श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय ४ रा - अन्वयार्थ

नाभाग आणि अंबरीषाची कथा -

नभगापत्यं नाभागः (आसीत्) - नभगाचा पुत्र नाभाग होय - यविष्ठं यतन्तं ब्रह्मचारिणं कविं आगतं - कनिष्ठ अशा ब्रह्मचर्य पाळून विद्वान होऊन आलेल्या त्याआपल्या भावाला - भ्रातरः दायं व्यभजन - इतर भाऊ (पिता हाच) वाटणी म्हणून देते झाले. ॥ १ ॥

भ्रातरः मह्यं किं अभाक्त - भाऊहो, मला कोणती वाटणी योजली आहे - -तव पितरं भजाम- - तुला पिताच आम्ही देतो - तत, आर्याः मम त्वां अभाक्षुः-- अहो बाबा, वडील भावांनी तुम्हालाच माझी वाटणी केले आहे - पुत्रक तत मा आदृथाः- - हे बाळा, ते भाषण तू मान्य करु नको. ॥ २ ॥

इमे सुमेधसः अंगिरसः अद्य सत्रं आसते - हे बुद्धिवान अंगिरा ऋषि सांप्रत यज्ञ करीत आहेत - कवे - हे विद्वान नभगा - षष्ठं षष्ठं अहः उपत्ये (ते) कर्मणि मुह्यन्ति- - ते प्रतिवेळी सहावा दिवस आला म्हणजे कर्माच्या बाबतीत घोटाळ्यात पडतील. ॥ ३ ॥

तान महात्मनः द्वे वैश्वदेवे सूक्ते त्वंशंसय - त्या महात्म्या अंगिरांना वैश्वदेव नावाची दोन सूक्ते तू सांग - ते स्वः यन्तः - तेअंगिरा स्वर्गाला जात असता - सत्रपरिशेषितं आत्मनः धनं (तुभ्यं) दास्यन्ति - यज्ञात शेष राहिलेले स्वतःचे द्रव्य तुला देतील - अथ ततः गच्छ - म्हणून तेथे जा - सः तथाकृतवान - तो नभग तसे करिता झाला - यथा - जेणेकरुन - ते सत्रपरिशेषितं (धनं) -तस्मै दत्वा स्वर्ग ययुः - ते अगिंरस यज्ञात उरलेले द्रव्य नभगाला देऊन स्वर्गीगेले. ॥ ४-५ ॥

(तत) स्वीकरिष्यन्तं तं - ते द्रव्य घेणार्‍या त्या नभगाला - कश्चित् कृष्णदर्शनः पुरुषः - कोणी एक काळ्या वर्णाचा पुरुष - उत्तरतः अभ्येत्य उवाच-- उत्तर दिशेकडून येऊन म्हणाला - इदं वास्तुकं वसु मम (अस्ति)- - हे यज्ञमंडपातीलद्रव्य माझे आहे. ॥ ६ ॥

तर्हि - त्यावेळी - मानवः - मनुपुत्र नभग - -इदं ममऋषिभिः दत्तं - हे मला ऋषींनी दिले - इति (आह) स्म - असे म्हणाला - नौ(विवादे) ते पितरि प्रश्नः (उचितः) स्यात - आपल्या या वादाविषयी तुझ्या पित्यालाच प्रश्न करणे योग्य होईल - तथा (सः) पितरं पृष्टवान - त्याप्रमाणे तो पित्यालाच विचारता झाला. ॥ ७ ॥

क्वचित - एका प्रसंगी - ऋषयः - ऋषि - यज्ञवास्तुगतं उच्छिष्टंसर्व - यज्ञमंडपातील सर्व द्रव्य - रुद्राय विभागं चक्रुः- - रुद्राला विभाग म्हणून देतेझाले - तस्मात सः देवः सर्व अर्हति - यास्तव तो देव सर्व स्वीकारण्यास योग्य आहे. ॥ ८ ॥

नभगः तं प्रणम्य आह - नभग त्या रुद्राला नमस्कार करुन म्हणाला - ईशवास्तुकं किल तव (अस्ति) - हे रुद्रा, यज्ञमंडपातील सर्वद्रव्य खरोखर तुझे आहे - -इति मे पिता आह- - असे माझा पिता म्हणाला - ब्रह्मन शिरसा त्वां प्रसादये - हेब्रह्मज्ञा, मस्तक विनम्र करुन तुला मी प्रसन्न करितो. ॥ ९ ॥

यत ते पिता धर्म अवदत-- ज्या अर्थी तुझा पिता धर्माला अनसरुन म्हणाला - त्वं तु सत्यं प्रभाषसे - आणि तू खरेबोलतोस - मन्त्रदृशे ते सनातनं ब्रह्मज्ञानं ददामि - मंत्रदृष्टया तुला त्रिकालाबाधित मी ब्रह्मज्ञान असे देतो. ॥ १० ॥

सत्रे परिशेषितं दत्तं द्रविणं मत (मत्तः) गृहाण - यज्ञात राहिलेले ऋषीनी दिलेले हे द्रव्य तू माझ्यापासून घे - इति उक्त्वा सत्यवत्सलः रुद्रःअन्तर्हितः - असे म्हणून सत्यप्रिय रुद्र तेथेच गुप्त झाला. ॥ ११ ॥

प्रातः सायं च-- सकाळी व सायंकाळी - सुसमाहितः यः एतत संस्मरेत - स्वस्थचित्ताने जो ह्या चरित्राचेस्मरण करील - (सः) मन्त्रज्ञः कविः भवति - तो मंत्र जाणणारा विद्वान ऋषि होतो - -तथा आत्मनः गतिं च एव प्राप्नोत्ती- - आणि त्याप्रमाणे परमात्म्याचे स्थानही मिळवितो. ॥ १२ ॥

नाभागात महाभागवतः कृती अंबरीषः अभूत- - नाभागापासून मोठा भगवद्‌भक्त व विद्वान असा अंबरीष राजा झाला - यं क्वचित न प्रतिहतः ब्रह्मशापः अपि न अस्पृशत - ज्याला कोठेही कुंठित न होणारा असा ब्रह्मशापसुद्धा स्पर्श करिता झाला नाही. ॥ १३ ॥

भगवन - हे शुकाचार्य - तस्य धीमतः राजर्षेः - त्या बुद्धिमानराजर्षीचे - (चरितं) श्रोतुम इच्छामि - चरित्र ऐकण्याची मी इच्छा करितो - यत्रनिर्मुक्तः दुरत्ययः ब्रह्मदण्डः - ज्याच्यावर सोडलेला प्रतिकार करण्यास कठीण असा ब्रह्मशापरुपी दंड - न प्राभूत - परिणामकारक झाला नाही. ॥ १४ ॥

महाभागःअंबरीषः - महाभाग्यशाली अंबरीष राजा - सप्तद्वीपवतीं वहीं - सात द्वीपांनी युक्त अशा पृथ्वीला - भुवि अव्ययां श्रियं च - आणि पृथ्वीवरील अविनाशी संपत्तीला - -अतुलं विभवं च लब्ध्वा - आणि तुलनारहित ऐश्वर्याला मिळवून- - विभवनिर्माणंविद्वान - ऐश्वर्याचा नाश जाणणारा असा - पुंसां अतिदुर्लभं (अपि) तत सर्व-- पुरुषानां अत्यंत दुर्लभ असे सर्व ऐश्वर्य - स्वप्नसंस्तुतं मेने - स्वप्नासारखे मानिताझाला - यत पुमान तमः विशति - ज्यामुळे पुरुष मोहात बुडतो. ॥ १५-१६ ॥

भगवति वासुदेवे - भगवान वासुदेवाच्या ठिकाणी - तद्‌भक्तेषु साधुषु च - आणि भगवद्‌भक्त अशा सत्पुरुषांच्या ठिकाणी - परं भावं प्राप्तः - उत्तम भक्तीप्रत पोचला - -येन इदं विश्वं लोष्ठवत स्मृतम - ज्या भक्तीमुळे हे जग ढेकळाप्रमाणे मानिलेजाते. ॥ १७ ॥

सः कृष्ण्पदारविन्दयोः मनः (चकार) - तो श्रीकृष्णाच्या चरणकमलांवर मन लाविता झाला - वैकुण्ठगुणानुवर्णने वचांसि - श्रीविष्णूच्या गुणवर्णनात वाणी योजिता झाला - हरेः मन्दिरमार्जनादिषु करौ - श्रीविष्णूच्या देवालयाच्या सडासंमर्जनादि कर्मामधे दोन्ही हात - अच्युतसत्कथोदये श्रुतिं वै चकार-- भगवंताच्या चागंल्या कथा श्रवण करण्यात कान खरोखर लाविता झाला. ॥ १८ ॥

मुकुन्दलिङ्‌गालयदर्शने दृशौ (चकार) - भगवंताच्या मूर्तीचे व देवळांचे दर्शनघेण्याकडे दोन्ही नेत्र लाविता झाला - सदभृत्यगात्र स्प्रर्शे अड्गसड्गमम - भगवद्‌भक्तांना आलिंगन देण्यात शरीराचा संबंध लाविता झाला - श्रीमत्तुलस्याः तत्पादसरोजसौरभेघ्राणं - भगवंताच्या पदकमळावरील तुलसीपत्राच्या सुवासावर घ्राणेंद्रिय लाविता झाला - -तदर्पितै च रसनां (चकार) - भगवंताला निवेदन केलेल्या पदार्थाचे प्रसाद म्हणून सेवन करण्यात जिव्हा लाविता झाला - हरेःक्षेत्रपदानुसर्पणे पादौ - भगवंताच्या क्षेत्रस्थानी जाण्यासाठी दोन्ही पाय योजिता झाला - ह्रषीकेशपदाभिवन्दने शिरः-- भगवंताच्या चरणांना वंदन करण्याच्या कामी मस्तक - दास्ये च कामं - आणि भगवंताच्या सेवेसाठी वैषयिक पदार्थ लाविता झाला - कामकाम्यया तु न - पण स्वतःचीइच्छा तृप्त करण्यासाठी नाही - यथा उत्तमश्लोकजनाश्रया रतिः - ज्यायोगे भगवंताच्या भक्तांविषयी प्रीती - भवेत तथा सर्वं चकार - उत्पन्न होईल ते सर्व करिता झाला. ॥ १९-२० ॥

एवं सदा- - याप्रमाणे नेहमी - सर्वात्मभावं आत्मनःकर्मकलापं - सर्वत्र आत्मा भरलेला आहे अशा कल्पनेने केल्या जाणार्‍या आपल्या सर्वकर्मसमूहाला - परे अधियज्ञे भगवति अधोक्षजे विदधत - श्रेष्ठ यज्ञमूर्ती भगवान परमेश्वराच्या ठिकाणी निवेदन करीत - तन्निष्ठविप्राभिहितः - भगवन्निष्ठ ब्राह्मणांनो उपदेशिलेला असा - (सः) इमां महीं शशास ह - तो खरोखर ह्या पृथ्वीवर राज्यकरिता झाला. ॥ २१ ॥

असौ- - हा अंबरीष राजा - धन्वनि - निर्जल देशात - -सरस्वतीं अभिस्त्रोतं - सरस्वती नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेकडे - -वसिष्ठासितगौतमादिभिः ततैः - वसिष्ठ,आसित,गौतम इत्यादि ऋषींनी विस्तारलेल्या - -महाविभूत्या उपचिताड्ग्दक्षिणैः - मोठया वैभवामुळे जमविले आहे साहित्य व दक्षिणाज्यात अशा - अश्वमेधैः अधियज्ञं ईश्वंरं ईजे- - अस्वमेध यज्ञांनी यज्ञाधिपति परमेश्वराचे पूजन करिता झाला. ॥ २२ ॥

यस्य क्रतुषु - ज्या अंबरीषाच्या यज्ञांमध्ये - सदस्याःऋत्विजः जनाः च - सभासद,ऋत्विज व इतर लोक - गीर्वाणैः तुल्यरुपाः- - देवासमान रुपांचे - सुवाससः अनिमिषाः व्यदृश्यंत- - सुंदर वस्त्रे धारण केलेले वडोळ्याच्या पापण्या न हलणारे दिसले. ॥ २३ ॥

उत्त्मश्लोकचेष्टितं शृण्वद्‌भिःउपगायद्‌भिः यस्य्स मनुजैः - भगवंताचे गुणनुवाद श्रवण व गायन करणार्‍या ज्या अंबरीषाच्या सेवकांनीही - अमरप्रियः स्वर्गः न प्रार्थितः - देवांना प्रिय अशा स्वर्गाचीइच्छा केली नाही. ॥ २४ ॥

सिद्धानां अपि दुर्लभाः - सिद्धांनाहि अत्यंत दुर्लभ - स्वाराज्यपरिभाविताः कामाः-- आत्मसुखाने तुच्छ केलेले विषय - मुकुन्दं ह्रदि पश्यतः तान न समर्धयन्ति-- परमेश्वराला ह्रदयात पहाणार्‍या त्या भगवद्‌भक्तांना आनंद देत नाहीत. ॥ २५ ॥

सः पार्थिवः - तो राजा - इत्थं - याप्रमाणे - तपोयुक्तेन भक्तियोगेन स्वधर्मेण-- तपश्चर्येने युक्त असा भक्तियोग हाच जो आपला धर्म त्याने - हरि प्रीणन - भगवंतालाप्रसन्न करीत - सर्वान सड्गान शनैः जहौ- - हळूहळू सर्वसंग सोडून देता झाला. ॥ २६ ॥

गृहेषु दारेषु सुतेषु बंधुषु - घर,स्त्री,पुत्र व बंधु या ठिकाणी - -द्वीपोत्तमस्यन्दनवाजिपत्तिषु - उत्त्म हत्ती, रथ, घोडे व पायदळ या ठिकाणी - -अक्षय्यरत्नाभरणायुधादिषु - ज्यांतील रत्ने, अलंकार व आयुधे इत्यादी कधीहि संपत नाहीत अशा - अनन्तकोशेषु - अगणित भांडारगृहांच्या ठिकाणी - असन्मतिंअकरोत- - तुच्छपणाची बुद्धि ठेविता झाला. ॥ २७ ॥

एकांतभक्तिभावेन प्रीतः हरिः - अनन्य भक्तिभावाने प्रसन्न झालेला विष्णु - तस्मै - त्या अंबरीषाला - भृत्याभिरक्षणंप्रत्यनीकभयावहं चक्रं अदात - भक्तांचे रक्षण करणारे व शत्रुसैन्यांला भीती दर्शविणारेसुदर्शन चक्र देता झाला ॥ २८ ॥

कृष्णं आरिराधयिषुः वीरः - श्रीकृष्णाची आराधना करण्याची इच्छा करणारा पराक्रमी अंबरीष - तुल्यशीलया महिष्या युक्तः - समान स्वभावाच्या राणीसह - सांवत्सरं द्वादशीव्रतं दधार - एक वर्षपर्यंत चालणारे द्वादशीव्रत स्वीकारिता झाला. ॥ २९ ॥

व्रतान्ते कार्तिके मासि - व्रताच्या शेवटी कार्तिक महिन्यात - त्रिरात्रंसमुपोषितः (सः) - तीन दिवस उपवास केलेला तो - कदाचित कालिन्द्या स्नातः-- एकदा यमुना नदीत स्नान केलेला असा - मधुवने हरिं अर्चयत - मधुवनात श्रीहरीचीपूजा करिता झाला. ॥ ३० ॥

सर्वोपस्करसंपदा महाभिषेकविधिना अभिषिच्य - सर्वसहित्यसंपत्ती ज्यात आहे अशा महाभिषेक नामक विधीने अभिषेक घालून - अम्बराकल्पैः गन्धमाल्यार्हणादिभिः (च) - वस्त्रे, अलंकार, गंध व पुष्पे इत्यादीपूजासाहित्यादि - तग्दतान्तरभावेन- - भगवंताच्या ठिकाणी जडलेल्या चित्तवृत्तीने - -केशवं - विष्णूला - च- - आणि - सिद्धार्थान महाभागान ब्राह्मणान अपि-- निरिच्छ अशा भाग्यशाली ब्राह्मणांनाही - भक्तितः पूजयामास - भक्तीने पूजिताझाला ॥ ३१-३२ ॥

रुक्मविषाणींनां रुप्यांघ्रीणां सुवाससां- - सुर्वणाची टोपणेज्यांच्या शिंगांत बसविली आहेत व रुप्याचे अलंकार ज्याच्या पायात आहेत आणि ज्या सुंदरवस्त्रांनी आच्छादिलेल्या आहेत अशा - पयःशीलवयोरुपवत्सोपस्करसंपदाम- - दूधदेणार्‍या, गरीब स्वभावाच्या, अल्पवयी, सुंदर, वासरु असलेल्या व सर्व इतर सहित्यांनीयुक्त अशा - गवां षट अर्बुदानि- - साठ कोट गाई - साधुविप्रेभ्यः (तेषां) गृहेषुप्राहिणोत- - सदाचारी ब्राह्मणांना त्यांच्या घरी पाठविता झाला - अग्रे द्विजान गुणवत्तमंस्वादु अन्नं भोजयित्वा - प्रथम ब्राह्मणांना उत्तम प्रकारच्या मधूर अन्नाचे भोजन घालून - -लब्धकामैः अनुज्ञातः- - सर्व इच्छा पूर्ण झालेल्या ब्राह्मणांनी अनुज्ञा दिलेला तो - -पारणाय उपचक्रमे - पारणे करण्यास प्रवृत्त झाला - तर्हि- - इतक्यामध्ये - साक्षात भगवान दूर्वासाः तस्य अतिथिः अभूत- - प्रत्यक्ष भगवान दुर्वास ऋषि त्यांचा अतिथि म्हणून आला. ॥ ३३-३५ ॥

भूपः- - राजा - तं अतिथिं- - त्या अतिथिला - -प्रत्युत्थानासनार्हणैः आनर्च - - उत्थापन, आसन व सत्कार ह्यांनी पूजिता झाला - -पादमूलं उपागतः अभ्यवहाराय ययाचे - चरणकमलाजवळ गेलेला भोजनाकरिता विनविता झाला. ॥ ३६ ॥

सः तद्याच्त्रां प्रतिनद्य - तो दुर्वास राजाच्या प्रार्थनेला मानदेऊन - आवश्यकं कर्तुगतः - - नित्य अहनिक कर्म करण्याकरिता गेला - शुभेकालिंदीसलिले - यमुना नदीच्या स्वच्छ उदकात - बृहत ध्यायन निममज्ज - ब्रह्माचे चिंतन करीत स्नान करिता झाला. ॥ ३७ ॥

धर्मज्ञः- - धर्म जाणणारा तो राजा - -मुहूर्तार्थावशिष्टायां द्वादश्यां- - द्वादशी तिथी अर्धा मुहूर्तच राहिली असता - -तद्धर्मसंकटे (प्राप्ते) - ती धर्मासंबंधाची अडचण उत्पन्न झाली असता - द्विजैः(सह) पारणं प्रति चिंतयामास- - ब्राह्मणांशी व्रताच्या समाप्तीसंबंधी विचार करू लागला. ॥ ३८ ॥

ब्राह्मणातिक्रमे- - ब्राह्मणाची अमर्यादा करण्यात - दोषः (अस्ति)-- दोष आहे - यत द्वादश्यां अपारणे (अस्ति) - जो द्वादशीला पारणे न करणातहीआहे - यत कृत्वा मे साधु भूयात - जे केले असता माझे कल्याण होईल - अधर्मः वा मां न स्पृशेत - आणि मला अधर्म स्पर्श करणार नाही. ॥ ३९ ॥

अथ केवलेनअम्भसा व्रतपारणं करिष्ये - आता केवळ उदकाने व्रताची समाप्ती मी करीन - विप्राः-- ब्राह्मण हो - हि- - कारण - (यत) अब्भक्षणं - जे पाणी पिणे - तत - ते - -अशितं नाशितं च (अस्ति इति) प्राहुः - - खाणे होय, तसेच न खाणे होय असे म्हणतात. ॥ ४० ॥

कुरुश्रेष्ठ - हे परीक्षित राजा - इति - असा विचार केल्यावर - अपःप्राश्य- - उदक पिऊन - मनसा अच्युतं चिंतयन- - मनाने श्रीविष्णूचे चिंतन करीत - -सः राजर्षिः - तो श्रेष्ठ राजा - द्विजागमनं एव प्रत्याचष्ट - ब्राह्मणाच्या आगमनाचीचवाट पहात बसला. ॥ ४१ ॥

कृतावश्यकः यमुनाकूलात आगताः दुर्वासाः - नित्य आवश्यक कर्मे केली आहेत ज्याने असा यमुना तीरापासून आलेला दुर्वास मुनि - राज्ञाअभिनन्दितः- - राज्याने सत्कारिला असता - धिया तस्य चेष्टितं बुबुधे - बुद्धीने त्याचीकृति जाणिता झाला . ॥ ४२ ॥

मन्युना प्रचलद्गात्रः - क्रोधाने ज्याचे अवयव कापतआहेत असा - भ्रुकटीकुटिलाननः- - भुवया चढविल्यामुळे ज्याचे मुख वक्र झाले आहेअसा - सुतरां बुभुक्षितः - फारच भुकेलेला - कृताज्जलिं (नृपं) अभाषत - हातजोडिलेल्या राजाला म्हणाला. ॥ ४३ ॥

अहो- - अहो - अस्य नृशंसस्य श्रिया उन्म्त्तस्यविष्णोः अभक्तस्य ईशमानिनः - या दुष्ट, संपत्तीने माजलेल्या, विष्णुभक्ति न करणार्‍या व स्वतःला समर्थ मानणार्‍या राजाचे - धर्मव्यतिक्रमं - धर्माचे उल्लंघन - पश्यत-- पहा. ॥ ४४ ॥

यः - जो - आयातं अतिथिं मां- - आलेल्या अतिथिरुपी मला - -आतिथ्येन निमन्त्र्य - अतिथीला योग्य अशा सत्काराने बोलावून - अदत्वा च-- आणि न देता - स्वयं भुक्तवान - स्वतः भोजन करिता झाला - तस्य ते अद्य फलंदर्शये च - त्याचे तुला आज फळ दाखवितो. ॥ ४५ ॥

एवं ब्रुवाणः सः रोषविदीपितः(सन) - - याप्रमाणे बोलणारा तो मुनि क्रोधाने पेटलेला असता - जटां उत्कृत्य - जटाउपटून - तया- - तिच्यायोगे - तस्मै - त्या राजाकरिता - कालानलोपमां कृत्यांनिर्ममे - प्रलयकाळच्या अग्नीसारखी राक्षसी निर्मिता झाला. ॥ ४६ ॥

नृपः - अंबरीषराजा - ज्वलन्तीं असिहस्तां पदा भुवं वेपयन्तीं आपतन्तीं तां समुद्वीक्ष्य - क्रोधाने जळणार्‍या, हातात तरवार घेतलेल्या व पायाने पृथ्वीला कापवीत चालणार्‍या त्या कृत्येलापाहून - पदात न चचाल - जाग्यावरुन हालला नाही. ॥ ४७ ॥

महात्मना पुरुषेणभृत्यरक्षायां प्राक दिष्टं चक्रं- - महात्म्या परमेश्वराने भक्तरक्षणार्थ पूर्वी दिलेले सुदर्शनचक्र - पावकः क्रुद्धाहिं इव - अग्नि रागावलेल्या सर्पाला जसा तसे - तां कृत्यांददाह - त्या कृत्येला जाळिते झाले. ॥ ४८ ॥

अभिद्रवत तत उद्वीक्ष्य - धावत येणारे तेचक्र पाहून - स्वप्रयासं च निष्फलं - आणि आपला प्रयन्त फुकट गेलेला - उद्वीक्ष्य- पाहून - भीतः दुर्वासाः- - भ्यालेला दुर्वास मुनि - प्राणपरीप्सयादिक्षु दुद्रुवे-- प्राणरक्षणासाठी दाही दिशांकडे पळत सुटला. ॥ ४९ ॥

उद्‌भूतशिखः दावाग्निः यथा अहिं(तथा) - ज्याच्यातून ज्वाळा उठत आहेत असा वणवा जसा सर्पाच्या तसे - -भगवद्रथांगं तं अन्वघावत - भगवंताचे सुदर्शनचक्र त्या ऋषीच्या पाठीस लागले - -तथा अनुषक्तं ईक्षमाणः मुनिः - तशा रीतीने पाठलाग करणार्‍या सुदर्शन चक्राला पाहणारा दुर्वास ऋषि - मेरोः गुहां विविक्षुः प्रससार - मेरुपर्वताच्या गुहेत शिरण्यास इच्छिणारा पुढे धावू लागला. ॥ ५० ॥

सः - तो दुर्वास - -दिशः नभः क्ष्मां विवरानसमुद्रान सपालान लोकान त्रिदिवं गतः - दाही दिशा, आकाश ,पृथ्वी, सप्तपाताळे, सप्तसमुद्र, लोकपालांसह लोक व स्वर्ग येथे गेला - यतः यतः धावति तत्र तत्र - जेथेजेथे धावत जाई तेथे तेथे - दुष्प्र्सहं सुदर्शनं ददर्श - असह्य सुदर्शन चक्राला पाहताझाला. ॥ ५१ ॥

सः - तो दुर्वास - -यदा कुतश्चित (अपि) अलब्धनाथः(अभवत) - जेव्हा कोठूनहि ज्याला रक्षणकर्ता मिळत नाही असा झाला - तदा- तेव्हा - संत्रस्तचित्तः - घाबरुन गेले आहे अंतःकरण ज्याचे असा - अरणंएषमाणः - आश्रयाची इच्छा करणारा - विरिज्चं देवं समगात - ब्रह्मदेवाकडे गेला - -आत्मयोने विधातः - हे स्वयंभू ब्रह्मदेवा - अजिततेजसः मां त्राहि - श्रीविष्णूच्या तेजापासून माझे रक्षण कर. ॥ ५२ ॥

सहविश्वं एतत मदीयं स्थानं - जगासह हे माझस्थान - द्विपरार्धसंज्ञे क्रीडावसाने संदिधक्षोः - दोन परार्ध इतक्या क्रीडासमाप्तीच्याकाळी जाळून टाकणार्‍या - कालात्मनः यस्य भ्रूड्ग्मात्रेण हि तिरो भविष्यति- कालस्वरुपी ज्याच्या वाकडया भुंवइनेच नाहीसे झाले - अहं भवः दक्षभृगुप्रधानाःप्रजेशभूतेशसुरेशमुख्याःसर्वे वयं - मी, शंकर, दक्ष, भृगु, इत्यादी प्रजापती, भृतपती, मुख्य मुख्य देव असे आम्ही सर्व - यन्नियमं प्रपन्नाः - ज्याची आज्ञा मिळालेले - -लोकहितं - लोकहित होईल अशा रीतीने - मूर्ध्नि अर्पितं (तं नियमं) वहामः- मस्तकावर धारण केलेली ती आज्ञा पाळितो. ॥ ५३-५४ ॥

तस्मात त्वां रक्षितुं अहं नसमर्थः - यास्तव तुझे रक्षण करण्यास मी समर्थ नाही - प्रत्याख्यातः (सन)विष्णुचक्रोपतापितः दुर्वासाः - ब्रह्मदेवाने नाकारलेला असता श्रीविष्णूच्या सुदर्शन चक्राने पीडिलेला दुर्वास - कैलासवासिनं शर्वं शरणं यातः - कैलास पर्वतावर राहणार्‍या शंकराला शरण गेला. ॥ ५५ ॥

तात - हे मुने - वयं भूम्नि न प्रभवामः - आम्हीसर्वव्यापी परमेश्वरापुढे समर्थ नाही - -यस्मिन परे - ज्या परमेश्वराच्या ठिकाणी - ईदृशाःअन्ये अपि सहस्त्रशः अजजीवकोशाः काले भवन्ति - अशी दुसरी सुद्धा हजारो ब्रह्मांडे एखाद्या वेळी उत्पन्न होतात - (काले) च न भवन्ति - - आणि दुसर्‍या वेळी नाश पावतात - हि- - खरोखर - यत्र वयं भ्रमामः - ज्या ब्रह्मांडामध्ये आम्ही भ्रमण करीतअसतो. ॥ ५६ ॥

अहं सनत्कुमारः नारदः भगवान अजः कपिलः अपांतरतमः देवलःधर्मःआसुरिः च - मी, सनत्कुमार, नारद, भगवान ब्रह्मदेव, कपिल, व्यास, देवल, यमधर्म व प्रल्हाद - अन्ये च मरीचिप्रमुखाः - आणि दुसरे मरीचप्रमुख - -पारदर्शिनःसिद्धेशाः - सर्वज्ञ असे मोठमोठे सिद्ध - सर्वे वयं - सर्व आम्ही - मायया वृताःयन्मायां न विदाम - मायेने वेष्टिलेले ज्याच्या मायेला जाणू शकत नाही. ॥ ५७-५८ ॥

तस्य विश्वेश्वरस्य - त्या जगत्पति ईश्वराचे - इदं शस्त्रं - हे सुदर्शन चक्र - नः हिदुर्विषहं {अस्ति) - आम्हाला खरोखर निवारण्यास कठिण आहे - तं एव शरणं याहि- त्या विष्णूला तू शरण जा - हरिः ते शं विधास्यति - श्रीविष्णु तुझे कल्याण करील. ॥ ५९ ॥

ततः निराशः दुर्वासाः - तेव्हा निराश झालेला दुर्वासा - भगवतःवैकुण्ठाख्यं पदं ययौ - भगवंताच्या वैकुंठ नामक लोकाला प्राप्त झाला - यतश्रीनिवासः श्रिया सह अध्यास्ते - जेथे श्रीविष्णू लक्ष्मीसह राहतो. ॥ ६० ॥

अजितशस्त्रवह्रिना - श्रीविष्णुच्या सुदर्शन चक्राच्या तेजाने - संदह्यमानः - दग्धहोणारा - तत्पादमूले - त्या विष्णूच्या चरणांवर - पतितः सवेपथुः (सः) आह-- पीडलेला व थरथर कापणारा तो दुर्वास म्हणाला - अच्युत अनंत सदीप्सितप्रभोविश्वभावन - हे अच्युता, हेअनंता, हे साधूंनी इच्छिलेल्या जगच्चालक परमेश्वरा - -कृतागसं मा हि अव - खरोखर अपराधी अशा माझे तू रक्षण कर. ॥ ६१ ॥

तेपरमानुभावं अजानता मया - तुझे उत्कृष्ट सामर्थ्य न जाणणार्‍या माझ्याकडून - भवतःप्रियाणां अघं कृतं - तुमच्या प्रियभक्तांचा अपराध केला गेला - -विधातः - हेसृष्टयुत्पादका परमेश्वरा - तस्य अपचितिं विधेहि - त्या पातकाचे क्षालन कर - यन्नाम्नि उदिते नारकः अपि मुच्यते - ज्याचे नाव उच्चारिले असता नरकातील प्राणीसुद्धा मुक्त होतो. ॥ ६२ ॥

-द्विज - हे दुर्वास मुने - साधुभिः भक्तैः ग्रस्तह्रद्यः - सदाचारीभक्तांनी ज्याचे ह्रद्य स्वाधीन करुन घेतले आहे असा - भक्तजनप्रियः अहं - भक्तावरप्रेम करणारा मी - अस्वतन्त्रः इव भक्तपराधीनः हि - खरोखर परतत्रं पुरुषाप्रमाणेभक्तांच्याच सर्वस्वी अधीन आहे. ॥ ६३ ॥

ब्रह्मन - हे ब्राह्मणा - अहं मद्‌भक्तैःसाधुभिः विना - मी माझे भक्त जे सज्जन त्यांच्याशिवाय - -आत्मानं- - स्वतःला - आत्यन्तिकीं श्रियं च (अपि) - आणि अतिनिकट राहणार्‍या लक्ष्मीला सुद्धा - नआशासे - इच्छित नाही - अहं येषां परा गतिः - मी ज्यांचा श्रेष्ठ आधार आहे. ॥ ६४ ॥

दारागारपुत्राप्तान प्राणान इमं वित्तं परं (च) हित्वा - स्त्री, घर, पुत्र, आप्त, प्राण, द्रव्य आणि परलोक यांना सोडून - ये मां शरणं याताः - जे मला शरण आले - -तान त्यक्तुं कथं उत्सहे - त्यांना टाकण्यास मी कसा उद्युक्त होईन. ॥ ६५ ॥

यथासत्स्स्त्रयः सत्पतिं (तथा) - जशा पतिव्रता स्त्रिया सदाचारी पतीला तसे - मयिनिर्बद्धह्रद्याः समदर्शनाः साधवाः - माझ्या ठिकाणी चित्तवृत्ति लाविलेले समदृष्टी साधु - -भक्त्या मां वशी कुर्वन्ति- - भक्तीने मला वश करितात. ॥ ६६ ॥

सेवया पूर्णाः च (ते) - आणि पूर्ण सेवा केलेले ते भक्त - मत्सेवया प्रतीतं सालोक्यादिचतुष्टयं (अपि) न इच्छन्ति- - माझ्या सेवेने प्राप्त होणार्‍या सालोक्यादि चार मुक्तींनाही इच्छित नाहीत - अन्यत कालविद्रुतं कुतः - मग दुसरे कालगतीने नष्ट होणारे कोठून इच्छितील. ॥ ६७ ॥

साधवः मह्यं हृदयं (भवन्ति) - साधु मला हृदय होत - साधूनां ह्रदयं तुअहं - मी तर साधूंचे ह्र्दय आहे - ते मदन्यत न जानन्ति - - ते भक्त माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला जाणत नाहीत - अहं तेभ्यः मनाक अपि न (जानमि) - मी त्या भक्तांशिवाय थोडे सुद्धा जाणत नाही. ॥ ६८ ॥

विप्र - हे ब्राह्मणा - तव उपायंकथयिष्यामि - तुला मी उपाय सांगतो - तत शृणुष्व - तो तू ऐक - ते अयंआत्माभिचारः यतः (आगतः) - तू स्वतःवर ओढवून घेतलेले हे मोठे संकटज्याच्यामुळे प्राप्त झाले - तं हि वै भवान यातु - त्यालाच आपण खरोखर शरण जा - -साधुषु प्रहितं तेजः प्रहर्तुः अशिवं कुरुते - साधूंवर गाजविलेला प्रभाव प्रहार करणार्‍याचेच अकल्याण करितो. ॥ ६९ ॥

तपः विद्या च - तपश्चर्या आणि ज्ञान - उभेविप्राणां निःश्रेयसकरे (स्तः) - दोन्ही ब्राह्मणांना मोक्ष देणारी होत - ते एवदुर्विनितस्य कर्तुः - तीच दुराचरणी पुरुषाला - अन्यथा कल्पेते - विपरीत फले देणारीहोतात. ॥ ७० ॥

ब्रह्मन - हे ब्राह्मणा - तत गच्छ - याकरिता तू जा - ते भद्रं अस्तु -- तुझे कल्याण असो - महाभागं नाभागतनयं नृपं क्षमापय - भाग्यशाली नाभागपुत्र अंबरीष राजाची क्षमा माग - ततः (ते दुःखस्य ) शान्तिः भविष्यति - त्यामुळे तुझ्यादुःखाची शांति होईल. ॥ ७१ ॥

नवमः स्कन्धः - अध्याय चवथा समाप्त

GO TOP