायः ॥ २३ ॥
शंखचूडाचा वध -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
ते सर्व वृत्तांत ऐकल्यावर स्वतः शंकर गणांसह युद्धभूमीवर गेले. शंखचूडाने विमानातून उतरून शिवाला वंदन केले. त्याने कवच धारण करून, विमानात आरूढ होऊन प्रचंड धनुष्य हातात घेतले. दोघांचा प्रचंड संग्राम झाला. शंकराने सर्व मृतवीरांना पुन्हा उठविले. इतक्यात एक वृद्ध व व्याकुळ झालेला ब्राह्मण तेथे आला. तो शंखचूडाला म्हणाला, "हे राजाधिराज, मी गरीब ब्राह्मण आहे. मला प्रथम भिक्षा दे. कारण तू इच्छिणार्याला सर्व देणारा आहेस. तू वचन दिल्यासच मी माझी इच्छा प्रकट करीन. मी निश्चिष्ट, वृद्ध व तृषित आहे."
ते ऐकून राजेंद्राने ब्राह्मणाला इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले. "मला तुझे कवच हवे आहे." तो वृद्ध ब्राह्मण कपटाने म्हणाला.
भूर्जपत्रावर लिहून सोन्याच्या ताईतात घालून गळ्यात बांधलेले ते दिव्य कवच राजाने ब्राह्मणाला दान दिले. ते हरीचे कवच हरीनेच परत घेतले. ते घेऊन हरी तुलसीकडे गेला. त्याने कपटवेशाने जाऊन तिचा उपभोग घेतला व तिच्या ठिकाणी वीर्याधान केले. तोच इकडे महादेवाने हातात शूल घेऊन दानवाच्या वधास तो प्रवृत्त झाला.
तो शूल, शिव व केशव यांच्यावाचून कुणीही न पेलू शकणारा, अग्निशिखेप्रमाणे तेजस्वी, ब्रह्मांडाचा संहार करण्यास समर्थ, हजार हात लांब व शंभर हात रुंद असा तो शूल घेऊन शिव युद्धास सिद्ध झाला.
इकडे राजाने हातातील धनुष्य टाकून दिले. तो योगासने घालून बसला. मनातच त्याने श्रीकृष्णाचे चिंतन केले. त्याचवेळी तो शूल भ्रमण करीत त्या राजावर येऊन कोसळला. राजाचे त्याचवेळी भस्म झाले. राजाने मुरलीधारी दिव्यरूप धारण केले. गोलोकातून आलेल्या कोटयावधी गोपींनी युक्त अशा यानात तो आरूढ झाला आणि वैकुंठाला गेला.
तो सत्वर वृंदावनात पोहोचला. त्याने रासमंडळात जाऊन भक्तीभावाने राधाकृष्णाच्या चरणावर मस्तक ठेवले. त्या प्रसन्न व प्रफुल्लित सुदामा गोपाला पाहून कृष्णाने त्याला हृदयाशी कवटाळले. त्याचवेळी तो शूलही भ्रमण करीत कृष्णाकडे आला. शंखचूडाच्या अस्थीचे विविध प्रकारचे शंख तयार झाले. देवाच्या पूजेत ते शंख विविध रूपात पूजले जाऊ लागले. शंखोदकामुळे देवांना प्रेम निर्माण होते. शंखोदकाच्या स्नानामुळे तीर्थाच्या स्नानाचे पुण्य लाभते.
शंख हे हरीचे वसतीस्थान आहे. जेथे शंखाचा ध्वनी होतो तेथे लक्ष्मी वसती करते. स्त्रिया व शूद्र यांच्या शंखध्वनीमुळे मात्र लक्ष्मी रागावून दुसरीकडे जाते.
इकडे शंकरही आनंदाने वृषभावर बसून स्वर्गलोकी परत आला. तेव्हा विजयदुंदुभी वाजू लागल्या. गंधर्व, किन्नर यांचे गायन सुरू झाले. शंकरावर पुष्पवृष्टी झाली. सर्व देव-मुनी त्यांची स्तुती करू लागले.