श्रीमद् भागवत महापुराण

षष्ठ स्कंध - अध्याय ७ वा - अन्वयार्थ

बृहस्पतीकडून देवांचा त्याग आणि विश्वरूपाचा देवगुरू म्हणून स्वीकार -

भगवन् कस्य हेतोः आचार्येण आत्मनः (छात्राः) सुराः परित्यक्ताः एतत् शिष्याणां गुरौ अक्रमं आचक्ष्व हे शुकाचार्या काय कारणास्तव गुरु बृहस्पतीने स्वतःचे शिष्य देव टाकून दिले हे शिष्य जे देव त्यांचे गुरुसंबंधी मर्यादोल्लंघन सांगा ॥ १ ॥

भारत नृप त्रिभुवनैश्वर्यमदोल्लङ्‌घितसत्पथः मरुद्‌भिः वसुभिः रुद्रैः आदित्यैः ऋभुभिः च विश्वेदेवैः च साध्यैः च नासत्याभ्यां परिश्रितः सिद्धचारणगन्धर्वैः ब्रह्मवादिभिः मुनिभिः च विद्याधराप्सरोभिः किन्‍नरैः पतगोरगैः निषेव्यमाणः च स्तूयमानः ललितं उपगीयमानः आस्थानाध्यासनाश्रितः चंद्रमण्डलचारुणा पांडुरेण आतपत्रेण च अन्यैः पारमेष्ठ्यैः चामरव्यजनादिभिः युक्तः मघवान् इंद्रः सहार्धासनया पौलोम्या भृशं विराजमानः हे भरतकुलोत्पन्‍ना परीक्षित राजा त्रैलोक्याचे ऐश्वर्य मिळाल्यामुळे प्राप्त झालेल्या मदाने ज्याने सन्मार्गाचा त्याग केला आहे असा एकोणपन्‍नास मरुत्, आठ वसु, अकरा रुद्र, बारा आदित्य, ऋभुगण व विश्वेदेव आणि साध्य व अश्विनीकुमार ह्यांनी वेष्टिलेला सिद्ध, चारण व गंधर्व वेदवेत्ते ऋषि आणि विद्याधर व अप्सरा किन्‍नर, पक्षी व सर्प यांच्याकडून सेविला जाणारा आणि स्तविला जाणारा सुंदररीतीने गाइला जाणारा सभेत सिंहासनावर बसलेला चंद्रमंडळाप्रमाणे सुंदर शुभ्रवर्णाच्या छत्राने आणि दुसर्‍या महाराजाला शोभणार्‍या चवर्‍या, पंखे इत्यादि राजचिन्हांनी युक्त संपत्तिमान इंद्र इंद्राच्या अर्ध्या असनावर बसलेल्या इंद्राणीसह अत्यंत शोभणारा ॥ २-६ ॥

यदा सः देवानां च आत्मनः संप्राप्तं परमाचार्यं प्रत्युत्थानासनादिभिः न अभ्यनन्दत ह जेव्हा तो इंद्र देवांचा आणि स्वतःचा सभेत आलेला श्रेष्ठ गुरु अशा बृहस्पतीला सामोरे जाऊन आसन देणे इत्यादि प्रकारांनी खरोखर सत्कारिता झाला नाही ॥ ७ ॥

इंद्रः सुरासुरनमस्कृतं मुनिवरं वाचस्पतिं सभागतम् पश्यन् अपि आसनात् न उच्चचाल इंद्र देव व दैत्य यांनी वंदिलेल्या ऋषिश्रेष्ठ बृहस्पतीला सभेत आलेला पहात असूनहि सिंहासनावरुन हालला नाही ॥ ८ ॥

श्रीमदविक्रियाम् विद्वान् आंगिरसः प्रभुः कविः ततः सहसा निर्गत्य तूष्णीं स्वगृहं आययौ ऐश्वर्यमदाने उत्पन्‍न झालेल्या विकाराला जाणणारा अंगिरा ऋषीचा पुत्र समर्थ बृहस्पति त्या सभेतून एकाएकी निघून मुकाट्याने आपल्या घरी परत आला ॥ ९॥

तर्हि एव इंद्रः आत्मनः गुरुहेलनं प्रतिबुद्ध्य सदसि स्वयं आत्मना आत्मानं गर्हयामास त्याच वेळी इंद्र स्वतःच्या गुरुच्या झालेल्या अपमानाला जाणून सभेत स्वतः होऊन आपणच स्वतःला निंदू लागला ॥ १० ॥

अहो बत मम असाधु कृतं यत् वै दभ्रबुद्धिना ऐश्वर्यमत्तेन मया सदसि गुरुः कात्कृतः अहो किती दुःखाची गोष्ट माझ्या हातून दुष्कृत्य घडले कारण खरोखर अल्पबुद्धि असणार्‍या ऐश्वर्यामुळे उन्मत्त झालेल्या माझ्याकडून सभेत गुरु बृहस्पति तिरस्कारिला गेला ॥ ११ ॥

यया विबुधेश्वरः अहं अद्य आसुरं भावं नीतः त्रिविष्टपपतेः अपि लक्ष्मीं कः पंडितः गृद्ध्येत् ज्या ऐश्वर्याने देवांचा अधिपति मी आज दैत्याप्रमाणे दुष्ट अशा स्वभावाला प्राप्त झालो अशा त्रैलोक्याधिपतीच्याहि ऐश्वर्याला कोणता विद्वान् पुरुष मिळविण्याची इच्छा करील ॥ १२ ॥

पारमेष्ठ्यं धिषणं अधितिष्ठन् कंचन न प्रत्युत्तिष्ठेत् इति ये ब्रूयुः ते परं धर्मं न विदुः महाराजाला शोभणार्‍या आसनावर बसणार्‍याने कोणालाहि उभे राहून सत्कारु नये असे जे बोलतात ते श्रेष्ठ धर्माला जाणत नाहीत ॥ १३ ॥

कुपथदेष्ट्वणां तमसि अधः पततां तेषां वचः ये हि श्रद्‍दध्युः ते वै अश्मप्लवाः इव मञ्जन्ति दुष्ट मार्ग दाखविणार्‍या नरकामध्ये खाली पडणार्‍या त्या लोकांच्या भाषणावर जे खरोखर श्रद्धा ठेवितील ते खरोखर पाषाणाच्या नौकेप्रमाणे बुडतात ॥ १४ ॥

अथ निशठः अहं शीर्ष्णा तच्चरणं स्पृशन् अगाधधिषणं द्विजं अमराचार्यं प्रसादयिष्ये आता निष्कपटी असा मी मस्तकाने त्या गुरुच्या पायाला स्पर्श करुन महाबुद्धि अशा ब्राह्मण देवगुरु बृहस्पतीला प्रसन्‍न करीन ॥ १५ ॥

एवं चिन्तयतः तस्य मधोनः गृहात् गतः भगवान् बृहस्पतिः अध्यात्ममायया अदृष्टां गतिं प्राप याप्रमाणे विचार करीत बसलेल्या त्या इंद्राच्या घरातून निघालेला सर्वगुणसंपन्‍न बृहस्पती सर्वोत्कृष्ट मायेने न दिसणार्‍या गतीला प्राप्त झाला ॥ १६ ॥

भगवान् स्वराट् सुरैः युक्तः धिया ध्यायन् परीक्षन् गुरोः संज्ञां न अधिगतः औत्मनः शर्म न अलभत सर्वगुणसंपन्‍न स्वर्गाधिपती इंद्र देवांसह मनाने विचार करीत जिकडेतिकडे पहात असूनहि गुरु बृहस्पतीचा शोध काढिता झाला नाही स्वतःला सुख मिळविता झाला नाही ॥ १७ ॥

दुर्मदाः आततायिनः सर्वे असुराः तत् श्रुत्वा एव औशनसं मतं आश्रित्य देवान् प्रत्युद्यमं चक्रुः उन्मत्त झालेले हातात शस्त्रे धारण केलेले सर्व दैत्य त्या देवांच्या वृत्तांताला ऐकूनच शुकाचार्याच्या मताला अनुसरुन देवांवर विरुद्ध चाल करुन जाण्याच्या उद्योगाला आरंभित झाले ॥ १८ ॥

तै तीक्ष्णैः विसृष्टेषुभिः निभिंन्‍नांगोरुबाहवः सहेन्द्राः नतकन्धराः ब्रह्माणं शरणं जग्मुः त्या तीक्ष्ण अशा सोडिलेल्या बाणांनी मांड्या, दंड आणि बाहु ज्यांचे छिन्‍नभिन्‍न झाले आहेत असे इंद्रासह देव नम्र होऊन ब्रह्मदेवाला शरण गेले ॥ १९ ॥

भगवान् आत्मभूः अजः देवः तथा अभ्यदिंतान् तान् वीक्ष्य परया कृपया परिसांत्वयन् उवाच सर्वगुणसंपन्‍न स्वयंभू ब्रह्मदेव त्याप्रमाणे पीडिलेल्या त्या देवांना पाहून अत्यंत दयाळूपणाने सांत्वन करीत बोलला ॥ २० ॥

अहो सुरश्रेष्ठाः बत वः महत् अभद्रं कृतं हि ऐश्वर्यात् ब्रह्मिष्ठं दान्तं ब्राह्मणं न अभ्यनंदत अहो श्रेष्ठ देवहो खरोखर तुमचे मोठे अकल्याण झाले आहे कारण ऐश्वर्यामुळे ब्रह्मज्ञानी इंद्रियनिग्रही गुरु बृहस्पतीला तुम्ही सत्कारिले नाही ॥ २१ ॥

सुराः च यत् प्रक्षीणेभ्यः स्ववैरिभ्यः परेभ्यः समृद्धानां वः अयं पराभवः (अभवत्) तस्य अनयस्य आसीत् देवहो आणखी जो अत्यंत क्षीण झालेल्या आपले शत्रु अशा दुसर्‍यांकडून सर्वप्रकारांनी परिपूर्ण अशा तुमचा हा पराजय झाला त्या अपराधाचा होय ॥ २२ ॥

मघवन् गुर्वतिक्रमात् प्रक्षीणान् संप्रति भूयः भक्तितः काव्यं आराध्य उपचितान् द्विषतः पश्य भृगुदेवताः मम अपि निलयनं आददीरन् हे इंद्रा गुरुचा तिरस्कार केल्यामुळे क्षीण झालेले हल्ली पुनः भक्तीने गुरु शुक्राचार्याला सत्कृत करुन समृद्ध झालेले शत्रु जे दैत्य त्यांना पहा शुक्राचार्याला देवतेप्रमाणे मानणारे दैत्य माझ्यासुद्धा स्थानाला घेतील ॥ २३ ॥

अभेद्यमन्‍त्रा भृगूणां अनिशिक्षितार्थाः त्रिविष्टपं गणयन्ति किम् विप्रगोविन्दगवीश्वराणां नरेश्वराणां अभद्राणि न भवन्‍ति ज्यांच्या मंत्रांचा कधीहि भेद होत नाही असे भृगु ऋषींचे शिष्य दैत्य स्वर्गाला मोजितात काय ब्राह्मण, परमेश्वर व गाई ज्यांच्यावर अनुग्रह करणार्‍या अशा श्रेष्ठ पुरुषांना अकल्याण प्राप्त होत नाही ॥ २४ ॥

तत् अथ आत्मवन्तं तपस्विनं त्वाष्ट्रं विश्वरुपं विप्रं आशु भजत उत यदि अस्य कर्म क्षमिष्यध्वं सभाजितः सः वः अर्थान् विधास्यते म्हणून आता आत्मज्ञानी तपश्‍चर्या करणार्‍या त्वष्ट्याचा पुत्र अशा विश्वरुपनामक ब्राह्मणाला लवकर भजा आणखीहि जर ह्या विश्वरुपाचे असुरपक्षपातरुपी कृत्य सहन करील सत्कारिलेला तो विश्वरुप तुमच्या ऐश्वर्यादि पुरुषार्थरुपी मनोरथांना पूर्ण करील ॥ २५ ॥

राजन् ब्रह्मणा एवं उदिताः ते विगतज्वराः त्वाष्ट्रं ऋषिं उपव्रज्य परिष्वज्य इदं अब्रुवन् हे परीक्षित राजा ब्रह्मदेवाने याप्रमाणे उपदेशिलेले ते देव पीडारहित होऊन त्वष्ट्याचा पुत्र विश्वरुपनामक ऋषीकडे जाऊन आलिंगन देऊन हे म्हणाला ॥ २६ ॥

तात वयं ते आश्रमं प्राप्ताः अतिथयः (स्मः) ते भद्रं अस्तु समयोचितः पितृणां कामः संपाद्यतां हे विश्वरुपा आम्ही तुझ्या आश्रमाला आलेले अतिथी आहो तुझे कल्याण असो समयाला अनुरुप असा आम्ही जे पितर त्यांचा मनोरथ पूर्ण केला जावो ॥ २७ ॥

ब्रह्मन् हि पितृशुश्रूषणं सतां पुत्राणां परः धर्मः (अस्ति) पुत्रवताम् अपि ब्रह्मचारिणां (अपि अस्ति) किमुत हे ब्राह्मणा विश्वरुपा कारण पितरांची सेवा चांगल्या पुत्रांचा श्रेष्ठ धर्म होय पुत्रवंताचाहि आहे ब्रह्मचारी पुरुषांचाहि आहे हे काय निराळे सांगावे ॥ २८ ॥

आचार्यः ब्रह्मणः मूर्तिः पिता प्रजापतेः मूर्तिः भ्राता मरुत्पतेः मूर्तिः माता साक्षात् क्षितेः तनूः गुरु वेदांची मूर्ति होय बाप ब्रह्मदेवाची मूर्ति होय भाऊ इंद्राची मूर्ति होय आई प्रत्यक्ष पृथ्वीची मूर्ति होय ॥ २९ ॥

भगिनी दयायाः मूर्तिः अतिथिः स्वयं धर्मस्य आत्मा अभ्यागतः अग्‍नेः मूर्तिः च सर्वभूतानि आत्मनः (मूर्तिः) बहीण दयेची मूर्ति अतिथी स्वतः धर्माची मूर्ति अभ्यागत अग्‍नीची मूर्ति आणि सर्व प्राणी परमेश्वराची मूर्ति होय ॥ ३० ॥

तात तस्मात् आर्तानां पितृणां परपराभवाम् आर्ति तपसा अपनयन् संदेशं कर्तुं अर्हंसि हे विश्वरुपा ह्या कारणास्तव पीडिलेल्या आम्हा पितरांच्या शत्रूंपासून उत्पन्‍न झालेल्या पराजयरुपी पीडेला तपश्‍चर्येने दूर करुन विनंति स्वीकारण्यास योग्य आहेस ॥ ३१ ॥

यथा तव तेजसा अंजसा सपत्‍नान् विजेष्यामः तथा ब्रह्मिष्ठं गुरुम् ब्राह्मणं त्वा उपाध्यायं वृणीमहे जशाप्रकाराने तुझ्या तपःसामर्थ्याने लवकर शत्रूंना आम्ही जिंकू तशाप्रकाराने ब्रह्मज्ञानी श्रेष्ठ ब्राह्मण अशा तुला उपाध्याय म्हणून आम्ही वरित आहो ॥ ३२ ॥

ब्रह्मन् हि अर्थेषु यविष्ठाङ्‍घ्य्राभिवादनम् न गर्हयन्ति छन्दोभ्यः अन्यत्र वयः ज्यैष्ठ्यस्य कारणं न हे विश्वरुप ब्राह्मणा खरोखर अर्थसंपादनाच्या बाबतीत कनिष्ठाच्या चरणाला वंदन करणे हे निंदीत नाहीत मंत्रांहून इतर संबंधांमध्ये वय ज्येष्ठपणाचे कारण होय नाही ॥ ३३ ॥

सुरगणैः पौरोहित्ये अभ्यथिंतः महातपाः सः विश्वरुपः प्रसन्‍नः श्लक्ष्णया गिरा तान् आह देवगणांनी उपाध्यायकर्मामध्ये प्रार्थिलेला मोठा तपस्वी तो विश्वरुप प्रसन्‍न होऊन मधुर अशा वाणीने त्या देवांना म्हणाला ॥ ३४ ॥

नाथाः मद्विधः तच्छिष्यः धर्मशीलैः विगर्हितं ब्रह्मवर्चउपव्ययं पौरोहित्यं लोकेशैः अभियाचितं कथं नु प्रत्याख्यास्यति सः एव स्वार्थः उच्यते अहो नाथ हो माझ्यासारखा पुरुष त्या तुम्हा सर्वांचा शिष्य असताना धार्मिक पुरुषांनी निंदिलेले ब्रह्मतेजाचा नाश करणारे उपाध्यायत्व स्वीकारण्याबद्‍दल लोकपालांनी विनंति केली असता कसे बरे नाकारील न नाकारणे हाच स्वार्थ म्हटला आहे ॥ ३५ ॥

अधिश्वराः शिलोञ्छनं हि अकिंबनानां धनं तेन इह निर्वर्तिततसाधुसत्क्रिवः विगर्ह्यं पौरोधसं कथं नु करोमि येन दुर्मतिः हष्यति अहो लोकपालहो शिलोंच्छ वृत्ति तर दरिद्री पुरुषांचे द्रव्य होय त्या शिलोंछवृत्तीने येथे ज्याने साधूंची सत्कर्मे आचरण केली आहेत असा निंद्य अशा उपाध्यायपणाचा कसा बरे स्वीकार करु ज्या उपाध्ययपणाच्या योगे दुर्बुद्धि जन हर्ष पावतो ॥ ३६ ॥

तथापि न प्रतिब्रूयां गुरुभिः प्रार्थितं कियत् भवतां प्रार्थितं सर्वं प्राणैः च अर्थैः साधये तरीहि मी विरुद्ध भाषण करीत नाही गुरुस्थानी असणार्‍या तुम्ही प्रार्थिलेले कितीसे आहे तुमच्याकडून मागितलेले सर्व प्राणांच्या योगे आणि अर्थाच्या योगे पूर्ण करीन ॥ ३७ ॥

वृतः महातपाः विश्वरुपः तेभ्यः एवं प्रतिश्रुत्य परमेण समाधिना पौरोहित्यं चक्रे वरलेला मोठा तपस्वी विश्वरुप इंद्रादि देवांना याप्रमाणे वचन देऊन मोठ्या प्रयत्‍नाने उपाध्यायपणाला स्वीकारिता झाला ॥ ३८ ॥

विभुः औशनस्य विद्यया गुप्तां अपि सुरद्विषां श्रियं वैष्णव्या विद्यया आच्छिद महेन्द्राय अदात् समर्थ असा तो शुकाचार्याच्या विद्येने रक्षिलेल्या अशाहि दैत्यांच्या ऐश्वर्याला नारायण-कवचात्मक विष्णुसंबंधी विद्येने हिरावून घेऊन इंद्राला देता झाला ॥ ३९ ॥

विभुः सहस्राक्षः यया गुप्तः असुरचमूः जिग्ये तां सः उदारधीः विश्वरुपः महेंद्राय प्राह समर्थ इंद्र ज्या विद्येने रक्षिलेला दैत्यांच्या सैन्यांना जिंकिता झाला ती तो उदारबुद्धि विश्वरुप इंद्राला सांगता झाला ॥ ४० ॥

षष्ठ स्कन्धः - अध्याय सातवा समाप्त

GO TOP