|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २० वा - अन्वयार्थ
वर्षा आणि शरद ऋतूंचे वर्णन - गोपाः - गोप - आत्मनः दावाग्नेः मोक्षं - आपली वणव्यातून मुक्तता - प्रलंबवधं एव च - आणि तसेच प्रलंबासुराचा वध - इति - अशा प्रकारचे - तयोः तत् अद्भुतं कर्म - त्या बलराम व श्रीकृष्ण ह्या दोघांचे ते विलक्षण कर्म - स्त्रीभ्यः समाचख्युः - स्त्रियांना सांगते झाले. ॥१॥ गोपवृद्धाः गोप्यः च - म्हातारे गोप व गोपी - तत् उपाकर्ण्य - ते श्रवण करून - विस्मिताः - आश्चर्यचकित झाल्या - च - आणि - कृष्णरामौ - कृष्ण व बलराम - व्रजं गतौ - यांना गोकुळात अवतरलेले - देवप्रवरौ मेनिरे - देवश्रेष्ठ मानिते झाले. ॥२॥ ततः - नंतर - सर्वसत्त्वसमुद्भवा - सर्व प्राण्यांच्या जीवनांचे उगमस्थान असा - विद्योतमानपरिधिः प्रकाशमान खळी पडत आहेत ज्यात - विस्फुर्जितनभस्तला प्रावृट् - व मेघांच्या गडगडाटाने युक्त आहे आकाश ज्यात असा वर्षाकाल - प्रावर्तत - प्राप्त झाला. ॥३॥ सविद्युत्स्तनयित्नुभिः - विजांच्या गडगडाटांनी युक्त - सान्द्रनीलांबुदैः आच्छन्नं - अशा निळ्या मेघांनी व्याप्त असे - अस्पष्टज्योतिः व्योमः - स्पष्ट नाहीत तेजोगोल ज्यातील असे आकाश - सगुणं ब्रह्म इव - गुणयुक्त ब्रह्माप्रमाणे - बभौ - शोभले. ॥४॥ यत् - जे - भूम्याः - भूमीचे - उदमयं वस्तु - उदकरूपी द्रव्य - अष्टौ मासान् - आठ महिने - स्वगोभिः - आपल्या किरणांनी - पीतम् - प्याले गेले - तत् - ते - पर्जन्यः - पावसाची देवता - काले आगते - योग्यकाळ आला असता - मोक्तुं आरेभे - सोडण्याचा आरंभ करिती झाली. ॥५॥ तडिद्वंतः - विजांनी युक्त - चंडश्वसनवेपिताः - व वार्याच्या सोसाटयाने कंपित होणारे - महामेघाः हि - प्रचंड मेघसुद्धा - अस्य प्रीणनं जीवनं - ह्या जगाचे प्राणरूपी जल - करुणाः इव मुमुचुः - कृपाळु होऊनच की काय वर्षते झाले. ॥६॥ यथा एव - ज्याप्रमाणे - काम्यतपसः तनुः - काही हेतूने तपश्चर्या करणार्याचे शरीर - तत्फलं - त्या तपश्चर्येचे फळ - संप्राप्य - प्राप्त झाल्यावर पुष्ट होते त्याप्रमाणे - तपःकृशा मही - ग्रीष्म काळाने कृश झालेली पृथ्वी - देवमीढा वर्षीयसी आसीत् - पर्जन्य पडल्यामुळे पुष्ट झाली. ॥७॥ यथा कलौ युगे - ज्याप्रमाणे कलियुगात - पापेन पाखंडाः (दृश्यन्ते) - पापामुळे पाखंडवाद दृष्टीस पडतात - वेदाः नहि - वेद दृग्गोचर होत नाहीत - तथा - त्याप्रमाणे - तमसा निशामुखेषु - मेघाच्या दाट छायेने संध्याकाळी - खद्योताः भांति - काजवे प्रकाशत होते - ग्रहाः न (भान्ति) - ग्रह दिसत नव्हते. ॥८॥ यद्वत् नियमावसाने - ज्याप्रमाणे नित्यकर्माच्या शेवटी - ब्राह्मणाः (अधीयते तथा) - ब्राह्मण वेदाध्ययन करितात त्याप्रमाणे - प्राक् तूष्णीं शयानाः - पूर्वी स्वस्थ निजून राहिलेले - मंडूकाः - बेडूक - पर्जन्यनिनदं श्रुत्वा - मेघनाद श्रवण करून - गिरः व्यसृजन् - शब्द करते झाले. ॥९॥ यथा अस्वतन्त्रस्य पुंसः - ज्याप्रमाणे स्वतःच्या आधीन नसलेल्या पुरुषाला - देहद्रविणसंपदः - शरीर, संपत्ति व धन - उत्पथगामिनः कुर्वन्ति तथा - वाईट मार्गाकडे नेतात त्याप्रमाणे - अनुशुष्यतीः क्षुद्रनद्यः - सुकून गेलेल्या बारीकसारीक नद्या - उत्पथवाहिन्यः आसन् - आपल्या मर्यादेच्या बाहेर वाहणार्या झाल्या. ॥१०॥ हरिभिः शष्पैः हरिता - हिरव्या कोवळ्या गवतांनी हिरवीगार झालेली - च इंद्रगोपैः - आणि इंद्रगोप नामक - च लोहिताः - किडयांनी तांबडी झालेली - उच्छिलीन्ध्रकृत - अलभी नावाच्या छत्राकार वनस्पतींनी केली आहे - छाया भूः - छाया जीवर अशी पृथ्वी - नृणां श्रीः इव अभूत् - राजांच्या वैभवाप्रमाणे झाली. ॥११॥ क्षेत्राणि - शेते - सस्यसंपद्भिः - धान्याच्या विपुलतेमुळे - कर्षकाणां मुदं ददुः - शेतकर्यांना आनंद देती झाली - सर्वं च दैवाधीनं - आणि सर्व दैवाधीन आहे - अजानतां धनिनां - हे न जाणणार्या धनिक लोकांना - उपतापं (ददुः) - संताप देती झाली. ॥१२॥ यथा हरिनिषेवया - जसे परमेश्वराच्या सेवेने - सर्वे जलस्थलौकसः - पाण्यात व जमिनीवर राहणारे सर्व प्राणी - नववारिनिषेवया - नूतन उदकाच्या सेवनाने - रुचिरं रूपं अबिभ्रत् - सुंदर रूप धारण करते झाले. ॥१३॥ यथा अपक्वयोगिनः चित्तं - ज्याप्रमाणे अपूर्ण आहे योग ज्याचा अशाचे चित्त - कामाक्तं - भोगाच्या इच्छेने थबथबलेले - गुणयुक् (च भवति) - व विषयांच्या विचाराने युक्त असते - सरिद्भिः संगतः सिंधुः - नद्यांनी युक्त असा समुद्र - श्वसनोर्मिमान् (भूत्वा) - वार्यामुळे भयंकर लाटांनी युक्त होऊन चुक्षुभे - क्षुब्ध झाला. ॥१४॥ यथा अधोक्षजचेतसः - ज्याप्रमाणे परमेश्वराकडे आहे मन ज्यांचे असे - व्यसनैः - व्यसनांनी - अभिभूयमानाः - पराजित केलेले असताहि - (न व्यथन्ते) - व्यथित होत नाहीत - वर्षधाराभिः हन्यमानाः गिरयः - पर्जन्यांच्या धारांनी ताडिलेले पर्वत - न विव्यथुः - पीडित झाले नाहीत. ॥१५॥ द्विजैः न अभ्यस्यमानाः - ब्राह्मणांकडून अध्ययन न झाल्यामुळे - (अतः एव) कालहताः श्रुतयः इव - कालाने नष्टप्राय झालेल्या वेदांप्रमाणे - असंस्कृताः (अतः एव) - न वहिवाटल्यामुळे म्हणून - तृणैः छन्नाः मार्गाः - गवताने झाकून गेलेले रस्ते - संदिग्धाः वै बभूवुः - खरोखर अस्पष्ट झाले. ॥१६॥ लोकबंधुषु मेघेषु - जनांचे मित्र अशा मेघांच्या ठिकाणी - चलसौहृदः विद्युतः - चंचल आहे मित्रत्व ज्याचे अशा विजा - कामिन्यः - जशा वेश्या - गुणिषु पुरुषेषु इव - गुणी पुरुषांच्या ठिकाणी त्याप्रमाणे - स्थैर्यं न चक्रुः - स्थिरपणा ठेवित्या झाल्या नाहीत. ॥१७॥ च - आणि - यथा - ज्याप्रमाणे - गुणव्यतिकरे व्यक्ते - गुणांच्या मिश्रणाने युक्त अशा प्रपंचाच्या ठिकाणी - अगुणवान् पुरुषः (भाति) - निर्गुण पुरुष प्रकाशतो - गुणिनि वियति - मेघगर्जनारूप गुणांनी युक्त आकाशात - निर्गुणं माहेंद्रं - ज्याला दोरी नाही असे - धनुः अभात् - इंद्रधनुष्य प्रकाशित झाले. ॥१८॥ यथा पुरुषः - ज्याप्रमाणे जीव - स्वभासा - आपल्या चैतन्यानेच - भासितया अहंमत्या - प्रकाशित होणार्या अहंकाराने - तथा - त्याप्रमाणे - स्वज्योत्स्नाराजितैः घनैः - आपल्या चांदण्याने प्रकाशमान अशा मेघांनी - छन्नः उडुपः - आच्छादलेला नक्षत्रांचा स्वामी चंद्र - न रराज - शोभला नाही. ॥१९॥ यथा - ज्याप्रमाणे - गृहेषु तप्ताः निर्विण्णाः - संसारतापाने तप्त झालेले दुःखी पुरुष - अच्युतजनागमे - परमेश्वराच्या भक्तांचा समागम झाला असता - तथा - त्याप्रमाणे - शिखंडिनः - मोर - मेघागमोत्सवाः - मेघांचे आगमन हाच आहे आनंदाचा प्रसंग ज्यांचा - हृष्टाः प्रत्यनंदन् - असे हर्षित झालेले आनंद करिते झाले. ॥२०॥ यथा प्राक् क्षामाः - ज्याप्रमाणे पूर्वी क्षीण असलेले - तपसा श्रांताः - तपश्चर्येने थकलेले पुरुष - कामानुसेवया - विषयसेवनाने - तथा - तसे - पादपाः - वृक्ष - पद्भिः अपः पीत्वा - मुळांनी पाणी पिऊन - नानात्ममूर्तयः आसन् - नानाप्रकारची स्वरूपे धारण करणारे झाले.॥२१॥ अङग - हे परीक्षित राजा - सारसाःअपि - चक्रवाक पक्षीही - अशांतरोधस्सु - चिखल व काटयांनी भरलेली आहेत तीरे ज्यांची - सरस्सु - अशा सरोवरांच्या ठिकाणी - दुराशयाः ग्राम्याः - दुष्ट अंतःकरणाचे क्षुद्र लोक - अशांत कृत्येषु - घोर आहेत कृत्ये जेथे - गृहेषु इव - अशा घरात ज्याप्रमाणे राहतात त्याप्रमाणे - न्यूषुः - आसक्त होऊन राहिले. ॥२२॥ यथा कलौ - ज्याप्रमाणे कलियुगात - पाखंडिनां असद्वादैः - पाखंडयांच्या मिथ्यावादांनी - वेदमार्गाः - श्रृतिदर्शित मार्ग - ईश्वरे वर्षति - इंद्र पर्जन्य पाडीत असता - जलौघैः - पाण्याच्या लोटांनी - सेतवः निरभिद्यन्त - पूल मोडून गेले.॥२३॥ अथ यथा विश्पतयः - शिवाय ज्याप्रमाणे राजे लोक - काले काले - वेळोवेळी - द्विजेरिताः आशिषः - ब्राह्मणांनी उच्चारिलेल्या इच्छा - वायुभिः नुन्नाः मेघाः - वार्यांनी प्रेरिलेले मेघ - भूतेभ्यः अमृतं व्यमुञ्चन् - प्राण्यांना जल देते झाले. ॥२४॥ गोगोपालैः वृतः - गाई व गोपाळ यांनी वेष्टित असा - सबलः हरिः - बळरामासहित श्रीकृष्ण - एवं वरिष्ठं - याप्रमाणे समृद्ध अशा - पक्वखर्जूरजम्बुमत् - पिकलेला खजूर व जांभळे यांनी युक्त - तत् वनं - अशा त्या वनात - रंतुं प्राविशत् - खेळण्याकरिता शिरला. ॥२५॥ भगवता आहूताः - श्रीकृष्णाने हाक मारिलेल्या - भूयसा ऊधोभारेण - पुष्ट असलेल्या कांसेच्या भाराने - मंदगामिन्यः धेनवः - हळूहळू चालणार्या गाई - प्रीत्या स्त्रुतस्तनीः - आनंदाने ज्यांच्या स्तनांतून दूध पडत आहे अशा, - द्रुतं ययुः - त्वरेने गेल्या ॥२६॥ प्रमुदिताः वनौकसः - आनंदित झालेले अरण्यवासी लोक - मधुच्युतः वनराजीः - ज्यातून मध गळत आहे अशा वृक्षांच्या राई - गिरेः जलधाराः - पर्वतावरून पाडणारे पाण्याचे धबधबे - (तासां) नादान् - त्यांचा शब्द - आसन्नाः गुहाः (च) - आणि जवळ असणार्या गुहा - ददृशे - पहाता झाला ॥२७॥ कंदमूलफलाशनः भगवान् - कंद, मुळे, व फळे भक्षण करणारा श्रीकृष्ण - क्वचित् वनस्पतिक्रोडे - केव्हा वृक्षांच्या झुडुपात - देवे अभिवर्षति च - आणि पाऊस पडत असता - गुहायां - गुहेत - निर्विश्य - शिरून - रेमे - क्रीडा करिता झाला ॥२८॥ संकर्षणान्वितः - बळरामासह कृष्ण - समानीतं दध्योदनं - आणलेला दहीभात - सलिलांतिके शिलायां - पाण्याच्या जवळ दगडावर - संभोजनीयैः - बरोबर जेवण्यास योग्य अशा - गोपैः बुभुजे - गोपांसह जेवता झाला ॥२९॥ शाद्वलोपरिसंविश्य - गवतावर बसून - मीलितेक्षणं चर्वतः - डोळे मिटून रवंथ करणार्या - वृषान् वत्सतरान् - बैलांना व वासरांना - तृप्तान् (दृष्ट्वा) - संतुष्ट पाहून - स्वोधोभरश्रमाः गाः च - व आपल्या पुष्ट स्तनांच्या भाराने श्रमित होणार्या गाईंना - तृप्ताः (वीक्ष्य) - तृप्त झालेल्या पाहून ॥३०॥ च - आणि - सर्वभूतमुदावहां - सर्व प्राण्यांना आनंद देणार्या - आत्मशक्त्युपबृंहितां - आणि स्वतःच्या शक्तीने वर्धित अशा - तां प्रावृटश्रियं वीक्ष्य - त्या वर्षाकालच्या शोभेला पाहून - (तां) पूजयांचक्रे - तिचा गौरव करिता झाला ॥३१॥ एवं - याप्रमाणे - तस्मिन् व्रजे - त्या गोकुळात - रामकेशवयोः निवसतोः - बळराम व श्रीकृष्ण रहात असता - व्यभ्रा - नाहीसे झाले असे मेघ ज्यातून असा - रवच्छाम्ब्वपरुषानिला - स्वच्छ आहेत उदके ज्यातील असा व शांत आहे वायु ज्यातील असा - शरत् समभवत् - शरत्काल प्राप्त झाला ॥३२॥ नीरजोत्पत्त्या शरदा - कमळांची आहे उत्पत्ति ज्यात अशा शरद् ऋतूमुळे - पुनः योगनिषेवया - पुनरपि योगाचे सेवन केल्याने - भ्रष्टानां चेतांसि इव - योगभ्रष्ट झालेल्यांची मने जशी तशी - नीराणि प्रकृतिं ययुः - उदके आपल्या मूळच्या स्वच्छ स्वरुपाला प्राप्त झाली ॥३३॥ व्योम्नः अब्दं - आकाशातील मेघ - भूतशाबल्यं - वस्तूंवरील मळ - भुवः पङ्कं - पृथ्वीवरील चिखल - अपां मलं - पाण्याचा मल - शरत् जहार - शरद् ऋतु नाहीसे करता झाला - यथा - ज्याप्रमाणे - कृष्णे भक्तिः - कृष्णाविषयीची भक्ति - आश्रमिणां - ब्रह्मचर्यादि आश्रमांत वागणार्यांचे - अशुभं (हरति) - पाप नाहीसे करते ॥३४॥ यथा त्यक्त्यैषणाः - ज्याप्रमाणे सर्व इच्छा टाकून दिलेले - शांताः - शांत चित्ताचे - मुक्तकिल्बिषाः - व ज्यांची पापे नाहीशी झाली आहेत - मुनयः - असे मुनि - (तथा) - त्याप्रमाणे - जलदाः सर्वस्वं हित्वा - मेघ आपले सर्वस्व टाकून - शुभ्रवर्चसः विरेजुः - स्वच्छ कांतीने युक्त असे शोभले ॥३५॥ यथा ज्ञानिनः - ज्याप्रमाणे ज्ञानी लोक - काले ज्ञानामृतं ददते - योग्य काळी ज्ञानामृत देतात - न वा (सर्वदा) - नेहमी देत नाहीत - गिरयः - पर्वत - क्वचित् शिवं - कोठे कोठे स्वच्छ - तोयं मुमुचुः - पाणी सोडिते झाले. ॥३६॥ यथा - ज्याप्रमाणे - कुटुंबिनः मूढाः नराः - गृहस्थाश्रमी अज्ञानी लोक - अन्वहं क्षय्यं आयुः - दररोज क्षीण होणारे आयुष्य - तथा - त्याप्रमाणे - गाधजलेचराः - थोड्या पाण्यात संचार करणारे जीव - क्षीयमाणं जलं - आटत चाललेले पाणी - न एव अविंदन् - जाणू शकले नाहीत. ॥३७॥ यथा अविजितेंद्रियः - ज्याप्रमाणे इंद्रियनिग्रह न केलेला - कुटुंबी कृपणः दरिद्रः - प्रपंच करणारा दुःखी व दरिद्री मनुष्य - गाधवारिचराः - थोड्या पाण्यात संचार करणारे जीव - शरदर्कजं तापं अविन्दन् - शरत्कालीन सूर्याच्या तापाला प्राप्त झाले. ॥३८॥ यथा धीराः - ज्याप्रमाणे धैर्यशाली पुरुष - अनात्मसु शरीरादिषु - ज्यामध्ये सत्त्व नाही अशा शरीरादिकांवरील - अहंममतां (जहति) - अहंकार व माझेपणा हे सोडतात - तथा - त्याप्रमाणे - शनैः शनैः - हळू हळू - स्थलानि पङ्कं - भूमि चिखलाला - विरुधः च - आणि वनस्पति - आमं जहुः - अपक्वपणाला टाकून देत्या झाल्या. ॥३९॥ आत्मनि - आत्म्याच्या ठिकाणी - सम्यक् उपरते - उत्तम प्रकारे विरक्तता उत्पन्न झाली असता - व्युपरतागमः मुनिः - संपूर्ण वैदिक क्रिया टाकून दिलेला मुनि - निश्चलः भवति - स्तब्ध होतो - शरदागमे - शरत्काल प्राप्त झाला असता - निश्चलांबुः समुद्रः - स्थिर आहे पाणी ज्यातील असा समुद्र - तूष्णीं अभूत् - शांत झाला. ॥४०॥ यथा योगिनः - ज्याप्रमाणे योगी लोक - तन्निरोधेन - इंद्रिय निग्रहाच्या योगाने - प्राणैः स्त्रवत् ज्ञानं - इंद्रियांच्या द्वारा गळून जाणारे ज्ञान - कर्षकाः तु - शेतकरी लोकही - दृढसेतुभिः - बळकट अशा धरणांनी - केदारेभ्यः अपः अगृहणन् - शेतांना पाणी घेते झाले. ॥४१॥ उडुपः - चंद्र - भूतानां शरदर्कांशुजान् तापान् - शरत्कालीन सूर्यापासून होणार्या तापांना - अहरत् - हरता झाला - बोधः मुकुंदः - ज्ञानस्वरुप श्रीकृष्ण - व्रजयोषितां - गोकुळवासी स्त्रीजनांचा - देहाभिमानजं - देहाच्या अभिमानापासून उत्पन्न होणारा - (तापं अहरत्) - ताप हरण करिता झाला. ॥४२॥ यथा शब्दब्रह्मार्थदर्शनं - ज्याप्रमाणे वेदाच्या योग्य अर्थाचे ज्ञान ज्याला झाले आहे असे - सत्त्वयुक्तं चित्तं - सत्त्वगुणाने युक्त असे चित्त - तथा - त्याप्रमाणे - निर्मेघं खं - मेघरहित आकाश - शरद्विमलतारकं - शरत्कालातील स्वच्छ नक्षत्रांनी युक्त - अशोभत - असे शोभले. ॥४३॥ यथा वृष्णिचक्रावृतः - ज्याप्रमाणे यादवांच्या समुदायाने वेष्टिलेला - यदुपति कृष्णः - यादवांचा स्वामी श्रीकृष्ण - भुवि - पृथ्वीवर - तथा - त्याप्रमाणे - अखण्डमण्डलः शशी - पूर्ण आहे बिंब ज्याचे असा चंद्र - उडुगणैः व्योम्नि रराज - नक्षत्रगणांसह आकाशात शोभला. ॥४४॥ समशीतोष्णं - समान आहे शीत व उष्ण ज्यात - प्रसूनवनमारुतं - असा फुलझाडांच्या समुदायावरून येणारा वायू - आश्लिष्य - सेवन करून - जनाः तापं जहुः - लोक आपला संताप दूर करिते झाले - कृष्णह्रतचेतसः - पण कृष्णाने हरण केले आहे मन ज्यांचे अशा - गोप्यः (तु) न - गोपी ताप दूर करित्या झाल्या नाहीत ॥४५॥ शरदा - शरत्कालामुळे - पुष्पिण्यः - गर्भ धारणाला पात्र अशा - गावः - गाई - मृगाः - हरिणी - खगाः - पक्ष्यांच्या माद्या - नार्यः - मनुष्यांच्या स्त्रिया - ईशक्रियः - ईश्वराराधनरूप क्रिया जशा - फलैः इव - आपल्या फलांनी तशा - स्ववृषैः - आपल्या पतीकडून - अन्वीयमानाः अभवन् - अनुसरल्या गेलेल्या अशा झाल्या ॥४६॥ नृप - हे परीक्षित राजा - यथा तु राज्ञा - ज्याप्रमाणे राजाच्या योगाने - दस्यून्विना लोकाः - चोरांशिवाय इतर लोक - निर्भयाः (भवन्ति) - निर्भय होतात - (तथा) सूर्योत्थाने - त्याप्रमाणे सूर्योदय झाला असता - कुमुद्विना वारिजानि - कुमुद नावाच्या कमलाशिवाय इतर कमळे - उदह्रष्यन् - प्रफुल्लित झाली ॥४७॥ पुरग्रामेषु आग्रयणैः - नगरे व खेडी यांत - ऐन्द्रियैः च महोत्सवैः - नवान्नप्राशन व इतर लौकिक महोत्सवामुळे - हरेः च कलाभ्यां - व परमेश्वराचे अंश अशा रामकृष्णांच्या योगाने - पक्कसस्याढ्या भूः - पिकलेल्या धान्याने भरलेली अशी भूमी - नितरांबभौ - फारच शोभली ॥४८॥ यथा - ज्याप्रमाणे - वर्षरुद्धाः सिद्धाः - आयुष्यामुळे अडकून पडलेले सिद्ध लोक - काले आगते - योग्य वेळ आली असता - स्वपिण्डान् - आपल्याला योग्य अशा देवादिकाच्या देहांना - प्रपद्यन्ते तथा - प्राप्त होतात त्याप्रमाणे - वणिङ्मुनि - वाणी, संन्यासी, - नॄपस्त्राताः - राजे व ब्रह्मचारी इत्यादि लोक - निर्गम्य - बाहेर पडून - अर्थान् - व्यवहारांना - प्रपेदिरे - आपापल्या प्राप्त झाले ॥४९॥ अध्याय विसावा समाप्त |