![]() |
॥ श्रीमत् दासबोध ॥ दशक दुसरा : मूर्खलक्षणांचा समास पहिला : मूर्खलक्षण ॥ श्रीराम ॥ श्राव्य फितीत केवळ ठळक फॉंट मधील श्लोक आहेत : [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] ॐ नमोजि गजानना । येकदंता त्रिनयना । वंदून सद्गुरुचरण । करून रघुनाथस्मरण । येक मूर्ख येक पढतमूर्ख । उभय लक्षणीं कौतुक । जे प्रपंचिक जन । जयांस नाहीं आत्मज्ञान । सांडून सर्वही गोत । स्त्रीआधेन जीवित । समर्थावरी अहंता । अंतरीं मानी समता । आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति । आपुलीं धरूनियां दुरी । पराव्यासीं करी मीत्री । मान अथवा अपमान । स्वयें करी परिच्छिन्न । धरून परावी आस । प्रेत्न सांडी सावकास । घरीं विवेक उमजे । आणि सभेमध्यें लाजे । औषध न घे असोन वेथा । पथ्य न करी सर्वथा । संगेंविण विदेश करी । वोळखीविण संग धरी । आपणास जेथें मान । तेथें अखंड करी गमन । सेवक जाला लक्ष्मीवंत । तयाचा होय अंकित । विद्या वैभव ना धन । पुरुषार्थ सामर्थ्य ना मान । लंडी लटिका लाबाड । कुकर्मी कुटीळ निचाड । जिवलगांस परम खेदी । सुखाचा शब्द तोहि नेदी । आपणास राखे परोपरी । शरणागतांस अव्हेरी । जैसें जैसें करावें । तैसें तैसें पावाअवें । पुरुषाचेनि अष्टगुणें । स्त्रियांस ईश्वरी देणें । देवद्रोही गुरुद्रोही । मातृद्रोही पितृद्रोही । परपीडेचें मानी सुख । पससंतोषाचें मानी दुःख । सांडूनियां जगदीशा । मनुष्याचा मानी भर्वसा । संसारदुःखाचेनि गुणें । देवास गाळी देणें । अनीतीनें द्रव्य जोडी । धर्म नीति न्याय सोडी । घरीं असोन सुंदरी । जो सदांचा परद्वारी । आपुलें अर्थ दुसयापासीं । आणी दुसयाचें अभिळासी । अतिताचा अंत पाहे । कुग्रामामधें राहे । लक्ष्मी आलियावरी । जो मागील वोळखी न धरी । आपलें काज होये तंवरी । बहुसाल नम्रता धरी । अक्षरें गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं । ऐसीं हें मूर्खलक्षणें । श्रवणें चातुर्य बाणे । लक्षणें अपार असती । परी कांहीं येक येथामती । इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे |
समास दुसरा : उत्तम लक्षण ॥ श्रीराम ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रोतां व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण । विचारेंविण बोलों नये । विवंचनेविण चालों नये । जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । निंदा द्वेष करूं नये । असत्संग धरूं नये । वक्तयास खोदूं नये । ऐक्यतेसी फोडूं नये । तोंडाळासि भांडों नये । वाचाळासी तंडों नये । आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये । सुखा आंग देऊं नये । प्रेत्न पुरुषें सांडूं नये । शोच्येंविण असों नये । मळिण वस्त्र नेसों नये । व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये । आपल्याची गोही देऊं नये । आपली कीर्ती वर्णूं नये । धूम्रपान घेऊं नये । उन्मत्त द्रव्य सेवूं नये । देखिली वस्तु चोरूं नये । बहुत कृपण होऊं नये । येकाचा घात करूं नये । लटिकी गोही देऊं नये । अल्पधनें माजों नये । हरिभक्तीस लाजों नये । मूर्खासीं संमंध पडों नये । अंधारीं हात घालूं नये । स्नानसंध्या सांडूं नये । कुळाचार खंडूं नये । देवाचा नवस बुडऊं नये । आपला धर्म उडऊं नये । गुरुविरहित असों नये । नीच यातीचा गुरु करूं नये । इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे |
समास तिसरा : कुविद्या लक्षण ॥ श्रीराम ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] ऐका कुविद्येचीं लक्षणें । अति हीनें कुलक्षणें । श्लोक ॥ दंभो दर्पो । अभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च । काम क्रोध मद मत्सर । लोभ दंभ तिरस्कार । इछ्या वांछ्या चिकिछ्या निंदा । आनित्य ग्रामणी मस्ती सदा । नेणे आणी नायके । न ये आणी न सीके । अज्ञान आणी अविस्वासी । छळवादी आणी दोषी । कनिष्ठ आणी गर्विष्ठ । नुपरतें आणी नष्ट । अभिमानी आणी निसंगळ । वोडगस्त आणी खळ । अल्पमती आणी वादक । दीनरूप आणि भेदक । कठिणवचनी कर्कशवचनी । कापट्यवचनी संदेहवचनी । विद्याहीन वैभवहीन । कुळहीन लक्ष्मीहीन । बळहीन कळाहीन । मुद्राहीन दीक्षाहीन । युक्तिहीन बुद्धिहीन । आचारहीन विचारहीन । भक्तिहीन भावहीन । ज्ञानहीन वैराग्यहीन । समयो नेणे प्रसंग नेणे । प्रेत्न नेणे अभ्यास नेणे । इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे |
समास चवथा : भक्ति निरूपण ॥ श्रीराम ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] नाना सुकृताचें फळ । तो हा नरदेह केवळ । विधियुक्त ब्रह्मकर्म । अथवा दया दान धर्म । अनुतापें करावा त्याग । अथवा करणें भक्तियोग । पाळावी वेदांची आज्ञा । कर्मकांड उपासना । काया वाचा आणी मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें । नरदेहाचे उचित । कांहीं करावें आत्महित । हें कांहींच न धरी जो मनीं । तो मृत्यप्राय वर्ते जनीं । नाहीं संध्या नाहीं स्नान । नाहीं भजन देवतार्चन । नाहीं भक्ति नाहीं प्रेम । नाहीं निष्ठा नाहीं नेम । नाहीं नीति नाहीं न्याये । नाहीं पुण्याचा उपाये । कर्म नाहीं उपासना नाहीं । ज्ञान नाहीं वैराग्य नाहीं । उपरती नाहीं त्याग नाहीं । समता नाहीं लक्षण नाहीं । ऐसे प्रकारीचे पाहातां जन । ते जीतचि प्रेतासमान । इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे |
समास पाचवा : रजोगुण लक्षण ॥ श्रीराम ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मुळीं देह त्रिगुणाचा । सत्त्वरजतमाचा । श्लोक ॥ ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः । त्यांतहि शुद्ध आणी सबळ । तेहि बोलिजेति सकळ । रजोगुण येतां शरिरीं । वर्तणुक कैसी करी । माझें घर माझा संसार । देव कैंचा आणिला थोर । कैंचा धर्म कैंचें दान । कैंचा जप कैंचें ध्यान । धनधान्याचे संचित । मन होये द्रव्यासक्त । माझा देश माझा गांव । माझा वाडा माझा ठाव । दुसर्या चें सर्व जावें । माझेचेंचि बरें असावें । कपट आणी मत्सर । उठे देहीं तिरस्कार । संसाराचे बहुत कष्ट । कैसा होईल सेवट । कां मागें जें जें भोगिलें । तें तें मनीं आठवलें । आळस उठे प्रबळ । कर्मणुकेचा नाना खेळ । कळावंत बहुरूपी । नटावलोकी साक्षेपी । देवकारणीं लाजाळु । उदरालागीं कष्टाळु । गोडग्रासीं आळकेपण । अत्यादरें पिंडपोषण । असो ऐसा रजोगुण । लोभें दावी जन्ममरण । काया वाचा आणी मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें । येथानुशक्ती दानपुण्य । परी भगवंतीं अनन्य । आदिअंती येक देव । मध्येंचि लाविली माव । त्याचे वोळखीचें चिन्ह । सत्वगुणीं असे जाण । इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे |
समास सहावा : तमोगुण लक्षण ॥ श्रीराम ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मागां बोलिला रजोगुण । क्रियेसहित लक्षण । दुसर्यामचा प्राण घ्यावा । आपला आपण स्वयें द्यावा । अखंड भ्रांती पडे । केला निश्चय विघडे । क्षुधा जयाची वाड । नेणे कडु अथवा गोड । प्रीतिपात्र गेलें मरणें । तयालागीं जीव देणें । किडा मुंगी आणी स्वापद । यांचा करूं आवडे वध । कळह व्हावा ऐसें वाटे । झोंबी घ्यावी ऐसें उठे । युध्य देखावें ऐकावें । स्वयें युध्यचि करावें । सत्कर्में ते नावडती । नाना दोष ते आवडती । ब्रह्मवृत्तीचा उछेद । जीवमात्रास देणें खेद । परपीडेचा संतोष । निष्ठुरपणाचा हव्यास । भांडण लाऊन द्यावें । स्वयें कौतुक पाहावें । नावडे भक्ति नावडे भाव । नावडे तीर्थ नावडे देव । जेष्ठ बंधु बाप माये । त्यांचीं वचनें न साहे । निग्रह करून धरणें । कां तें टांगून घेणें । सकाम जें का अनुष्ठान । कां तें वायोनिरोधन । देवाची जो निंदा करी । तो आशाबद्धि अघोरी । ऐसें वर्ते तो तमोगुण । परी हा पतनास कारण । केल्या कर्माचें फळ । प्राप्त होईल सकळ । इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे |
समास सातवा : सत्त्वगुण लक्षण ॥ श्रीराम ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मागां बोलिला तमोगुण । जो दुःखदायक दारुण । जो भक्तांचा कोंवसा । जो भवार्णवींचा भर्वसा । जो परमसुखकारी । जो आनंदाची लहरी । ऐसा हा सत्वगुण । देहीं उमटतां आपण । ईश्वरीं प्रेमा अधिक । प्रपंच संपादणे लोकिक । अश्वदानें गजदानें । गोदानें भूमिदानें । तीर्थीं अर्पी जो अग्रारें । बांधे वापी सरोवरें । देवद्वारीं पडशाळा । पाईरीया दीपमाळा । लावीं वनें उपवनें । पुष्पवाटिका जीवनें । संध्यामठ आणि भुयेरीं । पाईरीया नदीतीरीं । नाना समग्री सुंदर । देवाळईं घाली नर । छेत्रें आणी सुखासनें । दिंड्या पताका निशाणें । थोरपण सांडून दुरी । नीच कृत्य आंगीकारी । देवालागीं उपोषण । वर्जी तांबोल भोजन । कांहीं करावा उपाये । संसारीं गुंतोन काये । सकळांचा आला वीट । परमार्थीं जो निकट । आले अतीत अभ्यागत । जाऊं नेदी जो भुकिस्त । तडितापडी दैन्यवाणें । आलें आश्रमाचेनि गुणें । होणार तैसें होत जात । प्रपंचीं जाला आघात । विषईं धांवे वासना । परी तो कदा डळमळिना । सकळांसीं नम्र बोले । मर्यादा धरून चाले । सकळ जनासीं आर्जव । नाहीं विरोधास ठाव । आपकार्याहून जीवीं । परकार्यसिद्धी करावी । नीच उत्तर साहाणें । प्रत्योत्तर न देणें । संत देखोनि धावें । परम सुख हेलावे । आवडे पुण्य संस्कार । प्रदक्षणा नमस्कार । ऐसा हा सत्वगुण सात्विक । संसारसागरीं तारक । ऐसी सत्वगुणाची स्थिती । स्वल्प बोलिलें येथामती । |
समास आठवा : सद्विद्या निरूपण ॥ श्रीराम ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] ऐका सद्विद्येचीं लक्षणें । परम शुद्ध सुलक्षणें । वृधाचारी कुळाचारी । युक्ताहारी निर्विकारी । तत्वज्ञ आणी उदासीन । बहुश्रुत आणी सज्जन । आधु पवित्र पुण्यसीळ । अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ । गोडी आवडी परमार्थप्रीती । सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती । दक्ष धूर्त योग्य तार्किक । सत्यसाहित्य नेमक भेदक । सुगड संगीत गुणग्राही । अनापेक्षी लोकसंग्रही । मित्रपणें परहितकारी । वाग्माधुर्य परशोकहारी । भाग्यवंत जयवंत । रूपवंत गुणवंत । येशवंत किर्तिवंत । शक्तिवंत सामर्थ्यवंत । असो ऐसे उत्तम गुण । हें सद्विद्यचें लक्षण । इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे |
समास नववा : विरक्त लक्षण ॥ श्रीराम ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] ऐका विरक्तांची लक्षणें । विरक्तें असावें कोण्या गुणें । मनोरथ पूर्ण होती । सकळ कामना पुरती । विरक्तें राखावें साधन । विरक्तें लावावें भजन । विरक्तें सद्क्रि या प्रतिष्ठावी । विरक्तें निवृत्ति विस्तारावी । विरक्तें भाविकें सांभाळावीं । विरक्तें प्रेमळें निववावीं । विरक्तें विमळज्ञान बोलावें । विरक्तें वैराग्य स्तवीत जावें । हरिकीर्तनें करावीं । निरूपणें माजवावीं । बहुतांस करावे परोपकार । भलेपणाचा जीर्णोद्धार । स्नान संध्या जप ध्यान । तीर्थयात्रा भगवद्भोजन । दृढ निश्चयो धरावा । संसार सुखाचा करावा । विरक्तें असावें धीर । विरक्तें असावें उदार । विरक्तें सावध असावें । विरक्तें शुद्ध मार्गें जावें । विरक्तें विरक्त धुंडावे । विरक्तें साधु वोळखावे । विरक्तें करावीं पुरश्चरणें । विरक्तें फिरावीं तीर्थाटणें । विरक्तें उपाधी करावी । आणि उदासवृत्ति न संडावी । विरक्तें असावें अंतरनिष्ठ । विरक्तें नसावें क्रियाभ्रष्ट । विरक्तें समय जाणावा । विरक्तें प्रसंग वोळखावा । हरिकथा निरूपण । सगुणभजन ब्रह्मज्ञान । विरक्तें निंदक वंदावें । विरक्तें साधक बोधावे । विरक्तें उत्तम गुण घ्यावे । विरक्तें अवगुण त्यागावे । इतुकें बोलिलें स्वभावें । त्यांत मानेल तितुकें घ्यावें । इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे |
समास दहावा : पढतमुर्ख लक्षण ॥ श्रीराम ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मागां सांगितलीं लक्षणें । मूर्खाआंगी चातुर्य बाणे । रजोगुणी तमोगुणी । कपटी कुटिळ अंतःकर्णी । समूळ ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । लक्षणें ऐकोन मानी वीट । मत्सरें करी खटपट । वक्ता अधिकारेंवीण । वग्त्रृत्वाचा करी सीण । अभ्यासाचेनि गुणें । सकळ विद्या जाणे । हस्त बांधीजे ऊर्णतंतें । लोभें मृत्य भ्रमरातें । स्त्रियंचा संग धरी । स्त्रियांसी निरूपण करी । नाहीं भक्तीचें साधन । नाहीं वैराग्य ना भजन । न मनी तीर्थ न मनी क्षेत्र । न मनी वेद न मनी शास्त्र । प्रपंचविशीं सादर । परमार्थीं ज्याचा अनादर । येथार्थ सांडून वचन । जो रक्षून बोले मन । रात्रंदिवस करी श्रवण । न संडी आपले अवगुण । निरूपणीं भले भले । श्रोते येऊन बैसले । शिष्य जाला अनधिकारी । आपली अवज्ञा करी । भरोन वैभवाचे भरीं । सद्गु२रूची उपेक्षा करी । ज्ञान बोलोन करी स्वार्थ । कृपणा ऐसा सांची अर्थ । वर्तल्यावीण सिकवी । ब्रह्मज्ञान लावणी लावी । प्रपंच गेला हातीचा । लेश नाहीं परमार्थाचा । त्यागावया अवगुण । बोलिलें पढतमूर्खाचें लक्षण । परम मूर्खामाजी मूर्ख । जो संसारीं मानी सुख । इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ॥ दशक दुसरा समाप्त ॥ ![]() |