श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २२ वा - अन्वयार्थ

देवहूतीबरोबर कर्दम प्रजापतींचा विवाह -

एवम् - याप्रमाणे आविष्कृताशेषगुणकर्मोदयः - वर्णिला आहे सर्व गुण व कर्मे यांचा उत्कर्ष ज्याचा असा सम्राट् - सार्वभौम राजा मनु सव्रीड इव - जणू काय लज्जायुक्त अशा उपारतम् - बोलणे थांबविलेल्या अशा तम् - त्या मुनिं - कर्दम ऋषीला उवाच ह - म्हणाला ॥१॥

छन्दोमयः - वेदस्वरूप ब्रह्मा - ब्रह्मदेव आत्मपरीप्सया - आपल्या रक्षणाच्या इच्छेने स्वमुखतः - आपल्या मुखापासून तपोविद्यायोगयुक्तान् - तपश्चर्या, ज्ञान व योग यांनी युक्त अशा अलम्पटान् - निष्काम अशा युष्मान् - तुम्हा ब्राह्मणांना असृजत् - उत्पन्न करिता झाला ॥२॥

च - आणि सहस्रपात् - हजारो आहेत पाय ज्याला असा ब्रह्मदेव दोःसहस्रात् - हजारो बाहूंपासून अस्मान् - आम्हा क्षत्रियांना तत्त्‍राणाय - त्या ब्राह्मणांच्या संरक्षणाकरिता असृजत् - उत्पन्न करिता झाला ब्रह्म - ब्राह्मणवर्णाला तस्य - त्या ब्रह्मदेवाचे हृदयम् - हृदय क्षत्त्‍रम् - क्षत्रियवर्णाला अङ्गम् - शरीर प्रचक्षते - म्हणतात ॥३॥

अतः - यास्तव ब्रह्म - ब्राह्मण च - आणि क्षत्त्‍रम् - क्षत्रिय आत्मानम् - शरीररूप अशा अन्योन्यम् - परस्परांनी हि - खरोखर रक्षतः - रक्षण करितात च - आणि यः - जो सदसदात्मकः - कार्यकारणरूप अस्ति - आहे सः - तो अव्ययः - निर्विकार असा देवः - देव तान् - त्या ब्राह्मणक्षत्रियांना रक्षति - रक्षितो ॥४॥

मे - माझे सर्व संशयाः - सर्व संशय तव - तुझ्या दर्शनात् एव - दर्शनानेच छिन्नाः - दूर झाले यत् - कारण स्वयम् - स्वतः भगवान् - श्रीविष्णु प्रीत्या - प्रेमाने रिराक्षषोः - रक्षण करण्याची इच्छा करणार्‍या राजाच्या धर्मम् - धर्माला आह - सांगता झाला ॥५॥

यः - जो अकृतात्मनाम् - वशीकृत केले नाही चित्त ज्यांचे अशा लोकांनी दुर्दर्शः - पहाण्यास अशक्य सः - तो भगवान् - श्रीहरि मे - माझ्याकडून दिष्ट्या - सुदैवाने दृष्टः - पाहिला गेला मे - माझ्याकडून भवतः - तुझी शिवम् - पवित्र अशी पादरजः - पायधूळ शीर्ष्णा - मस्तकाने स्पृष्टं - स्पर्श केली गेली ॥६॥

दिष्ट्या - सुदैवाने त्वया - तुझ्याकडून महान् - मोठा अनुग्रहः - अनुग्रह कृतः - केला गेला अहम् - मी अनुशिष्टः - उपदेशिलो च - आणि अपावृतैः - उघड्या असलेल्या कर्णरन्ध्रैः - कर्णच्छिद्रांनी उशतीः - मनोहर अशा गिरः - वाणी दिष्ट्या - सुदैवाने जुष्टाः - सेविल्या ॥७॥

मुने - ऋषे सः - तो भवान् - तू दुहितृस्नेहपरिक्लिष्टात्मनः - कन्येवरील स्नेहाने खिन्न आहे मन ज्याचे अशा दीनस्य - दीन अशा मम - माझ्या श्रावितम् - विज्ञापनेला कृपया - कृपेने श्रोतुम् - श्रवण करण्याकरिता अर्हसि - योग्य आहेस ॥८॥

इयम् - ही प्रियव्रतोत्तानपदोः - प्रियव्रत व उत्तानपाद यांची स्वसा - बहीण मम - माझी दुहिता - कन्या वयःशीलगुणादिभिः - वय, स्वभाव, दया इत्यादी गुण यांनी युक्तम् - योग्य अशा पतिम् - पतीला अन्विच्छति - इच्छिते ॥९॥

एषा - ही यदा - ज्या वेळी नारदात् - नारद ऋषीपासून भवत - तुझी शीलश्रुतवयोगुणान् - स्वभाव, विद्या, वय व गुण यांना अशृणोत् - श्रवण करती झाली तदा - तेव्हा तु - तर त्वयि - तुझ्या ठिकाणी कृतनिश्चया - केला आहे निश्चय जिने अशी आसीत् - झाली ॥१०॥

तत् - त्यास्तव व्दिजाम्य - हे व्दिजश्रेष्ठा मया - मी श्रद्धया - श्रद्धेने उपहृताम् - अर्पण केलेल्या अशा गृहमेधिषु - गृहस्थाश्रमासंबंधी कर्मसु - कर्मांमध्ये सर्वात्मना - सर्वस्वी ते - तुला अनुरुपाम् - योग्य अशा इमाम् - ह्या कन्येला प्रतीच्छ - स्वीकार ॥११॥

हि - कारण निर्मुक्तसंगस्य - त्यागिला आहे सङ्ग ज्याने अशा पुरुषालादेखील उद्यतस्य - आपोआप प्राप्त झालेला कामस्य - विषयाचा प्रतिवादः - निषेध करणे न शस्यते - योग्य नाही कामरक्तस्य - विषयांमध्ये आसक्त असलेल्या मनुष्याला न शस्यते इति - योग्य नाही असे पुनः - पुनः किम् - काय वक्तव्यम् - सांगितले पाहिजे ॥१२॥

यः - जो उद्यतम् - आपोआप प्राप्त झालेल्या विषयाला अनादृत्य - झिडकारून कीनाशम् - कृपणाला अभियाचते - याचना करितो स्फीतम् - पसरलेले असे तद्यशः - त्याचे यश क्षीयते - नष्ट होते च - आणि मानः - मान अवज्ञया - दुसर्‍याच्या अपमानाने हतः - नष्ट भवति - होतो ॥१३॥

विव्दन् - हे ज्ञानी कर्दम मुने अहम् - मी त्वा - तुला विवाहार्थम् - विवाहाकरिता उद्यतम् - उद्युक्त झालेला असे अशृणवम् - ऐकता झालो अत - यास्तव उपकुर्वाणः - विवाहापर्यंतच ब्रह्मचर्य धारण करणारा त्वम् - तू मे - मी प्रत्ताम् - दिलेल्या कन्येला प्रतिगृहाण - घे ॥१४॥

बाढम् - ठीक आहे उव्दोढुकामः - विवाह करण्याची इच्छा करणारा असा अहम् - मी अस्मि - आहे च - आणि तव - तुझी आत्मजा - कन्या अप्रत्ता - न दिलेली अशी अस्ति - आहे असौ - हा आद्यः - पहिला आवयोः - आमचा वैवाहिकः - विवाहसंबन्धी विधिः - विधि अनुरूपः - योग्य अस्ति - आहे ॥१५॥

नरदेव - हे राजा समाम्नायविधौ - वेदांतील विधींमध्ये प्रतीतः - प्रसिद्ध असा सः - तो विवाहविधी भूयात् - व्हावा इति - अशी ते - तुझ्या अस्याः - ह्या पुत्र्याः - कन्येची कामः - इच्छा अस्ति - आहे स्वया - आपल्या अङ्गकान्त्या - शरीरकान्तीने श्रियम् एव - अलंकारांच्या शोभेलाच क्षिपन्तीम् - दूर करणार्‍या अशा ते - तुझ्या तनयाम् - कन्येचा कः एव - कोणता पुरुष न आद्रियेत - आदर करणार नाही ॥१६॥

विश्वावसुः - विश्वावसुगंधर्व हर्म्यपृष्ठे - राजवाड्याच्या गच्चीवर विक्रीडतीम् - खेळणार्‍या अशा क्वणदङ्घ्रिशोभाम् - शब्द करणार्‍या पायांमुळे आहे शोभा जिची अशा कन्दुकविह्‌वलाक्षीम् - चेंडूमुळे चंचल झाले आहेत डोळे जिचे अशा याम् - जिला विलोक्य - पाहून संमोहविमूढचेताः - मोहाने व्याकुल झालेले आहे चित्त ज्याचे असा स्वात् - आपल्या विमानात् - विमानातून न्यपतत् - पडला ॥१७॥

ललनाललामम् - स्त्रियांना भूषणभूत अशा प्रार्थयन्तीम् - प्रार्थना करणार्‍या अशा असेवितश्रीचरणैः - सेविलेले नाहीत लक्ष्मीचे चरण ज्यांनी अशा लोकांनी अदृष्टाम् - न पाहिलेल्या अशा मनोः - मनूच्या वत्साम् - कन्या अशा उच्चपदः - उत्तानपदाच्या स्वसारम् - बहीण अशा अभियाताम् - स्वतः प्राप्त झालेल्या ताम् - तिला कः - कोणता बुधः - सुज्ञ पुरुष न अनुमन्येत - स्वीकारणार नाही ॥१८॥

अतः - यास्तव मे - माझ्या आत्मनः - देहापासून तेजः - गर्भाला बिभृयात् यावत् - धारण करी पर्यंत समयेन - अशा अटीवर साध्वीम् - साध्वीला भजिष्ये - सेवीन अतः - यापुढे शुक्लप्रोक्तान् - शुक्लस्वरूपी भगवन्ताने सांगितलेल्या पारमहंस्यमुख्यान् - ज्ञानसंपादनाविषयी मुख्य अशा अविहिंस्त्रान् - हिंसारहित अशा धर्मान् - धर्मांना बहु - विशेष असे मन्ये - मानितो ॥१९॥

यतः - ज्या परमेश्वरापासून इदम् - हे विचित्रम् - अनेक चमत्कारांनी भरलेले विश्वम् - विश्व अभवत् - उत्पन्न झाले वा - अथवा यत्र - जेथे संस्थास्यते - लय पावेल च - आणि अवतिष्ठते - रहाते एषः - हा प्रजापतीनाम् - प्रजापतीचा पतिः - स्वामी भगवान् - भगवान अनंतः - श्रीविष्णु मह्यम् - मला वै - खरोखर परम् - श्रेष्ठ प्रमाणम् - प्रमाण अस्ति - आहे ॥२०॥

उग्रधन्वन् - उग्र आहे धनुष्य ज्याचे अशा हे विदुरा सः - तो कर्दम ऋषि इयत् एव - एवढेच आबभाषे - बोलला धिया - बुद्धीने अरविन्दनाभम् - विष्णूचे उपगृह्‌णन् - ध्यान करणारा असा तूष्णीम् - स्तब्ध असीत् - झाला च - आणि स्मितशोभितेन - हास्याच्या शोभेने युक्त अशा मुखेन - मुखाने देवहूत्याः - देवहूतीच्या चेतः - चित्ताला लुलुभे - लोभविता झाला ॥२१॥

प्रहर्षितः - आनन्दित झालेला सः - तो मनु महिष्याः - राणीच्या च - आणि दुहितुः - कन्येच्या व्यवसितम् - निश्चयाला स्फुटम् - स्पष्ट ज्ञात्वा - जाणून अनु - नंतर गुणगणाढ्याय - पुष्कळ गुणांनी युक्त अशा तस्मै - त्या कर्दम ऋषीला तुल्याम् - योग्य अशा ताम् - त्या देवहूतीला ददौ - देता झाला ॥२२॥

महाराज्ञी - महाराणी अशा शतरूपा - शतरूपा प्रीत्या - प्रीतीने दम्पत्योः - जोडप्याला पारिबर्हान् - आंदणरूप महाधनान् - मोठे आहे मूल्य ज्यांचे अशा भूषावासःपरिच्छदान् - अलंकार, वस्त्रे व संसाराचे साहित्य यांना पर्यदात् - देती झाली ॥२३॥

सम्राट् - सार्वभौम राजा मनु सदृक्षाय - योग्य अशा वराला प्रत्ताम् - दिलेल्या दुहितरम् - कन्येला बाहुभ्याम् - बाहूंनी उपगुह्य - आलिङ्गन देऊन गतव्यथः - गेली आहे व्यथा ज्याची असा तव्दिरहम् - तिच्या विरहाला सोढुम् - सहन करण्यास अशक्नुवन् - न शकणारा असा औत्कण्ठयोन्मथिताशयः - उत्कण्ठेने व्याकुळ झाले आहे अन्तःकरण ज्याचे असा मुहुः - वारंवार बाष्पकलाम् - अश्रूंना मुञ्चन् - सोडणारा अम्ब वत्स इति - हे मुली, हे लाडके पुत्री, असे वदन् - बोलणारा नेत्रोदैः - नेत्रांतील उदकांनी दुहितुः - कन्येच्या शिखाः - केसांना आसिञ्चत् - भिजविता झाला ॥२४-२५॥

नृपः - राजा मनु मुनिवरम् - मुनिश्रेष्ठ कर्दमाला आमन्‌त्र्य - विचारून अनुज्ञातः - अनुज्ञा दिलेला असा सहानुगः - सेवकांसहित सभार्यः - भार्येसह रथम् - रथावर आरुह्य - चढून स्वपुरम् - आपल्या नगरीला प्रतस्थे - प्रयाण करिता झाला ॥२६॥

ऋषिकुल्यायाः - ऋषिकुलाला हितकारक अशा सरस्वत्याः - सरस्वतीच्या उभयोः - दोन्ही सुरोधसोः - सुंदर तीरांवर उपशान्तानाम् - अत्यन्त शान्त अशा ऋषीणाम् - ऋषींच्या आश्रमसंपदः - आश्रमसंपत्तीना पश्यन् - पहात सः ययौ - तो जाता झाला ॥२७॥

प्रजाः - लोक आयान्तम् - येणार्‍या तम् - त्या पतिम् - राजा मनूला अभिप्रेत्य - जाणून प्रहर्षिताः - आनन्दित झालेले असे गीतसंस्तुतिवादित्रैः - गायन, स्तुति व वाद्ये यांसह ब्रह्मावर्तात् - ब्रह्मावर्तनामक देशाहून प्रत्युदीयुः - सामोरे गेले ॥२८॥

तत्र - त्या देशामध्ये सर्वसंपत्समन्विता - सर्व संपत्तींनी युक्त अशी बर्हिष्मती नाम - बर्हिष्मतीनामक पुरी - नगरी आसीत् - होती यत्र - जीमध्ये अङ्गम् - शरीराला विधुन्वतः - कापविणार्‍या अशा यज्ञस्य - यज्ञवराहाचे रोमाणि - केस न्यपतन् - पडले ॥२९॥

ते एव - ते केसच शश्वत् - निरंतर हरितवर्चसः - हिरवा आहे वर्ण ज्यांचा असे कुशाः - दर्भ काशाः - मोळ आसन् - उत्पन्न झाले ऋषयः - ऋषि यैः - ज्या दर्भाच्या योगाने यज्ञघ्रान् - यज्ञनाश करणार्‍या राक्षसांना पराभाव्य - पराभूत करून यज्ञम् - यज्ञाला ईजिरे - पूजिते झाले ॥३०॥

भगवान् - ऐश्वर्यसंपन्न असा मनुः - मनु यतः - ज्या यज्ञवराहापासून भुवम् - पृथ्वीरूप स्थानम् - स्थानाला लब्ध्वा - मिळवून तम् - त्या यज्ञपुरुषम् - यज्ञपुरुषाला कुशकाशमयम् - कुशस्वरूप व काशस्वरूप बर्हिः - दर्भ आस्तीर्य - पसरून अयजत् - यज्ञ करिता झाला ॥३१॥

विभुः - समर्थ असा मनु बर्हिष्मतीम् नाम - बर्हिष्मतीनामक याम् - ज्या पुरीत समावसत् - रहात होता त्स्याम् - त्या नगरीमध्ये निर्विश्य - प्रवेश करून तापत्रयविनाशम् - तिन्ही तापांचा नाश करणार्‍या अशा भवनम् - गृहात प्रविष्टः - शिरला ॥३२॥

सभार्यः - पत्नीसहित सप्रजः - लोकांसहित प्रत्यूषेषु - प्रातःकाळी सस्त्रीभिः - स्त्रियांसहित सुरगायकैः - देवांचे गायक जे गंधर्व त्यांनी संगीयमानसत्कीर्तिः - गायिली जात आहे पवित्र कीर्ति ज्याची असा अनुबद्धेन - एकाग्र झालेल्या अशा हृदा - अन्तःकरणाने हरेः - श्रीहरीच्या कथाः - कथा श्रृण्वन् - ऐकणारा असा सः - तो मनु अन्याविरोधितः - धर्म आणि अर्थ या दुसर्‍या पुरुषार्थांना विरोध न करिता कामान् - विषयसेवनरूप पुरुषार्थाला बुभुजे - भोगिता झाला ॥३३॥

यत् - कारण भोगाः - विषय भगवत्परम् - श्रीहरीच आहे श्रेष्ठ ज्याला अशा योगमायासु - योगमायेमध्ये निष्णातम् - कुशल अशा मुनिम् - ऋषिरूप अशा स्वायम्भुवं मनुम् - स्वायंभुव मनूला आभ्रंशयितुम् - भ्रष्ट करण्याकरिता न शेकुः - समर्थ झाले नाहीत ॥३४॥

अतः - यास्तव विष्णोः - श्रीविष्णूच्या कथाः - कथा कुर्वतः - रचणार्‍या ब्रुवतः - बोलणार्‍या शृण्वतः - श्रवण करणार्‍या ध्यायतः - ध्यान करणार्‍या तस्य - मनुराजाचे स्वान्तरयापनाः - मन्वन्तराला घालविणारे असे यामाः - प्रहर अयातयामाः - गेला नाही रस ज्यातील असे आसन् - झाले ॥३५॥

सः - तो मनु एवम् - याप्रमाणे वासुदेवप्रसङ्गेन - श्रीहरीवरील निष्ठेने परिभूतगतित्रयः - जिंकिल्या आहेत जाग्रत, स्वप्न व सुषुप्ति त्या तीन अवस्था ज्याने असा युगानाम् एकसप्ततिम् - एकाहत्तर महायुगांच्या अवधीचे स्वान्तरम् - मन्वन्तर निन्ये - घालविता झाला ॥३६॥

वैयासे - हे व्यासपुत्रा विदुरा शारीराः - शरीरात उत्पन्न होणारे मानसाः - अन्तःकरणात उत्पन्न होणारे दिव्याः - आकाशात उत्पन्न होणारे च - आणि ये - जे मानुषाः - मनुष्यांपासून उत्पन्न होणारे च - आणि भौतिकाः - भूतांपासून उत्पन्न होणारे संति - आहेत ते - ते क्लेशाः - क्लेश हरिसंश्रयम् - श्रीहरि आहे आश्रय ज्याचा अशा प्राण्याला कथम् - कसे बाधन्ते - बाधा करतील ॥३७॥

सदा - निरंतर सर्वभूतहितः - सर्व प्राण्यांचे हित करणारा असा यः - जो मनु मुनिभिः - ऋषींनी पृष्टः - प्रश्न केलेला असा नृणाम् - मनुष्यांचे च - आणि वर्णाश्रमाणाम् - वर्ण व आश्रम यांचे नानाविधान् - अनेक प्रकारच्या शुभान् - कल्याणकारण अशा धर्मान् - धर्मांना आह - सांगता झाला ॥३८॥

एतत् - हे वर्णनीयस्य - स्तुत्य असा आदिराजस्य - पहिला राजा मनोः - मनु त्याचे अद्भुतम् - आश्चर्यकारक असे चरितम् - चरित्र ते - तुला वर्णितम् - वर्णन केले अतः पर - यापुढे तदपत्योदयं - त्याच्या अपत्यांचा उत्कर्ष शृणु - श्रवण कर ॥३९॥

तृतीयः स्कन्धः - अध्याय बाविसावा समाप्त

GO TOP