श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ७१ वा - अन्वयार्थ

श्रीकृष्णांचे इंद्रप्रस्थाला जाणे -

महामतिः उद्धवः - मोठा बुद्धिवान असा उद्धव इति देवर्षेः उदीरितं आकर्ण्य - याप्रमाणे नारदाचे भाषण ऐकून कृष्णस्य सभ्यानां च मतम् आज्ञाय - श्रीकृष्णाचे व सभासदांचे मत जाणून अब्रवीत् - म्हणाला ॥१॥

देव - हे कृष्णा ऋषिणा यत् उक्तं - नारद मुनीने जसे सांगितले यक्ष्यतः पैतृष्वस्नेयस्य - यज्ञ करणार्‍या आतेभावाचे त्वया साचिव्यं कार्यं - त्वा सहाय्य करावे शरणैषिणां च रक्षा (कार्या) - आणि शरण आलेल्यांचे रक्षण करावे. ॥२॥

विभो - हे कृष्णा दिक्चक्रजयिना राजसूयेन यष्टव्यं - चारी दिशांची राज्ये जिंकणार्‍याने राजसूय यज्ञ करावा असे म्हणतात अतः जरासुतजयः - म्हणून जरासंधाला जिंकणे हे उभयार्थः (सन्) मम मतः - दोन्ही कार्ये साधणारे मला मान्य आहे. ॥३॥

गोविंद - हे श्रीकृष्णा हि - खरोखर एतेन एव - ह्यायोगेच असल्यामुळे अस्माकं महान् अर्थः (सिध्येत) - आमचाहि मोठा अर्थ साधेल बद्धान् राज्ञः विमुञ्चतः तव च - व बन्धनात सापडलेल्या राजांची सुटका करणार्‍या तुझी यशः च भविष्यति - कीर्तिही होईल ॥४॥

बले नागायुतसमः - सामर्थ्याने दहा हजार हत्तींसारखा सः राजा - तो जरासंध राजा समबलं भीमं विना - तुल्यसामर्थ्याच्या भीमाशिवाय अन्येषां बलिनाम् च अपि दुर्विषहः वै - दुसर्‍या त्याहून बलिष्ठ असलेल्यांनाही स्पर्धा करण्यास खरोखर कठीण आहे ॥५॥

सः तु - तो जरासंध तर द्वैरथे जेतव्यः - द्वंद्वयुद्धामध्ये जिंकणे शक्य आहे शताक्षौहिणीयुतः (सन् समरे) मा (जेतव्यः) - शंभर अक्षौहिणी सैन्याने युक्त असल्यामुळे रणात जिंकणे शक्य नाही ब्रह्मण्यः (सः) - ब्राह्मणांचे कल्याण करणारा जरासंध विप्रेः अभ्यर्थितः - ब्राह्मणांनी प्रार्थिला असता कर्हिचित् न प्रत्याख्याति - कधीही अमान्य करीत नाही ॥६॥

वृकोदरः - भीम ब्रह्मवेषधरः - ब्राह्मणाचा वेष घेतलेला तं गत्वा - जरासंधाजवळ जाऊन (द्वैरथं) भिक्षेत - द्वंद्वयुद्धाची भिक्षा मागो (सः) द्वैरथे तव सन्निधौ (तं) हनिष्यति - तो भीम द्वंद्वयुद्धामध्ये तू जवळ असताना जरासंधाला मारील (अत्र) संदेहः नः - ह्यात संशय नाही ॥७॥

विश्वसर्गनिरोधयोः ईशस्य - जगाची उत्पत्ती व संहार करण्याच्या कामी समर्थ अशा अरूपिणः कालस्य तव - रूपरहित काळस्वरुपी तुला हिरण्यगर्भः शर्वः च - ब्रह्मदेव व शंकर हे परं निमित्तं - केवळ निमित्तमात्र होत ॥८॥

लब्धशरणाः - मिळाला आहे रक्षणकर्ता ज्यांना अशा राज्ञां देव्यः गोप्यः च - जरासंधाच्या बंदिखान्यात पडलेल्या राजांच्या स्त्रिया व गोपी गृहेषु - आपल्या घरी स्वशत्रुवधं आत्मविमोक्षणं च - आपल्या शत्रूंचा नाश व स्वतःच्या पतींची मुक्तता हे ते विशदकर्म गायन्ति - तुझे निर्मळ कृत्य गातात मुनयः वयं च - ऋषि व आम्ही कुंजरपतेः (नक्रात् मोक्षणं) - गजेंद्राची नक्रापासून केलेली सुटका जनकात्मजायाः (रावणात् मोक्षणं) - सीतेची रावणापासून केलेली सुटका पित्रोः च (कंसात् मोक्षणं) - वसुदेव, देवकी यांची कंसापासून केलेली सुटका ॥९॥

कृष्ण - हे श्रीकृष्णा जरासन्धवधः भूरि अर्थाय उपकल्पते - जरासंधाचा वध पुष्कळ अर्थ साधण्यास समर्थ आहे क्रतुः च - आणि राजसूय यज्ञ प्रायः पाकविपाकेन - बहुधा पुण्यपापरूपी कर्माचे फल या रूपाने तव अभिमतः - तुला मान्यच आहे ॥१०॥

राजन् - हे राजा देवर्षिः च यदुवृद्धाः कृष्णः च - नारद, वृद्ध यादव व श्रीकृष्ण हे इति सर्वतोभद्रं अच्युतं उद्धववचः - याप्रमाणे सर्वप्रकारे कल्याण कारक व युक्तियुक्त असे उद्धवाचे भाषण प्रत्यपूजयन् - अभिनंदिते झाले ॥११॥

अथ - नंतर विभुः भगवान् देवकीसुतः - सर्वव्यापी भगवान देवकीपुत्र श्रीकृष्ण गुरून् अनुज्ञाप्य - वसुदेवादि वडील मंडळीची आज्ञा घेऊन दारुकजैत्रादीन् भृत्यान् - दारुक, जैत्र आदिकरून सेवकांना प्रयाणाय आदिशत् - प्रवासाकरिता आज्ञापिता झाला ॥१२॥

शत्रुहन् - हे शत्रुनाशका परीक्षित राजा संकर्षणं यदुराजं च अनुज्ञाप्य - बलराम व उग्रसेन यांची आज्ञा घेऊन ससुतान् सपरिच्छदान् - पुत्र व परिवार यांसह स्वान् अवरोधान् निर्गमय्य - आपल्या अंतः पुरातील स्त्रियांना प्रयाण करावयास लावून सूतोपनीतं गरुडध्वजं रवरथं - सारथ्याने जवळ आणलेल्या व ज्याच्या ध्वजस्तंभावर गरुड आहे अशा आपल्या रथावर आरुहत् - चढला ॥१३॥

ततः - नंतर रथद्विपभटसादिनायकैः करालया आत्मसेनया (च) परिवृतः (सः) - रथ, हत्ती, योद्धे, घोडेस्वार यांच्या अधिपतींनी आणि शूर अशा आपल्या सैन्याने वेष्टिलेला असा श्रीकृष्ण मृदंगभेर्यानकशंखगोमुखैः प्रघोषघोषित् ककुभः - मृदंग, भेरी, दुदुंभि, शंख व गोमुख ह्या वाद्यांनी मोठ्या शब्दाने गर्जवून सोडलेल्या दिशेपासून निराक्रमत् - बाहेर पडला ॥१४॥

सहात्मजाः सुव्रताः - पुत्रांसह असलेल्या व सदाचारसंपन्न अशा वरांबराभरणविलेपनस्नजः - उत्तम वस्त्रे, अलंकार, चंदनाची उटी व माळा धारण करणार्‍या (च) असिचर्मपाणिभिः नृभिः सुसंवृताः - व तरवार आणि ढाल हातात घेतलेल्या मनुष्यांनी वेष्टिलेल्या नृवाजिकांचनशिबिकाभिः - मनुष्यांच्या व घोड्यांच्या सुवर्णाच्या पालख्यांतून पतिं अच्युतं अनु - पति जो श्रीकृष्ण त्याच्या मागोमाग ययुः - गेल्या ॥१५॥

स्वलंकृताः - अलंकार घातलेल्या कटकुटिकंबलाम्बराद्युपस्कराः - गवतांची घरे व कांबळ्यांची वस्त्रे हीच आहेत साहित्ये ज्यांची अशा परिजनवारयोषितः - सेवक व वारांगना नरोष्ट्रगोमहिषखराश्वतर्यनः करेणुभिः - मनुष्य, उंट, बैल, रेडे, गाढव, खेचरे, खटारे व हत्ती यांच्यावर सर्वतः अधियुज्य - सर्व प्रकारे साहित्य लादून ययुः - गेल्या ॥१६॥

तुमुलरवं बलं - भयंकर शब्द करणारे सैन्य बृहद्‌ध्वजपटछत्रचामरैः - उंच उंच ध्वज, मोठमोठया पताका, छत्र, व चवर्‍या यांनी वरायुधाभरणकिरीटवर्मभिः - उत्तम आयुधे, अलंकार, मुकुट व कवचे यांनी दिवा - दिवसा रवेः अंशुभिः - सूर्याच्या किरणांमुळे यथा अर्णवः क्षुभिततिमिंगिलोर्मिभिः (तथा) - ज्याप्रमाणे समुद्र क्षुब्ध झालेल्या माशांनी व लाटांनी शोभतो त्याप्रमाणे बभौ - शोभला. ॥१७॥

अथो - नंतर यदुपतिना सभाजितः - श्रीकृष्णाने पूजिलेला मुकुंदसंदर्शननिर्वृतेन्द्रियः - श्रीकृष्णाच्या दर्शनाने आनंदित झाली आहेत इंद्रिये ज्याची असा आहृतार्हणः - आणि पूजा स्वीकारिली आहे ज्याने असा मुनिः - नारद तद्‌व्यवसितं निशम्य - श्रीकृष्णाचा तो निश्‍चय ऐकून हृदि विदधत् - हृदयामध्ये धारण करणारा असा तं प्रणम्य - श्रीकृष्णाला नमस्कार करून विहायसा (ययौ) - आकाशमार्गाने गेला. ॥१८॥

भगवान् - श्रीकृष्ण गिरा प्रीणयन् - वाणीने प्रसन्न करीत राजदूतं इदं उवाच - राजांनी पाठविलेल्या दूताला असे म्हणाला दूत - हे दूता मा भैष्ट - भिऊ नका वः भद्रं (अस्तु) - तुमचे कल्याण असो मागधं घातयिष्यामि - जरासंधाला मी मारवीन. ॥१९॥

इति (भगवता) उक्तः दूतः - अशा रीतीने श्रीकृष्णाने सांगितलेला दूत प्रस्थितः - गेला यथावत् (च) नृपान् अवदत् - व जसेच्या तसे राजांना सांगता झाला ते अपि - ते राजेहि शौरेः संदर्शनं प्रत्यैक्षन् - श्रीकृष्णाच्या दर्शनाची वाट पहात बसले यत् - कारण (ते) मुमुक्षवः (आसन्) - ते मुक्त होण्याची इच्छा करणारे होते. ॥२०॥

हरिः - श्रीकृष्ण आनर्तसौवीरमरून् - अनर्त, सौवीर व मारवाड ह्या देशांना गिरीन् नदीः - पर्वत व नद्या ह्यांना पुरग्रामव्रजाकरान् - नगरे, खेडीपाडी, गौळवाडे खाणी ही तीर्त्वा - उल्लंघून विनशनं अतीयाय - कुरुक्षेत्रहि ओलांडून पुढे गेला ॥२१॥

अथ मुकुंदः - नंतर श्रीकृष्ण ततः दृषद्वतीं सरस्वतीं च तीर्त्वा - तेथून दृषद्वती व सरस्वती या नद्या उतरून अथ पञ्चालान् मत्स्यान् च - नंतर पञ्चालदेश व मत्स्यदेश हे शक्रप्रस्थं अगमत् - इंद्रप्रस्थाला प्राप्त झाला. ॥२२॥

सोपाध्यायः सुहृद्‌वृतः अजातशत्रुः - उपाध्यायासह व मित्रांनी वेष्टिलेला धर्मराजा नृणां दुर्दर्शनं तं - मनुष्यांना दुर्घट आहे दर्शन ज्याचे अशा श्रीकृष्णाला उपागतं आकर्ण्य - आलेला ऐकून प्रीतः - आनंदित झालेला निरगात् - बाहेर निघाला. ॥२३॥

सः - तो धर्मराजा आदृतः - आदरयुक्त असा हृषीकेशं - श्रीकृष्णाला प्राणाः प्राणम् इव - जसे पंचप्राण जीवाला त्याप्रमाणे भूयसा - मोठया गीतवादित्रघोषेण ब्रह्मघोषेण (च) - गायन-वादनाच्या शब्दाने व वेदमंत्रांच्या घोषाने अभ्ययात् - सामोरा गेला. ॥२४॥

अथ - नंतर स्नेहेन विक्लिन्नहृदयः पाण्डवः - प्रेमाने ज्याचे हृदय भडभडून आले आहे असा धर्मराजा चिरात् दृष्टं प्रियतमं कृष्णं दृष्टवा - पुष्कळ दिवसांनी दिसलेल्या अत्यंत प्रिय अशा श्रीकृष्णाला पाहून पुनः पुनः संस्वजे - वारंवार आलिंगन देता झाला. ॥२५॥

हताशुभः - नष्ट झाले आहे पाप ज्याचे असा अश्रुलोचनः - ज्याच्या नेत्रांत आनंदाश्रु आले आहेत असा हृष्यत्तनुः - ज्याच्या शरीरावर रोमांच उत्पन्न झाले आहेत असा विस्मृतलोकविभ्रमः - लोकव्यवहाराला विसरून गेलेला असा नृपतिः - धर्मराजा स्मामलालयं मुकुन्दगात्रं - लक्ष्मीचे रहाण्याचे निर्मळ घरच अशा श्रीकृष्णाच्या शरीराला दोर्भ्यां परिष्वज्य - दोन्ही बाजूंनी आलिंगन देऊन परां निर्वृतिं लेभे - अत्यंत सौख्य मिळविता झाला. ॥२६॥

प्रेमजवाकुलेन्द्रियः भीमः - प्रेमाच्या आवेशाने ज्याची इन्द्रिये व्याकुळ झाली आहेत असा भीम स्मयन् - स्मित हास्य करीत मातुलेयं तं परिरभ्य - मामेभाऊ श्रीकृष्णाला आलिंगन देऊन निर्वृतः (अभवत्) - सुखी झाला यमौ किरीटी च - नकुळ, सहदेव आणि अर्जुन हे मुदा प्रवृद्धबाष्पाः - आनंदाने ज्यांचे अश्रुबिंदु वाढत आहेत असे सुहृत्तमं अच्युतं परिरेभिरे - मित्रश्रेष्ठ अशा श्रीकृष्णाला आलिंगन देते झाले. ॥२७॥

अर्जुनेन परिष्वक्तः - अर्जुनाने आलिंगिलेला यमाभ्यां अभिवादितः - नकुळ व सहदेव यांनी वंदिलेला यथार्हतः - योग्यतेनुसार ब्राह्मणेभ्यः वृद्धेभ्यः च नमस्कृत्य - ब्राह्मण व वृद्ध यांना नमस्कार करून (सर्वैः) मानितः (सः) - सर्वांनी मान दिलेला श्रीकृष्ण कुरुसृञ्जयकैकयान् सूतमागधगन्धर्वान् वंदिनः उपमन्त्रिणः च - कुरु, सृंजय, कैकय, सूत, मागध, गायक, स्तुतिपाठक व उपमंत्री यांना मानयामास - मान देता झाला. ॥२८-२९॥

ब्राह्मणाः च - आणि ब्राह्मण मृदङ्‌गशङखपटहवीणापणवगोमुखैः - मृदंग, शंख, नगारा, वीणा, ढोल व गोमुख ह्या वाद्यांनी अरविन्दाक्षं तुष्टुवुः ननृतुः जगुः - कमलनेत्र श्रीकृष्णाची स्तुति करीत नाचू-गाऊ लागले. ॥३०॥

एवं सुहृद्‌भिः पर्यस्तः - याप्रमाणे मित्रांनी वेष्टिलेला पुण्यश्‍लोकशिखामणिः - पुण्यकीर्ति लोकांमध्ये श्रेष्ठ असा संस्तूयमानः भगवान् - स्तविला जाणारा श्रीकृष्ण अलंकृतं पुरं विवेश - भूषविलेल्या इंद्रप्रस्थ नगरीत शिरला. ॥३१॥

करिणां मदगन्धतोयैः संसिक्तवर्त्म - हत्तींच्या मदाच्या सुगंधयुक्त उदकांनी शिंपिले आहेत रस्ते ज्यातील असे चित्रध्वजैः कनकतोरणपूर्णकुंभैः - चित्रविचित्र पताकांनी व सुवर्णाच्या तोरणांसह असलेल्या जलपूर्ण घटांनी नवदुकूलविभूषणस्नग्गन्धैः - नवीन रेशमी वस्त्रे व अलंकार आणि सुगंधित माळा ही धारण करणार्‍या मृष्टात्मभिः नृभिः युवतिभिः च - शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषांनी व स्त्रियांनी विराजमानं - शोभणारे उद्दीप्तदीपबलिभिः - प्रज्वलित दिव्यांनी व बलिकर्मांनी युक्त असे प्रतिसद्मजालनिर्यातधूपरुचिरं - प्रत्येक घराच्या खिडक्यांतून बाहेर आलेल्या धूपामुळे सुंदर दिसणारे विलसत्पताकं - फडकत आहेत पताका ज्यांत असे मूर्धन्यहेमकलशैः रजतोरुशृंगैः भवनैः जुष्टं - ज्यांच्या मस्तकावर सुवर्णाचे कलश आणि रुप्याची शिखरे आहेत अशा गृहांनी युक्त असे कुरुराजधाम ददर्श - कौरवराज जो युधिष्ठिर त्याचे राजधानीचे नगर पहाता झाला. ॥३२-३३॥

नरलोचनपानपात्रं (तं) प्राप्तं निशम्य - मनुष्यांच्या नेत्राचा आदरपूर्वक अवलोकनाचा विषय असा तो श्रीकृष्ण आला आहे असे ऐकून औत्सुक्यविश्‍लथितकेशदुकूलबन्धाः - औत्कण्ठयाने शिथिल झाले आहेत केसांचे व वस्त्रांचे बंध ज्यांचे अशा युवतयः - तरुण स्त्रिया गृहकर्म - घरांतील कृत्यांना तल्पे पतीन् च - तसेच बिछान्यावर पतींना सद्यः विसृज्य - तत्काळ सोडून देऊन (तं) द्रष्टुं - त्या श्रीकृष्णाला पहाण्यासाठी नरेन्द्रमार्गे ययुः स्म - राजमार्गावर गेल्या. ॥३४॥

गृहाधिरूढाः नार्यः - घरांच्या गच्च्यांवर चढलेल्या स्त्रिया इभाश्वरथद्विपद्‌भिः सुसंकुले तस्मिन् - हत्ती, घोडे, रथ व पायदळ यांनी व्यापिलेल्या त्या राजमार्गावर सभार्यं कृष्णं उपलभ्य - स्त्रियांसह श्रीकृष्णाला पाहून कुसुमैः विकीर्य - पुष्पवृष्टि करून मनसा उपगुह्य - मनाने आलिंगन देऊन उत्स्मयवीक्षितेन सुस्वागतं विदधुः - अत्यंत स्मितहास्ययुक्त अवलोकनाने श्रीकृष्णाचे उत्तम स्वागत करित्या झाल्या. ॥३५॥

स्त्रियः - नागरिक स्त्रिया यथा उडुपसहाः ताराः - जशा चंद्रासह असणार्‍या तारका तशा मुकुन्दपत्‍नीः पथि निरीक्ष्य - श्रीकृष्णाच्या स्त्रियांना मार्गात अवलोकन करून ऊचुः - म्हणाल्या अमूभिः किं (पुण्यं) अकारि - ह्या स्त्रियांनी कोणते पुण्य केले होते बरे यत् - कारण पुरुषमौलिः - पुरुषश्रेष्ठ श्रीकृष्ण उदारहासलीलावलोककलया - सुंदर हास्ययुक्त अशा लीलाकटाक्षांनी (आसाम्) चक्षुषां उत्सवं आतनोति - या स्त्रियांच्या नेत्रांना आनंद देतो. ॥३६॥

मंगलपाणयः हतैनसः - मंगल पदार्थांना धारण करणारे व निष्पाप असे श्रेणीमुख्याः पौराः - निरनिराळ्या पेठांतील मुख्य असे कारागीर लोक तत्र तत्र उपसंगम्य - त्या त्या ठिकाणी एकत्र जमून कृष्णाय सपर्यां चक्रुः - श्रीकृष्णाची पूजा करिते झाले. ॥३७॥

फुल्ललोचनैः अन्तःपुरजनैः - प्रफुल्लित नेत्राच्या स्त्रियांनी ससंभ्रमैः अभ्युपेतः मुकुन्दः - त्वरापूर्वक सत्कारिलेला श्रीकृष्ण प्रीत्या राजमंदिरं प्राविशत् - प्रीतीने राजमंदिरात गेला. ॥३८॥

पृथा - कुंती भ्रात्रेयं त्रिभुवनेश्वरं कृष्णं विलोक्य - भाचा जो त्रैलोक्यपति कृष्ण त्याला पाहून प्रीतात्मा - प्रसन्नचित्त झालेली सस्नुषा - सुनेसह पर्यङ्‌कात् उत्थाय - पलंगावरून उठून (तं) परिषस्वजे - त्याला आलिंगन देती झाली. ॥३९॥

नृपः - धर्मराजा देवदेवेशं गोविंदं गृहं आनीय - मोठमोठया देवांचा अधिपति अशा श्रीकृष्णाला घरी आणून आदृतः प्रमोदोपहतः (भूत्वा) - आदरयुक्त आनंदाने भरून गेलेला असा पूजायां कृत्यं न अविदत् - पूजेतील सविस्तर कृत्य जाणता झाला नाही. ॥४०॥

राजन् - हे राजा कृष्णः - श्रीकृष्ण पितृष्वसुः - आत्या जी कुंती तिला गुरुस्त्रीणां च - आणि वडील स्त्रियांना अभिवादनं चक्रे - नमस्कार करिता झाला स्वयं च - आणि स्वतः कृष्णया भगिन्या च अभिवन्दितः - द्रौपदीकडून व सुभद्रेकडून वंदिला गेला. ॥४१॥

श्वश्र्वा संचोदिता कृष्णा - कुंतीने आज्ञापिलेली द्रौपदी रुक्मिणीं सत्यां भद्रां जाम्बवतीं - रुक्मिणी, सत्यभामा, भद्रा व जांबवती ह्यांना तथा च (इतराः) कृष्णपत्‍नीः - त्याप्रमाणे दुसर्‍या कृष्णस्त्रियांना सर्वशः आनर्च - सर्वप्रकारे पूजिती झाली. ॥४२॥

वासःस्नङ्‌मण्डनादिभिः - वस्त्रे, माळा, व भूषणे यांनी कालिन्दीं मित्रविंदां शैब्यां सतीं नाग्नजितीं च - कालिन्दी, मित्रविंदा, शैब्या, व सती नाग्नजिती ह्यांना याः च अभ्यागताः अन्याः (ताः) - आणि ज्या दुसर्‍या स्त्रिया आल्या होत्या त्यांना. ॥४३॥

सः धर्मराजः - तो धर्मराजा ससैन्यं सानुगामात्यं सभार्यं च जनार्दनं - सैन्य, सेवक, प्रधान आणि पत्‍न्या यांसह श्रीकृष्णाची नवं नवं सुखं निवासयामास - नवीन नवीन रीतीने सुखकारक होईल अशी रहाण्याची व्यवस्था करिता झाला. ॥४४॥

फाल्गुनसंयुतः - अर्जुनासहित असा खांडवेन वह्निं तर्पयित्वा - खांडव वनाने अग्नीला तृप्त करून येन राज्ञे दिव्या सभा कृता - ज्याने धर्मराजासाठी अलौकिक दिव्य सभा निर्माण केली (तं) मयं मोचयित्वा (च) - त्या मयासुराला वणव्यापासून मुक्त करून. ॥४५॥

भटैः वृतः - योद्‌ध्यांनी वेष्टिलेला फाल्गुनेन (सह) - अर्जुनासह रथं आरुह्य विहरन् - रथात बसून विहार करीत राज्ञः प्रियचिकीर्षया कतिचित् मासान् उवास - धर्मराजाचे प्रिय करण्याच्या इच्छेने कित्येक महिने रहाता झाला. ॥४६॥

अध्याय एकाहत्तरावा समाप्त

GO TOP