श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय १६ वा - अन्वयार्थ

कश्यपांकडून अदितीला पयोव्रताचा उपदेश -

एवं पुत्रेषु नष्टेषु - याप्रमाणे पुत्र नाहीसे झाले असता - दैत्यैः त्रिविष्टपे हृते - दैत्यांनी स्वर्गाचे राज्य हरण केले असता - तदा - त्यावेळी - देवमाता अदितिः - देवांची माता अदिती - अनाथवत् पर्यतप्यत् - दीनाप्रमाणे खिन्न झाली. ॥१॥

एकदा - एके दिवशी - चिरात् समाधेः विरतः - दीर्घ काळाच्या समाधीपासून थांबलेला - भगवान् कश्यपः - भगवान कश्यप - निरुत्सवं निरानन्दं तस्याः आश्रमम् अगात् - उत्सव व आनंद यांनी रहित अशा त्या अदितीच्या आश्रमाला आला. ॥२॥

कुरुद्वह - हे कुरुश्रेष्ठा - कृतासनपरिग्रहः - केला आहे आसनाचा स्वीकार ज्याने असा - यथान्यायं सभाजितः - योग्य रीतीने पूजिलेला - सः - तो कश्यप - दीनवदनां पत्नीम् इदं आह - दीनमुख पत्नीला हे म्हणाला. ॥३॥

भद्रे - हे कल्याणि - अधुना लोके - सांप्रत ह्या लोकी - विप्राणां अभद्रं न अपि आगतम् - ब्राह्मणांवर काही संकट तर आले नाही ना ? - धर्मस्य (अभद्रं) न (अपि) - धर्मावर संकट आले नाही ना ? - मृत्योः छंदानुवर्तिनः लोकस्य - मृत्यूच्या इच्छेनुरूप वागणार्‍या लोकांवर - (अभद्रं) न अपि - काही संकट आलेले नाही ना ? ॥४॥

गृहमेधिनि - हे गृहस्थाश्रमी स्त्रिये - यत्र हि अयोगिनां योगः (भवति) - ज्यात योगसाधन न करणार्‍यांनाही योगफल प्राप्त होते - तेषु गृहेषु - त्या घरांमध्ये - धर्मस्य अर्थस्य कामस्य - धर्म, अर्थ, व काम यांच्यावर - किञ्चित् अकुशलम् (आगतम्) अपि वा - काही संकट आले की काय ? ॥५॥

क्वचित् वा - अथवा एखादे वेळी - अतिथयः अभ्येत्य - अतिथी येऊन - कुटुम्बासक्तया त्वया - गृहकार्यात गुंतलेल्या अशा तुझ्याकडून - प्रत्युत्थानेन अपूजिताः - सत्कारादिकाने न पूजिलेले असे - गृहात् याताः अपि वा - घरातून निघून गेले की काय ? ॥६॥

येषु गृहेषु - ज्या घरात - अतिथयः सलिलैः अपि - अतिथि उदकांनी - न अर्चिताः यदि निर्यान्ति - न पूजिलेले असे जर निघून जातील - (तर्हि) ते नूनं - तर ती घरे खरोखर - फेरुराजगृहोपमाः (स्युः) - मोठया कोल्ह्यांच्या विवरांसारखी होत. ॥७॥

सति भद्रे - हे कल्याणि साध्वी - मयि प्रोषिते - मी प्रवासाला गेलो असता - उद्विग्नधिया त्वया - उदासीन आहे चित्त जिचे अशा तुझ्याकडून - वेलायां कर्हिचित् - होमाची वेळ झाली असता एखाद्या प्रसंगी - अग्नयः - अग्नी - हविषा न हुताः तु - हविर्भागाने पूजावयाचे राहिले नाहीत ना ? ॥८॥

गृहान्वितः - गृहस्थाश्रमी पुरुष - यत्पूजया - ज्यांचे पूजन केल्यामुळे - कामदुघान् लोकान् याति - सर्व कामना पूर्ण करणार्‍या लोकांप्रत जातो - ब्राह्मणः अग्निः च - असा ब्राह्मण आणि अग्नि - सर्वदेवात्मनः विष्णोः मुखं वै (अस्ति) - सर्व देवतात्मक विष्णूचे खरोखर मुख होत. ॥९॥

मनस्विनी - हे मनोनिग्रही स्त्रिये - अपि सर्वे तव पुत्राः कुशलिनः (सन्ति) - तुझे सर्व पुत्र खुशाल आहेत ना ? - अहं लक्षणैः भवत्या आत्मानं - मी खुणांवरून तुझे अंतःकरण - अस्वस्थं लक्षये - अस्वस्थ आहे असा तर्क करितो. ॥१०॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मज्ञानी कश्यपा - द्विजगवां धर्मस्य - ब्राह्मण, गाई, धर्म आणि - अस्य जनस्य च भद्रं (अस्ति) - हे सर्व लोक ह्यांचे कल्याण आहे - गृहमेधिन् - हे गृहस्थाश्रमी मुने - इमे गृहाः त्रिवर्गस्य परं क्षेत्रं (अस्ति) - हे घर, धर्म, अर्थ व काम यांचे मुख्य ठिकाण होय. ॥११॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मज्ञानी ऋषे - अग्नयः अतिथयः भृत्याः - अग्नि, अतिथि, सेवक आणि - ये च लिप्सवः भिक्षवः - काही मिळण्याची इच्छा करणारे याचक - (इति) सर्वं - ह्या सर्वांना - भगवतः अनुध्यानात् - ईश्वराच्या नित्य चिंतनामुळे - न रिष्यति - उणे पडत नाही. ॥१२॥

भगवन् - हे सर्वैश्वर्यसंपन्न ऋषे - प्रजाध्यक्षः भवान् - प्रजापति असे आपण - यस्याः एव धर्मान् प्रभाषते - जिला अशा रीतीने धर्म सांगत असता - (तस्याः) मे कः नु - त्या माझी कोणती बरे - मानसः कामः न संपद्येत - अंतःकरणातील इच्छा पूर्ण होणार नाही ? ॥१३॥

मारीच - हे मरीचिपुत्रा - सत्त्वरजस्तमोजुषः - सत्त्वगुण, रजोगुण व तमोगुण - इमाः प्रजाः - यांचे सेवन करणार्‍या या प्रजा - तव एव मनःशरीरजाः (सन्ति) - तुझ्याच मनापासून व शरीरापासून जन्मल्या आहेत - प्रभो - हे समर्थ मुने - भवान् तासु असुरादिषु समः (अस्ति) - आपण त्या दैत्यादिकांच्या ठिकाणी समबुद्धि ठेवणारे आहा - तथापि महेश्वरः भक्तं भजते - तथापि परमेश्वरही भक्तांचा पक्ष स्वीकारितो. ॥१४॥

तस्मात् - त्याकरिता - ईश - हे समर्थ कश्यपा - सुव्रत प्रभो - हे व्रताचरणशील समर्थ मुने - भजन्त्याः मे श्रेयः चिन्तय - सेवा करणार्‍या माझ्या कल्याणाचा उपाय योज - सपत्नैः हृतश्रियः - शत्रूंनी ज्यांची संपत्ती व - हृतस्थानान् नः पाहि - स्थान हिरावून घेतली आहेत अशा आमचे रक्षण करा. ॥१५॥

परैः विवासिता सा अहं - शत्रूंनी घालवून दिलेली ती मी - व्यसनसागरे मग्ना (अस्मि) - दुःखसमुद्रात बुडुन गेले आहे - प्रबलैः (अरिभिः) मम ऐश्वर्यं - बलाढय अशा शत्रूंनी माझे ऐश्वर्य, - श्रीः यशः स्थानं हृतानि (सन्ति) - लक्ष्मी, कीर्ती व ठिकाण ही सर्व हरण केली आहेत. ॥१६॥ - कल्याणकृत्तम साधो - कल्याणकारी पुरुषांत श्रेष्ठ अशा हे साधो कश्यपा - मम आत्मजाः - माझे पुत्र - तानि यथा पुनः प्रपद्येरन् - ज्यायोगे ती राज्यैश्वर्यै पुनः मिळवितील - तथा धिया (निश्चित्य) - तसे आपल्या बुद्धीने निश्चित करून - कल्याण विधेही - त्याचे कल्याण करा. ॥१७॥

अदित्या एवम् अभ्यर्थितः - अदितीने याप्रमाणे प्रार्थिलेला - कः स्मयन् इव - प्रजापति कश्यप किंचित हसल्यासारखे करून - ताम् आह - तिला म्हणाला - अहो विष्णोः मायाबलं - कितीही विष्णूच्या मायेचे सामर्थ्य - इदं जगत् स्नेहबद्धं - हे जग प्रेमपाशांनी जखडून टाकिले आहे. ॥१८॥

भौतिकः अनात्मा देहः क्व - पंचमहाभूतांपासून बनलेला जड देह कोणीकडे - च - आणि - प्रकृतेः परः आत्मा क्व - मायेच्या पलीकडे असणारे चैतन्य कोणीकडे - के कस्य पति पुत्राद्याः - कोण कोणाचे पतिपुत्रादिक - हि मोहः एव (सर्वस्य) कारणम् (अस्ति) - खरोखर अज्ञानच सर्वांचे कारण होय. ॥१९॥

पुरुषं भगवन्तं - सर्वांच्या शरीरात राहणार्‍या षड्‌गुणैश्वर्यसंपन्न, - जनार्दनं - लोकांच्या पीडा नष्ट करणार्‍या, - सर्वभूतगुहावासं - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आत्मस्वरूपाने राहणार्‍या, - जगद्‌गुरुं वासुदेवं उपतिष्ठस्व - जगद्‍गुरु, सर्वव्यापी व प्रकाशमान अशा विष्णूची उपासना कर. ॥२०॥

दीनानुकम्पनः विष्णुः - दीनांवर दया करणारा तो विष्णु - ते कामान् विघास्यति - तुझ्या इच्छा पूर्ण करील - भगवद्भक्तिः अमोघा - श्रीविष्णूची भक्ति व्यर्थ न जाणारी आहे - इतरा न - दुसरी भक्ती तशी नाही - इति मम मतिः - असे माझे मत आहे. ॥२१॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मज्ञानी कश्यपा - अहं केन विधिना जगत्पतिम् उपस्थास्ये - मी कोणत्या प्रकाराने श्रीविष्णूची आराधना करावी - यथा सत्यसंकल्पः सः - ज्यायोगे तो सत्यसंकल्प भगवान - मे मनोरथं विदध्यात् - माझे मनोरथ पूर्ण करील. ॥२२॥

द्विजश्रेष्ठ - हे ब्राह्मणश्रेष्ठ मुने - देवः - श्रीविष्णु - पुत्रकैः सह सीदन्त्याः - मुलांसह खिन्न होणार्‍या - मे (यथा) आशु तुष्यति - माझ्यावर जेणेकरून लवकर संतुष्ट होईल - (तथा) त्वं तदुपधावनं विधिम् आदिश - असा तू भगवंताला आळवण्याचा प्रकार सांग. ॥२३॥

प्रजाकामस्य मे - संततीची इच्छा करणार्‍या माझ्याकडून - एतत् पृष्टः भगवान् पद्मजः - हा प्रश्न विचारिलेला सर्वैश्वर्यसंपन्न ब्रह्मदेव - यत् केशवतोषणं व्रतम् आह - जे भगवंताला संतुष्ट करण्याचे व्रत सांगता झाला - (तत्) ते प्रवक्ष्यामि - ते तुला सांगतो. ॥२४॥

फाल्गुनस्य अमले पक्षे - फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षामध्ये - द्वादशाहं - बारा दिवसांपर्यंत - पयोव्रतः - पयोव्रतनामक व्रत पाळून - परमया भक्त्या अन्वितः (भूत्वा) - मोठया भक्तीने युक्त होऊन - अरविंदाक्षम् अर्चयेत् - कमळनेत्र अशा श्रीविष्णूचे पूजन करावे. ॥२५॥

सिनीवाल्यां - अमावस्येच्या दिवशी - यदि वै लभ्येत (तर्हि) - जर खरोखर मिळेल तर - क्रोडदीर्णया मृदा आलिप्य - डुकराने उकरलेल्या मातीचा अंगाला लेप करून - स्रोतसि स्नायात् - नदीप्रवाहात स्नान करावे - एतं मन्त्रम् (च) उदीरयेत् - आणि हा मंत्र म्हणावा. ॥२६॥

देवि - हे पृथ्वी देवि - स्थानं इच्छता आदिवराहेण - स्थानाची इच्छा करणार्‍या वराहावतारी परमेश्वराने - त्वं रसायाः उध्दृता असि - तुला रसातलातून वर काढिले - तुभ्यं नमः - तुला नमस्कार असो - मे पाप्मानं प्रणाशय - माझ्या पापांचा तू नाश कर. ॥२७॥

निर्वर्तितात्मनियमः - उरकले आहे स्नानसंध्यादि नित्य कृत्य ज्याने असा - समाहितः - सावधानचित्त असा - अर्चायां - मूर्तींच्या ठिकाणी - स्थंडिले सूर्ये जले - स्थंडिलाच्या ठिकाणी, तसेच सूर्य, उदक, - वह्नौ गुरौ अपि - अग्नि व गुरु ह्या ठिकाणीही - देवम् अर्चेत् - देवांची पूजा करावी. ॥२८॥

भगवते पुरुषाय महीयसे - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न, शरीरात वास्तव्य करणार्‍या, फार मोठया, - सर्वभूतनिवासाय - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आत्मरूपाने राहणार्‍या - वासुदेवाय साक्षिणे - सर्वव्यापी प्रकाशमान व साक्षीरूपाने असणार्‍या - तुभ्यं नमः - तुला नमस्कार असो. ॥२९॥

अव्यक्ताय सूक्ष्माय - ज्याचे स्वरूप स्पष्ट होणार नाही, - चतुर्विंशगुणज्ञाय - जो सूक्ष्म असून चोवीस तत्त्वे जाणतो, - गुणसङ्ख्यानहेतवे - तत्त्वांची गणती करण्यास - प्रधानपुरुषाय च नमः - कारणीभूत अशा पुरुषोत्तमाला नमस्कार असो. ॥३०॥

द्विशीर्ष्णे त्रिपदे चतुःशृंगाय - दोन मस्तके, तीन पाय, चार शिंगे, - तन्तवे सप्तहस्ताय - विस्तृत स्वरूप व सात हात अशी ज्याला आहेत, - त्रयीविद्यात्मने यज्ञाय नमः - त्या वेदत्रयात्मक यज्ञस्वरूपी परमेश्वराला नमस्कार असो. ॥३१॥

शिवाय भद्राय नमः - कल्याण करणार्‍या भद्ररूपी भगवंताला नमस्कार असो - शक्त्तिधराय नमः - मायारूप शक्ति धारण करणार्‍या ईश्वराला नमस्कार असो - च - आणि - सर्वविद्याधिपतये - संपूर्ण विद्यांचा स्वामी व - भूतानां पतये नमः - सर्व प्राण्यांचा पालक अशा परमेश्वराला नमस्कार असो. ॥३२॥

हिरण्यगर्भाय - सुवर्णाचे ब्रह्मांड ज्याच्या शरीरात गर्भरूपाने राहात आहे, - जगदात्मने प्राणाय नमः - अशा जगद्‌व्यापक प्राणस्वरूपी भगवंताला नमस्कार असो - योगैश्वर्यशरीराय - योगसंपत्ति हे ज्याचे शरीर व - योगहेतवे ते नमः - योगाला जो साधनीभूत अशा तुला नमस्कार असो. ॥३३॥

आदिदेवाय ते नमः - जगाच्या आधी असलेल्या तुला नमस्कार असो - साक्षिभूताय ते नमः - साक्षिरूपाने असणार्‍या तुला नमस्कार असो - नारायणाय ऋषये - ऋषिकुळात नरनारायण नावाने - नराय हरये नमः - अवतार घेणार्‍या विष्णूला नमस्कार असो. ॥३४॥

मरकतश्यामवपुषे - पाचेप्रमाणे श्यामवर्ण शरीराच्या व - अधिगतश्रिये (ते) नमः - लक्ष्मीने युक्त अशा तुला नमस्कार असो - केशवाय तुभ्यं नमः - जलात शयन करणार्‍या तुला नमस्कार असो - पीतवाससे ते नमः - पिवळे वस्त्र धारण करणार्‍या तुला नमस्कार असो. ॥३५॥

वरेण्य - हे श्रेष्ठा - वरदर्षभः - वर देणार्‍यांत श्रेष्ठ अशा हे विष्णो - त्वं पुंसां सर्ववरदः (असि) - तू पुरुषांना सर्व वर देणारा आहेस - अतः - म्हणून - धीराः श्रेयसे ते पादरेणुम् उपासते - ज्ञानी तुझ्या चरणधूळीची उपासना करितात. ॥३६॥

देवाः श्रीः च - देव आणि लक्ष्मी - तत्पादपद्मयोः - त्याच्या चरणकमलांच्या - आमोदं स्पृहयन्तः इव - सुगंधाची इच्छा करणारेच की काय - यम् अन्ववर्तन्त - ज्याची उपासना करतात - (सः) भगवान् मे प्रसीदतां - तो परमेश्वर माझ्यावर प्रसन्न होवो. ॥३७॥

(पुरुषः) श्रद्धया युक्तः (भूत्वा) - पुरुषाने श्रद्धायुक्त होऊन - एतैः मन्त्रैः आवाहनपुरस्कृतं - ह्या मंत्रांनी आवाहनादिकांनी सत्कारलेल्या - हृषीकेशं - विष्णूला - पाद्योपस्पर्शनादिभिः अर्चयेत् - पाद्य, आचमन इत्यादि षोडशोपचारांनी पूजावे. ॥३८॥

गन्धमाल्याद्यैः विभुं अर्चित्वा - चंदन, फुले इत्यादि पदार्थांनी श्रीविष्णूची पूजा करून - पयसा स्नपयेत् - दुधाने स्नान घालावे - ततः - नंतर - द्वादशाक्षरविद्यया - बारा अक्षरांच्या मंत्राने, - वस्त्रोपवीताभरणपाद्योपस्पर्शनैः - वस्त्र, यज्ञोपवीत, अलंकार, पाद्य, आचमन, - गन्धधूपादिभिः च - गंध व धूप इत्यादि उपचार समर्पण करून - (विभुं) अर्चेत् - श्रीविष्णूची पूजा करावी. ॥३९॥

विभवे सति - सामर्थ्य असता - पयसि घृतं ससर्पिः - दुधात शिजविलेल्या व घृत आणि - सगुडं शाल्यन्नं नैवेद्यं दत्वा - गूळ ह्यांनी युक्त अशा भाताचा नैवेद्य अर्पण करून - मूलविद्यया - द्वादशाक्षरी मूल मंत्रांने - जुहुयात् - हवन करावे. ॥४०॥

निवेदितं तद्भक्ताय दद्यात् - भगवंताला अर्पण केलेला नैवेद्य भगवद्भक्ताला द्यावा - स्वयं वा भुञ्जीत - किंवा स्वतः खावा - आचमनं दत्वा - आचमन देऊन आणि - अर्चित्वा च तांबूलं निवेदयेत् - पूजा करून तांबूल अर्पण करावा. ॥४१॥

(मूलमंत्रं) अष्टोत्तरशतं जपेत् - बाराक्षरी मूळ मंत्राचा १०८ वेळा जप करावा - स्तुतिभिः विभुं स्तुवीत - स्तोत्रांनी विष्णुची स्तुति करावी - प्रदक्षिणं कृत्वा - प्रदक्षिणा घालून - मुदा भूमौ प्रणमेत् - मोठया आनंदाने नमस्कार घालावा. ॥४२॥

शिरसि तच्छेषां कृत्वा - मस्तकावर भगवंताचा निर्माल्य धारण करून - देवम् उद्वासयेत् - देवतेचे विसर्जन करावे - ततः पायसेनद्‌व्यवरान् विप्रान् - नंतर कमीतकमी दोन ब्राह्मणांना तरी - यथोचितं भोजयेत् - यथायोग्य खिरीचे भोजन घालावे. ॥४३॥

सभाजितैः तैः अनुज्ञातः (सः) - सत्कारिलेल्या त्या ब्राह्मणांनी अनुज्ञा दिलेल्या त्या व्रती पुरुषाने - सेष्टः - इष्टमित्रांसह - शेषं भुञ्जीत - उरलेले अन्न सेवन करावे - अथ - नंतर - तद्रात्र्यां ब्रह्मचारी (सन्) - त्या रात्री ब्रह्मचारी राहून - श्वोभूते प्रथमे अहनि - उजाडल्यावर पहिल्या दिवशी - स्नातः शुचिः सुसमाहितः (भूत्वा) - स्नान केलेला, शुद्ध व स्वस्थचित्त होऊन - यथोक्तेन विधिना पयसा स्नापयित्वा - देवाला पूर्वी सांगितलेल्या विधीने दुधाने स्नान घालून - यावद्‌व्रतसमापनं अर्चेत् - देवपूजनादि सर्व गोष्टी व्रत संपेपर्यंत चालू ठेवाव्या. ॥४४-४५॥

विष्णवर्चनादृतः - भगवंताच्या पूजेविषयी आदर बाळगणारा - पयोभक्षः (सः) - व दूध भक्षण करणारा होत्साता - इदं व्रतं चरेत् - हे व्रत करावे - पूर्ववत् अग्निं जुहुयात् - पूर्वीप्रमाणे अग्नीमध्ये हवन करावे - च - आणि - ब्राह्मणान् अपि भोजयेत् - ब्राह्मणांनाही भोजन घालावे. ॥४६॥

एवं तु - याप्रमाणे तर - पयोव्रतः - हे पयोव्रत स्वीकारून - द्वादशाहं अहरहः - मनुष्याने बारा दिवसपर्यंत प्रतिदिवशी - हरेः आराधनं कुर्यात् - श्रीविष्णूचे आराधन करावे - (च) होमं अर्हणं द्विजतर्पणं (कुर्यात्) - आणि होम, पूजन आणि ब्राह्मणभोजन ही करावी. ॥४७॥

प्रतिपद्दिनम् आरभ्य - प्रतिपदेला प्रारंभ करून - यावत् शुक्लत्रयोदशी (भवेत्) - शुक्लपक्षातील त्रयोदशी येईपर्यंत - ब्रह्मचर्यम् अघःस्वप्नं - ब्रह्मचर्य पाळावे, खाली जमिनीवर निजावे - त्रिषवणं स्नानं च चरेत् - व तिन्ही वेळा स्नान करावे. ॥४८॥ - सर्वभूतानाम् अहिंस्रः - कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणारा - वासुदेवपरायणः च (भूत्वा) - आणि भगवंताची अनन्य भक्ती करणारा होऊन - असदालापं तथा - वाईट भाषणे तसेच - उच्चावचान् भोगान् वर्जयेत् - लहानमोठे विषयभोग टाळावे. ॥४९॥

अथो - नंतर - त्रयोदश्यां - त्रयोदशीच्या दिवशी - विधिकोविदैः - शास्त्रविधी जाणणार्‍यांकडून - शास्त्रदृष्टेन विधिना - शास्त्रांत सांगितलेल्या प्रकाराचे - पञ्चकैः - पंचामृतांनी - विभोः विष्णोः स्नपनं कारयेत् - विश्वव्यापक विष्णुला स्नान घालावे. ॥५०॥

वित्तशाठयविवर्जितः - द्रव्याविषयी फसवणूक न करिता - महतीं पूजां कुर्यात् - महापूजा करावी - च - आणि - शिपिविष्टाय विष्णवे - जीवांतर्गत विष्णूला उद्देशून - पयसि चरुं निरूप्य - दुधात भात सिद्ध करून - सुसमाहितः - स्वस्थ चित्ताने - श्रृतेन तेन - शिजविलेल्या त्या - पुरुषं यजेत - परमेश्वराचे यजन करावे - च - आणि - अतिगुणवत् - पुष्कळ पदार्थांनी युक्त असा - पुरुषतुष्टिदं नैवेद्यं दद्यात् - परमेश्वराला संतुष्ट करणारा नैवेद्य समर्पण करावा. ॥५१-५२॥

ज्ञानसम्पन्नम् आचार्यं - ज्ञानी आचार्याला - (तथा) च - त्याप्रमाणे - ऋत्विजः - ऋत्विजांना - वस्त्राभरण धेनुभिः तोषयेत् - वस्त्रे, अलंकार व गाई देऊन संतोषवावे - तत् हरेः आराधनं विद्धि - ते श्रीविष्णूचे आराधन समज. ॥५३॥

शुचिस्मिते - शुद्ध मंदहास्य करणार्‍या हे स्त्रिये - च - आणि - तत्र ये समागताः तान् - तेथे जे कोणी आले असतील त्यांना - च - आणि - अन्यान् ब्राह्मणान् - दुसर्‍या ब्राह्मणांना शक्तीनुसार - सदन्नेन शक्त्या गुणवता भोजयेत् - गुणसंपन्न उत्तम अन्नाचे भोजन घालावे. ॥५४॥

गुरवे ऋत्विग्भ्यः च - गुरु आणि ऋत्विज यांना - यथार्हतः दक्षिणां दद्यात् - योग्यतेप्रमाणे दक्षिणा द्यावी - च - आणि - अन्नाद्येन समुपागतान् - अन्नादि देऊन आलेल्या - आश्वपाकान् प्रीणयेत् - चांडाळापर्यंत सर्व प्राण्यांना तृप्त करावे. ॥५५॥

च - आणि - सर्वेषु दीनान्धकृपणेषु भुक्तवत्सु - सर्व दीन, आंधळे व कृपण ह्यांनी भोजन केले असता - च - आणि - तत् विष्णोः प्रीणनं विद्वान् - तेच अन्नदान भगवंताला संतुष्ट करिते असे जाणून - बंधुभिः सह भुञ्जीत - बांधवांसह भोजन करावे. ॥५६॥

अन्वहं च - व प्रतिदिवशी - नृत्यवादित्रगीतैः - नाचणे, वादन व गायन यांनी - स्तुतिभिः - स्तुतींनी - स्वस्तिवाचकैः - आणि मंगलकारक शुभ मंत्रांनी - तत्कथाभिः च - आणि भगवंताच्या कथांनी - भगवतः पूजां कारयेत् - परमेश्वराची पूजा करावी. ॥५७॥

एतत् पयोव्रतं नाम - खरोखर हे पयोव्रत - परं पुरुषाराधनं (अस्ति) - परमेश्वराचे आराधन करण्याचे उत्तम साधन होय - पितामहेन अभिहितं - ब्रह्मदेवाने सांगितलेले - मया ते समुदाहृतं - मी तुला सांगितले. ॥५८॥

महाभागे - हे महाभाग्यशाली स्त्रिये - त्वं च - तू सुद्धा - नियतात्मा (भूत्वा) - इंद्रियनिग्रह करून - शुद्धभावेन आत्मना - शुद्ध आहेत विचार ज्यातील अशा अंतःकरणाने - सम्यक् चीर्णेन अनेन (व्रतेन) - उत्तम रीतीने केलेल्या ह्या व्रताने - अव्ययं केशवं भज - अविनाशी अशा श्रीविष्णूची सेवा कर. ॥५९॥

भद्रे - हे कल्याणकारिणी स्त्रिये - अयं वै सर्वयज्ञाख्यः (अस्ति) - हा यज्ञ खरोखर सर्वयज्ञ या नावाने प्रसिद्ध आहे - (इदम् व्रतम्) सर्वव्रतम् इति स्मृतं - हे व्रत सर्वव्रत म्हणून म्हटले आहे - इदं तपः सारं (अस्ति) - हे व्रत तपाचे सार आहे - च - आणि - (इदम्) ईश्वरतर्पणम् दानं - हे ईश्वराला संतुष्ट करणारे दान आहे. ॥६०॥

येन साक्षात् अधोक्षजः तुष्यति - जेणे करून प्रत्यक्ष परमेश्वर संतुष्ट होतो - ते एव नियमाः (सन्ति) - तेच नियम होत - च - आणि - ते एव यमोत्तमाः (सन्ति) - तेच श्रेष्ठ यम होत. ॥६१॥

तस्मात् - या कारणास्तव - भद्रे - हे कल्याणि - (त्वं) प्रयता (भूत्वा) - तू शुद्ध होऊन - श्रद्धया - श्रद्धेने - एतत् व्रतम् आचर - हे व्रत कर - (येन) परितुष्टः भगवान् - जेणे करून संतुष्ट झालेला ईश्वर - आशु - लवकर - ते वरान् विधास्यति - तुला वर देईल. ॥६२॥

अष्टमः स्कन्धः - अध्याय सोळावा समाप्त

GO TOP