|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ७ वा - अन्वयार्थ
छकडा मोडणे आणि तृणावर्त उद्धार - प्रभो - हे शुकाचार्या - ईश्वरः भगवान् हरिः - समर्थ असा भगवान श्रीहरी - येन येन अवतारेण - ज्या ज्या अवतारांनी - नः कर्णरम्याणि - आमच्या कर्णाला गोड लागणारी - मनोज्ञानि च (कर्माणि) करोति - व मनाला आनंद देणारी कर्मे करितो. ॥१॥ यत् शृण्वतः पुंसः - जी ऐकणार्या पुरुषाचे मानसिक - अरतिः वितृष्णा च अचिरेण अपैति - औदासीन्य व नानाविध तृष्णा त्वरित दूर होतात - सत्त्वं शुद्ध्यति - अंतःकरण शुद्ध होते - हरौ भक्तिः (जायते) - परमेश्वराविषयी भक्ती उत्पन्न होते - तत्पुरुषे च सख्यं (जायते) - व त्याच्या भक्तांच्या ठायी मैत्री जडते - तत् एवं हारं - तेच रमणीय वृत्त - मन्यसे चेत् - तू मनात आणीत असशील तर - (मां) वद - मला सांग. ॥२॥ अथ - तसेच - मानुषं लोकं आस्थाय - मनुष्य लोकात येऊन - तज्जातिं अनुरुंधतः कृष्णस्य - त्या जातीप्रमाणे वागणार्या कृष्णाचे - अद्भुतं अन्यत् अपि तोकाचरितं (वद) - अद्भुत असे आणखीही बालपणी केलेले चरित्र सांग. ॥३॥ कदाचित् - एके दिवशी - जन्मर्क्षयोगे - जन्मनक्षत्राच्या दिवशी - औत्थानिककौतुकाप्लवे - उपडे वळण्याच्या उत्सवानिमित्त स्नान घालण्याच्या प्रसंगी - समवेतयोषितां (मध्ये) - जमलेल्या स्त्रियांच्या मेळ्यात - वादित्रगीतद्विजमंत्रवाचकैः - वाद्ये, गीत, ब्राह्मणांचे वेदमंत्रपठण यांच्या योगे - सती - साध्वी यशोदा - सूनोः अभिषेचनं चकार - मुलाला मंगलस्नान घालती झाली. ॥४॥ नंदस्य पत्नी - नंदाची स्त्री यशोदा - कृतमज्जनादिकं - केले आहेत स्नान आदिकरून विधि ज्याचे अशा - अन्नाद्यवासःस्रगभीष्टधेनुभिः - अन्नादि पदार्थ, वस्त्रे, माळा, इच्छित वस्तू व गाई यांनी - सुपूजितैः विप्रैः - ज्याला उत्तमप्रकारे पूजिलेल्या ब्राह्मणांनी - कृतस्वस्त्ययनं - मंगल आशिर्वाद दिला आहे अशा - संजातनिद्राक्षं - झाले आहेत निद्रायुक्त डोळे ज्याचे अशा - शनैःअशीशयत् - हळू हळू निजविती झाली. ॥५॥ औत्थानिकौत्सुक्यमनाः - उपडा वळू लागल्याने जिचे मन आनंदयुक्त झाले आहे अशी - सा मनस्विनी - ती थोर मनाची यशोदा - समागतान् व्रजौकसः पूजयती (सती) - घरी आलेल्या गोकुळातील लोकांचा सत्कार करीत असता - सुतस्य रुदितं वै न एव अशृणोत् - मुलाचे रडणे खरोखर ऐकती झाली नाही - (ततः) स्तनार्थी रुदन् - नंतर स्तनपानाच्या इच्छेने रडणारा - (सः) चरणौ उदक्षिपत् - तो कृष्ण पाय वर करून झाडिता झाला. ॥६॥ अधःशयानस्य शिशोः - खाली निजलेल्या बालकृष्णाच्या - अल्पकप्रवालमृद्वंघ्रिहतं अनः - चिमुकल्या व कोवळ्या पानांप्रमाणे मृदु अशा पायाने लाथाडलेला गाडा - विध्वस्तनानारसकुप्यभाजनं - जेणेकरून नानाप्रकारचे रस भरलेली तांब्यापितळेची भांडी फुटली आहेत - व्यत्यस्तचक्राक्षविभिन्नकूबरं - व जेणेकरून चाके व आस मोडले आहेत जोखड अस्ताव्यस्त झाले आहे, अशा रीतीने - व्यवर्तत - उलथून पडला. ॥७॥ औत्थानिके कर्माणि याः समागताः - उपडा वळू लागण्याच्या प्रसंगीच्या समारंभासाठी ज्या गोळा झाल्या होत्या - (ताः) यशोदाप्रमुखाः व्रजस्त्रियः - त्या यशोदा आदिकरून गोकुळवासी स्त्रिया - नंदादयः गोपाः (च) - आणि नंदादिक गोप - (तत्) दृष्ट्वा - ते पाहून - अद्भुतदर्शनाकुलाः (बभूवुः) - अद्भुत देखाव्याने व्याकूळ झाले - शकटं स्वयं कथं वै विपर्यगात् - गाडा आपोआप कसा हो उलटला.॥८॥ बालकाः - मुले - अव्यवसितमतीन् गोपान् - निश्चित झाली नाही बुद्धि ज्यांची अशा गोपांना - गोपीः च - आणि गोपींना - ऊचुः - म्हणाली - रुदता अनेन (कृष्णेन) एतत् पादेन क्षिप्तं - रडणार्या ह्या कृष्णाने हा गाडा पायाने उलट केला - न संशयः - ह्यात संशय नाही. ॥९॥ ते गोपाः - ते गोप - बालभाषितं इति न श्रद्दधिरे - हे मुलांचे बोलणे समजून त्यावर विश्वास ठेविते झाले नाहीत - उत ते तस्य बालकस्य - कारण ते त्या बालकृष्णाचे - अप्रमेयं बलं विदुः - अपरिमित बल जाणत नव्हते. ॥१०॥ ग्रहशंकिता यशोदा - पिशाचबाधेची भीति वाटलेली यशोदा - रुदन्तम् - रडत असलेल्या - विप्रैः सूक्तैः कृतस्वस्त्ययनं सुतं - ब्राह्मणांनी रक्षोघ्नादिक सूक्तांनी स्वस्तिवाचन केलेल्या मुलाला - आदाय - घेऊन - स्तनं अपाययत् - स्तनपान करविती झाली. ॥११॥ विप्राः - ब्राह्मण - हुत्वा - होमहवन करून - बलिभिः गोपैः पूर्ववत् - शक्तिमान गोपांनी पहिल्याप्रमाणे - सपरिच्छदं स्थापितं शकटं - साहित्यासह जाग्यावर ठेविलेल्या गाडयाला - दध्यक्षतकुशांबुभिः अर्चयांचक्रुः - दही, अक्षता आणि कुशोदक यांनी पूजिते झाले. ॥१२॥ ये असूयानृतदंभेर्प्याहिंसा - जे असूया, खोटे बोलणे, दंभ, द्रोह, हिंसा, - मानविवर्जिता (सन्ति) - गर्व इत्यादिकांनी रहित असतात - तेषां सत्यशीलानां कृताः - त्या सत्यशील पुरुषांनी दिलेले - आशिषः विफलाः न भवन्ति - आशीर्वाद कधीही निष्फळ होत नाहीत. ॥१३॥ इति बालकं आदाय - असे म्हणत बालकाला घेऊन - द्विजोत्तमैः सामर्ग्यजुरुपाकृतैः - श्रेष्ठ ब्राह्मणांकडून ऋक्, यजु व साम ह्या तीन्ही वेदांतील मंत्रांनी - जलैः पवित्रौषधिभिः = अभिमंत्रण केलेल्या जलांनी व पवित्र औषधिमिश्रित उदकांनी - अभिषिच्य - अभिषेक करवून - स्वस्त्ययनं च वाचयित्वा - पुण्याहवाचन करवून - अग्निं च हुत्वा - आणि अग्नीला आहुती देऊन - समाहितः नंदगोपः - स्वस्थचित्त झालेला नंद गवळी - द्विजातिभ्यः महागुणं अन्नं प्रादात् - ब्राह्मणांना उत्तमप्रकारचे अन्न देता झाला. ॥१४-१५॥ आत्मजाभ्युदयार्थाय - मुलाचा सर्वतोपरी उत्कर्ष व्हावा याकरिता - सर्वगुणोपेताः - सर्व लक्षणांनी युक्त - वासःस्रग्रुक्ममालिनीः गावः - व वस्त्रे, फुलांचे हार व सोन्याच्या पुतळ्यांच्या माळांनी विभूषित अशा गाई - (द्विजातिभ्यः) प्रादात् - ब्राह्मणांना देता झाला - ते च (आशिषः) अन्वयुंजत - ते ब्राह्मणहि त्या बालकाला आशीर्वाद देते झाले. ॥१६॥ (ये) विप्राः वेदविदः युक्ताः (सन्ति) - जे ब्राह्मण वेदवेत्ते व योगाभ्यासी आहेत - तैः याः आशिषः प्रोक्ताः - त्यांनी जे आशीर्वाद दिलेले असतात - ते तथा (एव भविष्यन्ति) - ते खरेच व्हावयाचे - कदाचित् अपि निष्फलाः न भविष्यन्ति (इति) स्फुटं - कधीही निष्फल व्हावयाचे नाहीत हे स्पष्ट आहे. ॥१७॥ एकदा आरोहं आरूढं - एके दिवशी मांडीवर घेऊन - सुतं लालयंती सती (यशोदा) - मुलाला खेळवीत असलेली साध्वी यशोदा - गिरिकूटात् शिशोः गरिमाणं - पर्वताच्या शिखरासारखे मुलाचे ओझे - वोढुं न सेहे - वहाण्यास समर्थ झाली नाही ॥१८॥ भारपीडिता गोपी विस्मिता (सती) - भाराने पीडित झालेली यशोदा आश्चर्यचकित होत्साती - तं भूमौ निधाय - त्याला जमिनीवर ठेवून - महापुरुषं आदध्यौ - परमेश्वराचे ध्यान करिती झाली - जगतां कर्मसू आस - आणि सृष्टिकर्मांपैकी जे आपले कृत्य त्या कृत्याला लागली ॥१९॥ प्रणोदितः कंसभृत्यः नाम्ना तृणावर्तः दैत्यः - कंसाने पाठविलेला आपला सेवक तृणावर्त नावाचा दैत्य - सर्वं गोकुलं रेणुभिः आवृण्वन् - सर्व गोकुळ धुळीने झाकणारा - चक्षूंषि मुष्णन् - दृष्टि बंद करणारा - सुमहाघोरशब्देन - अतिशय महाभयंकर अशा आपल्या शब्दाने - दिशः प्रदिशः ईरयन् - दिशा व उपदिशा गाजवून सोडणारा - आसीनं अर्भकं - जमिनीवर असलेल्या बालकाला - चक्रवातस्वरुपेण जहार - वावटळीच्या रूपाने उचलून नेता झाला ॥२०-२१॥ गोष्ठं मुहूर्तं रजसा तमसा आवृतं अभूत् - गोकुळ दोन घटिका धुळीने व अंधकाराने भरून गेले - यतः - ज्याठिकाणी - यशोदा न्यस्तवती - यशोदा मुलाला ठेविती झाली - तस्मिन् - त्याठिकाणी - (सा तं) न अपश्यत् - ती त्याला पाहती झाली नाही ॥२२॥ तृणावर्तनिसृष्टाभिः शर्कराभिः - तृणावर्ताच्या धूळ फेकण्याच्या सपाटयाने - उपद्रुतः कश्चन - त्रासलेला कोणीही मनुष्य - विमोहितः (सन्) - मूढ होऊन - आत्मानं च परं अपि - स्वतःला आणि दुसर्या मनुष्यालाही - न अपश्यत् - पाहू शकला नाही. ॥२३॥ इति - याप्रमाणे - खरपवनचक्रपांसुवर्षे सुतपदवीं - भयंकर वावटळीत व धूळीच्या वर्षावात - अविलक्ष्य - मुलाला न पाहिल्यामुळे - अबला माता - दीन अशी यशोदा माता - यथा मृतवत्सका गौः (तथा) - ज्याप्रमाणे वासरू मेलेली गाय त्याप्रमाणे - (तं) अनुस्मरंती - त्याला आठवीत - अतिकरुणं अशोचत् - अत्यंत करुणस्वराने शोक करिती झाली - भुवि (च) अपतत् - आणि पृथ्वीवर पडली. ॥२४॥ पवने उपारतपांसुवर्षवेगे (सति) - वार्यातील धूळफेकीचा जोर कमी झाल्यावर - नंदसूनुं अनुपलभ्य - नंदाच्या मुलाला न पाहिल्यामुळे - भृशं अनुतप्तधियः - ज्यांचे अंतःकरण अत्यंत संतप्त झाले आहे - अश्रुपूर्णमुख्यः - व ज्यांचे मुख अश्रुप्रवाहांनी भरून गेले आहे अशा - गोप्यः - गोपी - तत्र (यशोदायाः) रुदितं - त्याठिकाणी यशोदेचे रडणे ऐकून - अनुनिशम्य रुरुदुः - आपणहि रडू लागल्या. ॥२५॥ वात्यारूपधरः तृणावर्तः - वावटळीचे रूप धारण करणारा तृणावर्त दैत्य - कृष्णं हरन् शांतरयः नभोगतः - कृष्णाला घेतल्यावर आपला वेग थांबवून आकाशात गेला - ततः परं - त्यापुढे - भूरिभारभृत् - मोठे ओझे धारण करणारा तो - गंतुं नु अशक्नोत् - जाऊ शकला नाही. ॥२६॥ गुरुमत्तया तं (कृष्णं) - अतिशय जड असल्यामुळे हा बालक म्हणजे - अश्मानं मन्यमानः (सः) - एक मोठा दगडच आहे की काय असे मानणारा तो दैत्य - (तेन च बालकेन) गले गृहीतः सन् - आणि त्या बालकाने आपला गळा पकडला असता - (तं) अद्भुतार्भकं - त्या अद्भुत बालकाला - आत्मनः उत्स्रष्टुं न अशक्नोत् - आपल्यापासून दूर लोटू शकला नाही. ॥२७॥ गलग्रहणनिश्चेष्टः - गळा आवळल्यामुळे हालचाल बंद झालेला, - निर्गतलोचनः - ज्याचे डोळे बाहेर आले आहेत असा - अव्यक्तरावः दैत्यः - आणि स्पष्ट शब्द न उमटणारा राक्षस - व्यसुः सहबालः व्रजे न्यपतत् - गतप्राण होत्साता मुलासह गोकुळात पडला. ॥२८॥ यथा रुद्रशरेण विद्धं पुरं - ज्याप्रमाणे शंकराच्या बाणाने छिन्नभिन्न झालेल्या त्रिपुरासुराला - अंतरिक्षात् शिलायां पतितं - आकाशातून शिळेवर पडलेल्या - विशीर्णसर्वावयवं करालं तं - व सर्व शरीर छिन्नभिन्न झालेल्या अशा त्या भयंकर दैत्याला - समेताः रुदत्यः स्त्रियः - एकत्र जमून रडत असलेल्या स्त्रिया - ददृशुः - पाहत्या झाल्या. ॥२९॥ तस्य उरसि लंबमानं कृष्णं प्रादाय - त्या तृणावर्ताच्या उरावर लोंबणार्या कृष्णाला घेऊन - मात्रे प्रतिहृत्य - त्याच्या आईच्या स्वाधीन करून - विस्मिताः गोप्यः - आश्चर्यचकित झालेल्या गोपी - नंदमुख्यः गोपाः च - व नंदादिक गोप - विहायसा पुरुषादनीतं - आकाशात राक्षसाने नेलेल्या - मृत्यूमुखात् प्रमुक्तं - मृत्यूच्या तोंडातून सुटलेल्या - तं (सुतं) पुनः स्वस्तिमन्तं लब्ध्वा - त्या मुलाला पुनः सुखरूप स्थितीत मिळविल्यामुळे - अतीव किल मोदं प्रापुः - खरोखर अत्यंत हर्षाला प्राप्त झाले. ॥३०॥ अहो - अहो - रक्षसा निवृत्तिं गमितः एषः बालः पुनः अभ्यगात् - अहो राक्षसाने मारलेला बालक पुनः परत आला - अत्यद्भुतं बत - हे खरोखर आश्चर्य होय - खलः हिंस्रः स्वपापेन विहिंसितः - दुष्ट व घातुक असा हा राक्षस आपल्या पापकर्माने मेला - साधुः समत्वेन भयात् विमुच्यते - सज्जन लोक समत्वबुद्धीने भयापासून मुक्त होतो. ॥३१॥ नः किं तपः चीर्णं - आम्ही कोणती तपश्चर्या केली होती - उत (किम्) अधोक्षजार्चनं (कृतम्) - किंवा ईश्वराचे काय पूजन केले होते - पूर्तेष्टदत्तं उत - किंवा पूर्व कर्म, यज्ञयाग, दान तसेच - भूतसौहृदं (वा किम् कृतम्) - प्राणिमात्रावर दया अशा तर्हेचे काय केले होते - यत् - ज्यामुळे - संपरेतः बालकः - मृत्यूमुखी पडलेला बालक - स्वबंधून् प्रीणयन् - आपल्या इष्टमित्रांना आनंद देत - दिष्टया पुनः एव उपस्थितः - सुदैवाने परत आला. ॥३२॥ इति बृहद्वने बहुशः अद्भुतानि दृष्ट्वा - महावनात याप्रमाणे वारंवार अनेक चमत्कार पाहून - विस्मितः नंदगोपः - आश्चर्यचकित झालेला नंद गोप - भूयः वसुदेववचः (सत्यं) मानयामास - वरच्यावर वसुदेवाचे भाषण खरे मानिता झाला. ॥३३॥ एकदा अर्भकं आदाय - एके दिवशी मुलाला उचलून - स्वांकं आरोप्य - आपल्या मांडीवर घेऊन - भामिनी स्नेहपरिप्लुता - स्नेहाने परिपूरित अशी यशोदा - प्रस्नुतं (स्तनं) पाययामास - प्रेमपान्हा फुटला असता त्याला स्तनपान करविती झाली. ॥३४॥ राजन् - हे राजा - पीतप्रायस्य जृंभतः तस्य - बहुतेक पिऊन झाले आहे ज्याचे अशा जांभई देणार्या त्याचे - रुचिरस्मितं मुखं लालयती सा जननी - सुंदर हास्ययुक्त मुखाचे कौतुक करणारी ती यशोदा माता - इदं ददृशे - असे पाहती झाली. ॥३५॥ खं रोदसी ज्योतिरनीकं - आकाश, स्वर्ग, पृथ्वी, नक्षत्रचक्र - आशाः सूर्येदुवह्निश्वसनांबुधीन् - दिशा, सूर्य, चंद्र, अग्नि, वायु, समुद्र - द्वीपान् नगान् तद्दुहितृ - द्वीपे, पर्वत, नद्या - वनानि - अरण्ये - यानि च स्थावरजंगमानि भूतानि (तानि सर्वाणि) - व जे स्थावरजंगम असे पदार्थ ते सर्व. ॥३६॥ राजन् - हे राजा - सा मृगशावाक्षी - ती हरिणाच्या बालकाप्रमाणे नेत्र असणारी यशोदा - विश्वं वीक्ष्य - हे सर्व जग पाहिल्याबरोबर - नेत्रे संमील्य - डोळे मिटून - सहसा संजातवेपथुः - अकस्मात् जिच्या अंगाला कंप सुटला आहे - सुविस्मिता आसीत् - अशी अत्यंत आश्चर्यचकित झाली. ॥३७॥ अध्याय सातवा समाप्त |