श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय १७ वा - अन्वयार्थ

वर्णधर्मनिरूपणम्, आश्रमेषु ब्रह्मचारी गृहस्थ धर्मवर्णं च -

वर्णाश्रमाचारवतां - सर्व वर्ण आणि आश्रम यांचे विभाजन स्पष्ट झालेले आहे अशा - सर्वेषां द्विपदां अपि - सर्व मनुष्यांसही उपयुक्त - पूर्वं - आदिकाळी - त्वद्‌भक्तिलक्षणः यः धर्मः - तुझी भक्ति हेच मुख्य लक्षण ज्याचे असा जो धर्म - त्वया अभिहितः - तू सांगितलास. ॥ १ ॥

अरविंदाक्ष - हे कमलनेत्रा - नृणां त्वयि भक्तिः भवेत् - जीवांची तुझ्या ठिकाणी भक्ति राहील अशासाठी - स्वधर्मेण यथा अनुष्ठीयमानेन - स्वधर्माचे अनुष्ठान कसे करावे - तत् समाख्यातुं अर्हसि - ते सर्व मला सांगण्याला तू योग्य आहेस. ॥ २ ॥

माधव महाबाहो - लक्ष्मीपते आजानुबाहो - तेन हंसरूपेणं - त्वा हंसरूप घेऊन - ब्रह्मणे - ब्रह्मदेवाला - प्रभो - हे सर्वेश्वरा - पुरा - फार प्राचीन काळी - यत् - जो - परमकं धर्मं अभ्यात्थ किल - श्रेष्ठतम धर्माचाच उपदेश केला. ॥ ३ ॥

सः प्राक् अनुशासितः - तो मागे सांगितलेला कर्तव्यरूपी धर्म - अमित्रकर्शन - शत्रुसंहारका - सुमहता कालेन - पुष्कळच काळ लोटल्यामुळे - इदानीं - या काळी - मर्त्यलोके - मृत्युलोकी - प्रायः न भविता - बहुधा कल्याणकारक होणार नाही. ॥ ४ ॥

अच्युत - सदा स्वरूपातच असणार्‍या देवा - भुवि - या लोकी - धर्मस्य वक्ता, कर्ता, अविता - धर्माचे प्रवचन करणारा, धर्मस्थापना करणारा, धर्मसंरक्षण करणारा - ते अन्यः न - तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही - यत्र मूर्तिधराः कलाः - जेथे वेदादि प्रत्यक्ष मूर्तिमंत असतात अशा - वैरिच्यां सभायां अपि - ब्रह्मसभेत सुद्धा. ॥ ५ ॥

मधुसूदन देव - मधु राक्षसाला मारणार्‍या देवा - कर्त्रा, अवित्रा, प्रवक्त्रा च भवता - धर्मकर्ता, धर्मसंरक्षक, आणि धर्मोपदेशक जो तू त्या त्वा - महीतले त्यक्ते - ही पृथ्वी सोडून गेल्यानंतर - विनष्टं - नष्ट झालेला धर्म - कः प्रवक्ष्यति - कोण सांगू शकेल ? ॥ ६ ॥

तत् - म्हणून - सर्वधर्मज्ञ प्रभो - सर्व धर्मांचे ज्ञान असणार्‍या कृष्णा - त्वद्‌भक्तिलक्षणः धर्मः - त्वद्‌भक्तियुक्त धर्म - नः - आम्हांपैकी - यस्य यथा विधीयेत - ज्या कोणास जसा उपदेश अवश्य हितकर आहे - तथा - त्याप्रमाणे - त्वं मे वर्णय - तू मला सविस्तर सांग. ॥ ७ ॥

इत्थं - याप्रमाणे - स्वभृत्यमुख्येन - आपल्या सेवकांमध्ये मुख्य अशा उद्धवाने - पृष्ठः - विचारलेला - सः भगवान् हरिः - तो भगवान श्रीकृष्ण - प्रीतः - संतुष्ट होऊन - मर्त्यानां क्षेमाय - मनुष्यांच्या कल्याणाकरिता - सनातनान् धर्मान् आह - पुरातन अशा धर्माप्रत सांगता झाला. ॥ ८ ॥

उद्धव - उद्धवा - एषः तव प्रश्नः धर्म्यः - हा तुझा प्रश्न धर्माला अनुकूल म्हणून फार चांगला - वर्णाश्रमाचारवतां नृणां नैःश्रेयसकरः च - व वर्णाश्रमानुसार चालण्याचा ज्यांचा निश्चय आहे, त्यांचे कल्याण करणार आहे - तं मे निबोध - तोच धर्म मजपासून ऐक. ॥ ९ ॥

आदौ कृतयुगे - आरंभकाळी कृतयुगात - नृणां वर्णः ‘हंसः ’ इति स्मृतः - सर्व लोकांचा एकच वर्ण होता. त्यालाच ‘हंस ’ असे म्हणत असत - प्रजाः जात्या कृतकृत्याः - त्यावेळी सर्व लोक कृतार्थ होते - तस्मात् - म्हणून - ‘कृतयुगं ’ विदुः - त्या काळाला ‘कृतयुग ’ हे सार्थ नाव आहे. ॥ १० ॥

अग्रे - आदिकालीन युगात - अहं वृषरूपधृक् धर्मः वेदः प्रणवः एव - चतुष्पादरूप धरणारा जो धर्म तो मी प्रणवात्मक मात्र वेद होतो - मुक्तकिल्बिषाः तपोनिष्ठाः - तत्कालीन पापशून्य असून एकनिष्ठ मनस्तपश्चर्या करणारे लोक - मां हंसं उपासते - हंसरूप जो मी, त्या माझे ध्यानमात्र करीत असत. ॥ ११ ॥

त्रेतासुखे - त्रेतायुगाच्या आरंभी - महाभाग - सौभाग्यशील उद्धवा - मे प्राणात् हृदयात् - माझ्या प्राणरूपी शक्ति असणार्‍या हृदयापासून - त्रयी विद्या प्रादुरभूत् - ऋक्, यजुः, साम, ही वेदत्रयी प्रकट झाली - तस्याः - तिच्यामुळे - अहं - मी - त्रिवृन्मुखः आसं - तीन स्वरूपांचा झालो. ॥ १२ ॥

विप्रक्षत्रियविट्‌शूद्राः - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण - वैराजात् पुरुषात् - विराट नामक पुरुषाच्या - मुखबाहूरुपादजाः जाताः - अनुक्रमे मुख, हस्त, मांडया आणि चरण यांपासून उत्पन्न झाले - ये आत्माचारलक्षणाः - ते सर्व लोक स्वभावसिद्ध गुणधर्मानुरूप त्या त्या वर्णांचे असे ठरे. ॥ १३ ॥

मम जघनतः गृहाश्रमः - माझ्या जघनापासून गृहस्थाश्रम - हृदः ब्रह्मचर्यं - हृदयापासून ब्रह्मचर्य आश्रम - वक्षःस्थानात् वने वासः - वक्षःस्थलापासून वानप्रस्थ (आणि) - शीर्षणि न्यासः संस्थितः - मस्तकापासून संन्यासाची उत्पत्ति झाली. ॥ १४ ॥

वर्णानां आश्रमणां च नृणां प्रकृतयः - वर्णांत व आश्रमांत राहणार्‍या पुरुषांच्या प्रकृति म्हणजे स्वभाव वगैरे - जन्मभूम्यनुसारिणीः आसन् - जन्मभूमि म्हणजे क्षेत्रे - जन्मस्थाने यांनुसार असत - नीचैः नीचाः - नीच जन्मस्थान असेल तर नीच प्रकृति - उत्तमोत्तमा - उत्तम असेल, तर उत्तम प्रकृति असे. ॥ १५ ॥

शमः, दमः, तपः, शौचं, मनाचा शम, इंद्रियांचा दम, तप, शुद्धि, - संतोषः, क्षांतिः, आर्जवं, मद्‌भक्तिः च, - संतोष, समाधान, क्षमा, ऋजुता, माझी भक्ति, - दया, सत्यं, इमाः तु ब्रह्मप्रकृतयः - दया, सत्य ह्या ब्राह्मणप्रकृति. ॥ १६ ॥

तेजः, बलं, धृतिः, शौर्यं, - तेजस्वीपणा, शारीरिक व मानसिक बल, - तितिक्षा, औदार्यं, उद्यमः, - धैर्य, शौर्य, क्षमा, उदारपणा, उद्योगाची हौस, - स्थैर्यं, ब्रह्मण्यता, ऐश्वर्यं, - स्थिरता, वेदांच्या ठायी भक्ति आणि प्रभुता - इमाः तु क्षत्रप्रकृतयः - ह्या दहा क्षत्रियाच्या प्रकृति म्हणजे सहजसिद्ध गुण होत. ॥ १७ ॥

आस्तिक्य, दाननिष्ठा च, अदंभः, - आस्तिक्यबुद्धि, दानशूरता, निष्कपटता किंवा सरळपणा किंवा ढोंगाचा अभाव, - ब्रह्मसेवनं, अर्थोपचयैः अतुष्टिः, - ब्रह्मसेवा व संपत्तीची हाव - इमाः तु वैश्यप्रकृतयः - ही वैश्याची सहज प्रकृति असते. ॥ १८ ॥

द्विजगवां, देवानां च अपि अमायया शुश्रूषणं - द्विजन्मे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांची व गायीची, त्याप्रमाणे देवांची सेवा म्हणजे चाकरी - तत्र लब्धेन संतोषः - या चाकरीने जे काय मिळेल त्यांत संतोष - इमाः तु शुद्रप्रकृतयः - हे शूद्राचे सहजसिद्ध गुण - प्रकृति - स्वभाव होत. ॥ १९ ॥

अशौचं, अनृतं, स्तेयं, नास्तिक्यं, - मलीनपणा, असत्यभाषण, चोरी करणे, श्रद्धा नसणे, - शुष्काविग्रहः, कामः, क्रोधः च, तर्षः च, - कारण नसता भांडणे, कामुकता, क्रोध असणे, लोभ - अंतेवसायिनां स्वभावः - हे अति शूद्राचे सहजसिद्ध गुण असत. ॥ २० ॥

अहिंसा, सत्यं, अस्तेयं, - कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे, सत्यप्रेम, चोरी न करणे, - अकामक्रोधलोभता, - काम - क्रोध - लोभ यांनी शून्य असणे, - भूतप्रियहितेहा च - लोकांचे हित व प्रिय करण्याची ईहा म्हणजे इच्छा असणे, - अयं सार्ववर्णिकः धर्मः - हा सर्व वर्णांचा साधारण धर्म आहे. ॥ २१ ॥

आनुपूर्व्यात् - पूर्वीच्या जातकरणादि संस्कारांनंतर - उपनयनं द्वितीयं जन्म प्राप्य - उपनयन म्हणजे मौजीबंधन नामक दुसरा जन्म प्राप्त झाला म्हणजे - द्विजः - त्या दुसर्‍य़ांदा जन्मलेल्या ब्रह्मचार्‍याने - दांतः - इंद्रियनिग्रह करून - गुरुकुले वसन् च - गुरूच्या आश्रमात राहून - आहुतः ब्रह्म अधीयीत - गुरुजींनी आज्ञपिल्याप्रमाणे ब्रह्माचा म्हणजे वेदाचा अभ्यास करावा. ॥ २२ ॥

मेखलाजिनदंडाक्षब्रह्मसूत्रकमंडलून् दधत् - कटिसूत्र, मृगासन, यष्टि, माळा, यज्ञोपवीत, कमंडलू धारण करणारा - जटिलः - जटाधारी - अघौतद्वासः - दांत व वस्त्र न धुणारा - अरक्तपीठः - आसन न रंगविणारा - कुशान् दधत् - दर्भ धारण करणारा - (ब्रह्मचारी असावा) ॥ २३ ॥

स्नानभोजनहोमेषु - स्नान, भोजन व हवन करताना - जपोच्चारे च - जप करताना व मलविसर्जन करताना - वाग्यतः - वाणी स्तब्ध असावी - नखरोमाणी कक्षोपस्थगतानि अपि - नखे केश - खाकेतील व गुह्य स्थानावरील सुद्धा - न छिंद्यात् - कापून किंवा उपटून काढू नयेत. ॥ २४ ॥

ब्रह्मव्रतघरः स्वयं रेतः न जातु अवकिरेत् - ब्रह्मचार्‍याने केव्हाही स्वतः रेत स्खलू देऊ नये - अवकीर्णे - आपोआप स्खलित झालेच तर - अप्सु अवगाह्य - स्नान करून - यतासुः - प्राणायाम करावा - त्रिपदीं जपत् - त्रिपदा गायत्रीचा जप करावा. ॥ २५ ॥

यतवाक् - मौन धारण करून - संध्ये च जपन् - सकाळी व संध्याकाळी संध्या करून - अग्नि अर्क आचार्य - अग्नि, सूर्य, आचार्य, - गो विप्र गुरु वृद्धसुरान् - धेनु, ब्राह्मण, ज्ञानवृद्ध व वयोवृद्ध वडील माणसे व देव यांची - शुचिः समाहितः उपासीत - शुचिर्भूत व एकचित्त होऊन सेवा करावी. ॥ २६ ॥

आचार्यं मां विजानीयात् - आचार्य - गुरुजी - प्रत्यक्ष मी - म्हणजे परमात्माच आहे असे जाणावे - कर्हिचित् न अवमन्येत - आचार्याचा केव्हाही मानभंग व आज्ञाभंग करू नये - न मर्त्यबुद्‌ध्या असूयेत - तो मनुष्य म्हणून त्याचा मत्सर करण्यास प्रत्यवाय नाही, असे केव्हाही समजू नये - गुरुः सर्वदेवमयः - गुरु म्हणजे सर्व देव एकवटलेले स्वरूप होय. ॥ २७ ॥

सायं, प्रातः - संध्याकाळी व सकाळी - यत् - जे - भैक्ष्यं - अन्न, भिक्षा - अन्यत् - व दुसरे काही - उपानीय - शुद्ध करून आणून - तस्मै निवेदयेत् - ते ते गुरूला अर्पण करावे - अनुज्ञातं - गुरूने आज्ञा केल्यानंतर - संयतः उपयुंजीत - त्या त्या अन्नाचे अगर इतर वस्तूंचे सेवन मनोनिग्रह करून करावे. ॥ २८ ॥

आचार्यं शुश्रूषमाणाः - गुरूची सेवा करणार्‍या शिष्याने - सदा - नेहमी - नीचवत् उपासीत - अति नम्र वृत्तीने जवळ असावे - यानशय्यासनस्थानैः न अतिदूरे - गुरुजी बाहेर जात असता, शयनी असता, बसले असता, त्या स्थानापासून दूर असू नये - कृतांजलिः - नेहमी हात जोडून असावे. ॥ २९ ॥

एवंवृत्तः - असे व्रत धारण करून - भोगविवर्जितः - सर्वप्रकारच्या भोगांचा त्याग करून - अखंडितं व्रतं बिभ्रत् - आपले ब्रह्मचर्यव्रत अखंडित ठेवून - यावत् विद्या समाप्यते - विद्येचे अध्ययन पूर्ण होईपर्यंत - गुरुकुलेवसेत् - गुरुकुलात राहावे. ॥ ३० ॥

यदि असौ - जर तो ब्रह्मचारी - छंदसां लोकं ब्रह्मविष्टप आरोक्ष्यन् - छंदांचा लोक म्हणजे महर्लोक त्याप्रत - ब्रह्मविष्टपः - ब्रह्मलोक त्याप्रत जाण्याची इच्छा करणारा असेल तर - बृहद्‌वृतः - त्याने नैष्ठिक ब्रह्मचर्यव्रत धारण करून - स्वाध्यायार्थं - पुढील श्रेष्ठ अध्ययनासाठी - गुरवे देहं विन्यसेत् - गुरुजीस आपला देहसुद्धा अर्पण करावा. ॥ ३१ ॥

अपृथग्धीः - अभेदबुद्धि धारण करून - ब्रह्मवर्चस्वी - तो वेदोभास्कर - अकल्मषः - सर्वथा शुद्ध असणारा - अग्नौ गुरौ - अग्नीच्या ठिकाणी, गुरूच्या ठिकाणी, - आत्मनि च सर्वभूतेषु - स्वस्वरूपात, आणि सर्व स्थिर जंगम पदार्थांत - परं मां - श्रेष्ठ असा जो मी त्या माझी - उपासीत - उपासना करावी. ॥ ३२ ॥

अगृहस्थः - नैष्ठिक ब्रह्मचारी - स्त्रीणां निरीक्षणस्पर्शसंलाषक्ष्वेलनादिकं - स्त्रियांचे दर्शन, त्यांच्याशी भाषण, थटटामस्करी - मिथूनीभूतान् प्राणिनः - रत्यर्थ एकत्र झालेली नरमादीची जोडपी - अग्रतः त्यजेत् - अगोदर त्याग करावा. ॥ ३३ ॥

शौचं आचमनं स्नानं - मन, शुद्धि, आचमन, स्नान, - संध्योपासनं आर्जवं तीर्थसेवा जपः - संध्या, ऋजुता, जप ही व्रते नित्य चालवावी - अस्पृश्य अभक्ष्य - अस्पृश्याला स्पर्श करणे, अभक्ष भक्षिणे, - असंभाष्यवर्जनं - बोलण्यास योग्य नाही त्यांच्याशी बोलणे, या सर्व गोष्टी वर्ज्य कराव्या. ॥ ३४ ॥

कुलनंदन - कुलास आनंद देणार्‍या उद्धवा - अयं नियमः - आताच गेल्या श्लोकात सांगितलेला नियम - सर्वाश्रमयुक्तः - ब्रह्मचार्यादि चारी आश्रमांत घालून दिलेला आहे - सर्वभूतेषु मद्‌‌भावः - सर्व भूतांचे ठिकाणी मी आहे अशी दृढ भावना - मनोवाक्कायसंयमः - मन वाणी व शरीर ही सर्व आपल्या स्वाधीन ठेवणे हा आत्मसंयम होय. ॥ ३५ ॥

एवं - याप्रकारे - बृहद्‌व्रतधरः - नैष्ठिकब्रह्मचारी - अग्निः इव ज्वलन् ब्राह्मणः मद्‍भक्तः - अग्नीप्रमाणे तेजस्वी असा मद्‍भक्त ब्राह्मण - तीव्रतपसा - कडकडीत तपश्चर्येने - दग्धकर्माशयः - कर्मजनक व कर्मजन्य वासनांस जाळून टाकतो - अमलः - शुद्धचित्त होतो. ॥ ३६ ॥

अथ - वेदाभ्यास संपल्यानंतर - यथाजिज्ञासितागमः - इच्छेप्रमाणे वेदवेदार्थ समजून घेतला आहे असा - अनंतरं - द्वितीय आश्रमात - आवेक्ष्यन् - प्रवेश करू इच्छित असल्यास - गुर्वनुमोदितः - गुरूंची आज्ञा घेऊन - गुरवे दक्षिणां दत्वा - गुरूला दक्षिणा देऊन - स्नायात् - मंगलस्नान करावे. ॥ ३७ ॥

द्विजोत्तमः गृह्यं वनं वा उपविशेत् - त्या द्विजोत्तम ब्रह्मचार्‍याने गृहस्थाश्रम किंवा वानप्रस्थाश्रम इच्छेनुसार स्वीकारावा - प्रव्रजेत् वा - अथवा संन्यासग्रहणहि करावे किंवा - आश्रमात् आश्रमं गच्छेत् - प्रथम गृहस्थाचा, मग वनाचा, मग संन्यासाचा अशाच क्रमाने त्याने जावे - अन्यथा न - उलट क्रम केव्हाही धरू नये - मत्परः चरेत् - माझी भक्ति मात्र सर्वदा अखंड असावी. ॥ ३८ ॥

गृहार्थी - गृहस्थाश्रमात जाऊ इच्छिणार्‍याने - अजुगुप्सितां सदृशीं वयसा - कुलीन आणि अव्यंग, आपणाहून वयाने लहान - यवीयसीं भार्यां उद्वहेत् - व समान वर्णाची भार्या निवडून तिच्याशी धर्मविहित विवाह करावा - या संवर्णा अनुक्रमात् - या सवर्ण भार्येनंतर क्रमाने खालच्या वर्णांतील भार्या करावी. ॥ ३९ ॥

इज्याध्ययनदानानि - यज्ञ, अध्ययन, दान, ही कर्मे - सर्वेषां द्विजन्मनां च - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिन्ही द्विजांस अवश्य आहेत - प्रतिग्रहः अध्यापनं याजनं च ब्राह्मणस्य एव - परंतु दान घेणे, शिकविणे आणि यज्ञकर्म हे अधिकार ब्राह्मणास मात्र आहेत. ॥ ४० ॥

प्रतिग्रहं मन्यमानः तपस्तेजोयशोनुदं - दान घेणे हे तपाची, तेजाची, व यशाची हानि करणारे आहे - अन्याभ्यां एव जीवेत - अध्यापनाने अथवा याजनाने मात्र आपला योगक्षेम चालवावा - तयोः दोषदृक् - त्याही दोन्ही वृत्ति दूषित आहेत असे ज्याला वाटते त्याने - शिलैः - शेतातील कणांनी आपला उदरनिर्वाह करावा. ॥ ४१ ॥

ब्राह्मणस्य हि अयं देहः - हा ब्राह्मणाचा देह - क्षुद्रकामाय न इष्यते - क्षुद्र पदार्थांची इच्छा करण्यात दवडू नये - कृच्छ्‌राय तपसे - येथे इहलोकी तीव्र तपश्चर्येच्या कामी त्यांचा विनियोग करावा - इह प्रेत्य च अनंतसुखाय च - आणि देहपात झाल्यानंतर परलोकी अनंत सुख मिळेल अशा कर्माकडे त्याला लावावे. ॥ ४२ ॥

शिलोंछवृत्या परितुष्टचित्तः - शेतात पडलेले दाणे टिपणे हे शिल व बाजारात पडलेले बिनवारशी दाणे वेचणे ही उंछवृत्ति अशा शिलेंच्छ वृत्तीतच जो संतुष्ट राहतो - विरजं महान्तं धर्मं जुषाणः - परम शुद्ध असा जो आतिथ्यप्रभृति धर्म तो अक्षरशः व अर्थशः पाळतो - मयि अर्पितात्मा - मलाच आपला आत्मा अर्पण केला आहे - गृहे एव तिष्ठन् न अतिप्रसक्तः - घरात राहूनही आसक्त असत नाही - समुः शांति विप्रंपेति - तोच उत्तम प्रकारचा शांतीचा अधिकारी होतो. ॥ ४३ ॥

सोदंतं मत्परायणं - दुःखात असलेल्या मद्‌भक्तविप्राला - ये समुद्धरंति - जे कोणी धनसंपन्न लोक दारिद्र्यातून वर काढितात - अर्णवात् नौः इव - खवळलेल्या समुद्रातून नाव तारावी त्याप्रमाणे - आपद्‌भ्‌यः तान् नचिरात् उद्धरिष्ये - त्यांस त्यांच्या संकटांपासून मी परमेश्वर तत्काळ मुक्त करतो. ॥ ४४ ॥

सर्वाः प्रजाः राजा व्यसनात् समुद्धरेत् - सर्वपालक राजाने आपल्या प्रजेला व्यसनमुक्त करावे - पिता इव - पिता मुलांचे संकट नष्ट करतो तसे - धीरः आत्मना आत्मानं - धीरपुरुषाने आपल्या स्वतःस आपल्या सद्‌विवेकाने संकटमुक्त करावे - गजपतिः गजान् यथा - जसा गजेंद्र इतर हत्तींस सोडवून आपणासही सोडवितो तसा. ॥ ४५ ॥

इह कृत्स्नं अशुभं विधूय - या लोकातील सकल अमंगल सुखदुःख नाहीशी करून - एवंविधः नरपतिः - वर सांगितल्याप्रमाणे राहणारा राजा - अर्कवर्चसा विमानेन - सूर्याप्रमाणे तेजस्वी असणार्‍या विमानात बसून जातो - इंद्रेण सह मोदते - इंद्राच्या समागमात आनंदरूप होतो. ॥ ४६ ॥

सीदन् विप्रः - दरिद्री जो विप्र त्याने - वणिग्वृत्त्या पण्यैः एव - वाण्याच्या धंद्यातील खरेदी विक्रीच्या व्यवहाराने मात्र - आपदं तरेत् आपल्या आपत्तीतून मुक्त व्हावे - आपदाक्रांतः खड्‌गेन वा - आपत्तीतून मोकळीक होईनाच तर त्याने क्षात्रवृत्तीचा अंगीकार करावा - श्ववृत्या कथंचन न - केव्हाही कशीही शुद्रवृत्ती पत्करू नये. ॥ ४७ ॥

आपदि राजन्यः तु - संकटकाळी क्षत्रियाने तर - वैश्ववृत्या मृगयया जीवेत् - वैश्यवृत्तीचा स्वीकार करून जगण्यासाठी शिकारीहि व्हावे - वा विप्ररूपेण चरेत् - किंवा ब्राह्मणवृत्तीने योगक्षेम चालवावा - श्ववृत्या कथंचन न - सेवावृत्ती केव्हाही स्वीकारू नये. ॥ ४८ ॥

शूद्रवृत्तिं वैश्यः भजेत् - वैश्याने शूद्रवृत्ति स्विकारावी - शूद्रः कारुकटक्रियां - आणि शूद्राने चटया वगैरेंचा धंदा करावा - कृच्छ्‌रातं मुक्तः - संकटमुक्त होताच - न गर्ह्येण कर्मणा वृत्तिं लिप्सेत - स्वीकारलेला धंदा करण्याचा लोभ ठेवू नये. ॥ ४९ ॥

यथोदयं - स्वतःच्या संपत्यनुसार - वेदाध्याय स्वधा स्वाहा - वेदपाठादि म्हणजे ब्रह्मयज्ञ, स्वधा - पितृयज्ञ, स्वाहा - देवयज्ञ, - बलि अन्नाद्यैः - बलि - आणि अन्न म्हणजे मनुष्ययज्ञ करून - मद्रूपाणि देवर्षिपितृभूतानि - मत्स्वरूप देव, ऋषि, पितर व भूते यांचे - अन्वहं यजेत् - प्रतिदिवशी यजन करावे. ॥ ५० ॥

यदृच्छया उपपन्नेन - आकस्मिक रीतीने प्राप्त झालेल्या - उपार्जितेन वा - किंवा स्वतः योग्य रीतीने मिळविलेल्या - शुक्लेन धनेन - शुद्ध धनाने - भृत्यान् अपीडयन् - दारापुत्रादि व सेवकादि यांस पीडा न होईल अशा रीतीने - न्यायेन एव क्रतून् आहरेत् - न्यायाने सर्व कर्मे शास्त्रोक्त पद्धतीने यथाशक्ति करावी. ॥ ५१ ॥

कुटुंबेषु न सज्जेत - कुटुंबातील मंडळीवर अथवा गेहदेहादिकांवर आसक्ति ठेऊ नये - कुटुंबी अपि न प्रमाद्येत् - गृहस्थाश्रमी असला तरी त्याने नीतिभ्रष्ट किंवा भक्तिभ्रष्ट होऊ नये - विपश्चित् - जो ज्ञानी आहे त्याने - दृष्टवत् अदृष्टं अपि नश्वरं पश्येत् - दृश्य नश्वर आहे तसे अदृष्ट म्हणजेच स्वर्गसुखात्मक कर्मफलहि विनाशी आहे असे समजावे. ॥ ५२ ॥

पुत्रदाराप्तबंधूनां - पुत्र, कलत्र, मित्र, भ्राते इत्यादिकांची - संगमः - संगति - पांथसंगमः - पांथस्थांच्या संगतीसारखी क्षणिक - अनुदेहं एते वियंति - एक देह सुटल्यानंतर दुसर्‍या जन्मात यांची सोबत नसते - निद्रानुगः स्वप्नः यथा - प्रत्येक निद्रेत असणारे स्वप्न त्या निद्रेबरोबरच नष्ट होते तसे. ॥ ५३ ॥

इत्थं परिमृशन् - असा विचार करून - मुक्तः - हा जीवन्मुक्त - गृहेषु - घरादिकांमध्ये - अतिथिवत् वसन् - केवळ पाहुण्यासारखा राहतो - न गृहैः अनुबध्येत - स्वगृहादि त्याला बांधू शकत नाहीत - निर्ममः निरहंकृतः - ममत्वशून्य व अहंताशून्य असतो. ॥ ५४ ॥

गृहमेधीयैः कर्मभिः - गृहस्थधर्मास अवश्य अशा सर्व धार्मिक कर्मांनी - भक्तिमान् - मद्‍भक्त - मां एव इष्ट्‍वा - मला मात्र संतुष्ट करीत - तिष्ठेत् - घरीच राहील - प्रजावान् वनं वा उपविशेत् - मुलेबाळे कर्ती झाल्यावर वानप्रस्थ होईल - वा - किंवा - परिव्रजेत् - संन्यास घेईल. ॥ ५५ ॥

यः तु गेहे आसक्तमतिः - ज्याला घराचीच आसक्ती असते - पुत्रवित्तैषणातुरः - पुत्र व्हावा, वित्त मिळवावे अशा पुत्रैषणवित्तैषणांमुळे जो व्याकुळ असतो - स्त्रैणः - जो स्त्रीवश असतो - मूढः कृपणधीः - तो मूर्ख मनुष्य, मंदमति - ‘मम ’ ‘अहं ’इति बद्‍‌ध्‌यते - मी व माझे या पाशांनी घटट बांधला जातो. ॥५६ ॥

अहो मे पितरौ वृद्धौ - अहो माझे आईबाप वृद्ध आहेत - भार्या बालात्मजा - पत्नी लेकुरवाळी आहे - आत्मजाः अनाथाः - मुलांना कोणाचा आधार नाही - मां ऋते दीनाः दुःखिताः - माझ्याशिवाय दीन व दुःखी झालेली ही सर्व - कथं जीवंति - आपले आयुष्य कसे कंठतील ? ॥५७ ॥

एवं गृहाशयाक्षिप्तहृदयः - याप्रमाणे घराच्या वासनेने ज्याचे अंतःकरण मोक्षभ्रष्ट झाले आहे असा - अयं मूढधीः - हा मूढबुद्धीचा पुरुष - अतृप्तः - असमाधानी राहून - तान् अनुध्यायन् - घरादिकांचे चिंतन करीत - मृतः - मेला असता - अंधं तमः विशते - घोर नरकावस्थेप्रत जातो. ॥ ५८ ॥

अध्याय सतरावा समाप्त

GO TOP