समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १२ वा

इक्ष्वाकु राजाच्या उर्वरित वंशाचे वर्णन -

श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्‌)
कुशाचा अतिथी पुत्र तयाच्या निषधा नभो ।
नभाचा पुंडरीको नी क्षेमधन्वा तयास तो ॥१॥
त्याच्या देवानिको पुत्रा अनिहा पारियात्र त्यां ।
बलस्थला वज्रनाभो सूर्याचा अंश हा असे ॥२॥
तयाच्या विधृती याला हिरण्यनाभ जाहला ।
शिष्य तो जैमिनीचा नी योगाचार्यात श्रेष्ठ तो ॥३॥
अध्यात्म शिष्य याचा तो याज्ञवल्क्य ऋषी पहा ।
हृदयोग्रंथि हा छेदी योगी तो सिद्धि दायक ॥४॥
पुष्या हिरण्यनाभाच्या ध्रुवसंधि तयास त्या ।
सुदर्शना अग्निवर्णो त्याच्या शीघ्रासि तो मरु ॥५॥
मरुने साधिल्या सिद्धी कलापग्रामि राहतो ।
युगांती नष्टता वंश प्रगटेल पुन्हाहि हा ॥६॥
मरुताच्या प्रसूश्रूता संधी नी त्या अमर्षणो ।
तयाच्या महस्वान्‌ याला विश्वसाह्‌वचि जाहला ॥७॥
प्रसेनजित्‌ तया त्याच्या तक्षकाला बृहद्‍बलो ।
परीक्षिता ! यया युद्धी मारिले अभिमन्युने ॥८॥
इक्ष्वाहू वंशिचे राजे असे या पूर्वि जाहले ।
बृहद्रण पुढे होई बृहद्‍बलास पुत्र तो ॥९॥
बृहद्रणा उरुक्रीय तयाच्या वत्सवृद्धला ।
प्रतियोमासि तो होई भानूनी त्याजला दिवाक् ॥१०॥
दिवाका सहदेवोनी तयासी बृहदश्व तो ।
तयाच्या भानुमान्‌ याच्या प्रतिकाश्वा सुप्रतिको ॥११॥
तयाच्या मरुदेवाच्या सुनक्षत्रासि पुष्करो ।
तयाच्या अंतरिक्षाच्या सुतपासी अमित्रजित्‌ ॥१२॥
तयासी बृहद्राजो नी त्याच्या बर्हीं कृतंजयो ।
रणंजय तयाचा यां होईल संजयो पुढे ॥१३॥
त्याच्या शाक्यासि शुद्धोद ययाच्या लंगला पुढे ।
प्रसेनजित्‌ असा होई तयाचा शूद्रको पहा ॥१४॥
शूद्रका रणको याचा सुरथो त्या सुमित्रची ।
सर्व बृहद्‌बलोवंशी अंतीम तो सुमित्र हा ॥१५॥
इक्ष्वाकूवंश हा येथे थांबेल युगअंति या ।
राजा सुमित्र तो होता संपेल कलियूग ही ॥१६॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बारावा अध्याय हा ॥ ९ ॥ १२ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP