श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ३ रा - अन्वयार्थ

भगवंतांच्या अन्य लीला-चरित्रांचे वर्णन -

ततः - नंतर - स्वपित्रोः - आपल्या मातापितरांचे - शं - कल्याण - चिकीर्षया - करण्याच्या इच्छेने - बलदेवसंयुतः - बलरामासह - सः - तो श्रीकृष्ण - पुरं - मथुरा नगरीला - आगत्य - येऊन - रिपुयूथनाथं - शत्रुसमूहाचा स्वामी अशा कंसाला - तुङ्गात् - सिंहासनावरून - ओजसा - पराक्रमाने - हतं निपात्य - ठार होईल अशा रीतीने - व्यसुं - गतप्राण झालेल्या त्याला - उर्व्यां - पृथ्वीवर - व्यकर्षत् - ओढून आणता झाला. ॥१॥

सकृत् - एकदाच - प्रोक्‍तं - सांगितलेले - ब्रह्म - वेद - सविस्तरं - विस्तारपूर्वक - सांदीपनेः - सांदिपनीपासून - अधीत्य - शिकून - तस्मै - त्याला - वरं - दक्षिणा म्हणून - मृतं - मेलेल्या - पुत्रं - मुलाला - पञ्चजनोदरात् - पञ्चजननामक समुद्रात राहणार्‍या दैत्यापासून - प्रादात् - आणून अर्पण करिता झाला. ॥२॥

भीष्मकन्यया - भीष्मक राजाची कन्या जी रुक्मिणी तिने - श्रियः - लक्ष्मीच्या - सवर्णेन - समान असणार्‍या आपल्या सौंदर्याने - ये - जे - राजानः - राजे - समाहूतः - बोलाविले होते - एषां मिषतां - त्यांच्यासमक्ष - मूर्ध्नि - मस्तकावर - पदं - पायाला - दधत् - ठेवणारा - गान्धर्ववृत्त्या - गान्धर्व नामक विवाहविधीने - बुभूषया - ऐश्वर्य उपभोगण्याच्या इच्छेने - सुपर्णः - गरूड - स्वभागं - आपल्या भागाला - इव - अशाप्रमाणे - जह्रे - हरण करिता झाला. ॥३॥

अविद्धनसः - नाक टोचून वेसण न घातलेल्या - ककुद्मतः - व ज्यांच्या पाठीवर मोठमोठी कोवळी आली आहेत अशा दांडग्या बैलांना - दमित्वा - दमवून - स्वयंवरे - स्वयंवरामध्ये - नाग्नजितीं - नग्नजित् राज्याच्या कन्येला - उवाह - वरिता झाला - अक्षतः - स्वतः सुरक्षित राहिलेला - तद्भग्नमानान् अपि - त्यामुळे अपमान पावलेली असूनसुद्धा - गृध्यतः - राज्यकन्येच्या प्राप्तीविषयी आशाळभूत झालेल्या - शस्त्रभृतः - शस्त्रधारी - अज्ञान् - मूर्ख राजांना - स्वशस्त्रैः - आपल्या शस्त्रांनी - जघ्ने - मारिता झाला ॥४॥

प्रभुः - श्रीकृष्ण - ग्राम्यः इव - सामान्य गावंढळाप्रमाणे - प्रियायाः - पत्नीचे - प्रियं - प्रिय - विधित्सुः - करण्यास इच्छिणारा - द्युतरुं - स्वर्गातील वृक्षाला - आर्च्छ्त् - इच्छिता झाला - यदर्थे - ज्याकरिता - वज्री - इंद्र - रुषा - रागाने - अंधः - धुंद झालेला - सगणः - देवगणांसह - तं - त्या श्रीकृष्णाच्या अंगावर - आद्रवत् - धावत आला - नूनं - खरोखर - वधूंना - बायकांचा - अयं - हा इंद्र - क्रीडामृगः - खेळातला हरिणच की काय असा होता ॥५॥

वपुषा - शरीराने - खं - आकाशाला - ग्रसन्तं - गिळणार्‍या - मृधे - युद्धात - सुनाभोन्मथितं - चक्राने मारलेल्या - सुतं - पुत्राला - आमन्त्रितः - प्रार्थना केलेला - प्रभुः - श्रीकृष्ण - शेषं - शिल्लक राहिलेल्या भागाला - तत्तनयाय - त्याच्या मुलाला - दत्त्वा - देऊन - तत् - त्यानंतर - अन्तःपुरं - अन्तःपुरात - आविवेश - गेला ॥६॥

तत्र - तेथे - कुजेन - पृथ्वीच्या पुत्राने - आहृताः - आणिलेल्या - ताः - त्या - नरदेवकन्याः - राजकन्या - आर्तबन्धुं - पीडलेल्यांना सहाय्य करणार्‍या - हरिं - श्रीकृष्णाला - दृष्ट्‌वा - पाहून - सद्यः उत्थाय - उठून - प्रहर्षव्रीडानुरागप्रहितावलोकैः - आनंद, लज्जा व प्रेमपूर्वक अवलोकन ह्यांनी - तं - त्या श्रीकृष्णाला - जगृहुः - वरित्या झाल्या ॥७॥

स्वमायया - आपल्या मायेने - अनुरूपः - अनुकूल रूप धारण करणारा - नाना गारेषु - अनेक मंदिरांमध्ये - एकस्मिन् - एकाच - मुहूर्ते - मुहूर्तावर - सविधं - यथाविधि - आसां - ह्या - योषितां - स्त्रियांच्या - पाणीन् - हातांना - जगृहे - घेता झाला म्हणजे त्यांच्याशी विवाह लाविता झाला. ॥८॥

तासु - त्या स्त्रियाचे ठिकाणी - सर्वतः - सर्व बाजूने - आत्मतुल्यानि - स्वतःसारख्या - अपत्यानी - मुलांना - एकैकस्यां - प्रत्येकीच्या ठिकाणी - दश दश - दहा दहा - इति - अशा संख्येने - प्रकृतेः - मायेचा - विबुभूषया - अधिक प्रसार व्हावा या इच्छेने - अजनयत् - उत्पादिता झाला ॥९॥

अनीकैः - सैन्यांनी - पुरं - नगराला - रुन्धतः - वेढा घालून नाकेबंदी करणार्‍या - कालमागध शाल्वादीन् - कालयवन,जरासंध व शाल्व इत्यादिकांना - स्वयं - स्वतः - अजीघनत् - मारिता झाला - स्वपुंसां - आपली भक्‍ति करणार्‍या पुरुषांना - दिव्यं - दैदीप्यमान - तेजः - तेजाला - आदिशत् - देता झाला ॥१०॥

शम्बरं - शम्बरासुराला - द्विविदं - द्विविद नामक वानराला - बाणं - बाणासुराला - मुरं - मुर दैत्याला - च - आणि - बल्वलम् एव - बल्वलाला सुद्धा - च - आणि - अन्यान् - दुसर्‍या - कान् - कित्येकांना - घातयत् - मारविता झाला - च - आणि - दंतवक्रादीन् - दंतवक्र वगैरेना - अवधीत् - मारिता झाला ॥११॥

अथ - नंतर - कुरुक्षेत्रं - कुरुक्षेत्राला - आपततां - आलेल्या - येषां - ज्यांच्या - बलैः - सैन्यांनी - भूः - पृथ्वी - चचाल - कापू लागली - तान् - त्या - ते - तुझे - भ्रातृपुत्राणां - भाऊ जे धृतराष्ट्र व पंडु यांच्या मुलांच्या - पक्षयोः - दोन पक्षांमध्ये - पतितान् - पडलेल्या - नृपान् - राजांना - अघातयत् - मारविता झाला ॥१२॥

सः - तो श्रीकृष्ण - कर्णदिःशासनसौबलांना - कर्ण, दुःशासन व शकुनि यांच्या - कुमन्त्रपाकेन - वाईट मसलतीच्या परिणामाने - हतश्रियायुषं - नष्ट झाली आहे संपत्ति व आयुष्य ज्याचे अशा - सानुचरं - सेवकांसह - सुयोधनं - दुर्योधनाला - भग्नोरुं - मांडी मोडलेला अशा तर्‍हेने - उर्व्यां - जमिनीवर - शयानं - शयन करणारा असा - पश्यन् - पाहणारा असा होत्साता - न ननन्द - संतुष्ट झाला नाही ॥१३॥

द्रोणभीष्मार्जुनभीममूलैः - द्रोण, भीष्म, अर्जुन व भीम ह्या मूलभूत पुरुषांकडून - अयं - हा - अष्टादशाक्षौहिणिकः - अठरा अक्षौहिणी सैन्यांनी होणारा - उरुभारः - मोठा भार - क्षपितः - नाहीसा केला - कियान् - हा कितीसा आहे - यत् - कारण - मदंशैः - माझ्या अंशामुळे - दुर्विषहं - असह्य - यदूनां - यादवांचे - बलं - सैन्य - आस्ते - अजून जिवंत आहे ॥१४॥

माध्व्यामदाताम्रविलोचनानां - मद्यप्राशनाने मदोन्मत्त होऊन लाल झाले आहेत डोळे ज्यांचे अशा - एषां - ह्या यदुसैन्यामध्ये - यदा - जेव्हा - मिथः - एकमेकात - विवादः - कलह - भविता - होईल - इयान् - हा - एषां - ह्यांच्या - वधोपायः - नाशाचा उपाय - अतः - ह्याहून - अन्यः - दुसरा - न - नाही - मयि - मी - उद्यते - नाश करण्यास उद्युक्‍त झालो असता - स्वयं - स्वतः - अन्तर्दधते स्म - नाश पावतील ॥१५॥

भगवान् - श्रीकृष्ण - एवं - याप्रमाणे - सञ्चिन्त्य - विचार करून - धर्मजं - धर्मराजाला - स्वराज्ये - स्वतःच्या राज्यावर - स्थाप्य - स्थापित करून - साधूनां - साधूंच्या - वर्त्म - मार्गाला - दर्शयन् - दाखविणारा होत्साता - सुहृदः - मित्रांना अर्थात् भक्‍तांना - नन्दयामास - आनन्दित करिता झाला ॥१६॥

अभिमन्युना - अभिमन्यूने - उत्तरायां - उत्तरेच्या ठिकाणी - साधु - चांगल्या रीतीने - धृतः - स्थापिलेल्या - पूरोः - पूरूचा - वंशः - वंश - द्रौण्यस्त्रसंछिन्नः - अश्वत्थाम्याच्या अस्त्राने नष्ट झाला असताही - भगवता - श्रीकृष्णाने - वै - खरोखर - पुनः - फिरून - सः - तो - धृतः - रक्षिला ॥१७॥

विभुः - श्रीकृष्ण - धर्मसुतं - धर्मराजाला - त्रिभिः - तीन - अश्वमेधैः - अश्वमेधांनी - अयाजयत् - यज्ञ करण्यास लाविता झाला - सः अपि - तो सुद्धा - अनुजैः - भावांकडून - क्ष्मां - पृथ्वीला - रक्षन् - राखणारा - कृष्णं - श्रीकृष्णाला - अनुव्रतः - अनुसरणारा होत्साता - रेमे - रममाण झाला ॥१८॥

विश्वात्मा अपि - विश्वव्यापक असूनहि - भगवान् - श्रीकृष्ण - लोकवेदपथानुगः - लौकिक व वैदिक ह्या उभय मार्गांना अनुसरणारा होत्साता - सांख्यं - सांख्यतत्वाला - आस्थितः - धरून चालणारा - असक्‍तः - अलिप्तपणाने - द्वार्वत्यां - द्वारकेत - कामान् - विषयांना - सिषेवे - सेविता झाला ॥१९॥

स्निग्धस्मितावलोकेन - प्रेमयुक्‍त हास्यपूर्वक अवलोकनाने - पीयूषकल्पया - अमृतासारख्या मधुर - वाचा - वाणीने - अनवद्येन - स्तुत्य अशा - चरित्रेण - कृत्यांनी - च - आणि - श्रीनिकेतेन - लक्ष्मीचे निवासस्थान अशा - आत्मना - स्वतःकडून ॥२०॥

क्षणदया - रात्रीमुळे - दत्तक्षणस्त्रीक्षणसौहृदः - दिला आहे ज्याने क्षणमात्रपर्यंत स्त्रियांच्या ठिकाणी प्रेम करण्याकरिता कालावधि दिला आहे असा तो श्रीकृष्ण - इमं - ह्या - लोकं - लोकाला - अमुं - दुसर्‍याला म्हणजे परलोकाला - च एव - आणिहि - यदून् - यादवांना - सुतरां - अत्यंत - रमयन् - रमविणारा - रेमे - रममाण होता झाला ॥२१॥

एवं - ह्याप्रमाणे - बृहन् - पुष्कळ - संवत्सरगणान् - वर्षसमूहांना - रममाणस्य - रममाण होणार्‍या - तस्य - त्यास - गृहमेधेषु - गार्हस्थ्यधर्माविषयी - योगेषु - व सांसारिक विषयांविषयी - विरागः - वैराग्य - समजायत - उत्पन्न झाले ॥२२॥

योगेन - योगाने - योगेश्वरं - योगश्रेष्ठ श्रीकृष्णाला - अनुव्रतः - अनुसरणारा - कः - कोणता - पुमान् - पुरुष - स्वयं - स्वतः - दैवाधिनः - दैवाच्यास्वाधीन होणारा असून - दैवाधीनेषु - दैवाच्या स्वाधीन असणार्‍या - कामेषु - विषयांवर - विस्त्रम्भेत - विश्वास ठेवील ॥२३॥

कदाचित् - एके काळी - पुर्यां - नगरीत - क्रीडद्भिः - खेळणार्‍या - यदुभोजकुमारकैः - यदुवंशातील व भोजवंशातील बालकांना - कोपिताः - क्रोधयुक्‍त केलेले - भगवन्मतकोविदाः - श्रीकृष्णाचा अभिप्राय जाणणारे - मुनयः - ऋषि - शेपुः - शाप देते झाले ॥२४॥

ततः - नंतर - कतिपयैः - कित्येक - मासैः - महिन्यांनी - संहृष्टा - आनंदाच्या भरात आलेले - वृष्णिभोजान्धकादयः - वृष्णि, भोज व अंधक वगैरे वंशांतील यादव - देवविमोहिताः - श्रीकृष्णाच्या मायेने मोहित झालेले होत्साते - रथैः - रथात बसून - प्रभासं - प्रभास क्षेत्राला - ययुः - जाते झाले ॥२५॥

तत्र - तेथे - स्नात्वा - स्नान करून - तदम्भसा - त्याच्या उदकाने - पितृन् - पितरांना - देवान् - देवांना - च - आणि - ऋषीन् - ऋषींना - एव - सुद्धा - तर्पयित्वा - तृप्त करून - अथ - नंतर - बहुगुणाः - पुष्कळ गुणांनी युक्‍त अशा - गावः - गाई - विप्रेभ्यः - ब्राह्मणांना - ददुः - देते झाले ॥२६॥

हिरण्यं - सुवर्ण - रजतं - रुपे - शय्यां - बिछाना - वासांसि - वस्त्रे - अजिनकम्बलान् - मृगचर्म व घोंगड्या किंवा शालजोड्या - यानं - पालख्या - रथान् - रथ - इभान् - हत्ती - कन्याः - कन्या - वृत्तिकरीं - उपजीविका करण्याजोगी - धरां - पृथ्वी - अपि - सुद्धा - ददुः - ह्या सर्वांना देते झाले ॥२७॥

गोविप्रार्थासवः - गाईकरिता व ब्राह्मणांकरिता ज्यांचे जगणे आहे असे - शूराः - पराक्रमी - उरुरसं - पुष्कळ रसांनी भरलेल्या - अन्नं - अन्नाला - भगवदर्पणं - श्रीकृष्णाला अर्पण करण्याच्या बुद्धीने - तेभ्यः - त्या ब्राह्मणांना - दत्त्वा - देऊन - च - आणि - मूर्धभिः - मस्तकांनी - भुवि - जमिनीवर पडून - प्रणेमुः - नमस्कार करिते झाले ॥२८॥

तृतीयः स्कन्धः - अध्याय तिसरा समाप्त

GO TOP