श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २५ वा - अन्वयार्थ

गोवर्धन धारण -

नृप - हे परीक्षित राजा - सः इंद्रः - तो इंद्र - आत्मनः पूजां - आपली पूजा - विहतां विज्ञाय - भंगलेली जाणून - कृष्णनाथेभ्यः - कृष्ण आहे स्वामी ज्यांचा - नंदादिभ्यः गोपेभ्यः - अशा नंदादिक गोपांवर - चुकोप - क्रुद्ध झाला. ॥१॥

च - आणि - ईशमानी - आपल्याला श्रेष्ठ मानणारा - क्रुद्धः इंद्रः - रागावलेला इंद्र - अंतकारिणां मेघानां - प्रलय करणार्‍या मेघांच्या - सांवर्तकं नाम गणं - सांवर्तक नावाच्या समूहाला - प्राचोदयत् - पाठविता झाला - वाक्यं च आह - आणि म्हणाला. ॥२॥

अहो - अहो - काननौकसां गोपानां - अरण्यात राहणार्‍या गोपांचा - श्रीमदमाहात्म्यं (पश्यत) - संपत्तीच्या गर्वाचा मोठेपणा पहा - ये - जे - मर्त्यं - साधारण मनुष्य - कृष्णं उपाश्रित्य - अशा कृष्णाचा आश्रय धरून - देवहेलनं चक्रुः - मी जो देव त्या माझी अवज्ञा करते झाले. ॥३॥

यथा - ज्याप्रमाणे - आन्वीक्षिकीं विद्यां हित्वा - अध्यात्मविद्येला सोडून - अदृढैः - असमर्थ अशा - कर्ममयैः - कर्मस्वरूपी अशा - नामनौनिभैः क्रतुभिः - केवळ नावाच्या नौकांसारख्या यज्ञांनी - भवार्णवं - भवसमुद्राला - तितीर्षन्ति - तरण्याची इच्छा करितात. ॥४॥

वाचालं - बडबड करणार्‍या - बालिशं स्तब्धं - पोरकट व उद्धट - अज्ञं पंडितमानिनं - अज्ञानी व आपल्याला ज्ञानी मानणार्‍या - मर्त्यं कृष्णमं उपाश्रित्य - मनुष्य जो कृष्ण त्याचा आश्रय करुन - मे अप्रियं चक्रुः - माझे अप्रिय करते झाले. ॥५॥

श्रिया अवलिप्तानां - संपत्तीने मत्त झालेल्या - कृष्णेन आध्मायितात्मनां - कृष्णाने भारून टाकिले आहे मन ज्यांचे अशा - एषां - या गोपांचा - श्रीमदस्तभं धुनुत - संपत्तीच्या मदाने आलेला गर्व नाहीसा करा - पशून् संक्षयं नयत - पशूंना नाशाप्रत न्या. ॥६॥

अहं च - आणि मी - नंदगोष्ठजिघांसया - नंदाच्या गौळवाड्याचा नाश करण्याच्या इच्छेने - ऐरावतं नागं आरुह्य - ऐरावत नावाच्या हत्तीवर बसून - महावीर्यैः मरुद्‌गणैः - महापराक्रमी अशा देवगणांसह - व्रजं अनुव्रजे - लगेच गोकुळात येतो. ॥७॥

इत्थं - याप्रमाणे - मघवता आज्ञप्ताः - इंद्राने आज्ञा दिलेले - निर्मुक्तबंधनाः मेघाः - व बंधनापासून मुक्त केलेले मेघ - ओजसा - जोराने - आसारैः - सरींनी - नंदगोकुलं पीडयामासुः - नंदाच्या गोकुळाला त्रस्त करिते झाले. ॥८॥

विद्युद्‌भिः विद्योतमानाः - विजांनी प्रकाशणारे - स्तनयित्‍नुभिः स्तनंतः - वज्राघातांनी गर्जणारे - तीव्रैः मरुद्‌गणैः नुन्नाः (ते) - भयंकर वार्‍यांनी प्रेरित असे ते मेघ - जलशर्कराः ववृषुः - गारांचा वर्षाव करिते झाले. ॥९॥

अभीक्ष्णशः - एकसारख्या - अभ्रेषु स्थूणास्थूलाः - मेघ मुसळासारख्या जाड - वर्षधाराः मुञ्चत्सु - पर्जन्यधारा सोडीत असता - जलौघैः प्लाव्यमाना भूः - पाण्याच्या लोटांनी बुडू लागलेली पृथ्वी - नतोन्नतं न अदृश्यत - उंचसखल अशी दिसेना. ॥१०॥

अत्यासारातिवातेन - अतिशय जोराच्या पर्जन्याने व सोसाटयाच्या वार्‍याने - जातवेपनाः पशवः - उत्पन्न झाले आहे कापरे ज्यांना असे पशू - शीतार्ताः - आणि थंडीने कुडकुडलेले - गोपाः गोप्यः च - गोप व गोपी ही - गोविंदं शरणं ययुः - कृष्णाला शरण गेली. ॥११॥

आसारपीडिताः गावः - पावसाच्या सरीने पीडिलेल्या गाई - शिरः सुतान् च - डोके व वासरे यांना - कायेन प्रच्छाद्य - शरीराने आच्छादून - वेपमानाः - कापत - भगवतः पादमूलं उपाययुः - कृष्णाच्या चरणाजवळ आल्या. ॥१२॥

कृष्ण कृष्ण महाभाग - हे कृष्णा, हे उदार कृष्णा - प्रभो भक्तवत्सल - हे समर्था, हे भक्तांवर दया करणार्‍या - गोकुलं - गोकुळ हे - त्वन्नाथं (अस्ति) - तू आहे स्वामी ज्याचा असे आहे - कुपितात् देवात् - रागावलेल्या इंद्रापासून - नः त्रातुं अर्हसि - आमचे रक्षण करण्यास तू समर्थ आहेस. ॥१३॥

भगवान् हरिः - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न कृष्ण - शिलावर्षनिपातेन - गारांच्या वर्षावाने - हन्यमानं (गोकुलं) - मरणोन्मुख झालेले गोकुळ - अचेतनं निरीक्ष्य - निश्चेष्ट झालेले पाहून - अपर्तुअत्युल्बणं - अकाली होणार्‍या अत्यंत भयाण अशा - अतिवातं - व ज्यामध्ये सोसाटयाचा वारा आहे - शिलामयं वर्षं - व अतिशय गारा पडत आहेत अशा पर्जन्याला - कुपितेन्द्रकृतं मेने - कोपलेल्या इंद्राची करणी मानिता झाला - अस्माभिः - आम्हांकडून - स्वयागे निहते - आपला यज्ञभंग झाला असल्यामुळे - इंद्रः (अस्माकम्) - इंद्र आमचा - नाशाय वर्षति - नाश करण्याकरिता पर्जन्य पाडीत आहे. ॥१४-१५॥

तत्र आत्मयोगेन - तेव्हा आता स्वतःच्या योगबलाने - सम्यक् प्रतिविधिं साधये - चांगल्या रीतीचा प्रतिकार योजीन - मौढयात् - अज्ञानाने - लोकेशमानिनां (देवानाम्) - आपणच जगाचे स्वामी आहो असे मानणार्‍या देवांचा - श्रीमदं - संपत्तीच्या गर्वाने आलेला - तमः हरिष्ये - तमोगुण हरण करीन. ॥१६॥

सद्‌भावयुक्तानां सुराणां - सद्‌भावाने युक्त अशा देवांना - ईशविस्मयः नहि - आपण ईश्वर आहो असा गर्व नसता - असतां मत्तः मानभंगः - दुर्जनांची माझ्याकडून होणारी मानहानी - प्रशमाय उपकल्पते - शांतीकरिताच असते. ॥१७॥

तस्मात् - याकरिता - मच्छरणं - मी ज्यांचा आधार आहे, - मन्नाथं - मी ज्यांचा स्वामी आहे - मत्परिग्रहं - व माझा ज्यांच्यावर अनुग्रह झाला आहे अशा - गोष्ठं - गोकुळाचे - स्वात्मयोगेन गोपाये - आपल्या योगसामर्थ्याने रक्षण करितो - सः अयं - तो हा - मे व्रतः आहितः - माझा संकल्पच केलेला आहे. ॥१८॥

इति उक्त्वा - असे बोलून - एकेन हस्तेन - एका हाताने - गोवर्धनाचलं कृत्वा - गोवर्धनपर्वत उचलून - बालकः कृष्णः - अल्पवयी कृष्ण - छन्नाकं इव - छत्रीच्या झाडाप्रमाणे - पर्वतम् लीलया दधार - पर्वताला लीलेने धरिता झाला. ॥१९॥

अथ - नंतर - भगवान् - भगवान - गोपान् (गोपीःच) आह - गोपांना व गोपींना म्हणाला - हे अंब - हे माते - तात - हे ताता - व्रजौकसः - हे गोकुलवासी हो - सगोधनाः - गाईंसह - यथोपजोषं - सोईप्रमाणे - गिरिगर्तं विशत - पर्वताखाली शिरा. ॥२०॥

इह - याठिकाणी - यद्धस्ताद्रिनिपातने - माझ्या हातांतून पर्वत पडेल अशाविषयी - वः त्रासः न कार्यः - तुम्ही भीति बाळगू नका - वातवर्षभयेन अलं - वारा व पाऊस ह्यापासून भीति दूर करा - तत् वः त्राणं - ते आमचे त्यापासून रक्षण - विहितं - झाले आहे. ॥२१॥

तथा - त्याप्रमाणे - कृष्णाश्वासितमानसाः - कृष्णाने ज्यांच्या मनाला धीर दिला आहे असे - सधनाः सोपजीविनः - धनासह, परिवारासह आणि गाडे आदिकरून - सव्रजाः (गोपाः) - गोकुळांतील वस्तूंसह ते गोप - यथावकाशं गर्तं विविशुः - जागा मिळाली त्याप्रमाणे पर्वताखाली शिरले.॥२२॥

तैः व्रजवासिभिः - त्या व्रजवासी जनांनी - क्षुत्तृड्‌व्यथां - भूक व तहान याची पीडा - सुखापेक्षां (च) हित्वा - व सुखाची इच्छा सोडून - वीक्ष्यमाणः (कृष्णः) - पाहिला जाणारा कृष्ण - सप्ताहं अद्रिं दधौ - सात दिवस पर्वत धरिता झाला - पदात् न अचलत् - एक पाऊलहि हालला नाही. ॥२३॥

अतिविस्मितः इंद्र - अत्यंत आश्चर्यचकित झालेला इंद्र - तं कृष्णयोगानुभावं निशम्य - ते कृष्णाचे योगसामर्थ्य पाहून - भ्रष्टसंकल्पः - ज्याची प्रतिज्ञा भग्न झाली आहे - निस्तंभः (भूत्वा) - व गेला आहे अभिमान ज्याचा असा होऊन - स्वान मेघान् संन्यवारयत् - आपल्या मेघांना निवारिता झाला. ॥२४॥

गोवर्धनधरः (कृष्णः) - गोवर्धन पर्वत धारण करणारा कृष्ण - खं व्यभ्रं - आकाश निरभ्र - उदितादित्यं (दृष्टवा) - व उगवला आहे सूर्य ज्यात असे पाहून - दारुणं वातवर्षं च - आणि भयंकर वारा व पर्जन्य - उपरतं निशाम्य - नाहीसा झाला असे पाहून - गोपान् अब्रवीत् - गोपांना म्हणाला. ॥२५॥

सस्त्रीधनार्भकाः गोपाः - स्त्रिया, धन व बालके यांसह हे गोपहो - निर्यातत्रासं त्यजत - बाहेर पडा आणि दुःख टाकून द्या - वातवर्षं उपारतं - वारा व पर्जन्य नाहीसा झाला - निमग्नाः च - व नद्या गेले आहे पाणी ज्यातून - व्युदप्रायाः - अशा बहुतेक झाल्या. ॥२६॥

ततः शनैः ते गोपाः - नंतर हळुहळु ते गोप - स्त्रीबालस्थविराः च - स्त्रिया, मुले व वृद्ध मनुष्ये - स्वं स्वं गोधनं - आपआपल्या गाई - शकटोढोपकरणं (च) - व गाडयांनी वाहण्याजोगे - आदाय - सर्व साहित्य घेऊन - निर्ययुः - बाहेर पडले - प्रभुः भगवान् अपि - कृष्ण भगवान सुद्धा - सर्वभूतानां पश्यतां - सर्व लोक पाहत असता - लीलया - सहज रीतीने - तं शैलं - त्या पर्वताला - स्वस्थाने - त्याच्या मूळस्थानावर - स्थापयामास - ठेविता झाला. ॥२७-२८॥

प्रेमवेगान् - प्रेमाच्या प्रवाहाने - निभृताः व्रजौकसः - पूर्ण भरलेले गोकुळवासी लोक - परिरंभणादिभिः - आलिंगनादिकांनी - तम् यथा (वत्) समीयुः - त्या कृष्णाला यथोचित भेटले - गोप्यः च - आणि गोपी - (तं) मुदा - त्याला हर्षाने - सस्नेहं अपूजयन् - व प्रेमाने पूजित्या झाल्या - दध्यक्षताद्‌भिः (च) - व दही, तांदूळ व जल यांनी - सदाशिषः युयुजुः - चांगले आशीर्वाद देत्या झाल्या. ॥२९॥

यशोदा रोहिणी नंदः - यशोदा, रोहिणी व नंद - बलिनां वरः रामः च - तसाच बलवानात श्रेष्ठ असा राम - स्नेहकातराः - प्रेमाने उत्सुक असे - कृष्णम् आलिंग्य - कृष्णाला आलिंगन देऊन - आशिषः युयुजुः - आशीर्वाद देते झाले. ॥३०॥

पार्थिव - हे परीक्षित राजा - दिवि - स्वर्गात - देवगणाः - देवसमूह - साध्याः - तसेच साध्य - सिद्धगंधर्वचारणाः (च) - आणि सिद्ध, गंधर्व, चारण हे - तुष्टुवुः - स्तुती करते झाले - तुष्टाः च - व संतोषित होत्साते - वर्षाणि मुमुचुः - पुष्पवृष्टि करते झाले.॥३१॥

नृप - हे परीक्षित राजा - दिवि - स्वर्गात - देवप्राणोदिताः शंखदुंदुभयः - देवांनी प्रेरिलेले शंख व दुंदुभी - नेदुः - वाजू लागले - तुंबरुप्रमुखाः - तुंबरु मुख्य आहे ज्यात - गंधर्वपतयः जगुः - असे मोठे गंधर्व गाउ लागले. ॥३२॥

राजन् - हे राजा - ततः - नंतर - अनुरक्तैः - कृष्णावर प्रेम करणार्‍या - पशुपैः परिश्रितः - गोपांनी वेष्टिलेला - सबलः सः हरिः - बलरामासह तो श्रीकृष्ण - गोष्ठं अव्रजत् - गोकुळात गेला - मुदिताः गोपिकाः (च) - आणि आनंदित झालेल्या गोपिकाहि - अस्य (कृष्णस्य) - त्या कृष्णाची - हृदिस्पृशः - हृदयाला चटका लावणारी - तथाविधानि कृतानि - तशाप्रकारची कृत्ये - गायन्त्यः - गायन करीत - ईयुः - गोकुळात गेल्या. ॥३३॥

अध्याय पंचविसावा समाप्त

GO TOP