|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १५ वा - अन्वयार्थ
कृष्णविरहाने व्यथित पांडवांचे परीक्षिताला राज्य देऊन स्वर्गारोहण - कृष्णविश्लेषकर्शितः - श्रीकृष्णवियोगाने कृश झालेला - कृष्णसखः - कृष्ण आहे मित्र ज्याचा असा - नानाशङकास्पदं - अनेक शंका घेण्याजोग्या - रूपं - रूपाला पाहून - एवं - याप्रमाणे - भ्रात्रा - भाऊ - राज्ञा - धर्मराजाकडून - विकल्पितः - विविध तर्क केलेला - शोकेन - शोकाने - शुष्यद्वदनहृत्सरोजः - सुकून गेले आहे मुख व हृदयरूपी कमळ ज्याचे असा - हतप्रभः - निस्तेज - कृष्णः - अर्जुन - तम् एव - त्याच - विभुं - श्रीकृष्णाला - अनुध्यायन् - चिंतित - प्रतिभाषितुं - उत्तर देण्याला - न अशक्नोत् - समर्थ झाला नाही. ॥१-२॥ कृच्छ्रेण - कष्टाने - शुचं - शोकाला - संस्तभ्य - आवरून - पाणिना - हाताने - नेत्रयोः - नेत्रांना - आमृज्य - पुसून - परोक्षेण - दृष्टीआड झाल्यामुळे - समुन्नद्धप्रणयौत्कण्ठयकातरः - फार प्रेमाच्या उत्कंठेने व्याकुळ झालेला - सारथ्यादिषु - सारथ्य वगैरे कृत्यांत - सख्यं - सहवासाला - मैत्रीं - मित्रत्वाला - च - आणि - सौहृदं - साधुत्वाला - संस्मरन् - स्मरणारा - बाष्पगद्गदया - अश्रूंनी सद्गदित झालेल्या - गिरा - वाणीने - अग्रजं - ज्येष्ठ भाऊ अशा - नृपं - धर्मराजाला - इति - याप्रमाणे - आह - बोलला. ॥३-४॥ महाराज - हे धर्मराजा ! - बन्धुरूपिणा - बंधूप्रमाणे असणार्या - हरिणा - श्रीकृष्णाने - अहं - मी - वञ्चितः - फसला गेलो - येन - ज्याने - मे - माझ्या - देवविस्मापनं - देवांना विस्मित करणार्या - महत् - मोठया - तेजः - तेजाला - अपहृतं - हरण केले. ॥५॥ यथा - ज्याप्रमाणे - हि - खरोखर - एषः - हा लोक - उक्थेन - प्राणाने - रहितः - वियुक्त झालेला - मृतकः - मेलेला असे - प्रोच्यते - बोलला जातो - यस्य - ज्या श्रीकृष्णाच्या - क्षणवियोगेन - एक क्षणभर झालेल्या वियोगाने - लोकः - जग - हि - खरोखर - अप्रियदर्शनः - प्रेताप्रमाणे वाईट दिसणारे झाले. ॥६॥ यत्संश्रयात् - ज्याच्या आश्रयामुळे - मया - माझ्याकडून - स्वयंवर मुखे - स्वयंवराच्या मुख्य ठिकाणी - द्रुपदगेहं - द्रुपदराजाच्या गृहाला - उपागतानां - आलेल्या - स्मरदुर्मदानां - गर्वाने म्दोन्मत्त झालेल्या - राज्ञोः - राजांचे - तेजः - सामर्थ्य - हृतं - हरण केले गेले - च - आणि - खलु - खरोखर - सज्जीकृतेन - सज्ज केलेल्या - धनुषा - धनुष्याने - मत्स्यः - मत्स्य - अभिहृतः - विद्ध केला गेला - च - आणि - कृष्णा - द्रौपदी - अधिगता - मिळविली गेली. ॥७॥ उ - आणि - यत्सन्निधौ - जो जवळ असताना - अहं - मी - सामरगणं - देवगणांसह - इंद्रं - इंद्राला - तरसा - आवेशाने - विजित्य - जिंकून - अग्नये - अग्नीला - खाण्डवं - खांडववन - अदाम् - दिले - च - आणि - मयकृता - मयासुराने केलेली - अद्भुतशिल्पमाया - आश्चर्यजनक कलाकौशल्याने युक्त असल्यामुळे मोह उत्पन करणारी - सभा - सभा - लब्धा - मिळविली - नृपतयः - राजे - अध्वरे - यज्ञात अर्थात राजसूय यज्ञात - ते - तुला - बलिं - नजराणे - दिग्भ्यः - दाही दिशांकडून - अहरन् - देते झाले. ॥८॥ यत्तेजसा - ज्यांच्या तेजाने - आर्यः - श्रेष्ठ - गजायुतसत्त्ववीर्यः - दहा हजार हत्तींप्रमाणे उत्साह व सामर्थ्य आहे ज्याचा असा - तव - तुझा - अनुजः - धाकटा भाऊ अर्थात भीम - मखार्थे - यज्ञाकरिता - नृपशिरोङ्घ्रि - राजांच्या मस्तकावर पाय देणार्याला - अहन् - मारिता झाला. - यत् - ज्यामुळे - तेन - त्याने - प्रमथनाथमखाय - महाभैरवाला बळी देण्याकरिता - आहृताः - आणलेले - भूपाः - राजे - मोचिताः - सोडविले - तत् - त्यामुळे - ते - तुझ्या - अध्वरे - यज्ञात - बलिं - नजराण्यांना - अनयन् - आणिते झाले. ॥९॥ अधिमख - राजसूय यज्ञांत झालेल्या - क्लृप्तमहाभिषेकश्लाधिष्ठचारुकबरं - अभिषेकामुळे ज्याला फारच महत्त्व प्राप्त झाले आहे अशा सुंदर केशपाशाला - विकीर्य - विस्कळीत करून - सभायां - सभेत - स्पृष्टं - स्पर्श केला - तत्स्त्रियः - त्यांच्या स्त्रिया - ह्तेशविमुक्तकेशाः - पति मृत झाल्यामुळे केश मोकळे सोडलेल्या अशा - यः - जो - अकृत - करता झाला. ॥१०॥ यः - जो - वनं - अरण्याला - एत्य - प्राप्त होऊन - शाकान्नशिष्टं - उरलेल्या भाजीच्या पानाला - उपभुज्य - खाऊन - दुर्वाससः - दुर्वास ऋषींच्या - अरिविहितात् - शत्रूने उपस्थित केलेल्या - दुरन्तकृच्छ्रात् - महासंकटापासून - नः - आम्हाला - जुगोप - रक्षिता झाला - यतः - ज्यायोगे - यः - जो दुर्वास - अयुताग्रभुक् - दहा हजारांबरोबर भोजन करणारा - सलिले - पाण्यात - विनिमग्नसंघः - स्नानार्थ उतरलेला ऋषिसमूह - त्रिलोकीं - त्रैलोक्याला - तृप्तां - संतुष्ट झाल्याप्रमाणे - अमंस्त - मानता झाला. ॥११॥ अथ - तसाच - यत्तेजसा - ज्याच्या तेजाने - भगवान् - सर्वगुणसंपन्न - सगिरिजः - पार्वतीसह - शूलपाणिः - शंकर - युधि - युद्धात - विस्मापितः - आश्चर्याने थक्क झालेला - निजं - स्वतःच्या - अस्त्रं - अस्त्राला - मे - मला - अदात् - देता झाला - च - आणि - अन्येऽपि - दुसरे सुद्धा - अहं - मी - अमुना एव - ह्याच - कलेवरेण - शरीराने - महेन्द्रभवने - इंद्रलोकात - महत् - मोठे - आसनार्धं - अर्धे आसन - प्राप्तः - मिळविले. ॥१२॥ आजमीढ - हे अजमीढकुलोत्पन्न धर्मराजा ! - सेन्द्राः - इंद्रासह - देवाः - देव - तत्रैव - त्या स्वर्गातच - विहरतः - क्रीडा करणार्या - मे - माझ्या - गांडीवलक्षणं - गांडीव धनुष्य धारण करणार्या - यदनुभावितं - त्या श्रीकृष्णाच्या कृपेने सामर्थ्यवान बनलेल्या - भुजदण्डयुग्मं - दोन बाहुदण्डांना - अरातिवधाय - शत्रुनाशार्थ - श्रिताः - आश्रय करते झाले - तेन - त्या - भूम्ना - तेजस्वी - पुरुषेण - श्रीकृष्णाने - अद्य - आज - अहं - मी - मुषितः - फ्सविला गेलो. ॥१३॥ यद्बान्धवः - ज्याच्या आश्रयावर अवलंबून राहिलेला - एकः - एकटा - अहं - मी - अनन्तपारं - ज्याचा अंत व पार नाही अशा - अतीर्यसत्वं - ज्याच्या बलाचे उल्लंघन करता येणारे नाही अशा - कुरुबलाब्धिं - कौरवसैन्यरूपी समुद्राला - रथेन - रथाने - ततरे - तरून गेलो - च - आणि - मया - म्या - परेषां - शत्रूचे - बहुधनं - पुष्कळ द्रव्य - प्रत्याहृतं - हिरावून घेतले - च - आणि - तेजास्पदं - तेजाचे ठिकाणच की काय अशा - मणिमयं - मणिरूपी धनाला - शिरोभ्यः - मस्तकातून - हृतं - हरण केले. ॥१४॥ विभो - हे धर्मराजा - यः - जो - मम - माझ्या - अग्रेचरः - अग्रभागी चालणारा - अदभ्रराजन्यवर्यरथमण्डलमण्डितासु - श्रेष्ठ क्षत्रियांच्या रथसमूहांमुळे शोभणार्या - भीष्मकर्णगुरुशल्यचमूषु - भीष्म, कर्ण, द्रोण, व शल्य ह्यांच्या सैन्यातील - रथयूथपानां - सेनापतींची - आयुः - आयुष्ये - मनांसि - मने - च - आणि - सहः - बल - ओजः - व अस्त्रकौशल्य - दृशा - केवळ अवलोकनाने - आर्च्छत् - हरण करिता झाला. ॥१५॥ गुरुभीष्मकर्णद्रौणि - द्रोण, भीष्म, कर्ण, अश्वत्थामा, - त्रिगर्तशलसैन्धवबाह्लिकाद्यैः - सुशर्मा, शल्य, जयद्रथ व बाल्हीक वगैरे वीरांनी - निरूपितानी - सोडिलेली - अमोघमहिमानी - व्यर्थ जाणारी नाहीत सामर्थ्ये ज्यांची अशी - आसुराणि - दैत्यांची - अस्त्राणि - अस्त्रे - नृहरिदासं - नरसिंहभक्त प्रल्हाद - इव - प्रमाणे - यद्दोष्षु - ज्याच्या बाहूंवर - प्रणिहितं - अवलंबून राहिलेल्या - मा - मला - नोपस्पृशुः - स्पर्श करू शकली नाहीत. ॥१६॥ भव्याः - सत्पुरुष - अभवाय - मोक्षप्राप्तीकरिता - यत्पादपद्मं - ज्याच्या चरणकमलाला - भजन्ति - सेवितात - यदनुभावनिरस्तचित्ताः - ज्याच्या पराक्रमाने अंतःकरणहीन - रथिनः - रथांत बसलेले - अरयः - शत्रू - श्रान्तवाहं - ज्याचे घोडे दमले होते अशा - भुविष्ठं - पृथ्वीवर उतरलेल्या - मां - मला - न प्राहरन् - न ताडिते झाले - आत्मदः - आत्मपद मिळवून देणारा - ईश्वरः - श्रीकृष्ण - कुमतिना - दुर्बुद्धि अशा - मे - माझ्याकडून - सौत्ये - सारथ्य कर्मात - वृतः - योजिला. ॥१७॥ नरदेव - हे नरश्रेष्ठ धर्मराजा ! - माधवस्य - श्रीकृष्णाच्या - उदाररुचिरस्मितशोभितानि - गंभीर, सुंदर व मंदहास्य ह्यांनी शोभणारी - नर्माणि - थट्टेची भाषणे - हे पार्थ - हे कुंतीपुत्रा ! - हे अर्जुन - हे अर्जुना ! - सखे - हे मित्रा ! - कुरुनन्दन - हे कुरुवंशाला आनंद देणार्या - इति - याप्रमाणे - हृदिस्पृशानि - मनाला चटका लावणारी - संजल्पितानि - भाषणे - स्मर्तुः - स्मरणार्या - मम - माझ्या - हृदयं - अंतःकरणाला - लुठन्ति - क्षुब्ध करितात. ॥१८॥ शय्यासनाटनविकत्थनभोजनादिषु - निजणे, बसणे, फिरणे, बडबड करणे, भोजन वगैरेमध्ये - ऐक्यात् - अभेदामुळे - वयस्य - हे मित्रा ! - ऋतवान् - सत्यवक्ता - इति - याप्रमाणे - विप्रलब्धः - वंचिलेला म्हणजे तिरस्कृत केलेला - सख्युः - मित्राच्या - सखा - मित्र - इव - प्रमाणे - तनयस्य - पुत्राच्या - पितृवत् - बापाप्रमाणे - महान् - मोठा - महितया - मोठेपणामुळे - कुमतेः - दुर्बुद्धीच्या - मे - माझ्या - सर्वं - संपूर्ण - अघं - पापाला - सेहे - सहन करिता झाला. ॥१९॥ अङ्ग नृपेन्द्र - हे राजश्रेष्ठा धर्मा ! - सख्या - मित्र अशा - प्रियेण - प्रिय अशा - सुहृदा - व साधु स्वभावाच्या अशा - पुरुषोत्तमेन - पुरुषश्रेष्ठ श्रीकृष्णाने - रहितः - रहित - हृदयेन - हृदयाने - शून्यः - शून्य - सः - तो - अहं - मी - अध्वनि - वाटेत - उरुक्रमपरिग्रहं - श्रीकृष्णाच्या स्त्रियांना - रक्षन् - राखणारा - असद्भिः - दुष्ट अशा - गोपैः - गोपांनी - अबला - स्त्री - इव - प्रमाणे - विनिर्जितः - जिंकलेला - अस्मि - आहे. ॥२०॥ यतः - ज्यामुळे - नृपतयः - राजे - आनमन्ति - नमत होते - तत् - ते - वै - च - धनुः - धनुष्य - ते - ते - इषवः - बाण - सः - तो - रथः - रथ - ते - ते - हयाः - घोडे - सः - तो - अहं - मी - रथी - रथांत बसणारा वीर - भस्मन्हुतं - भस्मांत हवन केलेले - कुहकराद्धं - कपटाने मिळविलेले - ऊष्यां - क्षारभूमीत - उप्तं - पेरलेले - इव - त्याप्रमाणे - ईशरिक्तं - श्रीकृष्णविरहित - तत् - ते - सर्वं - सर्व - क्षणेन - एका क्षणात - असत् - व्यर्थ - अभूत् - झाले. ॥२१॥ राजन् - हे धर्मराजा ! - त्वया - तू - सुहृत्पुरे - द्वारकेतील - अभिपृष्टानां - विचारलेले - नः - आमचे - सुहृदा - आप्तेष्ट - विप्रशापविमूढानां - ब्राह्मणशापाने मोहित झालेले - वारुणीं - वारुणी नावाच्या - मदिरां - मद्याला - पीत्वा - पिऊन - मदोन्मथितचेतसां - मदाने धुंद झाली आहेत अंतःकरणे ज्यांची असे - अन्योन्यं - एकमेकाला - अजानताम् इव - न ओळखणारे असेच की काय - मुष्टिभिः - मुठींनी - मिथः - एकमेकात - निघ्नतां - ताडण करीत असता - चतुःपञ्च - चारपाच - अवशेषिताः - उरले. ॥२२-२३॥ यत् - ज्यामुळे - भूतानि - प्राणी - मिथः - एकमेकात - निघ्नन्ति - मारामारी करितात - च - आणि - मिथः - एकमेकांचे - भावयन्ति - पालन करितात - एतत् - हे - प्रायेण - बहुतकरून - भगवतः - षड्गुणैश्वर्यसंपन्न - ईश्वरस्य - परमेश्वराचे - विचेष्टितं - चरित्र. ॥२४॥ राजन् - हे धर्मराजा - यद्वत् - ज्याप्रमाणे - जले - पाण्यात - जलौकसां - जलचर प्राण्यांपैकी - महान्तः - मोठे - अणीयसः - लहानांना - बलिनः - बलाढय - दुर्बलान् - अशक्तांना - महान्तः - मोठे - बलिनः - बलाढय - मिथः - परस्परांना - अदन्ति - खातात - एवं - याप्रमाणे - विभुः - श्रीकृष्ण - बलिष्ठैः - बलाढय - महद्भिः - मोठया - यदुभिः - यादवांकडून - इतरान् - दुसर्यांना - यदुभिः - यादवांकडून - यदून् - यादवांना - अन्योन्य - परस्पर - ह - खरोखर - भूभारान् - पृथ्वीच्या भारांना - संजहार - हरण करिता झाला. ॥२५-२६॥ देशकालार्थ युक्तानी - देशकालाला शोभणार्या अर्थांनी युक्त - च - आणि - हृत्तापोपशमानि - हृदयांच्या तापांना शांत करणारी - गोविन्दाभिहितानि - श्रीकृष्णाची भाषणे - स्मरतः - स्मरण करणार्या - मे - माझ्या - चित्तं - अंतःकरणाला - हरन्ति - हरण करितात. ॥२७॥ एवं - याप्रमाणे - अतिगाढेन - अत्यंत दृढ अशा - सौहार्देन - प्रेमाने - कृष्णपादसरोरुहं - श्रीकृष्णाच्या चरणकमलाला - चिन्तयतः - चिंतणार्या - जिष्णोः - अर्जुनाची - मतिः - बुद्धि - शान्ता - शांत - विमला - निर्मळ - आसीत् - झाली. ॥२८॥ अर्जुनः - अर्जुन - वासुदेवाङ्घ्र्यनुध्यानपरिब्रुंहितरंहसा - श्रीकृष्णाच्या चरणाच्या चिंतनाने वाढला आहे वेग ज्याचा अशा - भक्त्या - भक्तीने - निर्मथिताशेषकषायधिषणः - नष्ट झाला आहे बुद्धीवरील सर्व मळ ज्याच्या असा झाला. ॥२९॥ प्रभुः - अर्जुन - यत् - जे - ज्ञानं - ज्ञान - भगवता - श्रीकृष्णाने - संग्राममूर्धनि - युद्धाच्या प्रारंभी - गीतं - गायिले - तत् - ते - कालकर्मतमोरुद्धं - काळ, कर्म व अज्ञान यांनी रोधिलेले - पुनः - पुन्हा - अध्यगमत् - स्मरता झाला. ॥३०॥ ब्रह्मसंपत्त्या - ब्रह्मज्ञानरूपी ऐश्वर्याने - विशोकः - शोकरहित झालेला - सञ्चिछन्नद्वैतसंशयः - व द्वैतबुद्धी व सर्व संशय पार नाहीसे झालेला - लीनप्रकृतिनैर्गुण्यात् - प्रकृति लीन होऊन प्राप्त झालेल्या नैर्गुण्यामुळे - अलिङ्गत्वात् - व सूक्ष्म शरीराच्या नाशामुळे - असंभवः - पुनर्जन्मादिरहित झाला. ॥३१॥ निभूतात्मा - स्थिरचित्त झालेला - युधिष्ठिरः - धर्मराज - भगवन्मार्गं - भगवंताच्या मार्गाला - च - आणि - यदुकुलस्य - यादव कुळाच्या - स्वंस्था - नाशाला - निशम्य - ऐकून - स्वःपथाय - स्वर्गमार्गाकरिता - मतिं - बुद्धीला - चक्रे - करिता जाला. ॥३२॥ पृथा - कुंती - अपि - सुद्धा - धनञ्जयोदितं - अर्जुनाने सांगितलेल्या - यदूनां - यादवांच्या - नाशं - नाशाला - च - आणि - तां - त्या - भगवद्गतिं - श्रीकृष्णाच्या गतीला - अनुश्रुत्य - ऐकून - एकान्तभक्त्या - आत्यंतिक अशा भक्तीने - अधोक्षजे - इंद्रियांना अगोचर न होणार्या - भगवति - परमेश्वराचे ठिकाणी - निवेशितात्मा - अर्पण केले आहे अंतःकरण जिने अशी - संसृते - संसारातून - उपरराम - पराङ्मुख झाली. ॥३३॥ अजः - श्रीकृष्ण - कण्टकेन - काटयाने - कण्टकं - काटयाला - इव - प्रमाणे - यया - जिने - भुवः - पृथ्वीच्या - भारं - भाराला - अहरत् - हरिता झाला - तां - त्या - तनूं - तनूला म्हणजे शरीराला - विजहौ - टाकता झाला - च - आणि - ईशितुः - परमेश्वराला - द्वयमपि - दोन्हीही - समम् - सारखेच. ॥३४॥ यथा - ज्याप्रमाणे - नटः - नाटकी - च - आणि - यथा - ज्याप्रमाणे - मत्स्यादिरूपाणि - मत्स्यादि स्वरूपे - धत्ते - धरतो - जह्यात् - टाकतो - येन - ज्याने - भूभारः - पृथ्वीचा भार - क्षपितः - नाहीसा केला - तत् - त्या - कलेवरं - शरीराला - जहौ - सोडता झाला. ॥३५॥ - यदा - जेव्हा - श्रवणीयसत्कथः - ऐकण्याजोग्या आहेत चांगल्या कथा ज्याच्या असा - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न्न - मुकुंदः - श्रीकृष्ण - स्वतन्वा - स्वतःच्या शरीराने - इमां - ह्या - महीं - पृथ्वीला - जहौ - सोडून जाता झाला. - तदाहः - त्या दिवसापासून - एव - च - अप्रतिबुद्धचेतसा - अज्ञानी अन्तःकरणाच्या लोकांच्या - अधर्महेतुः - अधर्माला कारणीभूत - कलिः - कलियुग - अन्ववर्तत - सुरू झाले. ॥३६॥ बुधः - ज्ञानी - युधिष्ठिरः - धर्मराज - तथात्मनि - कलिरूप बनलेल्या - राष्ट्रे - राज्यात - च - आणि - पुरे - नगरात - च - आणि - गृहे - घरात - तत्परिसर्पणं - कलीमुळे पसरत असलेल्या - लोभानृतजिह्यहिंसनादि - लोभ, असत्य, कपट, हिंसा वगैरे - अधर्मचक्रं - अधर्मसमूहाला - विभाव्य - पाहून - गमनाय - स्वर्गाला जाण्याकरिता - पर्यधात् - निश्चय करिता झाला. ॥३७॥ स्वराट् - सार्वभौम धर्मराजा - आत्मनः - स्वतःच्या - गुणैः - गुणांशी - सुसमं - तुल्य अशा - विनयिनं - विनयशील - पौत्रं - नातवाला म्हणजे परीक्षिताला - गजाह्वये - हस्तिनापुरात - तोयनीव्याः - पाणीच आहे नेसलेले वस्त्र जिचे अशा अर्थात समुद्रवलयांकित - भूमेः - पृथ्वीचा - पतिं - रक्षक राजा असा - अभ्यषिञ्चत् - अभिषेकिता झाला. ॥३८॥ ततः - नंतर - ईश्वरः - धर्मराजा - तथा - त्याप्रमाणे - शूरसेनपतिं - शूरसेनदेशाचा राजा अशा - वज्रं - वज्र नावाच्या अनिरुद्धपुत्राला - मथुरायां - मथुरेत - प्राजापत्यां - प्राजापत्य नावाच्या - इष्टिं - इष्टीला म्हणजे यज्ञीय हवन कृत्याला - निरूप्य - करून - अग्नीन् - अग्नींना - अपिबत - पिता झाला. ॥३९॥ तत्र - तेथे - तत् - ते - दुकूलवलयादिकं - रेशमी वस्त्र, सुवर्ण कंकणे वगैरे - सर्वं - सगळे - विसृज्य - टाकून - निर्ममः - माझेपणा ज्याने सोडला आहे - निरहंकारः - व मीपणा सोडलेला - सञ्चिछन्नाशेषबन्धनः - सर्व सांसारिक पाश ज्याने तोडून टाकले आहेत - वाचं - वाणीला - मनसि - मनात - तत् - ते मन - प्राणे - प्राणात - च - आणि - तं - त्या प्राणाला - इतरे - दुसर्यात म्हणजे अपानात - जुहाव - हवन करिता झाला - सोत्सर्गं - बाहेर सोडण्याच्या अपानाच्या क्रियेसह - अपानं - अपानाला - मृत्यौ - मृत्यूत - तं - त्या मृत्यूला - पञ्चत्वे - पाञ्चभौतिक तत्त्वात - हि - खरोखर - अजोहवीत - हवन करिता झाला. ॥४०-४१॥ अथ - नंतर - मुनिः - मननशील किंवा मौन धारण करणारा ऋषि - पञ्चत्वं - पाञ्चभौतिक तत्त्वाला - हुत्वा - हवनयुक्त करून - त्रित्वे - त्रिगुणात्मक तत्त्वात - च - आणि - तत् - ते त्रिगुणात्मक तत्त्व - एकत्वे - एकात्म अविद्यारूपी प्रकृतीत - अजुहोत् - हवन करिता झाला - सर्वं - सगळे - आत्मनि - आत्म्यात - आत्मानं - आत्म्याला - अव्यये - अविनाशी - ब्रह्मणि - ब्रह्मात - अजुहवीत् - हवन करिता झाला. ॥४२॥ चीरवासाः - चिंध्या पांघरलेला - निराहारः - खाणेपिणे सोडून दिलेला - बद्धवाक् - मौन धरलेला - मुक्तमूर्धजः - केस मोकळे सोडलेला - आत्मनः - स्वतःच्या - रूपं - स्वरूपाला - जडोन्मत्तपिशाचवत् - उन्मत्त किंवा पिशाच्यांप्रमाणे - दर्शयन् - दाखविणारा. ॥४३॥ अनवेक्षमाणः - इकडेतिकडे न पाहणारा - यथा - जसा - बधिरः - बहिरा - अशृण्वन् - काहीही न श्रवण करणारा - निरगात् - निघाला - महात्मभिः - माहात्म्यांनी - गतपूर्वां - पूर्वी गमन केलेल्या - उदीचीं - उत्तर - आशां - दिशेला - प्रविवेश - गेला. - परं - श्रेष्ठ - ब्रह्म - ब्रह्माला - हृदि - हृदयात - ध्यायन् - चिंतन करीत - गत - गेलेला - यतः - जेथून - न आवर्तेत - परत फिरत नाही. ॥४४॥ कृतनिश्चयाः - ज्यांचा ठाम निश्चय झाला आहे असे - सर्वे - सर्व - भ्रातरः - भीमादि भाऊ - भुवि - पृथ्वीवर - अधर्ममित्रेण - अधर्मच ज्याचा मित्र आहे अशा - कलिना - कलीने - स्पृष्टः - स्पर्शिलेल्या म्हणजे पगडा बसविलेल्या - प्रजाः - प्रजा - दृष्ट्वा - पाहून - तम् अनु - त्याच्या मागोमाग - निर्जग्मुः - गेले. ॥४५॥ साधुकृतसर्वार्थाः - चांगल्या रीतीने आचरिले आहेत धर्मादि चार पुरुषार्थ ज्यांनी असे - ते - ते पांडव - आत्मनः - स्वतःच्या जवळ - वैकुण्ठचरणाम्बुजं - श्रीकृष्णाच्या चरणकमलाला - आत्यन्तिकं - अतिशय - ज्ञात्वा - जाणुन - मनसा - मनाने - धारयामासुः - ध्यान करिते झाले. ॥४६॥ तद्ध्यानोद्रिक्तया - त्याच्या ध्यानाने वाढलेल्या - भक्त्या - भक्तीने - विशुद्धधिषणाः - शुद्धबुद्धि झालेले - ते - ते - विधूतकल्मपास्थानं - पापरहितांचे वसतिस्थान असे जे पद - तस्मिन् - त्या - परे - श्रेष्ठ अशा - नारायणपदे - भगवंताच्या पदाचे ठिकाणी - एकान्तमतयः - ज्यांची बुद्धि एकरूपाने चिकटून राहिली आहे असे - विषयात्मभिः - विषयलंपट अशा - असद्भिः - दुराचरणी पुरुषांनी - दुरवापां - मिळविण्यास कठीण अशा - गतिं - गतीला - हि - खरोखर - विरजेन - शुद्ध सात्त्विक अशा - आत्मना एव - आत्म्यानेच - अवापुः - मिळविते झाले. ॥४७-४८॥ आत्मवान् - ज्ञानी - विदुरः - विदुर - अपि - सुद्धा - प्रभासे - प्रभासक्षेत्रात - देहं - देहाला - परित्यज्य - टाकून - कृष्णावेशेन - श्रीकृष्णावरील दृढ भक्तीने - तच्चित्तः - तेथेच अन्तःकरण ठेवलेला असा - पितृभिः - पितरांसह - स्वक्षयं - स्वस्थानाला - ययौ - गेला. ॥४९॥ च - आणि - तदा - त्यावेळी - द्रौपदी - द्रौपदी - पतींनां - पतींच्या - अनपेक्षतां - निरपेक्षस्थितीला - आज्ञाय - जाणून - वासुदेवे - प्रकाशरूपाने सर्वत्र वास्तव्य करणार्या - भगवति - भगवंताचे ठिकाणी - एकान्तमतिः - एकरूप केली आहे बुद्धि जिने अशी - हि - खरोखर - तं - त्या भगवत्पदाला - आप - प्राप्त झाली. ॥५०॥ यः - जो - इति - याप्रमाणे - श्रद्धया - भक्तीने - एतत् - हे - भगवत्प्रियाणां - भगवंताला आवडत्या - पाण्डोः - पाण्डुराजाच्या - सुतानां - पुत्रांचे - स्वस्त्ययनं - कल्याणकारक - पवित्रं - पवित्र - संप्रयाणं - स्वर्गारोहण - अलं - पुष्कळ वेळा - शृणोति - ऐकतो - हरौ - परमेश्वराचे ठिकाणी - भक्तिं - भक्तीला - लब्ध्वा - मिळवून - सिद्धिं - मोक्षाला - उपैति - जातो. ॥५१॥ अध्याय पंधरावा समाप्त |