श्रीमद् भागवत महापुराण

पंचम स्कंध - अध्याय १६ वा - अन्वयार्थ

भुवनकोशाचे वर्णन -

यावत् आदित्यः तपति च यत्र असौ चन्द्रमाः ज्योतिषां गणैः सह वा दृश्यते भूमण्डलायामविशेषः त्वया उक्तः जितक्या दूरपर्यंत सूर्य प्रकाशतो आणि जेथे हा चंद्र नक्षत्रांच्या समूहांसह दिसतो भूमंडळाच्या लांबीरुंदीचा विशिष्ट विस्तार तुझ्याकडून सांगितला गेला. ॥१॥

तत्र अपि सप्तभिः प्रियव्रतरथचरणपरिखातैः सप्त् सिन्धवः उपक्लृप्ताः भगवन् त्वया यतः एतस्याः सप्तद्वीपविशेषविकल्पः खलु सूचितः अहं एतत् एव अखिलं मानतः च लक्षणतः सर्वं विजिज्ञासामि त्यामध्येहि सात प्रियव्रत राजाच्या रथाच्या चक्रांनी पाडिलेले जे खंदक त्यांनी सात समुद्र निर्मिले, हे ज्ञानसंपन्न ऋषे, तुझ्याकडून ज्यामुळे ह्या पृथ्वीच्या निरनिराळ्या सातद्वीपांची रचना खरोखर सुचविली गेली मी हेच संपूर्ण लांबीरुंदीच्या प्रमाणाने आणि स्वरूपाने संपूर्ण जाणण्याची इच्छा करीत आहे. ॥२॥

हि भगवतः गुणमये स्थूलरूपे आवेशितं मनः अगुणे अपि सूक्ष्मतमे आत्मज्योतिषि परे ब्रह्मणि भगवति वासुदेवाख्ये आवेशितुं क्षमं तत् उ ह गुरो एतत् अनुवर्णयितुं अर्हसि इति (उवाच) कारण परमेश्वराच्या सगुण स्थूल रूपावर लाविलेले चित्त निर्गुण अशाहि अतिसूक्ष्म अशा आत्मविषयक ज्ञानाने संपन्न अशा श्रेष्ठ ब्रह्मरूप षड्‌गुणैश्वर्यसंपन्न वासुदेवसंज्ञक स्वरूपावर लाविण्यास समर्थ होते त्याकरिता हे महर्षे हे वर्णन करण्यास योग्य आहेस असे म्हणाला. ॥३॥

महाराज पुरुषः भगवतः मायागुणविभूतेः काष्ठां मनसा वा वचसा वै अधिगन्तुं विबुधायुषा अपि न अलं तस्मात् प्राधान्येन एव भूगोलकविशेषं नामरूपमानलक्षणतः व्याख्यास्यामः हे परीक्षित राजा, पुरुष परमेश्वराच्या मायेच्या गुणांच्या सामर्थ्याच्या अंताला मनाने किंवा वाणीने खरोखर जाणण्यास देवांच्या आयुष्याइतक्या काळानेहि समर्थ नाही तरीहि मुख्य मुख्य गोष्टी घेऊनच भूमंडलाचे विशेष वर्णन नावे, स्वरूपे, प्रमाण व लक्षणे ह्यांच्या योगाने आम्ही सांगतो. ॥४॥

यः वा अयं द्वीपः कुवलयकोशाभ्यन्तरकोशः नियुतयोजनविशालः यथा पुष्करपत्रं समवर्तुलः जे खरोखर हे द्वीप भूमंडळरूपी कमळाच्या आतील गाभ्याच्या घेरातील एक घेरच असे एक लक्ष योजने विस्ताराचे कमळाच्या पानाप्रमाणे सारखे वेटोळे ॥५॥

यस्मिन् नवयोजनसहस्रायामानि नव वर्षाणि अष्टभिः मर्यादागिरिभिः सुविभक्तानि भवन्ति ज्यात नऊ हजार योजने विस्तीर्ण अशी नऊ खंडे आठ सीमादर्शक पर्वतांनी विभागलेली आहेत. ॥६॥

एषां मध्ये अभ्यन्तरवर्षं इलावृतं नाम यस्य नाभ्यां अवस्थितः सर्वतः सौवर्णः कुलगिरिराजः मेरुः द्वीपायामसमुन्नाहः कर्णिकाभूतः कुवलयकमलस्य मूर्धनि द्वात्रिंशत्सहस्रयोजनविततः मूले षोडशसहस्रं तावता अन्तर्भूम्यां प्रविष्टः ह्या खंडांमध्ये मध्यभागी असणारे खंड इलावृत नावाचे होय ज्याच्या नाभिस्थानी उभा असलेला सर्व बाजूने सोन्याचा सीमादर्शक पर्वतांचा राजा मेरुपर्वत द्वीपाच्या लांबी इतक्या म्हणजे एक लक्ष योजने उंचीचा, कळीच्या आकाराचा भूमंडळरूप कमळाच्या शिखरावर बत्तीस हजार योजने विस्तृत, मूळाजवळ सोळा हजार तितकाच जमिनीत शिरलेला ॥७॥

इलावृतं उत्तरोत्तरेण नीलः श्वेतः शृंगवान इति त्रयः रम्यकहिरण्मयकुरूणां मर्यादागिरयः प्रागायताः उभयतः क्षारोदावधयः द्विसहस्रपृथवः पूर्वस्मात् पूर्वस्मात् उत्तरः उत्तरः एकैकशः दशांशाधिकांशेन दैर्घ्ये एव ह्‌रसन्ति इलावृताच्या उत्तरोत्तर बाजूला नील, श्वेत, शृंगवान् असे तीन रम्यक, हिरण्मय आणि कुरु अशांचे सीमादर्शक पर्वत पूर्वेकडे लांब असलेले ज्यांच्या दोन्ही बाजूस खार्‍या पाण्याच्या समुद्रांची मर्यादा असलेले दोन हजार योजने पसरलेले पूर्वीच्या पूर्वीच्याहून पुढील पुढील पर्वत एकएकाहून दशांशापेक्षा किंचित अधिक अशा प्रमाणाने लांबीमध्येच कमी होतात. ॥८॥

एवं इलावृतं दक्षिणेन निषधः हेमकूटः हिमालयः इति प्रागायताः यथानीलादयः अयुतयोजनोत्सेधाः यथासङ्‌ख्यं हरिवर्षकिंपुरुषभारतानां मर्यादागिरयः याप्रमाणे इलावृताच्या दक्षिण बाजूने निषध, हेमकूट, हिमालय असे पर्वत पूर्वेकडे ज्यांची लांबी आहे असे नीलादिपर्वताप्रमाणे दहा हजार योजने उंच असे अनुक्रमाने हरिवर्ष, किंपुरुष व भरत ह्या खंडाचे सीमापर्वत होत. ॥९॥

तथा एव इलावृतं अपरेण च पूर्वेण आनीलनिषधायतौ माल्यवद्‌गन्धमादनौ द्विसहस्र पप्रथतुः केतुमालभद्राश्वयोः सीमानं विदधाते त्याप्रमाणेच इलावृताच्या पश्‍चिमबाजूने आणि पूर्वबाजूने नीलपर्वत व निषधपर्वत यांपर्यंत पसरलेले माल्यवान व गंधमादन असे दोन पर्वत दोन हजार योजने पसरलेले आहेत, केतुमाल, आणि भद्राश्व यांच्या सीमेला दर्शवितात. ॥१०॥

मंदरः मेरुमंदरः सुपार्श्वः कुमुदः इति अयुतयोजनविस्तारोन्नाहाः मेरोः चतुर्दिशं अवष्टंभगिरयः उपक्लृताः मंदरपर्वत, मेरुमंदर, सुपार्श्व, कुमुद असे दहा हजार योजने घेर व उंची आहे ज्यांची असे मेरुपर्वतांच्या चारहि दिशांना आधारभूत पर्वत असे रचिले आहेत. ॥११॥

एतेषु चतुर्षु चूतजंबूकदम्बन्यग्रोधाः चत्वारः पादपप्रवराः पर्वतकेतवः इव अधिसहस्रयोजनोन्नाहाः तावद्विटपविततयः शतयोजनपरिणाहाः ह्या चार पर्वतांवर आंबा, जांभूळ, कळंब व वड असे चार श्रेष्ठ वृक्ष पर्वताचे जणू ध्वजच असे हजारापेक्षा अधिक योजने उंच असे तितकाच म्हणजे हजारापेक्षा अधिक योजने वृक्षांचा विस्तार असलेले शंभर योजने जाड खोड असलेले ॥१२॥

पयोमध्विक्षुरसमृष्टजलाः चत्वारः हृदाः भरतर्षभ यदुपस्पर्शिनः उपदेवगणाः स्वाभाविकानि योगैश्वर्याणि धारयन्ति दूध, मध, उसाचा रस व गोडे पाणी ह्यांनी भरलेले चार डोह, हे भरतश्रेष्ठा परीक्षित राजा, ज्या डोहात आचमनादि करणारे किन्नरादि देव सहज प्राप्त होणारी योगाची ऐश्वर्ये मिळवितात. ॥१३॥

च नंदनं चैत्ररथं वैभ्राजकं सर्वतोभद्रं इति चत्वारि देवोद्यानानि भवन्ति आणि नंदन, चैत्ररथ, वैभ्राजक, सर्वतोभद्र असे चार देवांचे बगीचे आहेत. ॥१४॥

येषु सुरललनाललामयूथपतयः उपदेवगणैः उपगीयमानमहिमानः अमर परिवृढाः किल सह विहरन्ति ज्या उपवनात सुंदर देवांगनांच्या संघांचे पति गंधर्वकिन्नरादि संघांनी ज्यांची माहात्म्ये वर्णिली आहेत असे मोठमोठे श्रेष्ठ देव खरोखर एकेठिकाणी क्रीडा करितात. ॥१५॥

मंदरोत्संगे एकादशशतयोजनोत्तुंगदेवचूतशिरसः गिरिशिखरस्थूलानि अमृतकल्पानि फलानि पतन्ति मंदर पर्वताच्या वरच्या बाजूस अकराशे योजने उंचीच्या देवतांच्या आम्रवृक्षाच्या शेंडयावरून पर्वताच्या शिखराप्रमाणे मोठाली अमृताप्रमाणे मधुर अशी फळे पडतात. ॥१६॥

विशीर्यमाणानां तेषां अतिमधुरसुरभिसुगन्धिबहुलारुणरसोदेन अरुणोदा नाम नदी मन्दरगिरिशिखरात् निपतन्ती पूर्वेण इलावृतं उपप्लावयात फुटलेल्या त्या फळांच्या अत्यंत गोड, मधुर व सुगंधयुक्त असा पुष्कळशा तांबुस वर्णाच्या रसाने अरुणोदा नावाची नदी मंदर पर्वताच्या शिखरावरून पडणारी पूर्व दिशेने इलावृत खंडाला भिजविते. ॥१७॥

यदुपजोषणात् भवान्याः अनुचरीणां पुण्यजनवधूनां अवयवस्पर्शसुगन्धवातः समंतात् दशयोजनं अनुवासयति जिच्या सेवनामुळे पार्वतीच्या सेविका अशा यक्षस्त्रियांच्या अवयवांच्या स्पर्शाने सुगंधी झालेला वायु सभोवार दहा योजनेपर्यंतच्या प्रदेशाला सुगंधित करतो. ॥१८॥

एवं इभकाय निभानां अनस्थिप्रायाणां अत्युच्चनिपातविशीर्णानां जम्बूफलानां रसेन जंबू नाम नदी अयुतयोजनात् मेरुमंदरशिखरात् अवनितले निपतन्ती आत्मानं दक्षिणेन यावत् इलावृतं उपस्यन्दयति याप्रमाणे हत्तीच्या शरीराएवढया मोठया प्रमाणाच्या बहुतेक बीजरहित अशा फारच उंचावरून पडल्यामुळे छिन्नभिन्न झालेल्या जांभळांच्या फळांच्या रसाने जंबू नावाची नदी दहा हजार योजने उंच असलेल्या मेरुमंदर पर्वताच्या शिखरावरून पृथ्वीवर पडणारी स्वतःच्या दक्षिण बाजूला जितका इलावृत खंडाचा प्रदेश भिजवून सोडिते. ॥१९॥

तावत् उभयोः अपि रोधसोः या मृत्तिका तद्रसेन अनुविध्यमाना (भवति) वाय्वर्कसंयोगविपाकेन सदा अमरलोकाभरणं जांबूनदं नाम सुवर्णं भवति तितक्याच प्रमाणाच्या जंबू नदीच्या दोन्ही बाजूंकडील तीरांवरील जी माती त्या जांभळाच्या रसाने मिश्रित झालेली असते वायू व सूर्य यांच्या संयोगाच्या परिणामाने नेहमी देवलोकांच्या अलंकारांचे साधन असे, जांबूनद नावाचे सोने होते. ॥२०॥

यत् उ ह वाव विबुधादयः युवतिभिः सह मुकुटकटककटिसूत्राद्याभरणरूपेण खलु धारयन्ति ज्या सुवर्णाला खरोखर देव वगैरे स्त्रियांसहवर्तमान मुकुट, कडी, करगोटे वगैरे अलंकाराच्या स्वरूपाने खरोखर धारण करितात. ॥२१॥

यः तु सुपार्श्वनिरूढः महाकदम्बः तस्य कोटरेभ्यः विनिःसृताः याः पञ्चायामपरिणाहाः पंच मधुधाराः सुपार्श्वशिखरात् पतन्त्यः (सन्ति) ताः आत्मानं अपरेण इलावृतम् अनुमोदयन्ति जो तर सुपार्श्व नामक पर्वतावर उगवलेला मोठा कळंबवृक्ष, त्या कळंब वृक्षाच्या ढोलीतून बाहेर निघालेल्या ज्या पाच वावे विस्ताराच्या पाच मधाच्या धारा सुपार्श्वपर्वताच्या शिखरावरून पडणार्‍या आहेत त्या आपल्या पश्‍चिमेकडील इलावृत खंडाला आनंदित करतात. ॥२२॥

याः उपयुञ्जानानां मुखनिर्वासितः वायुः हि समंतात् शतयोजनम् अनुवासयति ज्या मधुधारा सेवन करणार्‍यांच्या मुखातून निघालेला वायु खरोखर सभोवार शंभर योजनेपर्यंतच्या प्रदेशाला सुगंधित करतो ॥२३॥

एवं कुमुदनिरूढः यः शतवल्शो नाम वटः तस्य स्कन्धेभ्यः नीचीनाः पयोदधिमधुघृतगुडान्नाद्यम्बरशय्यासनाभरणादयः कामदुधाः सर्वे एव नदाः कुमुदाग्रात् पतन्तः तं इलावृतं उत्तरेण उपयोजयन्ति याप्रमाणे कुमुद पर्वतावर उगवलेला जो शतवल्श नावाचा वटवृक्ष त्याच्या खांद्यापासून खाली पडणारे दूध, दही, मध, तूप, गुळ, अन्न तसेच वस्त्रे, शय्या, आसन, अलंकार इत्यादिक इच्छा पूर्ण करणारे सर्वप्रकारचे नद कुमुद पर्वताच्या शिखरावरून पडणारे असे त्या इलावृत खंडाला उत्तर बाजूने वहात असतात. ॥२४॥

यान् उपजुषाणानां प्रजानां कदाचित् अपि वलीपलितक्लमस्वेददौर्गन्धजरामयमृत्युशीतोष्णवैवर्ण्योपसर्गादयः तापविशेषाः न भवन्ति यावज्जीवं निरतिशयं सुखम् एव ज्या नद्यांना सेवणार्‍या लोकांना कधीहि अंगावर सुरकुत्या पडणे, केस पांढरे होणे, ग्लानि, घाम, दुर्गंधी, वृद्धपणा, रोग, मृत्यु, शीत, उष्ण, निस्तेजपणा, पीडा इत्यादिक विशिष्ट ताप होत नाहीत आयुष्यभर अत्युत्कृष्ट सुखच ॥२५॥

कुरंगकुररकुसुंभवैकंकत्रिकूटशिशिरपतंगरुचकनिषधशिनीवासकपिलशंखवैदूर्यजारुधिहंसर्षभनागकालंजरनारदादयः विंशतिगिरयः मेरोः मूलदेशे कर्णिकायाः केसरभूताः इव परितः उपक्लृप्ताः कुरंग, कुरर, कुसुंभ, वैकंक, त्रिकूट, शिशिर, पतंग, रुचक, निषध, शिनी, वास, कपिल, शंख, वैदूर्य, जारुधि, हंस, ऋषभ, नाग, कालंजर, नारद वगैरे असे वीस पर्वत मेरु पर्वताच्या पायथ्याजवळ कमळातील गाभ्याच्या भोवतीचे कमलतंतूच जणू काय असे सभोवार रचिले आहेत. ॥२६॥

मेरुं पूर्वेण अष्टादशयोजनसहस्रं उदगायतौ द्विसहस्रं पृथुतुंगौ जठरदेवकूटौ भवतः एवं अपरेण पवनपारियात्रौ दक्षिणेन कैलासकरवीरौ प्रागायतौ एव (स्तः) उत्तरतः त्रिशृंगमकरौ (स्तः) एतैः अष्टाभिः परितः परिस्तृतः अग्निः इव काञ्चनगिरिः चकास्ति मेरु पर्वताच्या पूर्व बाजूने अठरा हजार योजनेपर्यंत उत्तरेकडे लांबलेले दोन हजार योजनेपर्यंत विस्तृत व उंच असे जठर व देवकूट नावाचे दोन पर्वत आहेत, याप्रमाणे पश्‍चिम बाजूने पवन व पारियात्र हे दोन पर्वत, दक्षिण दिशेला कैलास व करवीर असे दोन पर्वत, पूर्वेकडे लांब होत गेलेले असेच आहेत, उत्तर दिशेला त्रिशृंग व मकर असे दोन पर्वत आहेत, ह्या आठ पर्वतांनी सभोवार परिस्तरणांनी वेष्टिलेल्या अग्नीप्रमाणे मेरुपर्वत चमकत आहे. ॥२७॥

मेरोः मूर्धनि मध्यतः उपक्लृप्ताः अयुतयोजनसहस्रीं समचतुरस्रां भगवतः शातकुम्भीं वदन्ति मेरुपर्वताच्या माथ्यावर मध्यभागी वसविलेल्या दहा हजार योजने लांब व रुंद अशी सारख्या लांबीरुंदीच्या भगवान ब्रह्मदेवाच्या नगरीला शातकुम्भी असे म्हणतात. ॥२८॥

ताम् अनुपरितः अष्टानां लोकपालानां यथादिशं यथारूपं अष्टौ पुरः तुरीयमानेन उपक्लृप्ताः त्या नगरीच्या सभोवार आठ लोकपालांची त्या त्या दिशेला अनुरूप त्या त्या स्वरूपाला अनुसरून आठ नगरे ब्रह्मनगरीच्या चतुर्थांशमानाने वसविलेली आहेत. ॥२९॥

पंचम स्कन्धः - अध्याय सोळावा समाप्त

GO TOP