मुण्डकोपनिषद्

ॐ भद्रं कर्णेभिः श्रुणुयाम देवा भद्रं पश्येम अक्षभिर्यजत्राः ।
स्थिरैः अङ्‌गैः तुष्टुवाँसः तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ।
स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।
॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
॥ ॐ ब्रह्मणे नमः ॥


प्रास्ताविक -


वेदान्तर्गत ब्रह्मविद्येचे प्रतिपादन करण्यासाठी शब्दांकित झालेली जी श्रृति-सूत्रें आढळतात त्यांना ’उपनिषद’ म्हणतात. अशी उपनिषदें चारही वेदांच्या मंत्रसंहितेत, ब्राह्मणग्रंथांमधे व आरण्यकांमधें विखुरलेली आहेत. प्रस्तुत ’मुण्डक उपनिषद्’ हें अथर्ववेदातील उपनिषदांपैकीं एक महान् उपनिषद मानले जातें. आचार्य शंकराचार्यांनी भाष्य केलेल्या उपनिषदांमध्यें ह्याचाही समावेश आहे. अर्थात आचार्यांनी भाष्य करण्यापूर्वीही हें प्रसिद्ध होतेंच. श्रीकृष्णद्वैपायन व्यासकृत ब्रह्मसूत्रांमधेंही प्रमाणादाखल मु. उ. तील १.१.६ च्या मंत्रावर एक अधिकरण आले आहे [ अदृश्यत्वादिगुण धर्मोक्ते ब्र. सू. १.२.२१ ]. यांवरून असे दिसते कीं ब्र. सू. रचनाकालीही हें उपनिषद एक प्रमाण ग्रंथ म्हणून प्रसिद्ध होतेच. शिवाय आचार्यांच्या व्यतिरिक्त श्रीरामानुज, श्रीमध्व, श्रीनिम्बार्क, श्रीवल्लभ, श्रीचैतन्य इ. संप्रदायांतील मुख्य स्वामी वा त्यांचे संप्रदायांतील इतर शिष्यांचे ह्या उपनिषदावर व्याख्या करणारे ग्रंथ आहेत. थोडक्यांत म्हणायचे तर सर्व संप्रदाय मान्य असे हें एक महान् उपनिषद आहे.
ह्या उपनिषदाचे ’मुण्डक’ असें नांव कां पडले ?. ’क’ म्हणजे सुख. सर्वसुखांमध्ये शिरोभागरूपी ब्रह्मसुखाच्या निरूपणावरचे उपनिषद म्हणून ’क’ चे मुण्ड अर्थात् मुण्डक. विद्वानलोक दुसरे कारण सांगतात तें असे, ह्या उपनिषदांत तीन मुण्डके (प्रकरणे) असल्यामुळे हें त्रिशिरा आहे. विराट्, हिरण्यगर्भ, ईश्वर असें ब्रह्माचें तीन पाद म्हणजे तीन शिरें. ह्याच्याही पलीकडील (पर) आणि तीन्ही शिरांमध्येंही व्याप्त असलेल्या तुरीय-तत्त्व परमानंदाची प्रतिष्ठा व निरूपण तिन्ही मुण्डकांमध्यें वर्णीत आहे. म्हणून ’मुण्डक उपनिषद’.


प्रथमः मुण्डके प्रथमः खण्डः


ॐ ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता ।
स ब्रह्मविद्यां सर्वविद्या प्रतिष्ठाम् अथर्वाय ज्येष्ठपुत्राय प्राह ॥ १ ॥


अथ कबन्धी कत्यायनः उपेत्य प्रपच्छ - (एक वर्ष झाल्यावर ) कत्य प्रपौत्र कबंधीने पिप्पलाद ऋषींजवळ जाऊन विचारले - भगवन् कुतः ह वा इमाः प्रजाः प्रजायन्त इति - भगवन् , चराचर विश्वात दिसण्यार्‍या चित्रविचित्र प्रजांच्या उत्पत्तीचे मूळ कारण ( कुठून ? कशी ? ) काय ? ॥ ३ ॥


ब्रह्मा देवानां - इंद्रादि सर्व देवांमधे ब्रह्मदेव हे आद्य. पण ब्रह्मदेव म्हणजे ब्रह्म नव्हे. (पर)ब्रह्म अमर्याद, आदि-अंत रहित आहे. मनुष्याच्या तुलनेने ब्रह्मदेव अतिशय तेजस्वी असले तरी तेही एक देहधारी व्यक्ती आहेत. प्रथमः - इथे प्रथमचा अर्थ सर्वश्रेष्ठ असा आहे. सर्व देवांमधे आदि तर आहेतच पण सर्वांत श्रेष्ठही आहेत. बभूव - ’योन्यादिनिरपेक्षं बभूव इति संबभूव’ - सं म्हणजे स्वयं, ज्याची योनिद्वारा उत्पत्ति नाही असा. समाधिकाळी किंवा सुप्तावस्थेमध्ये जे स्फुर्तीरहित भासते, पण ज्याच्या शक्तिमुळे जे इंद्रियांद्वारे प्रचंड कार्य करवू शकते तें म्हणजे अंतःकरण. मनुष्याचे अज्ञात अदृष्य अशा एका शक्तीला आपण जसे अंतःकरण म्हणून नांव दिले आहे - ज्याच्याविना द्वैताचा आभास निर्माण करणारी सृष्टी उत्पन्न हो‍ऊं शकत नाही, तद्‍वत परब्रह्म ईश्वरावर अध्यारोपित अंतःकरणाचे नांव आहे ’ब्रह्मा’ अर्थात् ब्रह्मदेव. विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता - विश्वाचा स्रष्टा आणि सर्व प्रजापतिंचा अधिपति. ब्रह्मदेव सृष्टीकर्ता तर आहेतच पण त्याचे रक्षकही आहेत. स ब्रह्मविद्यां सर्वविद्या प्रतिष्ठाम् - ह्या उपनिषदाचे गुरुपद ब्रह्मदेवाकडे आहे. सर्वांत श्रेष्ठ असे ब्रह्मदेवच सर्व विद्यांमधें श्रेष्ठ अशा ब्रह्मविद्येचे प्रतिपादक हो‍ऊं शकतात. ब्रह्मविद्या सर्व विद्यांमधें श्रेष्ठ कां ? एकतर - ’ब्रह्मणा प्रोक्ता विद्या ब्रह्मविद्या’, दुसरे - ’ब्रह्मविषयाविद्या ब्रह्मविद्या’, तिसरे ’यस्मिन् विज्ञाते सर्वं विज्ञातं भवति’. ज्या विद्येने सर्वकांहीं जाणले जाते ती विद्या. अथर्वाय ज्येष्ठपुत्राय प्राह - इतरत्र ब्रह्मदेवांच्या पुत्रांचे वर्णन दिसते त्यांत त्यांचे पुत्र म्हणजे सनक, सनन्दन, सनातन व सनत्कुमार असे चार कुमार; रुद्र तसेच स्वायंभुव मनु, मरीचि, अग्नि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, वशिष्ठ, दक्ष व नारद असे दहा ऋषी; ह्यांची वर्णनें सांपडतात. पण ’अथर्व’ या नांवाचा कुठें उल्लेख दिसत नाही. कांहीं विद्वानांनी ह्याचा अर्थ लावलाय तो असा. थर्व म्हणजे अदृढ, विचलित होणारा. म्हणून अथर्वाय शब्दानें श्रद्धायुक्त, दृढनिश्चयी, इंद्रियजय झालेला आणि ब्रह्मविद्येचा जिज्ञासु अशा गुणांनी युक्त असा कोणी एक शिष्य सूचित केल्याचे दिसते. तसेच ज्येष्ठपुत्राय असेही म्हटले आहे. पुत्र दोन प्रकारचे असतात. विंदु-संतति - वीर्यापासून झालेली संतति, आणि नाद-संतति - गुरुदीक्षेने अध्यात्मिक जन्म पावलेली अशी संतति. म्हणजे शिष्यांपैकी श्रेष्ठ असा ज्येष्ठपुत्र.


पुढील मंत्रात उपनिषदाच्या परंपरेचें वर्णन आले आहे.


अथर्वणे यां प्रवदेत ब्रह्मा अथर्वा तां पुरोवाच अङ्‌गिरे ब्रह्मविद्याम् ।
स भारद्वाजाय सत्यवहाय प्राह भारद्वाजः अङ्‌गिरसे परावराम् ॥ २ ॥


ब्रह्मा यां अथर्वणे प्रवदेत - ब्रह्मदेवानें अथर्वाला ज्या विद्येचा उपदेश केला तां ब्रह्मविद्यां अथर्वा पुरा अङ्‌गिरा उवाच - सर्वप्रथम अथर्वनें ही ब्रह्मविद्या अङ्‌गिरा नामक ऋषीला सांगितली. स भारद्वाजाय सत्यवहाय प्राह - अङ्‌गिरानें ती भारद्वाज कुलोत्पन्न सत्यवहाय नामक ऋषीला सांगितली. भारद्वाज परावरां अङ्‌गिरसे (प्राह) - भारद्वाजाने ही परंपरेनें आलेली विद्या अङ्‌गिरस नांवाच्या ऋषीला सांगितली. अशा तर्‍हेने ही ब्रह्मविद्या संपूर्ण मानव जातीसाठी उपलब्ध झाली.


महान् विद्येच्या प्राप्तीसाठी शिष्यही महान असावा लगतो. कठ. उ. १.१.२१ मधें यमराज नचिकेताला म्हणतात ’देवैरत्रापि विचिकित्सितं पुरा न हि सुविज्ञेयमणुरेष धर्मः’ पूर्वी देवांनाही हा विषय न समजल्यामुळे संदेह झाला होता, कारण हा अतिसूक्ष्म धर्म सुगमतेने जाणता येण्यासारखा नाही. म्हणून त्यांनी त्याची बर्‍याप्रकारे परीक्षा केल्यावर जेव्हां त्यांना नचिकेताच्या योग्यतेची खात्री पटली, तेव्हांच त्यांनी ब्रह्मविद्या सांगण्यास प्रारंभ केला. प्रश्नोपनिषदांतही आढळते की पिप्पलाद ऋषींनी आलेल्या शिष्यांना वर्षभर आपल्या जवळ राहाण्यास सांगून, त्यांच्यावर बारीक लक्ष ठे‍ऊन, त्यांच्या योग्यतेची खात्री झाल्यावरच त्यांना उपदेश केला. हें सर्व येथें सांगण्याचे प्रयोजन म्हणजे पुढील मंत्रात ’विधिवत्’ हा शब्दप्रयोग आहे, त्यात हे सर्व आलेच असे समजायचे.


शौनको ह वै महाशालो अङ्‌गिरसं विधिवद् उपसन्नः पप्रच्छ । कस्मिन् नु भगवो विज्ञाते सर्वं इदं विज्ञातं भवति इति ॥ ३ ॥


ह शौनकः वै महाशालः - शुनक ऋषीचा पुत्र शौनक. शौनकाचा महाशाल म्हणजे महागृहस्थ असा उल्लेख करून ’गृहस्थ’देखील ब्रह्मविद्येचा अधिकारी हो‍ऊ शकतो असे सूचीत केलें आहे. म्हणजेच साधना करून परम-तत्त्व जाणण्यासाठी गृह-त्याग अनिवार्य (conditional) नाही. असे म्हणतात शौनक नैमिष्यारण्यांत यज्ञ करीत असत, आणि त्यांचे यज्ञ वर्षानुवर्षे चालत असत. त्यांचेजवळ ८८,००० ऋषी (विद्यार्थी ? ) होते. इतक्या ऋषिगणांची निवास भोजनादि व्यवस्था शौनक करीत असत. यज्ञकार्यात मधे मधें होणार्‍या विश्रांतीकाळी सुत पौराणिक कथांची प्रवचनें करीत असत. अङ्‌गिरसं विधिवत् उपसन्नः - गुरुकडून ज्ञानप्राप्तीच्या इच्छेने जाणार्‍यासाठी ज्या शरणागतीची नितांत आवश्यकता असते, त्याच्या निदर्शनाप्रित्यर्थ जो विधि विदित आहे, त्या विधिनुसार, म्हणजे हातांत समिधा घे‍ऊन, शौनक अङ्‌गिरस ऋषिंजवळ गेले. कोणता हा विधि ? विधिची कृति पाहता वाटते कीं हें तर फारच सोपें आहे. तो विधि असा. नित्यहवन करणार्‍याला समिधा (म्हणजे सुकलेल्या काटक्या) सतत लागतात. गुरुपयोगी सर्वांत उत्तम सामग्री ती हीच. अशा समिधा नम्रभावाने अर्पण करून विद्येची याचना करणें हा विधि. पण त्यामागें फार मोठी भूमिका लागते. शिष्याला कांही तयारी करावी लागते. तो विशिष्ट गुणयुक्तही (qualified) असला पाहिजे. अशा शिष्यानेंच समिधा घे‍ऊन जाणे इष्ट मानले जाते. कसा असला पाहिजे असा शिष्य ? श्रोत्रीयं ब्रह्मनिष्ठम् ह्याचे थोडे विवरण आवश्यक आहे. कारण ह्या उपनिषदाच्या शेवटच्या खण्डातील १० व्या मंत्रात आवश्यक गुणांचा उल्लेख आहे. श्रोत्रियम् - ज्याने चारपैकी निदान एका वेदाचा तरी संपूर्ण अभ्यास पूर्ण केला आहे. पण एव्हढे केले म्हणजे झाले असे नव्हे. कारण ब्रह्मचर्यपूर्वक निदान एका वेदाचा अभ्यास पूर्ण केल्याशिवाय द्विजाला विवाहाचीही अनुमति नसे. वेदानधीत्य वेदौ वा वेदं वापि यथाक्रमम् । अविप्लुतं ब्रह्मचर्या लक्षण्यां स्त्रियं उद्‍वहेत् (मनु. ३.२). ह्याव्यतिरिक्त आत्मप्रत्ययासाठी उत्तमोत्तम ग्रंथांचा सखोल अभ्यास ज्याचा झाला आहे, अशाला श्रोत्रीय म्हणतात. ग्रंथ कसा असावा ? श्रीरामदास स्वामींनी दासबोधात (७.९.३२-३४) ग्रंथाची छान व्याख्या केली आहे.


जेणें होय उपरती । अवगुण अवघे पालटती ।
जेणें चुके अधोगती । त्या नांव ग्रंथ ॥ ३२ ॥
जेणें धारिष्ट चढे । जेणें परोपकार घडे ।
जेणें विषयवासना मोडे । त्या नांव ग्रंथ ॥ ३३ ॥
जेणें ग्रंथ परत्र साधन । जेणें ग्रंथें होय ज्ञान ।
जेणें हो‍इजे पावन । त्या नांव ग्रंथ ॥ ३४ ॥


अशा श्रोत्रिय व्यक्तिला वैराग्यप्राप्ति झाली असेलच असें नाही. पण ब्रह्मविद्येच्या प्राप्तीसाठी ’वैराग्य’ आवश्यक आहे. त्याशिवाय त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणता येणार नाही आणि असे नसतांना शिष्य ब्रह्मविद्या प्राप्तीचा अधिकारी हो‍ऊं शकत नाही. आणि म्हणूनच जो श्रोत्रियही आहे, ब्रह्मनिष्ठही आहे अशा शिष्यानें समिधा घे‍ऊन गुरुपाशी जाणें हा विधि.


पुढील मंत्रात अङ्‌गिरस ऋषि उपदेश सुरू करतात -


तस्मै स होवाच । द्वे विद्ये वेदितव्ये इति ह स्म
यद् ब्रह्मविदो वदन्ति परा च एव अपरा च ॥ ४ ॥


तस्मै सः उवाच - अङ्‌गिरस ऋसि शौनकाला म्हणाले, ब्रह्मविद् इति ह स्म वदन्ति यत् - ब्रह्मज्ञानी महात्म्यांचे म्हणणे अशा प्रकारे आहे, द्वे विद्ये वेदितव्ये परा च अपरा च - ह्या जगात अभ्यासिल्या जाणार्‍या दोन प्रकारच्या विद्या आहेत. एक परा गोष्टींचे तत्त्व, आणि दुसरे अपरा गोष्टींचे ज्ञान. शौनक तर षड्शास्त्रांसहित वेदाभ्यास करूनच आलेले आहेत. मग ऋषींनी ’अपरा’ विद्यांचे उल्लेख करण्याचे कारण काय ? एकतर कोणताही अभ्यास योग्य त्या क्रमानुसार केला तर चटकन पूर्ततेला पोचतो. दुसरे म्हणजे आचार्य (श्रीशंकराचार्य) आपल्या भाष्यात म्हणतात त्याप्रमाणे, अपरा विद्या तर अविद्या ह्या वर्गातच मोडते तरीपण त्याचेही निराकरण करणें आवश्यक आहेच. कारण सिद्धांत पक्षाचे निरूपणापूर्वी पूर्वपक्षाचे निराकरण करणें हा क्रमच आहे. ब्रह्मविद्या हे गुरुकडून प्रसादरूपाने मिळणारे अनुभूतिगम्य ज्ञान आहे. तें शब्दांकित करणे अशक्यच. सर्व शास्त्रांचा अभ्यास झाल्यावर वाटते कीं गुरुजी आतां असे काय शिकवणार आहेत ज्याचा मी अभ्यास केला नाही. पण ह्या मंत्रावरून हे स्पष्ट होते की आतापर्यंत वेदांगांसहित झालेला अभ्यास म्हणजे संसारातील अणु पासून प्रकृति पर्यंतचे व्यवहारिक ज्ञान. आणि म्हणून आतापर्यंत जे शिकलास ते सर्व बुद्धिलाही चकित करणारे भासले तरी ते सर्व ’अपरा’च आहे असे बहुधा ऋषि सूचित करत असावेत.


आता वरील मंत्रात ऋषि ’परा च एव अपरा च’ म्हणाले खरे, पण पुढील मंत्रात अपरा बद्दल निरूपण सुरु करतात. कारण ? आधी अपरा विद्येचे निराकरण करायचे आहे -


तत्र अपरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्ववेदः
शिक्षा कल्पो व्याकरणं निरुक्तं छन्दो ज्योतिषं इति ।
अथ परा यया तद् अक्षरं अधिगम्यते ॥ ५ ॥


चार वेद व सहा वेदांगे ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान अपरा विद्ये-अंतर्गत समजले जाते. ऋग्वेद, यजुर्वेद सामवेद व अथर्ववेद हे चार वेद झाले. वेदमंत्रांचे उच्चारणा संबंधी नियम ज्यांत संकलित आहेत त्या शास्त्राला ’शिक्षा’ असे म्हणतात. मंत्र प्रयोगांच्या विधिचे शास्त्र म्हणजे कल्प. भाषा नियमांचे शास्त्र म्हणजे व्याकरण. मंत्रांना लयबद्ध करण्याचे शास्त्र म्हणजे छंद. निरुक्त हा एक प्रकारचा वैदिक शबदकोष. कुठलेही वैदिक कार्य करण्यासाठी काळ-वेळ ठरविण्याचे शास्त्र म्हणजे ज्योतिष शास्त्र. ही झाली वेदांची सहा अंगे. अथ यया तत् अक्षरं अधिगम्यते (सा) परा - ज्यामुळे त्या अविनाशी परमात्माचे वा परम-तत्त्वाचे ज्ञान हो‍ईल, अशा विद्येला ’परा’ विद्या म्हणतात.


यत् तत् अद्रेश्यं अग्राह्यं अगोत्रं अवर्णम्
अचक्षुः-श्रोत्रं तत् अपाणिपादं नित्यं विभुं
सर्वगतं सुसूक्ष्मं तद् अव्ययं यद् भूतयोनिं परिपश्यन्ति धीराः ॥ ६ ॥


तत् यत् अद्रेश्यं अग्राह्यं अगोत्रं अवर्णं अचक्षुः-श्रोत्रं अपाणिपादम् (आसीत्) - तो (परमेश्वर) मनुष्यास जाणीवेच्या कक्षात येणारा नाही, ग्रहण करता येण्यासारखा नाही, त्याला मूळ नाही म्हणजे तो गोत्रहित आहे, तो रंग वा आकृतिरहित आहे, त्याला डोळे, कान इ. ज्ञानेन्द्रिये नाहीत, हात पाय इ. कर्मेंद्रियें नाहीत [पण भ.गी. १३.१३ त तर म्हणतात ’सर्वत्र पाणिपादं तत्], असा आहे. तत् यत् नित्यं विभुं सर्वगतं सुसूक्ष्मं अव्ययम् - तो नित्य, म्हणजे ज्याला जाणे येणे असते, त्याचे अस्तित्व कधी असते कधी नसते असा नसून, अस्ति भावाने सदा नित्य आहे, सर्वव्यापी, सर्वत्र पसरलेला वा सर्वत्र गति असलेला असा बृहत्, सुक्ष्माहूनही सूक्ष्म, आणि अव्यय - अपरिवर्तनशील असा आहे. तत् भूतयोनिं धीराः परिपश्यन्ति - सर्व प्राणीसमुदायाच्या उत्पत्तिचे कारणरूप असलेल्या अशा परमेश्वराचे ज्यांना ज्ञान झाले आहे, असे ज्ञानी जन (धीराः) त्या ब्रह्माला सर्वत्र पाहतात.


यथा उर्णनाभिः सृजते गृह्णते च यथा पृथिव्यां ओषधयः संभवन्ति ।
यथा सतः पुरुषात् केश-लोमानि तथा अक्षरात् संभवति इह विश्वम् ॥ ७ ॥


यथा उर्णनाभिः सृजते च गृह्णते - कोळी जसा स्वताःच्या पोटातून निर्माण झालेल्या पदार्थापासून आपणच जाळे निर्माण करतो आणि लहर आली की ते सर्व परत आपणच गिळंकृत करतो, यथा पृथिव्यां ओषधयः संभवन्ति - किंवा भूमिमध्ये जशी नाना प्रकारच्या औषधींची (वृक्ष, वनस्पती, धान्य इ.) उत्पत्ति होते, यथा सतः पुरुषात् केश-लोमानि - किंवा जसे चेतन मनुष्याच्या शरीरावर केस आणि लव यांची उत्पत्ति होते, तथा अक्षरात् इह विश्वंम् संभवति - अगदि त्याप्रमाणे त्या अविनाशी परब्रह्मापासून ह्या जगतांतील सृष्टीसहित सर्व कांही उत्पन्न होते.


तपसा चीयते ब्रह्म ततो अन्नं अभिजायते ।
अन्नात् प्राणो मनः सत्यं लोकाः कर्मसु च अमृतम् ॥ ८ ॥


ब्रह्म तपसा चीयते - तपाच्या सामर्थ्याने ब्रह्मदेव सृष्टिच्या विस्ताराला कारण झाला. इथें हे लक्षात घेणे आवश्यक आहे की तप किंवा तपश्चर्या ह्याचा जो साधारण अर्थ आपल्याला ज्ञात आहे त्या अर्थाने इथे ’तप’चा अर्थ घे‍ऊ नये. ब्रह्मदेवाचे तप फक्त संकल्परूप असते. ततः अन्नं अभिजायते - अशा तपापासूनच अन्न उत्पादनाचे सामर्थ्य व अन्नाची उत्पत्ति होते. अन्नात् प्राणो मनः सत्यं लोकाः कर्मसु च अमृतम् - अन्नापासून क्रमशः प्राण (चैतन्यशक्ति), मन, पंचमहाभूतें, प्राणी समुदाय व त्यांची स्थाने (भूलोक, स्वर्गलोक इ.), निरनिराळी कर्में आणि कर्मफळें (अमृत) यांची उत्पत्ती झाली.


यः सर्वज्ञः सर्वविद् यस्य ज्ञानमयं तापः ।
तस्माद् एतद् ब्रह्म नाम रूपम् अन्नं च जायते ॥ ९ ॥


यः सर्वज्ञः सर्वविद् - हा परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ - म्हणजे ढोबळ रूपाने सर्व कांही जाणतोच, पण सर्वविद् - म्हणजे त्याला सृष्टीतील अणु पासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक स्थावर जंगम वस्तूचे व प्रत्येक देहधारी प्राण्याचे विशेष ज्ञान आहे. यस्य ज्ञानमय तपः - असे एकमेव ज्ञान ज्याला (ज्या परमेश्वरला) आहे ते ज्ञान म्हणजेच त्याचे तप होय. एतद् ब्रह्म नाम रूपं अन्नं च जायते - ह्या परमेश्वरापासूनच हे विराट् स्वरूप विश्व तसेच नाम, रूप व भरण पोषण स्थितिसाठी आवश्यक असे अन्न उत्पन्न झाले.

वरील ६ ते ७ ह्या मंत्रांतून परब्रह्माचे निर्गुण रूप व त्याच्या अचिंत्य शक्तिचें वर्णन आले आहे. शेवटच्या मंत्रात ऋषींनी शौनकाला ’एतत् ब्रह्म च’ असे सांगतांना आपला हात सभोंवती फिरवून हे गुणयुक्त दृश्यस्वरूपातील नाम रूप असलेले सबंध विश्व म्हणजेच ब्रह्म असे सांगितले असले पाहिजे. कारण ह्या परमेश्वराच्या अनंत नामांपैकी त्याचे एक नाम ’विश्व’ असे आहे. आणि विशेष म्हणजे ’विष्णुसहस्रनाम’ यांतील परमेश्वराचे पहिले नाम आहे ’विश्वम्’.
॥ इति मुण्डकोपनिषदि प्रथममुण्डके प्रथमः खण्डः ॥॥ प्रथममुण्डके द्वितीयः खण्डः ॥


तदेतत् सत्यं मन्त्रेषु कर्माणि कवयो यान्यपश्यंस्तानि त्रेतायां बहुधा संततानि ।
तान्याचरथ नियतं सत्यकामा एष वः पन्थाः सुकृतस्य लोके ॥ १ ॥

यदा लेलायते ह्यर्चिः समिद्धे हव्यवाहने ।
तदाऽऽज्यभागावन्तरेणाऽऽहुतीः प्रतिपादयेत् ॥ २ ॥

यस्याग्निहोत्रं अदर्शं अपौर्णमासं अचातुर्मास्यं अनाग्रयणं अतिथिवर्जितं च ।
अहुतं अवैश्वदेवं अविधिना हुतमासप्तमांस्तस्य लोकान् हिनस्ति ॥ ३ ॥

काली कराली च मनोजवा च सुलोहिता या च सुधूम्रवर्णा ।
स्फुलिङ्‌गिनी विश्वरुची च देवी लेलायमाना इति सप्त जिह्वाः ॥ ४ ॥

एतेषु यश्चरते भ्राजमानेषु यथाकालं चाहुतयो ह्याददायन् ।
तं नयन्त्येताः सूर्यस्य रश्मयो यत्र देवानां पतिरेकोऽधिवासः ॥ ५ ॥

एह्येहीति तमाहुतयः सुवर्चसः सूर्यस्य रश्मिभिर्यजमानं वहन्ति ।
प्रियां वाचमभिवदन्त्योऽर्चयन्त्य एष वः पुण्यः सुकृतो ब्रह्मलोकः ॥ ६ ॥

प्लवा ह्येते अदृढा यज्ञरूपा अष्टादशोक्तमवरं येषु कर्म ।
एतच्छ्रेयो येऽभिनन्दन्ति मूढा जरामृत्युं ते पुनरेवापि यन्ति ॥ ७ ॥

अविद्यायामन्तरे वर्तमानाः स्वयं धीराः पण्डितं मन्यमानाः ।
जङ्‌घन्यमानाः परियन्ति मूढा अन्धेनैव नीयमाना यथान्धाः ॥ ८ ॥

अविद्यायां बहुधा वर्तमाना वयं कृतार्था इत्यभिमन्यन्ति बालाः ।
यत् कर्मिणो न प्रवेदयन्ति रागात् तेनातुराः क्षीणलोकाश्च्यवन्ते ॥ ९ ॥

इष्टापूर्तं मन्यमाना वरिष्ठं नान्यच्छ्रेयो वेदयन्ते प्रमूढाः ।
नाकस्य पृष्ठे ते सुकृतेऽनुभूत्वं इमं लोकं हीनतरं वा विशन्ति ॥ १० ॥

तपःश्रद्धे ये ह्युपवसन्त्यरण्ये शान्ता विद्वांसो भैक्ष्यचर्यां चरन्तः ।
सूर्यद्वारेण ते विरजाः प्रयान्ति यत्रामृतः स पुरुषो ह्यव्ययात्मा ॥ ११ ॥

परीक्ष्य लोकान् कर्मचितान् ब्राह्मणो निर्वेदमायान्नास्त्यकृतः कृतेन ।
तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम् ॥ १२ ॥

तस्मै स विद्वानुपसन्नाय सम्यक् प्रशान्तचित्ताय शमान्विताय ।
येनाक्षरं पुरुषं वेद सत्यं प्रोवाच तां तत्त्वतो ब्रह्मविद्याम् ॥ १३ ॥
॥ इति मुण्डकोपनिषदि प्रथममुण्डके द्वितीयः खण्डः ॥॥ द्वितीय मुण्डके प्रथमः खण्डः ॥


तदेतत् सत्यं यथा सुदीप्तात् पावकाद्विस्फुलिङ्‌गाः सहस्रशः प्रभवन्ते सरूपाः ।
तथाऽक्षराद्विविधाः सोम्य भावाः प्रजायन्ते तत्र चैवापि यन्ति ॥ १ ॥

दिव्यो ह्यमूर्तः पुरुषः स बाह्याभ्यन्तरो ह्यजः ।
अप्राणो ह्यमनाः शुभ्रो ह्यक्षरात् परतः परः ॥ २ ॥

एतस्माज्जायते प्रणो मनः सर्वेन्द्रियाणि च ।
खं वायुर्ज्योतिरापः पृथिवी विश्वस्य धारिणी ॥ ३ ॥

अग्नीर्मूर्धा चक्षुषी चन्द्रसूर्यौ दिशः श्रोत्रे वाग् विवृताश्च वेदाः ।
वायुः प्रणो हृदयं विश्वमस्य पद्‌भ्यां पृथिवी ह्येष सर्वभूतान्तरात्मा ॥ ४ ॥

तस्मादग्निः समिधो यस्य सूर्यः सोमात् पर्जन्य ओषधयः पृथिव्याम् ।
पुमान् रेतः सिञ्चति योषितायां बह्वीः प्रजाः पुरुषात् संप्रसूताः ॥ ५ ॥

तस्माद् ऋचः साम यजूंषि दीक्षा यज्ञाश्च सर्वे क्रतवो दक्षिणाश्च ।
संवत्सरश्च यजमानश्च लोकाः सोमो यत्र पवते यत्र सूर्यः ॥ ६ ॥

तस्माच्च देवा बहुधा संप्रसूताः साध्या मनुष्याः पशवो वयांसि ।
प्राणापानौ व्रीहियवौ तपश्च श्रद्ध सत्यं ब्रह्मचर्यं विधिश्च ॥ ७ ॥

सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिषः समिधः सप्त होमाः ।
सप्त इमे लोका येषु चरन्ति प्राणा गुहाशया निहिताः सप्त सप्त ॥ ८ ॥

अतः समुद्रा गिरयश्च सर्वेऽस्मात् स्यन्दन्ते सिन्धवः सर्वरूपाः ।
अतश्च सर्वा ओषधयो रसश्च येनैष भूतैस्तिष्ठते ह्यन्तरात्मा ॥ ९ ॥

पुरुष एवेदं विश्वं कर्म तपो ब्रह्म परामृतम् ।
एतद्यो वेद निहितं गुहायां सोऽविद्याग्रन्थिं विकिरतीह सोम्य ॥ १० ॥
॥ इति मुण्डकोपनिषदि द्वितीयमुण्डके प्रथमः खण्डः ॥॥ द्वितीय मुण्डके द्वितीयः खण्डः ॥


आविः संनिहितं गुहाचरं नाम महत्पदमत्रैतत् समर्पितम् ।
एजत्प्राणन्निमिषच्च यदेतज्जानथ सदसद्वरेण्यं परं विज्ञानाद्यद्वरिष्ठं प्रजानाम् ॥ १ ॥

यदर्चिमद्यदणुभ्योऽणु च यस्मिन् लोका निहिता लोकिनश्च ।
तदेतदक्षरं ब्रह्म स प्राणस्तदु वाङ्‌मनः ।
तदेतत्सत्यं तदमृतं तद्वेद्धव्यं सोम्य विद्धि ॥ २ ॥

धनुर्गृहीत्वौपनिषदं महास्त्रं शरं ह्युपासा निशितं सन्धयीत ।
आयम्य तद्‌भावगतेन चेतसा लक्ष्यं तदेवाक्षरं सोम्य विद्धि ॥ ३ ॥

प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते ।
अप्रमत्तेन वेद्धव्यं शरवत् तन्मयो भवेत् ॥ ४ ॥

यस्मिन् द्यौः पृथिवी चान्तरिक्षं ओतं मनः सह प्राणैश्च सर्वैः ।
तमेवैकं जानथ आत्मानं अन्या वाचो विमुञ्चथामृतस्यैष सेतुः ॥ ५ ॥

अरा इव रथनाभौ संहता यत्र नाड्यः । स एषोऽन्तश्चरते बहुधा जायमानः ।
ओमित्येवं ध्यायथ आत्मानं स्वस्ति वः पाराय तमसः परस्तात् ॥ ६ ॥

यः सर्वज्ञः सर्वविद् यस्यैष महिमा भुवि । दिव्ये ब्रह्मपुरे ह्येष व्योम्न्यात्मा प्रतिष्ठितः ।
मनोमयः प्राणशरीरनेता प्रतिष्ठितोऽन्ने हृदयं सन्निधाय ।
तद् विज्ञानेन परिपश्यन्ति धीरा आनन्दरूपममृतं यद् विभाति ॥ ७ ॥

भिद्यते हृदयग्रन्थिः छिद्यन्ते सर्वसंशयाः ।
क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे ॥ ८ ॥

हिरण्मये परे कोशे विरजं ब्रह्म निष्कलम् ।
तच्छुभ्रं ज्योतिषं ज्योतिः तद् यद् आत्मविदो विदुः ॥ ९ ॥

न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः ।
तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति ॥ १० ॥

ब्रह्मैवेदममृतं पुरस्ताद् ब्रह्म पश्चाद् ब्रह्म दक्षिणतश्चोत्तरेण ।
अधश्चोर्ध्वं च प्रसृतं ब्रह्म एव इदं विश्वमिदं वरिष्ठम् ॥ ११ ॥
॥ इति मुण्डकोपनिषदि द्वितीयमुण्डके द्वितीयः खण्डः ॥॥ तृतीय मुण्डके प्रथमः खण्डः ॥


द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते ।
तयोरन्यः पिप्पलं स्वादु अत्ति अनश्नन्नन्यो अभिचाकशीति ॥ १ ॥

समाने वृक्षे पुरुषो निमग्नो अनिशया शोचति मुह्यमानः ।
जुष्टं यदा पश्यत्यन्यमीशं अस्य महिमानमिति वीतशोकः ॥ २ ॥

यदा पश्यः पश्यते रुक्मवर्णं कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिम् ।
तदा विद्वान् पुण्यपापे विधूय निरञ्जनः परमं साम्यमुपैति ॥ ३ ॥

प्रणो ह्येष यः सर्वभूतैर्विभाति विजानन् विद्वान् भवते नातिवादी ।
आत्मक्रीड आत्मरतिः क्रियावान् एष ब्रह्मविदां वरिष्ठः ॥ ४ ॥

सत्येन लभ्यस्तपसा ह्येष आत्मा सम्यग्ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् ।
अन्तःशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो यं पश्यन्ति यतयः क्षीणदोषाः ॥ ५ ॥

सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः ।
येनाऽऽक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत् सत्यस्य परमं निधानम् ॥ ६ ॥

बृहच्च तद् दिव्यमचिन्त्यरूपं सूक्ष्माच्च तत् सूक्ष्मतरं विभाति ।
दूरात् सुदूरे तदिहान्तिके च पश्यन्त्विहैव निहितं गुहायाम् ॥ ७ ॥

न चक्षुषा गृह्यते नापि वाचा नान्यैर्देवैस्तपसा कर्मण वा ।
ज्ञानप्रसादेन विशुद्धसत्त्वस्ततस्तु तं पश्यते निष्कलं ध्यायमानः ॥ ८ ॥

एषोऽणुरात्मा चेतसा वेदितव्यो यस्मिन् प्राणः पञ्चधा संविवेश ।
प्राणैश्चित्तं सर्वमोतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवत्येष आत्मा ॥ ९ ॥

यं यं लोकं मनसा संविभाति विशुद्धसत्त्वः कामयते यांश्च कामान् ।
तं तं लोकं जयते तांश्च कामान् तस्मादात्मज्ञं ह्यर्चयेत् भूतिकामः ॥ १० ॥
॥ इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके प्रथमः खण्डः ॥॥ तृतीयमुण्डके द्वितीयः खण्डः ॥


स वेदैतत् परमं ब्रह्म धाम यत्र विश्वं निहितं भाति शुभ्रम् ।
उपासते पुरुषं ये ह्यकामास्ते शुक्रमेतदतिवर्तन्ति धीराः ॥ १ ॥

कामान् यः कामयते मन्यमानः स कामभिर्जायते तत्र तत्र ।
पर्याप्तकामस्य कृतात्मनस्तु इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः ॥ २ ॥

नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन ।
यमेवैष वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनूं स्वाम् ॥ ३ ॥

नायमात्मा बलहीनेन लभ्यो न च प्रमादात् तपसो वाप्यलिङ्‌गात् ।
एतैरुपायैर्यतते यस्तु विद्वान् तस्यैष आत्मा विशते ब्रह्मधाम ॥ ४ ॥

संप्राप्यैनमृषयो ज्ञानतृप्ताः कृतात्मानो वीतरागाः प्रशान्ताः
ते सर्वगं सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवाविशन्ति ॥ ५ ॥

वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः संन्यासयोगाद् यतयः शुद्धसत्त्वाः ।
ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृताः परिमुच्यन्ति सर्वे ॥ ६ ॥

गताः कलाः पञ्चदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु ।
कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परेऽव्यये सर्वे एकीभवन्ति ॥ ७ ॥

यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रे ऽस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय ।
तथा विद्वान् नामरूपाद्विमुक्तः परात्परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥ ८ ॥

स यो ह वै तत् परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति नास्याब्रह्मवित्कुले भवति ।
तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रन्थिभ्यो विमुक्तोऽमृतो भवति ॥ ९ ॥

तदेतदृचाऽभ्युक्तम् । क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठाः स्वयं जुह्वत एकर्षिं श्रद्धयन्तः ।
तेषामेवैतां ब्रह्मविद्यां वदेत शिरोव्रतं विधिवद् यैस्तु चीर्णम् ॥ १० ॥

तदेतत् सत्यं ऋषिरङ्‌गिराः पुरोवाच नैतदचीर्णव्रतोऽधीते ।
नमः परमऋषिभ्यो नमः परमऋषिभ्यः ॥ ११ ॥
॥ इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके द्वितीयः खण्डः ॥॥ इत्यथर्ववेदीय मुण्डकोपनिषत्समाप्ता ॥

ॐ भद्रं कर्णेभिः श्रुणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
स्थिरैरङ्‌गैस्तुष्टुवाँसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः ।
स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।
॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥