|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय २२ वा - अन्वयार्थ
पांचाल, कौरव आणि मगध-देशीय राजांच्या वंशांचे वर्णन - नृप - हे राजा- दिवोदासात् मित्रेयुः - दिवोदासापासून मित्रेयु- तत्सुतः च च्यवनः - आणि त्याचा मुलगा च्यवन- (ततः) सुदासः - त्यापासून सुदास- (ततः) सहदेवः - त्या सुदासापासून सहदेव- अथ जन्तुजन्मकृत् सोमकः - नंतर जंतूला जन्म देणारा सोमक झाला. ॥१॥ तस्य पुत्रशतं (अभवत्) - त्याला शंभर पुत्र होते- (तस्य) द्रुपदः - त्याचा पुत्र द्रुपद- तस्य (कन्या) द्रौपदी - त्या द्रुपदाची कन्या द्रौपदी - धृष्टद्युम्नादयः (च) सुताः - व धृष्टद्युम्नादि पुत्र होत. ॥२॥ धृष्टद्युम्नात् धृष्टकेतुः - धृष्टद्युम्नापासून धृष्टकेतु झाला- इमे भार्म्याः - हे भर्म्याश्वाच्या वंशात उत्पन्न झालेले - पंचालकाः - पांचालनामक राजे होत- यः अजमीढस्य सुतः अन्यः ऋक्षः - जे अजमीढाचा पुत्र दुसरा ऋक्ष- ततः संवरणः (अभवत्) - त्यापासून संवरण झाला- ततः सूर्यकन्यायां तपत्यां - त्या संवरणापासून तपतीनामक सूर्याच्या कन्येच्या ठिकाणी - कुरुक्षेत्रपतिः कुरुः - कुरुक्षेत्राचा राजा जो कुरु तो उत्पन्न झाला- कुरोः परीक्षित् सुधनुः - कुरूला परीक्षित, सुधनु, - जह्नुः निषधाश्वः सुताः - व निषधाश्व असे मुलगे झाले. ॥३-४॥ सुधनुषः सुहोत्रः अभूत् - सुधनुपासून सुहोत्र झाला- अथःच्यवनः - नंतर च्यवन झाला- ततः कृती - त्यापासून कृती- तस्य (पुत्रः) उपरिचरः वसुः - त्याचा पुत्र उपरिचर वसु- ततः बृहद्रथमुखाः (पुत्राः अभवन्) - त्या वसूपासून बृहद्रथप्रमुख पुत्र झाले. ॥५॥ (वसोः पुत्राः) कुशाम्बमत्स्यप्रत्यग्रवेदिपादि - त्या वसूचे कुशांब, मत्स्य, प्रत्यग्न व चेदिप - आद्यः (च) चेदिपाः - आदिकरून पुत्र चेदिदेशाचे राजे झाले- बृहद्रथात् कुशाग्रः अभूत् - बृहद्रथापासून कुशाग्र नावाचा पुत्र झाला- तस्य ऋषभः - त्या कुशाग्राचा पुत्र ऋषभ- तत्सुतः सत्यहितः जज्ञे - त्या ऋषभाला सत्यहित नामक पुत्र झाला- (तस्य) अपत्यं पुष्पवान् - त्या सत्यहिताचा मुलगा पुष्पवान - तत्सुतः जहुः - त्याचा पुत्र जहु- बृहद्रथात् अन्यस्यां भार्यांया - बृहद्रथापासून दुसर्या पत्नीच्या ठिकाणी - द्वे शकले (बभूवतुः) - दोन पुत्राचे तुकडे जन्मास आले- मात्रा ते बहिः उत्सृष्टे - आईने ते बाहेर टाकिले- जरया - जरा नावाच्या राक्षसिणीने - जीव जीव इति क्रीडन्त्या - खेळता खेळता ‘जग, जग’ म्हणून - अभिसंधिते - तुकडे जोडिले- (सः एव) जरासंधः सुतः अभवत् - तोच जरासंध म्हणून पुत्र झाला. ॥६-८॥ ततः च सहदेवः अभूत् - त्यापासून सहदेव झाला- (ततः) सोमापिः - त्यापासून सोमापि- यत् श्रुतश्रवाः (अभवत्) - ज्यापासून श्रुतश्रवा झाला- परीक्षित अनपत्यः अभूत् - परीक्षित हा निपुत्रिक झाला- जाह्नवः सुरथः नाम - जह्नुचा मुलगा सुरथ नावाचा होता- ततः विदूरथः - त्या सुरथापासून विदूरथ झाला- तस्मात् सार्वभौमः - त्यापासून सार्वभौम- ततः जयसेनः अभवत् - त्यापासून जयसेन झाला- तत्तनयः राधिकः - त्याचा पुत्र राधिक- अतः हि अयुतः अभूत् - राधिकापासून खरोखर अयुत नावाचा मुलगा झाला. ॥९-१०॥ ततः च क्रोधनः - त्यापासून क्रोधन- तस्मात् देवातिथिः - त्यापासून देवातिथि- अमुष्य च ऋष्यः - आणि ह्याचा ऋष्य- तस्य दिलीपः अभूत् - त्याचा पुत्र दिलीप झाला- तस्य च आत्मजः प्रतीपः - आणि त्याचा पुत्र प्रतीप- तस्य देवापिः शंतनुः - त्याचे देवापि, शंतनु - बाह्लिकः इति च आत्मजाः - व बाह्लीक हे तीन पुत्र होते- देवापिः तु पितृराज्यं - देवापि तर पित्याचे राज्य - परित्यज्य वनं गतः - सोडून अरण्यात गेला. ॥११-१२॥ (अतः) प्राक् महाभिषसंज्ञितः - म्हणून पूर्वजन्मी महाभिष नाव असलेला - शंतनुः राजा अभवत् - शंतनु राजा झाला- सः कराभ्यां यं यं जीर्णं स्पृशति - तो शंतनु ज्याला ज्याला हातानी स्पर्श करी - (सः) यौवनं एति - तो तो तारुण्याप्रत जाई- अग्र्यां शांतिं च आप्नोति - आणि श्रेष्ठ शांती मिळावी - तेन कर्मणा शंतनुः - त्या कृत्यामुळे तो राजा शंतनु म्हणून प्रसिद्ध झाला- यदा विभुः तद्राज्ये - जेव्हा इंद्राने त्याच्या राज्यात - द्वादशः समाः न ववर्ष - बारा वर्षे पर्जन्य पाडिला नाही- (तदा) शंतनुः ब्राह्मणैः उक्तः - तेव्हा शंतनु ब्राह्मणांकडून बोलला गेला- (त्वं) परिवेत्ता (असि) - तू परिवेत्ता आहेस- अयं अग्रभुक् - हा देवापि अगोदर पृथ्वीचा उपभोग घेणारा होय- अतः - म्हणून- पुरराष्ट्रविवृद्धये - नगराच्या व राज्याच्या - आशु अग्रजाय राज्यं देहि - उत्कर्षासाठी लवकर ज्येष्ठ भावाला राज्य दे. ॥१३-१५॥ द्विजैः एवम् उक्तः - ब्राह्मणांनी याप्रमाणे उपदेशिलेला - (शंतनुः) ज्येष्ठं छंदयामास - शंतनु ज्येष्ठ भावाची मनधरणी करिता झाला- तन्मन्त्रिप्रहितैः विप्रैः - त्याच्या मंत्र्यांनी पाठविलेल्या ब्राह्मणांनी- गिरा वेदात् भ्रंशितः - वाणीने वेदमार्गापासून भ्रष्ट केलेला - सः वेदवादातिवादान् अब्रवीत् - तो ज्येष्ठ बंधु वेदांची निंदा करू लागला- तदा वै देवः ववर्ष ह - त्याचवेळी पाऊस पडला- देवापि योगं आस्थाय - देवापि योगमार्गाचा अवलंब करून - कलापग्रामं आश्रितः - कलापनामक गावी राहिला आहे. ॥१६-१७॥ कलौ सोमवंशे नष्टे - कलियुगामध्ये चंद्रवंश नष्ट झाला असता - (देवापिः) कृतादौ (तं) स्थापयिष्यति - देवापि कृतयुगामध्ये पुनः त्याची स्थापना करील- बाह्लीकात् सोमदत्तः अभूत् - बाह्लीकापासून सोमदत्त झाला- ततः भूरिः भूरिश्रवाः शलः च - त्या सोमदत्तापासून भूरि, भूरिश्रवा व शल हे झाले- शंतनोः गंगायां आत्मवान् - शंतनूला गंगेच्या ठिकाणी आत्मज्ञानी, - सर्वधर्मविदां श्रेष्ठः - सर्व धर्मवेत्त्यात श्रेष्ठ, - महाभागवतः कविः आसीत् - मोठा भगवद्भक्त, विद्वान, सेनापतींमध्ये श्रेष्ठ असा भीष्म झाला- येन रामः युधि तोषितः - ज्या भीष्माकडून परशुराम युद्धात संतोषविला गेला- शंतनोः दाशकन्यायां - शंतनूला धीवर कन्येच्या ठिकाणी - चित्रांगदः सुतः जज्ञे - चित्रांगद पुत्र झाला. ॥१८-२०॥ विचित्रवीर्यः च अवरजः - आणि विचित्रवीर्य हा कनिष्ठ होय- चित्रांगदः नाम्ना हतः - चित्रांगद हा त्याच नावाच्या गंधर्वाने मारिला- यस्यां पराशरात् - ज्या धीवरकन्येच्या ठिकाणी पराशरापासून - साक्षात् हरेः कला वेदगुप्तः - प्रत्यक्ष विष्णूचा अंश व वेदांचे रक्षण करणारा असा - कृष्णमुनिः अवतीर्णः - कृष्णद्वैपायन व्यास या नावाने अवतीर्ण झाला- यतः अहं इदं अध्यगां - ज्या व्यासापासून मी हे शिकलो- भगवान बादरायणः - भगवान् व्यास - पैलादीन् स्वशिष्यान् हित्वा - पैलादि आपल्या शिष्यांना सोडून- मह्यं शांताय पुत्राय - मी जो शांत असा पुत्र त्या मला - इदं परं गुह्यं जगौ - हे अत्यंत मोठे रहस्य सांगता झाला- अथ विचित्रवीर्यः बलात् स्वयंवरात् - विचित्रवीर्य, बलात्काराने स्वयंवरांतून - (भावर्थे भीष्मेण) उपानीते - भावाकरिता भीष्माने आणिलेल्या - उभे काशिराजसुते - काशिराजाच्या दोन कन्या - अम्बिकाम्बालिके उवाह - अंबिका व अंबालिका यांच्याशी विवाह लाविता झाला- तयोः आसक्तहृदयः - त्यांच्याशी फारच आसक्त झाले आहे मन ज्याचे - यक्ष्मणा गृहीतः मृतः - असा क्षयाने पछाडलेला असा मृत झाला. ॥२१-२४॥ मात्रा उक्तः बादरायणः - आईने सांगितलेला व्यास - अप्रजस्य भ्रातुः क्षेत्रे - निपुत्रिक अशा भावाच्या स्त्रियांच्या ठिकाणी- धृतराष्ट्रं पांडुं च विदुरं च - धृतराष्ट्र पांडु आणि विदुर ह्यांना - अपि अजीजनत् - उत्पन्न करिता झाला. ॥२५॥ नृप - हे परीक्षित राजा- धृतराष्ट्रस्य गांधार्यां पुत्रशतं जज्ञे - धृतराष्ट्राला गांधारीच्या ठिकाणी शंभर पुत्र झाले- तत्र दुर्योधनः ज्येष्ठः - त्यात दुर्योधन हा वडीलपुत्र- दुःशला कन्यका च अपि - आणि दुःशला नावाची मुलगीही झाली. ॥२६॥ शापात् मैथुनरुद्धस्य - शापामुळे मैथुनाविषयी अटकाविलेल्या - पांडोः कुन्त्यां - पांडुच्या कुंतीनामक भार्येच्या ठिकाणी - धर्मानिलेन्द्रेभ्यः - यमधर्म, वायु व इंद्र यापासून - युधिष्ठिरमुखाः त्रयः (पुत्राः) जातः - युधिष्ठिरप्रमुख तीन महारथी पुत्र झाले. ॥२७॥ माद्र्यां नासत्यदस्रयोः - माद्रीच्या ठिकाणी नासत्य व दस्र ह्या दोन अश्विनीकुमारांपासून - नकुलः सहदेवः च - नकुल आणि सहदेव हे पुत्र झाले- द्रौपद्यां पंचभ्यः - द्रौपदीच्या ठिकाणी पाच पतीपासून - पंच पुत्राः - पाच पुत्र झाले- ते पितरः अभूवन् - ते तुझे पितर होत. ॥२८॥ युधिष्ठिरात् प्रतिविंध्यः - युधिष्ठिरापासून प्रतिविंध्य- वृकोदरात् श्रुतसेनः - वृकोदरापासून श्रुतसेन- अर्जुनात् श्रुतकीर्तिः - अर्जुनापासून श्रुतकीर्ति- नाकूलिः शतानीकः - नकुलाचा पुत्र शतानीक. ॥२९॥ राजन् - हे परीक्षित राजा- सहदेवसुतः श्रुतकर्मा - सहदेवाचा मुलगा श्रुतकर्मा- तथा अपरे (अपि पुत्राः जाताः) - तसेच दुसरेही मुलगे झाले- युधिष्ठिरात् तु - युधिष्ठिरापासून तर - पौरव्यां देवकः - पौरवीच्या ठिकाणी देवक झाला- अथ भीमसेनात् - नंतर भीमापासून - हिडिंबायां घटोत्कचः - हिडिंबेच्या ठिकाणी घटोत्कच झाला- ततः काल्यां सर्वगतः - त्यापासून कालीच्या ठिकाणी सर्वगत झाला- सहदेवात् पार्वती विजया - सहदेवापासून पर्वतकन्या विजया - सुहोत्रं असूत - सुहोत्र नामक पुत्र प्रसवली. ॥३०-३१॥ नकुलः करेणुमत्यां - नकुल करेणुमतीच्या ठिकाणी - निरमित्रं - निरमित्राला उत्पन्न करिता झाला- तथा अर्जुनः उलूप्यां इरावंतं - तसेच अर्जुन उलूपीच्या ठिकाणी इरावानाला- (च) मणिपूरपतेः - आणि मणिपूर राजाच्या - सुतायां बभ्रुवाहनं - कन्येच्या ठिकाणी बभ्रुवाहनाला उत्पादिता झाला- सः पुत्रिकासुतः अपि - तो बभ्रुवाहन कन्यापुत्र असूनही - तत्पुत्रः (मतः) - मणिपुरराजाचाच पुत्र म्हणून मानिला गेला. ॥३२॥ वीरः सर्वातिरथजित् तव तातः अभिमन्युः - पराक्रमी व सर्व अतिरथ्यांना जिंकणारा तुझा पिता अभिमन्यु - सुभद्रायां अजायत - सुभद्रेच्या ठिकाणी जन्मला- ततः उत्तरायां भवान् - त्याच्यापासून उत्तरेच्या ठिकाणी तू झालास. ॥३३॥ परिक्षीणेषु कुरुषु द्रौणेः ब्रह्मास्रतेजसा - अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्राच्या तेजाने कुरुकुल नष्ट झाले असता- त्वं च कृष्णानुभावेन - तू कृष्णाच्या सामर्थ्यामुळे - अन्तकात् सजीवः मोचितः - मृत्युपासून जिवंतपणे सोडविला गेलास. ॥३४॥ तात - हे परीक्षिता- श्रुतसेनः भीमसेनः - श्रुतसेन, भीमसेन - वीर्यवान् उग्रसेनः च इति - आणि पराक्रमी उग्रसेन असे- इमे जनमेजयपूर्वकाः तव तनयाः - हे जनमेजयप्रमुख पाच तुझे मुलगे होते. ॥३५॥ सः जनमेजयः - तो जनमेजय- त्वां तक्षकात् - तुला तक्षकापासून - निधनं गतं विदित्वा - मृत्यू प्राप्त झाला असे समजल्यावर- रुषा अन्वितः सर्पयागाग्नौ - क्रोधयुक्त होऊन सर्पसत्रातील अग्नीत - सर्पान् वै होष्यति - सर्पांचे हवन करील. ॥३६॥ कावषेयं तुरं पुरोधाय - कावषेय तुर नावाच्या ऋषीला पुरोहित करून- तुरगमेघयाट् (सः) - अश्वमेघ यज्ञ करणारा तो जनमेजय- सर्वां पृथ्वीं समन्तात् जित्वा - सर्व पृथ्वी सर्व बाजूंनी जिंकून- अध्वरैः च यक्ष्यति - आणखी यज्ञांनी यजन करील. ॥३७॥ तस्यः पुत्रः शतानीकः - त्याचा पुत्र शतानीक- याज्ञवल्क्यात् त्रयीं पठन् - याज्ञवल्क्य मुनीपासून तीन वेदांचे अध्ययन करणारा- अस्रज्ञानं क्रियाज्ञानं (लब्ध्वा) - अस्राचे ज्ञान व कर्ममार्गाचे ज्ञान मिळवून- शौनकात् परम् एष्यति - शौनक मुनीपासून ब्रह्माची प्राप्ती करून घेईल. ॥३८॥ तत्पुत्रः सहस्रानीकः - त्याचा पुत्र सहस्रानीक- ततः च एव अश्वमेधजः - त्यापासून आणखी पुढे अश्वमेधज पुत्र होईल- तस्य अपि असीमकृष्णः - त्याचाहि असीमकृष्ण पुत्र होईल- तत्सुतः तु नेमिचक्रः - त्याचा पुत्र तर नेमिचक्र. ॥३९॥ गजाह्वये नद्या हृते - हस्तिनापूर नदीच्या पूराने वाहून गेले असता- (सः) एव कौशांब्यां साधु वत्स्यति - तो नेमिचक्र कौशांबी नगरीमध्ये सुखाने राहील- ततः चित्ररथः उक्तः - नंतर त्यापासून चित्ररथ नावाचा पुत्र होईल असे सांगितले आहे- तस्मात् कविरथः सुतः - त्यापासून कविरथ नावाचा पुत्र होईल. ॥४०॥ तस्मात् च वृष्टिमान् - त्यापासून वृष्टिमान- तस्य सुषेणः - त्याचा सुषेण- अथ महीपतिः - सुषेणानंतर महीपति- तस्य सुनीथः भविता - त्याला सुनीथ होईल- (तस्य) नृचक्षुः - त्याला नृचक्षु- यत् सुखनीलः - ज्यापासून सुखनील होईल. ॥४१॥ तस्मात् परिप्लवः सुतः - त्यापासून परिप्लवनामक पुत्र होईल- तस्मात् सुनयात्मजः मेधावी - त्यापासून सुनय आहे पुत्र ज्याचा असा मेधावी होईल- ततः नृपञ्जयः - त्यापासून नृपंजय- (तस्य) दूर्वः - त्याचा दूर्व- तस्मात् निमिः जनिष्यति - त्यापासून निमि उत्पन्न होईल. ॥४२॥ निमेः बृहद्रथः - निमीपासून बृहद्रथ- तस्मात् सुदासजः शतानीकः - त्यापासून सुदास व सुदासापासून शतानीक झाला- शतानीकात् दुर्दमनः - शतानीकापासून दुर्दमन- तस्य अपत्यं वहीनरः - त्याचा पुत्र वहीनर. ॥४३॥ तस्य दंडपाणिः - त्याचा दंडपाणि- (ततः) निमिः - त्यापासून निमि- (तस्य) क्षेमकः नृपः भविता - त्याचा पुत्र क्षेमक राजा होईल- ब्रह्मक्षत्रस्य - ब्राह्मण व क्षत्रिय यांचा - देवर्षिसत्कृतः - देवांना व ऋषींना पूज्य- वंशः वै प्रोक्तः - असा वंश खरोखर तुम्हाला सांगितला. ॥४४॥ (अयं) वंशः क्षेमकं राजानं प्राप्य - हा वंश क्षेमक राजा झाल्यानंतर - कलौ संस्थां प्रास्यति - कलियुगात नाश पावेल- अथ मागधराजानः भवितारः - नंतर मागध राजे होतील- (तान्) ते वदामि - ते तुला सांगतो. ॥४५॥ सहदेवस्य मार्जारिः भविता - सहदेवाला मार्जारि नावाचा पुत्र होईल- यत् श्रुतश्रवाः - ज्यापासून श्रुतश्रवा होईल- ततः अयुतायुः - त्यापासून अयुतायु- तस्य अपि निरमित्रः - त्याचाहि निरमित्र- अथ तत्सुतः सुनक्षत्रः - नंतर त्याचा पुत्र सुनक्षत्र- सुनक्षत्रात् बृहत्सेनः - सुनक्षत्रापासून बृहत्सेन- अथ कर्मजित् - नंतर कर्मजित- ततः सृतञ्जयात् विप्रः - त्यापासून सृतंजय व सृतंजयापासून विप्र- तस्य शुचिः भविष्यति - त्याला शुचि होईल. ॥४६-४७॥ अथ क्षेमः - नंतर क्षेम- तस्मात् सुव्रतः - त्या क्षेमापासून सुव्रत- (ततः) धर्मसूत्रः - त्यापासून धर्मसूत्र- (ततः) शमः - त्या धर्मसूत्रापासून शम- (ततः) द्युमत्सेनः - त्या शमापासून द्युमत्सेन- अथ सुगतिः - नंतर सुगति- ततः सुबलः जनिता - त्यापासून सुबल उत्पन्न होईल. ॥४८॥ (ततः) सुनीथः - त्यापासून सुनीथ- अथ सत्यजित् - नंतर सत्यजित- (तस्य) विश्वजित् - त्याचा विश्वजित- यत् रिपुंजयः - ज्या विश्वजितापासून रिपुंजय नामक पुत्र होईल- बार्हद्रथाः भूपालाः च - आणि हे बृहद्रथाच्या वंशांतील राजे - साहस्रवत्सरं भाव्याः - हजार वर्षेपर्यंत राज्य करतील. ॥४९॥ नवमः स्कन्धः - अध्याय बाविसावा समाप्त |