श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय ८ वा - अन्वयार्थ

सगर - चरित्र

रोहितसुतः हरितः - रोहिताचा पुत्र हरित - तस्मात चम्पः (अभवत) - त्यापासूनचंप झाला - (तेन) चम्पापुरी विनिर्मिता - त्याने चंपापुरी वसविली - -अतः चसुदेवः- - आणि चंपापासून सुदेव झाला - यस्य आत्मजः विजयः (आसीत)-- ज्याचा पुत्र विजय होता. ॥ १ ॥

तत्सुतः भरुकः - त्याचा पुत्र भरुक - तस्मात वृकः - त्या पासून वृक - तस्य अपि बाहुकः - त्याचाहि बाहुक - सः राजा अरिभिः ह्रतभूःसभार्यः वनम अविशत - तो बाहुक राजा शत्रूंनी राज्य हिरावून घेतले असता पत्नीसहअरण्यात गेला. ॥ २ ॥

वृद्धं पंचतां प्राप्तं तं अनुमरिष्यती महिषी - वृद्ध होऊन मृत झालेल्या त्याच्या मागोमाग मरणारी महाराणी - -(तस्याः) आत्मानं प्रजावन्तं जानताऔर्वेण निवारिता - तिचे शरीर गर्भ धारण करणारे आहे असे जाणणार्‍या और्वऋषीकडून निवारिली गेली. ॥ ३ ॥

तत आज्ञाय - ते जाणून - -सपत्नीभिः अस्यै अंधसा सह गरःदत्तः - सवतीनी हिला अन्नाबरोबर विष दिले - -तेन सह एव महायशाः सगराख्यःसंजातः - त्या विषाबरोबरच मोठा कीर्तिमान असा सगर नावाचा पुत्र झाला. ॥ ४ ॥

सगरःचक्रवर्ती आसीत - सगर सार्वभौम राजा झाला - यत्सुतैः सागरः कृतः - - ज्याच्यापुत्रांनी सागर उत्पन्न केला - यः तालजङ्घान यवनान शकान हैहयबर्बरान गुरुवाक्येन नअवधीत - जो तालजंघ, यवन, शक, हैहय व बर्बर ह्यांना गुरुच्या सांगण्यावरुन मारिता झाला नाही - कांश्चित विकृतवेषिणः श्मश्रुधरान मुण्डान मुक्तकेशार्धमुण्डितानचक्रे - कित्येकांनी वेडयावाकडया वेषांचे, केवळ दाढीमिशा ठेवणारे, मोकळे केस ठेवलेले,अर्धवट मुंडण केलेले असे केले - कांश्चित अनन्तर्वाससः- - कोणाला आत वस्त्र धारणन करणारे - अपरान च अबहिर्वाससः (चक्रे) - कित्येकांनी वरुन वस्त्र न घेणारे असेतोकरिता झाला. ॥ ५-६ ॥

सः - तो सागर - और्वोपदिष्टयोगेन - - और्वानेसांगितलेल्या विधीने - -अश्वमेधैः - अश्वमेधयज्ञांनी - सर्ववेदसुरात्मकं आत्मानं ईश्वरंहरि अजयत - - सर्व वेद व देव ह्यांचा अन्तर्यामी अशा परमात्म्या भगवान श्रीहरीचे पूजनकरिता झाला - तस्य यज्ञे उत्सृष्टं पशुं अश्वं - - त्या यज्ञात पशु म्हणून सोडलेला अश्व - -पुरंदरः जहार - इंद्र हरण करिता झाला. ॥ ७ -८ ॥

दृप्ताः सुमत्याः तनयाः - गर्विष्ठअसे सुमतीचे पुत्र - पितुः आदेशकारिणः - त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारे होते - हयं अन्वेषमाणाः ते - घोडा शोधणारे ते - महीं न्यखनन - पृथ्वी खणते झाले. ॥ ९ ॥

प्रागुदीच्यां दिशि कपिलान्तिके हयं ददृशुः - ईशान्य दिशेला कपिलमुनिच्या जवळ घोडा पहाते झाले - एषः वाजिहरः चौरः मीलितलोचनः आस्ते - हा घोडा हरण करणारा चोर डोळे मिटून बसला आहे. ॥ १० ॥

पापः हन्यतां हन्यतां इति ( उक्त्वा )षष्टिसहस्त्रिणः (ते ) उदायुधाः अभिययुः - ह्या पापी पुरुषाला मारा, मारा, असे म्हणतते साठ हजार सगरपुत्र आयुधे उचलून धावून गेले - -तदा मुनिः उन्मिमेष- त्यावेळी कपिलमुनि डोळे उघडिता झाला ॥ ११ ॥

तावत महेन्द्रह्रतचेतसः - तितक्यात इंद्राने ज्यांचअंतःकरण हरण केले आहे असे ते सगरपुत्र - महह्यतिक्रमहताः - - मोठयानी अमर्यादा केल्यामुळे नष्ट झालेले असे - स्वशरीराग्निना - आपल्याच अंगांतून निघालेल्या अग्नीने - -क्षणात भस्मसात अभवन - क्षणात भस्म झाले. ॥ १२ ॥

नृपेन्द्रपुत्राः मुनिकोपभर्जिताः (अभवन) - राजपुत्र कपिलमुनीच्या क्रोधाने जळून गेले - इतिसत्वधामनि सधुवादः न - असे सत्वगुणसंपन्न कपिल मुनीसंबंधाने म्हणणे चांगले नाही - - खे भुवः रजः (इव) - आकाशात पृथ्वीच्या धुळीप्रमाणे - जगत्पवित्रात्मनि रोषमयंतमः कथं विभाव्यते - जगाला पवित्र करणार्‍या कपिलाच्या ठिकाणी क्रोधरुपी अज्ञान कसे संभवेल. ॥ १३ ॥

यस्य इह सांख्यमयी दृढा नौः ईरिता - ह्या लोकी सांख्यशास्त्ररुपीबळकट नौका ज्याची आहे - यया मुमुक्षुः दुरत्ययं मृत्युपथं भवार्णवं तरते - ज्यानौकेच्या सहाय्याने मोक्षेच्छु पुरुष तरुन जाण्यास कठिण व मृत्यूचा मार्गच असासंसारसमुद्रतरुन जातो - (तस्य) विपश्चितः परात्मभूतस्य पृथङमतिः कथं ( भवेत ) - त्या ज्ञानी अशा परमेश्वरस्वरुप झालेल्या कपिलाच्या ठिकाणी भेदबुद्धि कशी असणार . ॥ १४ ॥

यः असमग्त्रुसः इति उक्तः सः केशिन्याः नॄपात्मजः - जो असमंजस म्हणून सांगितला तो केशिनीपासून झालेला सगरराजाचा पुत्र होय - तस्य पितामहहितेरतः अंशुमान नामपुत्रः - त्याला आजोबांच्या कल्याणाविषयी झटणारा अंशुमान नावाचा पुत्र झाला. ॥ १५ ॥

असमंजसः- - असमंजस - पुरा योगी (आसीत ) - पूर्वजन्मी योगी होता - संगातयोगात विचलितः - संगतीमुळे योगापासून भ्रष्ट झाला - -जातिस्मरः आत्मानं असमंजसं दर्शयन - पूर्वजन्मीचे स्मरण आहे ज्याला असा तो स्वतःला वेडा आहे असे दाखवीत - -जनं उद्वेजयन - लोकांना उद्वेग आणीत - लोके विगर्हितं ज्ञातीनां विप्रियंकर्म आचरन - लोकांमध्ये निंद्य मानिलेले व बांधवांना न आवडणारे कृत्य करणारा - क्रीडतः वालान सरय्वां प्रास्यत - खेळणार्‍या मुलांना शरयू नदीत फेकून देता झाला. ॥ १६-१७ ॥

एवंवृत्तः (सः) पित्रा स्नेहं अपोह्य वै परित्यक्तः - याप्रमाणे आचरण करणारा तो असमंजस, पित्याकडून प्रेम दूर करुन खरोखरच हाकलून दिला गेला - योगैश्वर्येण तान बालान दर्शयित्वा - योगसामर्थ्याने त्या मुलांना दाखवून - -(सः) ततः ययौ - तो तेथून चालता झाला . ॥ १८ ॥

राजन - - हे परीक्षित राजा - -अयोध्यावासिनः सर्वे - आयोध्यात राहणारे सर्व लोक - पुनः आगतान बालानदृष्ट्वा - पुनः आलेल्या मुलाना पाहून - विसिस्मिरे - आश्चर्यचकित झाले - राजा चअपि अन्वतप्यत - आणि राजासुद्धा पश्चात्ताप पावला . ॥ १९ ॥

अंशुमान राज्ञातुरुंगान्वेषणे चोदितः - अंशुमान राजा सगराकडून घोडा शोधण्याच्या कामी लाविलेला - -पितृव्यखातानुपथं ययौ - चुलत्यांनी खणलेल्या मार्गाने गेला - -भस्मांति हयं ददृशे -- भस्माजवळ घोडा पहाता झाला . ॥ २० ॥

महान (सः) - तो बलशाली अंशुमान - तत्रआसीन मुनिं कपिलाख्यं अघोक्षजं वीक्ष्य - तेथे बसलेल्या कपिलनामधारी परमेश्वराला पाहून - प्राज्जलिः प्रणतः समहितमनाः (तं) अस्तौत - - हात जोडून व नम्र होऊनस्वस्थ अन्तःकरणाने त्याला स्तविता झाला. ॥ २१ ॥

अजनः - ब्रह्मदेव - अद्य अपि-- अजूनहि - समाधियुक्तिभिः (अपि) आत्मनः परं त्वां न पश्यति - समाधिसारख्या उपायांनी सुद्धा मन व बुद्धि यांच्या पलीकडे असणार्‍या तुला पहात नाही - न (च)बुद्ध्यते - आणि जाणतहि नाही - अपरे तस्य मनः शरीरधीविसर्गसृष्टाः अप्रकाशाःत्रयं कुतः (पश्यामः) - तर मग त्या ब्रह्मदेवाचे जे मन, शरेर व बुद्धि ह्यांपासून उत्पन्न झालेले अज्ञानी असे आह्मी कसे जाणू किंवा पाहू. ॥ २२ ॥

त्रिगुणप्रधानाः ये देहभाजः-- त्रिगुणाला प्राधान्य देणारे, जे देहधारी प्राणी - -गुणान विपश्यन्ति उत वा त्मः चविपश्य्न्ति - गुणांना पहातात आणि त्यातही तमोगुणाला पहातात - -ते- - ते - -बहिप्रकाशाः- - बाहेरच्या विषयांचेच ज्यांना ज्ञान आहे असे - -यन्माययामोहितचेतसः - ज्याच्या मायेने ज्यांची अंतकरणे मोहित झाली आहेत असे - स्वसंस्थं-- आपल्या ह्रद्यातच असणार्‍या - त्वां - तुला - न विदुः - जाणत नाहीत. ॥ २३ ॥

मूढः अहं - मूर्ख असा मी - -तं ज्ञानघनं - त्या ज्ञानस्वरुपी अशा - -स्वभावप्रध्वस्तमायागुण्भेदमोहैः सनंदनाद्यैः मुनिभिः विभाव्यं - मायेच्या सत्वादिगुणांमुळे ज्यांची भेदबुद्धि व अज्ञान ही आत्मस्वरुपाच्या ज्ञानामुळे नष्ट झाली आहेत अशा सनंदनादि मुनीनीच चिंतन करण्यास योग्य अशा - त्वां - तुला - कथं परिभावयामि-- कसा ध्यानात आणू. ॥ २४ ॥

प्रशांतमायागुणकर्मलिङ्‌गं- - अगदी शांत झाले आहेतमायेचे गुण, कर्मे, व स्वरुपे ज्यामध्ये अशा - -ज्ञानोपदेशाय गृहीतदेहं - ज्ञानोपदेश करण्याकरिता देह धारण केलेल्या - -पुराणं पुरुषं त्वां नमामहे - पुराणपुरुष अशा तुला आम्ही नमस्कार करतो. ॥ २५ ॥

त्वन्मायारचिते लोके - तुझ्या मायेने रचिलेल्या लोकांमध्ये - -कमलोभेर्ष्यामोहविभ्रांत चेतसः - कम, लोभ, मत्सर व मोहयांनी ज्यांची अंतःकरणे भ्रमिष्ट झाली आहेत, असे पुरुष - गृहादिषु वस्तुबुद्ध्या भ्रमन्ति-- घर, दार इत्यादि विषयांमध्ये सत्यबुद्धीने भ्रम पावतात. ॥ २६ ॥

सर्वभुतात्मन भगवन-- हे सर्वभूतान्तर्यामी भगवंता - -अद्य- - आज - नः कामकर्मींद्रियाशयः दृढःमोहपाशः - वासना, कर्मे वैंद्रिये यांचा आश्रय आहे ज्याला असा आमचा बळकट मोहपाश - तव दर्शनात छिन्नः (अस्ति) - तुझ्या दर्शनाने तुटला आहे . ॥ २७ ॥

नृप- - हे परीक्षित राजा - -इत्थं गीतानुभावः भगवान कपिलः मुनिः - याप्रमाणे वर्णिला आहे पराक्रम ज्याचा असा भगवान कपिलमुनि - धियां तं अंशुमन्तं अनुगृह्य-- मनःपूर्वक त्या अंशुमानावर कृपा करुन - -इदं उवाच - - असे म्हणाला . ॥ २८ ॥

वत्स - बाळा - -तव पितामहपशुः अयं अश्वः नीयतां - तुझ्या आजोबाचा याज्ञियपशु असा हा घोडा घेऊन जा - इमे च दग्धाः पितरः - आणि हे दग्ध झालेले तुझे पितर - -गङ्‌गभः (एव) अहीन्ति - - गंगोदकालाच योग्य आहेत - इतरत न - दुसर्‍यालानाहीत ॥ २९ ॥

तं परिक्रम्य - - त्याला प्रदक्षिणा करुन - -शिरसा (नमस्कृत्य)प्रसाद्य - मस्तकाने वंदनपूर्वक प्रसन्न करुन - अंशुमान हयं आनयत - अंशुमान अश्व आणिता झाला - सगरः तेन पशुना क्रतुशेषं समापयत - - सगर त्या पशूने अवशिष्ट यज्ञसमाप्त करिता झाला. ॥ ३० ॥

अंशुमति राज्यं न्यस्य - अंशुमानाकडे राज्य सोपवून - -निःस्पृहः मुक्तबन्धनः (सगरः) - निरिच्छ व सर्व बंधनांपासून मुक्त झालेला असासगर - और्वोपदिष्टमार्गेण अनुत्तमां गतिं लेभे - और्व मुनीने उपदेशिलेल्या मार्गाने श्रेष्ठगति मिळविता झाला. ॥ ३१ ॥

नवमः स्कन्धः - अध्याय आठवा समाप्त

GO TOP